डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

Submitted by डॉ. अभिराम दीक्षित on 17 July, 2015 - 17:21

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे. हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म विषयक मते या लेखात पाहूया . आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी - प्रगतीसाठी घटनाकारांनि काय उपाय सांगितले ते हि पाहूया.

[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]

images (3).jpgइस्लाम मध्ये समता आहे का ?

पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पुर्ण प्रकरण लिहिले आहे. त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टेग्नेशन . या प्रकराणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे वाक्य असे आहे .
"केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५)

download (1).jpg

बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदु आणि मुस्लिम अशा दोघातहि आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने दाखवले आहे. इस्लाम धर्मातील विषमता , गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात :
" इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु इस्लाम मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ इस्लाम धर्म आणि इस्लामिक देशातून झाला होता . " ( … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८)

इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा करताना आंबेडकर म्हणतात , " गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो पण त्याना मुक्त करा असे म्हणत नाही . इस्लाम धर्मानुसार गुलामाना मुक्त करण्याचे बंधन मुस्लीमावर नाहि. गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते - इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या रूपाने टिकून राहिली आहे , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पानभर दिले आहे . (८-२२९)

मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध आहे , व्यवसायावर जाती निर्धारण आहे. " (८-२२९,३०) त्यापुढे जाउन आंबेडकर लिहितात :

नक्कीच , हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि सर्व वाइट चाली आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि आहेत . अधिकच्या वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा : डॉ आंबेडकर (८-२३०)

images (4).jpg

.
मुस्लिम स्त्री हा एक दयनीय प्राणि आहे . इस्लामी धार्मिक जुलमाचे ते प्रतिक आहे अशी बाबासाहेबांची मांडणी दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी जेंव्हा धर्म घेतो तेंव्हा - त्याची चिकित्सा करताना - डॉ. आंबेडकरांच्या लेखणीला वेगळीच धार येत असे . धर्म चिकित्सा करताना बाबासाहेब निर्भिडपणे - सर्व धर्मांची चिकित्सा करत असत . हा गुण दुर्दैवाने आज लोप पावला आहे . आज भारतात इस्लाम चिकित्सा केली जात नाही हे सत्य आहे. तटस्थ , द्वेष रहित पण धारधार चिकित्सेची प्रेरणा बाबासाहेबांपासुन घेतली पाहिजे . डॉ आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात : -

" रस्त्या वर चालणार्या बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही " ( ८ - २३० , २३१)

पडदा पद्धतीच्या उगमाची आणि परिणामाची चर्चा करताना बाबासाहेब लिहितात - " बुरख्याची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभिर परिणाम झाले आहेत. मुस्लिम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे. अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याहि नितीमात्तेवर घातक परिणाम करतात. स्त्री - पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाइट प्रवृत्तीस जन्म देते हे सांगायला कोण्या मानसशास्त्रज्ञाची गरज नाही . अशा धार्मिक बंधनांमुळे लैंगिक अतिवासना आणि इतर अनैसर्गिक रोगट सवयिंचा प्रादुर्भाव या समाजात होतो . बुरख्यामुळे हिंदु मुस्लिम संवादात हि बाधा येते कारण - अतिशयोक्त वाटले तरी- हिंदुचे म्हणणे खरेच आहे कि - एका बाजूचे स्त्रीपुरुष आणि दुसर्या बाजूचे फक्त पुरुष यांचा निर्भिड संवाद होणार तरी कसा ? " (८- २३०, २३१)

जातीय स्तर आणि स्त्री / पुरुष अशा दोन्ही प्रकारची विषमता मुस्लिमात आहे आणि त्याचे समर्थन / प्रारंभ इस्लामी धर्मशास्त्रात आहे असा बाबासाहेबांचा निष्कर्ष दिसून येतो.

images (5).jpgबौद्ध धर्माचा विनाश का झाला ?

सर्व धर्मांची चिकित्सा करून झाल्यावर बाबासाहेबांना बुद्धाचा मार्ग योग्य वाटला होता. बुद्ध धम्मा च्या ऐतिहासिक उदय आणि अस्ताची त्यांनी तपशीलवार मिमांसा केली आहे. अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत . माझे सर्वात शेवटचे मत प्रमाण मानावे असे त्यांनी अनेकदा आपल्या अनुयायांना निक्षुन सांगितले आहे . त्यामुळे या विषयावर त्यांनी सर्वात शेवटी दिलेले भाषण पाहूया. साहेबांच्या महानिर्वाणापुर्वि सहा महिने २३ जून १९५६ रोजी अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत ते म्हणाले : -

" मुसलमानांनि या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून , बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्याना बूत शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत हा मुर्तिसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश ) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.….मुसलमानांनि बौद्ध व हिंदु धर्मावर आक्रमण केले होते . दोघांची मंदिरे उध्वस्त केली होती … . बर्याच बौद्ध भिक्कुची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ? हेच कळेनासे झाले . बौद्ध अनुयायी अंध:कारात चाचपडत राहिले " ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
अगदी असेच मत १० जून १९५० च्या जनता पत्रातील लेखातही व्यक्त केले आहे . ( खंड १८ -३ पान : २१५)

दुर्दैवाने घटनाकारांचे लवकरच महानिर्वाण झाले. या विषयावर ग्रंथ लिहणे जमले नाही . पण आयुष्याच्या शेवटी आंबेडकर अशा निर्णयाप्रत आलेले दिसतात कि, - मुस्लिमांकडुन विद्वान भिक्कुंचि कत्तल झाली वा त्यांना देशत्याग करावा लागला . मार्गदर्शन न मिळालेले बौद्धजन आता कोठे जातील ? तिकडे बोलघेवडे ब्राम्हण पुरोहित जन्मजात आयते तयार होत होतेच ! त्यासाठी भिक्कू प्रमाणे कठिण प्रशिक्षण - संस्काराची गरज नव्हती . इस्लामी आक्रमणामुळे वैचारिक नेतृत्व हरवलेला बौद्ध समाज पुढे ब्राम्हणी धर्माच्या तोंडप्रचारी तडाख्यात अडकला असा निष्कर्श बाबासाहेबांनी काढला आहे. आणि इस्लामी आक्रमण हे बुद्ध धर्माच्या नाशाचे एक महत्व पुर्ण कारण मानले आहे. ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )

मुस्लिम इतिहासाचे आंबेडकरी आकलन :

मुसलमान भारतात का आले ? त्यांच्या येण्या मागची कारणे - राज्य स्थापनेचे हेतू आणि भविष्यातील धार्मिक योजना याचे मुद्देसूद विवेचन घटनाकारांनि केलेले आहे. बाबासाहेब लिहितात : -

भारतातील मुस्लिम प्रवेश हे केवळ जमीन आणि लुटमार यासाठी नाहीत . आर्थिक - राजकीय कारणाप्रमाणे भारतात इस्लामचा प्रसार करणे हे धार्मिक कारणही आक्रमणा मागे महत्वाचे आहे. ( ८-५५). बाबासाहेबांनी मुस्लिम आक्रमणाचा धार्मिक हेतू सिद्ध करण्यासाठी अनेक मुस्लिम इतिहासकारांचि अवतरणे उधृत केलेली आहेत. उदा : तैमुर बादशाहाची बाबासाहेबांनी उधृत केलेली वाक्ये आहेत :

" माझ्या हिंदुस्थान वरील आक्रमणाचा हेतू काफ़िरांविरुद्धचि मोहीम चालवून त्यांना अल्लाच्या धर्मात आणणे हा आहे. प्रेषित मुहम्मदाच्या आज्ञेनुसार काफिरी श्रद्धांचे भंजन करून , सर्वदेवता समभावाचे उच्चाटन करून , देवळे आणि मुर्त्या यांच्यापासून हिंदुस्थान मुक्त केला तर मला गाझी आणि मुजाहिद म्हटले जाइल ." (८-५६)

भारतात मध्ययुगात हिंदु मुस्लिम एकता वगैरे अजिबात अस्तित्वात नव्हती. अगदी १८५७ चे बंड हा मुस्लिमांनी केलेला ब्रिटिश विरोधी जिहाद होता. सहाशे वर्ष मुसलमान या देशाचे मालक म्हणुन वावरत होते . ब्रिटिश राज्यात त्यांना हिंदुच्या समान नागरी दर्जा मिळाला हे मुस्लिमांच्या दृष्टीने अपमानास्पद होते. म्हणुन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला . १८५७ साली भारताला दार उल इस्लाम करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला तो जिहाद होता. असे आंबेडकरांचे मत होते (८-४९, २९५)

मुस्लिम हल्ल्यांमागच्या धार्मिक हेतूचे विवेचन करताना बाबासाहेब लिहितात

"इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोनच भागात केली आहे …. दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर - दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी … जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. " येथे बाबासाहेबांनी अनेक जिहादी युद्धांचे संदर्भ दिले आहेत. (८-२९५, २९६)

images.jpg

मुस्लिम आक्रमण - राज्य स्थापना - कर पद्धती यामागचे हेतू हि धार्मिक होते असे बाबासाहेबांचे मत आहे . हे मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकर कटाक्षाने मुस्लिम इतिहासकार किंवा बादशहा यांचेच संवाद आपल्या पुस्तकात पुन्हा उधृत करताना दिसतात .

झिजीया कर लादण्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काझी चा संवाद संपुर्ण पणे उधृत केला आहे . हा संवाद पुरेसा बोलका आहे .

" अल्लाह सांगतो कि हिंदुना हीन गुलामीत (धीम्मी ) ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे . कारण ते आपल्या प्रेषीतांचे कडवे शत्रू आहेत. आणि प्रेषीतांनिच आपल्याला आज्ञा केली आहे कि , हिंदुना इस्लामी बनवा नाहीतर ठार मारा , बंधक बनवा , त्यांची मालमत्ता लुटा . …. आपण सज्जन हनिफी मुस्लिम असल्यामुळे त्यांना झिजीया घेऊन सोडतो तरी.… हनिफी सोडुन इतर पंथात झीजियाचा पर्याय नाही. हिंदुपुढे दोनच पर्याय आहेत - " इस्लाम किंवा मृत्यू " (८-६३)

या उधृता नंतर निष्कर्ष काढताना आंबेडकर म्हणतात : मुहम्मद गझनी पासून अहमदशहा अब्दाली पर्यंतचि ७६२ वर्षांची कालकथा हि अशी आहे. (८-६३)

पाकिस्तान का बनले ?

डॉ. आंबेडकर फाळणीचे पुरस्कर्ते होते. हिंदु आणि मुस्लिम यांचे सहजीवन अवघड आहे . भारत अखंड राहिला तर धार्मिक संघर्ष इतके जास्त होतील कि हिंदुंचा सामजिक सुधार अशक्य होऊन बसेल त्यामुळे फाळणी करावी असे त्यांचे मत होते . पाकिस्तान बाबतीतले इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना ते म्हणतात :

"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत .काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही . इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच (low born ) आणि दर्जाहीन (without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही . "( ८ - ३०१)

पाकिस्तानवरील पुस्तकाचे एक प्रकरण राष्ट्रीय फ़्रस्ट्रेशन नावाचे आहे . त्यातील ३२८ -३३० या पानांवर बाबासाहेबांनी हिंदु मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा केलेली आहे . बाबासाहेब लिहितात " ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून भांडणे होतीच. (८-३२८) हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे. (8-229) . अकबर आणि कबीर या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही . " (८-३३०)

याचे अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : -

" इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही ..... भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला देत नाही . " (८-३३०)

images (7).jpg

अशा धार्मिक कारणांमुळे हिंदु मुस्लिम ऐक्य अशक्य आहे म्हणुन बाबासाहेबांनी फाळणीला पाठींबा दिला होता.

फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - " जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक, परिणामशुन्य राज्य बनेल- जणु जिवंत प्रेत, न पुरलेला मृतदेह " (८-३४०)

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली - बाबासाहेब म्हणाले होते. --

" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (१-१४६)

त्यावेळच्या अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे ३५% हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .

images (6).jpg

त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (१-१४६)

इशारा : हिंदु अधिक आक्रमक होत जातील

बाबासाहेबांनी ७५ वर्षा पुर्वी दिलेला इशारा आज महत्वाचा ठरताना दिसतो आहे . बाबासाहेब लिहितात :-

"मुसलमान राजकारणात गुंडगर्दि आणत आहेत .या दंगली त्याचे पुरावे आहेत. मुसलमान मुद्दाम सुटेडन जर्मन नाझिंचे अनुकरण करत आहेत. (झेक बाबतचे) . जोपर्यंत एकटे मुस्लिम आक्रमक होते तोवर हिंदु मार खात होते. भूतकाळ गेला आणि आज हे सत्य राहिले नाही . हिंदु लोक प्रतिकार शिकाले आहेत (learned to retaliate ) आणि मुस्लिमाना भोसकण्यात त्याना लाज वाटत नाही . गुंडगर्दिचा विरोध सवाई गुंडगिरीने करणे हा हिंदुचा नवा चष्मा बिभत्स आहे. ( ugly spectacle ) (८-२६९)

images (8).jpg

" मुस्लिम अतिरेक हा (native endowment) अंगभुत आहे, हिंदुपेक्षा जुना आहे आणि त्यांच्या संस्कृतीचे अंग आहे.. हिंदुचा अतिरेक हा आजकाल नव्याने प्रतिक्रिया म्हणुन तयार होतो आहे. आज या बाबतीत मुसलमान पुढे असले तरी हे असेच जर चालू राहिले तर…. कदाचित भविष्यात हिंदु त्याना मागे टाकतील . " (८-२४९)
हे दोन समाज अशाच प्रमाणे धर्मावरून भांडत राहिले तर , भारताचे काय होईल याचे चित्र बाबासाहेब आपल्यासमोर १९४० साली उभे करतात . आज फाळणी होऊन गेली आहे. काही वर्षाच्या शांततेत भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश च्या तुलनेत दैदिप्यमान प्रगती केलेली दिसते . मात्र हिंदु मुस्लिम संघर्ष राजकीय आणि धार्मिक स्वरूपात सुरूच आहे . त्यामागच्या राजकारणाची आंबेडकरांनी केलेली चिकित्सा अवश्य पाहिली पाहिजे .

धार्मिक राजकारणाचा आंबेडकरी अन्वयार्थ

हिंदु मुस्लिम राजकारणाच्या फियास्कोसाठी आंबेडकर हिंदु महासभा आणि कॉंन्ग्रेस या दोघांना जवाबदार ठरवतात . बाबासाहेब लिहितात "भाबड्या मनाच्या हिंदु सभेच्या देशभक्तांना वाटते कि हिंदुनि हिंसक पावित्रे घेतले कि मुसलमान सरळ होतील…. खरे तर हिंदु महासभा संवादाच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा आहे कारण त्याना एकता नकोच आहे. उदाहरणार्थ : ( ३५ % मुस्लिम असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या वास्तवात ) " हिंदुस्थान हिंदुचा ! " अशी घोषणा हिंदु सभेच्या अध्यक्षांचि आहे . वास्तव स्थिती पाहता हि घोषणा अतिशय अहंकारी आणि अक्षरश : अर्थहिन आहे . " (८-२७०)

कोंग्रेसच्या मुस्लिम अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या युरोप प्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . : डॉ आंबेडकर

कॉंग्रेसचेहि मुस्लिम / इस्लाम बाबतीतले धोरण पूर्णपणे चुकलेले आहे असा आंबेडकरांचा आरोप आहे. कोंग्रेसच्या धार्मिक राजकारणाला आंबेडकरांनी मुस्लिमांचा अनुनय / लांगुलचालन (Appeasement ) असे विशेषण वापरले आहे. अशी विशेषणे पाकिस्तान वरील पुस्तकात कोन्ग्रेस साठी शेकडो वेळा वापरली आहेत . एकट्या पान २७० वर लांगुलचालन (Appeasement ) हा शब्द सहा वेळा आलेला आहे. आंबेडकर लिहितात : -

" कॉंंग्रेसला अपिसमेंट आणि सेटलमेंट यातला फरक सुद्धा कळत नाही. अपिसमेंट - अनुनय म्हणजे लांगुलचालन! आक्रमकाचे हृदय जिंकण्या साठी त्यांनी केलेल्या खून, बलात्कार आणि निष्पापांच्या लूटमारी कडे दुर्लक्ष करणे हि कोङ्ग्रेसि अपिसमेंट ची नीती आहे . त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत .. सेटलमेंट म्हणजे दोन्ही बाजू समाधानी होतील अशी मर्यादित तडजोड होय . मुस्लिमाना धार्मिक आधारावर सवलती दिल्यास त्यांची आक्रमकता वाढीस लागलेली दिसते या सवलतिंचा अर्थ हिंदुचा भ्याडपणा (defeatism) असे मुस्लिम मनास वाटते. कोंग्रेसच्या अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या दोस्त राश्ट्रांप्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . " (८ - २७०)

सवाई गुंडगिरिचि आक्रमकता किवा लांगुलचालन यापैकी कोणत्याही मार्गाने हिंदु मुस्लिम प्रश्न सुटणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे.

समस्येवरील दोन उपाय

वकिली कायदे आणि सेटलमेंट करून हिंदु मुस्लिम प्रश्न हाताळावा लागतो - अपिसमेंट अथवा गुंडगिरी करून नाही - याची प्रचीती अजून भारतीय राजकारणाला झालेली नाही. फाळणी घडून भूतकाळात जमा झाली . आजच्या भारतातील हिंदु आणि मुस्लिमाना सहजीवन अपरिहार्य आहे . जुन्या मानसिकता जुने प्रश्न आजही तसेच्या तसे जिवंत आहेत . मुस्लिमांचा धार्मिक उन्माद , आक्रमकता, हिंदूची सवाई गुंडगिरी वा सवाई लांगुलचालन आजही तसेच आहे .

१) सेक्युलारीझम : यावर बाबासाहेबांनी सुचवलेला उपाय सेक्युलारीझम हा आहे . सेक्युलारीझम हा सर्व धर्म समभावाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे . त्यात धर्माचे स्थान फक्त पारलौकिक श्राद्धेपुरते मर्यादित असते. इहलोकात कसे वागावे ? किती विवाह करावेत ? बुरखा घालावा का ? याचे कोणतेच धार्मिक स्वातंत्र्य मिळत नाही . सर्व गोष्टी कायदा आणि शासनाच्या अखत्यारीत येतात . बाबासाहेबांची घटना आणि त्यातील कलमे सेक्युलर आहेत . त्यात कोणत्याहि धर्मास फाजील स्वातंत्र्य नाही . मात्र दुर्दैव असे कि याच घटनेत अनुसृत्य असणारा समान नागरी कायदा अजूनही होत नाही . कोंग्रेसच्या नाही - भाजपाच्या राज्यातही नाही .. शासन सेक्युलर रहात नाही . तलाक पिडीत मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा केला जात नाही .

download (2).jpg २) धर्म सुधारणा : मुस्लिम समाजात समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा करण्याची प्रोसेसच अस्तित्वात नाही. धर्म चिकित्सा हा विषय त्याज्य मानला गेला आहे . जी काही लाहान सहान सुधारक मंडळे आहेत ती कुराणाच्या परीभाषेबाहेर जात नाहीत . बुद्धीवादाचे समर्थन करण्यासाठी हदीस मधली पैगंबर वचने शोधली जातात. त्यामुळे मुस्लिमांचे प्रचंड नुकसान होणार आहे. विज्ञान निष्ठा आणि बुद्धिवाद याचा मुस्लिम समाजात प्रसार करणे बाबासाहेब आवश्यक मानतात. त्यासाठी त्यांनी रेनन ला उधृत केले आहे :
" इस्लाम विज्ञानाला सततच शत्रू समजत आला आहे. हे त्या धर्माचे एकनिष्ठ एकमेव सातत्य आहे . पण हे सातत्य धोकादायक आहे. इस्लामच्या दुर्दैवाने इस्लामला यश मिळत आले. विज्ञानाचा - बुद्धीवादाचा वध करून खरे तर इस्लामने स्वत:चाच वध केला आहे. जगाचे शाप घेतले आहेत आणि हीनत्व पत्करले आहे " ( ८ - २३५)
मुस्लिमांनी विज्ञान निष्ठेचा, बुद्धिवादाचा , आणि धर्म चिकित्सेचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही इतरांचेही भले होणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे .

समारोप

हिंदुच्या भल्यासाठी त्यांची धर्म चिकित्सा आणि प्रबोधन अत्यावश्यक आहे . पण मुस्लिमाना यापासून वंचित ठेवण्याचे काही कारण नाही . इस्लामची चिकित्सा केली तर हिंदुत्व वाद्यांना फायदा होतो या भ्रमातून आता बाहेर पडायला हवे . आणि इस्लाम हा मुक्तिदाता , समतेचा , शांततेचा धर्म आहे या कम्युनिस्टांनि पसरवलेल्या अंधश्रद्धेतुन हि मुक्त झाले पाहिजे . कम्युनिस्टांचे प्लेन आणि डोकी अभ्यासू असली तरी पुरोगामी वा संविधानिक निश्चित नाहीत. आपण आपले मेंदु कम्युनिस्टांकडे गहाण टाकण्याची गरज नाही .या विषयावर बाबासाहेबांचे विचार अभ्यासले पाहिजेत .

बाबासाहेबांनी इस्लामची कठोर चिकित्सा केली. त्या धर्मात समता नाही - सहिष्णुता नाही - आधुनिकता नाही - असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते . विज्ञान आणि विवेक याच्या प्रचारा शिवाय हे अशक्य आहे . इस्लाम धर्म चिकित्सा अटळ आहे. आपल्याला चिकित्सक बुद्ध्यांक वाढवावा लागणार आहे. बाबासाहेबांच्या Thoughts on Pakistan च्या मुळ आवृत्तीतल्या पहिल्या पानावरचे कोटेशन होते :

"“More brain, O Lord, more brain! or we shall mar
Utterly this fair garden we might win.”
―George Meredith

मेंदू दे देवा, मेंदु दे - बुद्धी दे देवा, बुद्धी दे
अन्यथा
मरेल विजयाची - सुनिश्चित आशा !

डॉ अभिरम दिक्षित

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]

संदर्भ ग्रंथांचे तपशील :

(1) - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(८ )- Volume 8. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(१८-३) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे : खंड १८ भाग ३ (मराठी ). उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन (२००२)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरी लेखनाच्या उद्देशाबद्दल शंका?
<<
आपल्या देशात अनेक कार्ये करताना मुहूर्त पाहिला जातो.

लेख टाकण्याचा मुहूर्त पाहिलात का? Especially wrt its content?

contexts.. always contexts...

डॉ दीक्षित तुम्ही पुना कराराबद्दल आणि शेड्युल कास्ट व इलेक्शन ह्या बद्द्ल अजून लिहू शकला असतात. तो मुद्दा खुलवायची गरज होती.

खुद्द आंबेडकरांचा स्टॅन्ड काय होता हे अजून कळायला हवे होते. बीबीसी ला ३१ डिसें १९५५ ला दिलेल्या भाषणात आंबेडकर म्हणतात,

" जर शिखांना आणि मुसलमानांना निवडणूकीत स्वतंत्र जागा मिळत असतील तर त्यांच्यापेक्षा १००० टाईम्सने स्ट्राँग असून गांधी शेड्युल कास्टला काय म्हणून नाकारतात? का? असे विचारल्यावर ते फक्त म्हणायचे की, तुम्हाला नाही कळणार. माझे म्हणणे असे आहे की त्यांना द्यायचे तर आम्हाला का नाही? दिले तर सर्वांना नाही तर कुणालाच नको हा माझा स्टॅन्ड होता. त्यावर ते (गांधीजी) गप्प बसले"

"जनरल इलेक्शन मध्येही आधी प्रि प्रायमरी इलेक्शन होऊन शेड्युल कास्टनेच त्यांचे प्रतिनिधी निवडावेत आणि मग ते निवडलेले प्रतिनिधी इलेक्शन साठी उभे राहतील. पण गांधींना ते मान्य नव्हते. त्यांनी त्यांना हवे असलेले प्रतिनिधी निवडले. आणि हे खुद्द त्यांच्या अनुयायांना पण मान्य नव्हते. परिणाम लगेच १९३७ मध्ये दिसून आला. गांधींजीच्या पॅनेलचा एकही प्रतिनिधी निवडून आला नाही ! "

मुसलमान / पाकिस्तान बद्द्ल त्यांची मत इथे वाचून काही लोकांना धक्का बसलेला दिसत आहे. खरे तर येथील लोकांनी आंबेडकरांबद्दल खरे काय वाचले आणि काय गृहित धरले आहे हे पाहण्यात मजा येईल. ( आय मिन खरेच)

मी नेहमी पाहतो की येथील गांधीवादी लगेच आंबेडकरांचे नाव पण घेतात. पण गांधी आणि आंबेडकर हे दोन ध्रुव होते. एकमेकांचे द्वेष्टे होते. त्यात आंबेडकर जरा जास्तच. गांधीइजमला आणि त्यांच्या महात्मा पदाला आंबेडकरांनी चॅलेंज केले होते.

त्याच मुलाखतीत आंबेडकर म्हणतात,

" गांधी, भारतीय इतिहासातले फार तर एक एपिसोड होते, सुवर्ण पान वगैरे नव्हते, इनफॅक्ट जेंव्हा पुना करार झाला आणि मी त्यांना जेल भेटलो तेंव्हा गांधी मध्ये एक महात्मा नसून त्यांचा हिणकस रंग मला पाहयला मिळाला. आय कुड सी इनसाईड हुमन गांधी "

"आज १९५५ मध्ये गांधींना लोकं ऑलरेडी विसरले आहेत, गांधींना जिंवत कोणी ठेवले तर ते काँग्रेस पार्टीने. अन्यथा लोक तर विसरलेच आहेत. सेलिब्रेशन म्हणून लोकं गांधींना आठवतात."

"गांधी हे दुहेरी व्यक्तीमत्व होते. गुजरात मधील गुजराथीपेपर मध्ये ते ऑर्थडॉक्स "हिंदू"सारखे लिहायचे. तर इंग्लिश हरिजन आणि यंग इंडिया मध्ये ते स्वतःला लिबरल हिंदू म्हणून प्रोजेक्ट करत. कुणीतरी हे कम्पेरिजन करायले हवे. त्यांची बायोग्राफी ही हरिजन वाचून लिहिली गेली. कुणीतरी हे सर्व करावे. अनटचेबल लोकांनी सरकारात मोठ्या पोझिशनवर काम करावे ह्याला गांधींचा फार मोठा विरोध होता. पण समजाला दाखविण्यासाठी त्यांनी देवळात हरिजनांना येऊ द्यावे म्हणून आग्रह धरला. नोबडी केअर्स दिस. देवळात एन्ट्री हीकाही मोठी घटना नाही होऊ शकत. ही हॅज नो डायनॅमिक्स इन हिम. ही डीड नॉट हॅव रियल मोटिव्ह ऑफ अपलिफ्ट "

"ही वॉज अ पोलिटिशन. आय रिफ्युज टू कॉल हिम महात्मा, ही डजन्ट डिझर्व्ह दॅट प्लेस. नॉट इव्हन फ्रॉम द पाँईट ऑफ व्हियू ऑफ हिज मोरॅलिटी "

ता क. ही सर्व मतं माझी नाहीत. आंबेडकरांची आहेत.

लेख अभ्यासपूर्ण आहे आणि आवडला..
डॉ. आंबेडकरांच्या अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीस प्रणाम..
त्यांची फाळणी वरील मते खूपच पटली..

<< मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते >> अगदी..
मी कट्टर हिंदू (म्हणजे मुस्लीम्द्वेष्टा नव्हे) असलो तरी त्याआधी मी एक सच्चा भारतीय आहे.
आजची परिस्थिती पाहता मुस्लिमांना आपल्या देशातून हाकलून लावणे वगेरे आजीबात शक्क्य नाही आणि बऱ्याच मुस्लिमांच्या बाबतीत (उदा. डॉ.कलाम, जहीर खान इ.) योग्यही नाही. त्यामुळे आता मुल्सिम लोकांच्या सुधारणेसाठी विचार होणे गरजेचे आहे असे वाटते..
याचा एक (आणि एकमेव) मार्ग हा त्यांच्यातील शिक्षणाचा टक्का वाढवणे हा आहे असे वाटते..
आज भारतीय मुस्लीमांपैकी फक्त १६% मुस्लीम युवक पदवीधर होतात. हे प्रमाण वाढवण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.
हा समाज सुशिक्षित आणि विचारी झाल्यास भारताच्या प्रगतीस नक्कीच मोठा हातभार लागेल..

पण यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे असे मला वाटते. समाजसुधारक वगेरेंच्या मात्रा यांना लागू पडतील असे वाटत नाही कारण त्यांच्यावर धर्माचा जबर पगडा आहे.
यावर ज्यांना मुस्लीम सुधारणेविषयी आस्था आहे त्यांची मते जाणून घेण्यास आवडेल.

एक भारतीय म्हणून आपण काय करू शकतो असे लेखकास (कोणालाही) काय वाटते ते जाणून घेण्यास आवडेल..

(काऊ, इब्लीस यांनी या प्रतिसादावर मत देऊ नये अमानवि.)

बाबासाहेबांनी हिण्दु धर्मातल्या रूढींवरही बरीच टीका केली आहे. शिवाय हिंदू कोड बिलाच्या वेळी त्यांना झालेला मनस्ताप सर्वश्रुत आहे. त्यावेळी समान नागरी कायदा हिंदुत्ववाद्यांना नको होता आणी पुरोगाम्यांना हवा होता. आता उलट आहे.यावर रामचांद्र गुहांचा छोटासा लेख आहे, लिंक मिळाली की डकवेन.

केदार तुमच्या प्र्स्तिसादातली बाबासाहेबांची सर्व विधाने अवतरण चिन्हात टाकाल तर बरे होइल.

साती धन्यवाद.
मी मिपावर वर्षातून एखादवेळेसच जात असल्यामुळे कोण कुठे काय काय लिहितं ते कळत नाही. Happy

कालच्याच पेपर मध्ये "मुस्लिम सत्यशोधक समाजात" फुट पडल्याची बातमी आली आहे. ही समाजोपयोगी संस्था बरचंस काम करायची पण असे दिसते की हमीद दलवाईंच्या मताला खुद्द मुस्लिम सत्यशोधक समाजात" स्थान नाही. त्याची काही कारणे व्हॅलिड असतीलही. पण मला ही संस्था आवडते.

रॅडिकल रिफॉर्म्स आणल्याशिवाय मुस्लिमांची आणि पर्यायाने "खुला नविन भारताची" प्रगती होणार नाही. आणि रॅडिकल रिफॉर्म्स मध्ये "युनिफॉर्म सिव्हिल कोड" अतिशय आवश्यक आहे. मला तरी पुढची ५० वर्षे हे काही होईल असे वाटत नाही.

तुम्ही जे लिहिले आहेत त्यात स्वतंत्र लेखाचे पोटेन्शिअल आहे >>

हो. मी खरे तर मागच्या वर्षी लेख लिहिला होता ह्यावर पण पोस्ट केला नाही. कारण इथे ती सर्व मुद्दामून दिली / असे काहीच नाही अशी हाकाटी काही आयडी उडवतात. खरे तर गांधी आणि आंबेडकर असे नाव एकत्र घेणार्‍यांची इथे एक जमात आहे, तिला खूप त्रास झाला असता. पण आता विचार करेन आणि लिहेन.

केदार | 20 July, 2015 - 11:13 नवीन
डॉ दीक्षित तुम्ही पुना कराराबद्दल आणि शेड्युल कास्ट व
इलेक्शन ह्या बद्द्ल अजून लिहू शकला असतात. तो मुद्दा
खुलवायची गरज होती.>>>>>>>>>>लेखाचा उद्देश बौद्ध आणि मुस्लिम यांच्यात भांडण लावने हा आहे,आपल्या उद्धिष्टापासून दूर जाण्याचा मुर्खपणा दिक्षित करतील असे वाटत नाही.

केदार,
छान पोस्ट .. आंबेडकरांची प्रत्येक बाबतीतील मतांना एक वैचारिक बैठक असल्याचे दिसून येते ..
बेफि +१ (वरचा प्रतिसाद)

रॅडिकल रिफॉर्म्स आणल्याशिवाय मुस्लिमांची आणि
पर्यायाने "खुला नविन भारताची" प्रगती होणार नाही.
आणि रॅडिकल रिफॉर्म्स मध्ये "युनिफॉर्म सिव्हिल कोड"
अतिशय आवश्यक आहे. मला तरी पुढची ५० वर्षे हे काही होईल
असे वाटत नाही.>>>>>>>> मुस्लिमांना असल्या रिफॉर्मची आणि युनिफॉर्म सिविल कोडची गरज नाही,शरियत सारखी अत्यंत न्यायपुर्ण व्यवस्था त्यांच्यासाठी आहे.त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही.

बाबासाहेबांनी हिण्दु धर्मातल्या रूढींवरही बरीच टीका केली आहे. शिवाय हिंदू कोड बिलाच्या वेळी त्यांना झालेला मनस्ताप सर्वश्रुत आहे. त्यावेळी समान नागरी कायदा हिंदुत्ववाद्यांना नको होता आणी पुरोगाम्यांना हवा होता >>> विकु, हे सगळे १००% खरे आहे (त्यातला बराच मनस्ताप खुद्द काँग्रेस नेतृत्वाकडूनच होत होता हे तुम्ही तितक्याच ठळकपणे लिहीले असते तर आवडले असते Happy ). पण त्याचा या लेखाशी थेट काय संबंध आहे? बाबासाहेबांची हिंदू धर्माबद्दलची मते जगजाहीर आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुस्लिम धर्मात समानता आहे ई भोंगळ मते अधूनमधून येत असतात. त्याचे खंडन या लेखातून होत आहे.

मुस्लिमांना असल्या रिफॉर्मची आणि युनिफॉर्म सिविल कोडची गरज नाही,शरियत सारखी अत्यंत न्यायपुर्ण व्यवस्था त्यांच्यासाठी आहे.त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही.
>>>>

एकच प्रश्न आहे,

मुस्लिम गुन्हेगारांना गुन्हा सिद्ध झाल्यावर शिक्षा देतानाही शरियतमध्ये सांगितल्याप्रमाणेच शिक्षा दिल्या तर चालतील का?

विजय कुलकर्णीजी,

आपल्या,

>>मात्र एवढ्या मोठ्या पुस्तकातील फक्त 'आपल्याला आवडलेले' असे मुद्दे एकत्र केल्यासारखे इथे झालेले दिसत आहे. समहाऊ, फक्त इस्लामबाबतची नकारात्मक मते लेखाच्या निमित्ताने एकत्र केल्यासारखे वाटले

सहमत.

यावर असे लिहावेसे वाटते. ( चुक भुल देणे घेणे )

आपण जिहाद, शरीयत, समान नागरी कायदा हे विषय क्षणभर बाजुला ठेऊ तरी सुध्दा भारतीय मुस्लीम स्त्रियांना

बुरखा का जाचक वाटत नाही हा प्रश्न पडतो. हा वैयक्तीक स्वातंत्र्याचा संकोच आहे असे मुस्लीम आणि इतर स्त्री स्वातंत्र्य या संदर्भात विचार करणारे यांना का वाटत नाही ?

दुसरा मुद्दा एका सामाजीक आणि आर्थीक विषयाला धरुन पुन्हा मुस्लीम स्त्रीयांशी संबंधीत आहे. शहाबानो मुद्दा जगाला माहित आहे. मेहेर की रकम आजही सुशिक्षीत मुसलमानांमध्ये किती असते याचा अंदाज घेतला तर ती अशिक्षीतांच्यात किती असेल याचाही अंदाज येईल.

यामुळे तलाकपिडीत महीला एखाद्या अमिराची चौथी बायको म्हणुनच सामान्यपणे जगु शकते अन्य सन्मानाने जगण्याचे मार्ग तिच्यासाठी बंद असतात कारण शिक्षणाचा सुध्दा अभाव असतो.

वरील मुद्यावर आपले काय म्हणणे आहे ते विस्त्रुत लिहल्यास आपला आभारी आहे.

मुस्लिम गुन्हेगारांना गुन्हा सिद्ध झाल्यावर शिक्षा
देतानाही शरियतमध्ये सांगितल्याप्रमाणेच शिक्षा दिल्या
तर चालतील का?>>>>>>>>जरुर ,का नाही, आणि फक्त मुस्लिमच का ?कुराण आणी शरियतचे नियम मानव कल्याणसाठीच आहेत.संपुर्ण जगाने शरियतचे कायदे स्विकारल्यास जगात गुन्हेगारीच राहणार नाही.

<<<<< भारतीय मुस्लीम स्त्रियांना
बुरखा का जाचक वाटत नाही हा प्रश्न पडतो. >>>>>>हिंदू स्त्रीयांना मंगळसुत्र जाचक वाटते का,तसेच बुरख्याचे आहे.

मुस्लिम मतदार संघ जेव्हा दिले गेले तेव्हा आंबेडकरसाहेबांनी देखील मागासवर्गियांकरीता वेगळा मतदार संघ हवा ही मागणी केली जेणे करून उपेक्षित राहिलेला समजा एकवटला जाऊन त्यांच्यातून एक समर्थ नेतृत्व पुढे येईल. परंतू ज्याप्रमाणे मुस्लिम लीग एकंदरीत मुख्यधारेच्या समाजापासून दुर जाउ लागली होती. वेगळ्या पाकिस्तानाची मागणी आलेली. त्याप्रमाणे मागासवर्गिय मुख्य धारेपासून वेगळे जाउ नये म्हणून गांधींनी त्यास विरोध केला. वर्षानुवर्षे उपेक्षीत समाज मुख्यधारेत आणण्याऐवजी त्याला वेगळेच ठेवावे हे गांधींना मान्य नव्हते. संपुर्ण हिंदूसमाज त्यातील विविध जातीजमाती यांचे एकत्रीकरण करून भारतीय समाज मजबूत बनावा हे उद्देश त्यावेळी पुढे होते. ते आंबेडकरसाहेबांना पटले म्हणून वेगळ्या मतदारसंघाची मागणी त्यांनी मागे घेतली. उपेक्षित समाजाला बरोबरीने स्थान मिळावे याकरीता मग राखीव जागा ही संकल्पना अस्तित्वात आली. जेणेकरून समाजातील सगळ्याच स्थरावरील प्रतिनिधींना नेतृत्व मिळेल. एका मतदारसंघात सगळ्याच जातीजमातीचे लोक असतात अशा मतदारसंघातून राखीव उमेदवार निवडून आला तर तो एक जनमान्यता मिळून आलेला असेल. ही भावना त्याच्या समाजात तसेच इतर समाजात देखील वाढीस लागेल.

अर्थात सगळेच उद्देश कल्पना पुर्णत्वास गेल्या नाही.

जाणकारांनी दुरुस्ती करावी ( केवळ जाणकारांनीच बाकीच्यांनी अक्कल पाजळू नये)

विशालदेव - बाबासाहेबांना गांधीजींचे पटले असे नव्हे. बहुधा उपोषणामुळे त्यांनी ते पटवून घेतले. त्यावेळच्या या नेत्यांमधे याच काय इतर अनेक विषयांवर मतभेद होते - आणि ते साहजिक आहे. पण सर्वांना बरोबर घेउन देश आपण हिंसा न करता स्वतंत्र करायचा आहे हा मुख्य उद्देश व त्यावर एकमत होते. स्पेसिफिक मुद्दे सगळ्यांचे सारखे होते असे नाही. सहसा नसतेच.

कुराण आणी शरियतचे नियम मानव कल्याणसाठीच आहेत.संपुर्ण जगाने शरियतचे कायदे स्विकारल्यास जगात गुन्हेगारीच राहणार नाही.
>>>>

सॉरी, कुराण आणि शरियतचा संबंध केवळ मुस्लिम धर्मियांशी आहे, बाकीच्या धर्मियांशी नाही. भारतात हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन इत्यादी धर्मियांना जर देशाचा कायदा लागू होतो तर केवळ मुस्लिमांसाठीच शरियत हे पूर्वीच्या राज्यकर्त्यांचं मताच्या लाचारीसाठी केलेलं पाप आहे.

आणि,
शरियतच्या मानव कल्याणकारी नियमांचं थैमान मध्यपूर्वेत सगळं जग पाहतं आहे.

मतभेद सर्व नेत्यांमधे असतात पण तत्कालिन परिस्थितीत मागासवर्गियांच्या मनात वेगळी भावना निर्माण करून देश स्वतंत्र करण्याच्या कामात व्यत्यय येईल हा विचार देखील आला असेल. आधीच हिंदू एकीकडे होते, मुस्लिमांना लीग आपल्याकडे खेचत होती. हिंदु मधे देखील इतर जातीजमातींमधे वितुष्ट होतेच अशा परिस्थितीत त्यांना एकत्र करण्याचे सोडून त्यांच्यात दरी वाढवली तर इंग्रजांविरुध्द कधीच एकजूट होऊन प्रतिकार करणे शक्य होणार नव्हते. हे दोन्ही नेत्यांना कल्पना होती असा अंदाज आहे.

लोकमान्य आणि गांधींमधे देखील परकोटीचे मतभेद होते. एक जहाल मतवादी आणि एक अत्यंत मवाळ मताचा जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात खटके उडतात पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांचे उद्देश वेगवेगळे असतात. सर्वाना घेउन पुढे जावे हा एकमात्र उद्देश त्याकाळच्या सगळ्या नेत्यांमधे दिसून येतो. आताचे काही अनुयायी त्या मतभेदांचा सोईस्कर अर्थ काढून नेते एकमेकांविरुध्द होते असे चित्र जनमानसांमधे रंगवण्याचा कुटील प्रयत्न करतात. ज्या प्रमाने रंगवतात त्यावरुन इतके मतभेद असते तर सगळ्यांनी मिळून स्वातंत्र्य मिळवण्याचा चमत्कार केला कसा? याचा विचार अल्पबुध्दीजीवी कधी करत नाही.

Far end ani kedar yanchya posts avadalya.

Ambedkar ani gandhi yanchyat itke differences of opinion hote hi dekhil navin mahiti aahe majhyasathi.

(काऊ, इब्लीस यांनी या प्रतिसादावर मत देऊ नये अमानवि.)
<<
@ प्रकु,
मी प्रतिसाद का देऊ नये हे तुमचे म्हणणे समजले नाही.

अ‍ॅक्चुअली तुमचा संपूर्ण प्रतिसाद पटण्यासारखा आहे.

फक्त एक शब्दप्रयोग थोडा वेगळा अस्ता तर अजून छान वाटले असते :
तुम्ही म्हटले,

"आजची परिस्थिती पाहता मुस्लिमांना आपल्या देशातून हाकलून लावणे वगेरे आजीबात शक्क्य नाही आणि बऱ्याच मुस्लिमांच्या बाबतीत (उदा. डॉ.कलाम, जहीर खान इ.) योग्यही नाही."

शक्क्य नाही या ऐवजी "योग्य नाही" हा शब्द तिथे योजला असता तर अधिक छान वाटले असते.

धन्यवाद!

महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य मिळेपर्यंत कुणालाच भारतीय समजले नाही. दुर्दैवाने त्यांच्या दृष्टीने जो- तो त्या त्या जातीचा होता. देश स्वतंत्र झाल्यानंतर मग मात्र भारतीयत्वाचे जोखड घटनेने लादले गेले ज्यात पुन्हा अल्पसंख्य म्हणुन पुन्हा राजकारण आले जे मुळात स्वातंत्र्य पुर्व काळात होते. ( असे मी म्हणले तर किती बरोबर आणि किती चुक ) गांधीजींनी देशाला आणि जगाला खुप काही दिले याबाबत दुमत नाही. काही प्रश्नांची हाताळणी मात्र आजचे अनेक प्रश्न निर्माण करुन गेली.

एक लिहायचे राहिले. पहिल्या पोष्ट मध्ये निकीतने थोडे ह्या मुद्द्याला टच केले आहे.

"१८५७ चे स्वातंत्र समर" हा शब्दच मुळी सावरकरांनी आणला.त्या आधी ते बंड म्हणून ओळखले गेले. पण सावरकरांनी त्या लढ्याला पुस्तक लिहून "स्वातंत्र्याची लढाई" वर भर दिला.

सावरकर अभ्यासक शेषराव मोर्‍यांनी मात्र "१८५७ चा जिहाद" असे पुस्तक लिहून सावरकरांचे कसे मुळ मुद्दाकडे दुर्लक्ष झाले आणि तो लढा कसा मुसलमानी सत्ता परत आणण्यासाठी होता हे लिहिले. त्यांनी भरपूर कागदपत्र त्या पुस्तकात दिली आहेत.

मला शेषराव मोर्‍यांचे ते पुस्तक बर्‍यापैकी पटले. तो जिहाद होता की काय ह्यावर अजून रिसर्च व्हायला हवा. पण जनसामान्यांना ते "बंड" न वाटता "स्वातंत्र्य समर "वाटते त्याचे कारण सावरकर आहेत.

केदार चांगली पोस्ट. वरच्या पोस्टीशीही सहमत. मो-यांच्या अखंड भारत का नाकारला मध्येही पहिल्या पुस्तकाचे आणि या समराचे खुप संदर्भ येतात. त्या़नी दिलेल्या संदर्भांवरुन लक्षात येते की हे समर का झाले ते.


मला शेषराव मोर्‍यांचे ते पुस्तक बर्‍यापैकी पटले

मला अजुन ते पुस्तक मिळाले नाही, अखंड भारत मिळाले आणि ते ब-यापैकी पटले. ज्यांना मोरेच पटत नाही त्यांनी मो-यांनी दिलेले परदेशी संदर्भ तरी वाचावेत. भारतीय लेखक भले दिशाभुल करत असतील पण परदेशी लेखकांच्या दिशाभुली भारतीय लेखकांपेक्षा नक्कीच वेगळ्या असतील. दोघेही एकच अजेंडा घेऊन पुस्तके लिहित नसतील.


भारतीय मुस्लीम स्त्रियांना
बुरखा का जाचक वाटत नाही हा प्रश्न पडतो

१. हल्ली अगदी १ वर्षाच्या मुस्लिम मुलीचेही डोके झाकलेले असते. इतक्या लहानपणीपासुनची सवय असली तर नंतर पुढे जाऊन त्याच्याशिवाय वावरणे जमत नाही.

२. माझ्या मुलीच्या कॉलेजात खुप मुली मुस्लिम आहेत आणि त्यातल्या खुप जणी बुरखा घालुन येतात. त्यातल्या काहिजणी कॉलेजच्या दारात बुरखा काढतातही. पण घरातुन निघताना बुरखा घातला नाही तर कॉलेजला यायला मिळणार नाही हे त्यांना माहित असते त्यामुळे बुरखा घालणे कितीही खटकले तरी तो घालण्याशिवाय पर्याय नसतो.

@ विशालदेव.

उत्तम प्रतिसाद.
केदार यांच्या प्रतिसादानंतर बाबासाहेबांचे गांधीजींशी असलेले मतभेद अधोरेखीत करणारी एक बाजू समोर आली होती. त्या संदर्भात, गांधीजींची हरिजनांबद्दलची मते थोड्या वेगळ्या प्रकाशात स्पष्ट केल्याबद्दल आभार!

Pages