डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

Submitted by डॉ. अभिराम दीक्षित on 17 July, 2015 - 17:21

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे. हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म विषयक मते या लेखात पाहूया . आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी - प्रगतीसाठी घटनाकारांनि काय उपाय सांगितले ते हि पाहूया.

[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]

images (3).jpgइस्लाम मध्ये समता आहे का ?

पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पुर्ण प्रकरण लिहिले आहे. त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टेग्नेशन . या प्रकराणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे वाक्य असे आहे .
"केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५)

download (1).jpg

बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदु आणि मुस्लिम अशा दोघातहि आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने दाखवले आहे. इस्लाम धर्मातील विषमता , गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात :
" इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु इस्लाम मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ इस्लाम धर्म आणि इस्लामिक देशातून झाला होता . " ( … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८)

इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा करताना आंबेडकर म्हणतात , " गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो पण त्याना मुक्त करा असे म्हणत नाही . इस्लाम धर्मानुसार गुलामाना मुक्त करण्याचे बंधन मुस्लीमावर नाहि. गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते - इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या रूपाने टिकून राहिली आहे , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पानभर दिले आहे . (८-२२९)

मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध आहे , व्यवसायावर जाती निर्धारण आहे. " (८-२२९,३०) त्यापुढे जाउन आंबेडकर लिहितात :

नक्कीच , हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि सर्व वाइट चाली आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि आहेत . अधिकच्या वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा : डॉ आंबेडकर (८-२३०)

images (4).jpg

.
मुस्लिम स्त्री हा एक दयनीय प्राणि आहे . इस्लामी धार्मिक जुलमाचे ते प्रतिक आहे अशी बाबासाहेबांची मांडणी दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी जेंव्हा धर्म घेतो तेंव्हा - त्याची चिकित्सा करताना - डॉ. आंबेडकरांच्या लेखणीला वेगळीच धार येत असे . धर्म चिकित्सा करताना बाबासाहेब निर्भिडपणे - सर्व धर्मांची चिकित्सा करत असत . हा गुण दुर्दैवाने आज लोप पावला आहे . आज भारतात इस्लाम चिकित्सा केली जात नाही हे सत्य आहे. तटस्थ , द्वेष रहित पण धारधार चिकित्सेची प्रेरणा बाबासाहेबांपासुन घेतली पाहिजे . डॉ आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात : -

" रस्त्या वर चालणार्या बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही " ( ८ - २३० , २३१)

पडदा पद्धतीच्या उगमाची आणि परिणामाची चर्चा करताना बाबासाहेब लिहितात - " बुरख्याची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभिर परिणाम झाले आहेत. मुस्लिम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे. अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याहि नितीमात्तेवर घातक परिणाम करतात. स्त्री - पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाइट प्रवृत्तीस जन्म देते हे सांगायला कोण्या मानसशास्त्रज्ञाची गरज नाही . अशा धार्मिक बंधनांमुळे लैंगिक अतिवासना आणि इतर अनैसर्गिक रोगट सवयिंचा प्रादुर्भाव या समाजात होतो . बुरख्यामुळे हिंदु मुस्लिम संवादात हि बाधा येते कारण - अतिशयोक्त वाटले तरी- हिंदुचे म्हणणे खरेच आहे कि - एका बाजूचे स्त्रीपुरुष आणि दुसर्या बाजूचे फक्त पुरुष यांचा निर्भिड संवाद होणार तरी कसा ? " (८- २३०, २३१)

जातीय स्तर आणि स्त्री / पुरुष अशा दोन्ही प्रकारची विषमता मुस्लिमात आहे आणि त्याचे समर्थन / प्रारंभ इस्लामी धर्मशास्त्रात आहे असा बाबासाहेबांचा निष्कर्ष दिसून येतो.

images (5).jpgबौद्ध धर्माचा विनाश का झाला ?

सर्व धर्मांची चिकित्सा करून झाल्यावर बाबासाहेबांना बुद्धाचा मार्ग योग्य वाटला होता. बुद्ध धम्मा च्या ऐतिहासिक उदय आणि अस्ताची त्यांनी तपशीलवार मिमांसा केली आहे. अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत . माझे सर्वात शेवटचे मत प्रमाण मानावे असे त्यांनी अनेकदा आपल्या अनुयायांना निक्षुन सांगितले आहे . त्यामुळे या विषयावर त्यांनी सर्वात शेवटी दिलेले भाषण पाहूया. साहेबांच्या महानिर्वाणापुर्वि सहा महिने २३ जून १९५६ रोजी अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत ते म्हणाले : -

" मुसलमानांनि या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून , बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्याना बूत शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत हा मुर्तिसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश ) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.….मुसलमानांनि बौद्ध व हिंदु धर्मावर आक्रमण केले होते . दोघांची मंदिरे उध्वस्त केली होती … . बर्याच बौद्ध भिक्कुची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ? हेच कळेनासे झाले . बौद्ध अनुयायी अंध:कारात चाचपडत राहिले " ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
अगदी असेच मत १० जून १९५० च्या जनता पत्रातील लेखातही व्यक्त केले आहे . ( खंड १८ -३ पान : २१५)

दुर्दैवाने घटनाकारांचे लवकरच महानिर्वाण झाले. या विषयावर ग्रंथ लिहणे जमले नाही . पण आयुष्याच्या शेवटी आंबेडकर अशा निर्णयाप्रत आलेले दिसतात कि, - मुस्लिमांकडुन विद्वान भिक्कुंचि कत्तल झाली वा त्यांना देशत्याग करावा लागला . मार्गदर्शन न मिळालेले बौद्धजन आता कोठे जातील ? तिकडे बोलघेवडे ब्राम्हण पुरोहित जन्मजात आयते तयार होत होतेच ! त्यासाठी भिक्कू प्रमाणे कठिण प्रशिक्षण - संस्काराची गरज नव्हती . इस्लामी आक्रमणामुळे वैचारिक नेतृत्व हरवलेला बौद्ध समाज पुढे ब्राम्हणी धर्माच्या तोंडप्रचारी तडाख्यात अडकला असा निष्कर्श बाबासाहेबांनी काढला आहे. आणि इस्लामी आक्रमण हे बुद्ध धर्माच्या नाशाचे एक महत्व पुर्ण कारण मानले आहे. ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )

मुस्लिम इतिहासाचे आंबेडकरी आकलन :

मुसलमान भारतात का आले ? त्यांच्या येण्या मागची कारणे - राज्य स्थापनेचे हेतू आणि भविष्यातील धार्मिक योजना याचे मुद्देसूद विवेचन घटनाकारांनि केलेले आहे. बाबासाहेब लिहितात : -

भारतातील मुस्लिम प्रवेश हे केवळ जमीन आणि लुटमार यासाठी नाहीत . आर्थिक - राजकीय कारणाप्रमाणे भारतात इस्लामचा प्रसार करणे हे धार्मिक कारणही आक्रमणा मागे महत्वाचे आहे. ( ८-५५). बाबासाहेबांनी मुस्लिम आक्रमणाचा धार्मिक हेतू सिद्ध करण्यासाठी अनेक मुस्लिम इतिहासकारांचि अवतरणे उधृत केलेली आहेत. उदा : तैमुर बादशाहाची बाबासाहेबांनी उधृत केलेली वाक्ये आहेत :

" माझ्या हिंदुस्थान वरील आक्रमणाचा हेतू काफ़िरांविरुद्धचि मोहीम चालवून त्यांना अल्लाच्या धर्मात आणणे हा आहे. प्रेषित मुहम्मदाच्या आज्ञेनुसार काफिरी श्रद्धांचे भंजन करून , सर्वदेवता समभावाचे उच्चाटन करून , देवळे आणि मुर्त्या यांच्यापासून हिंदुस्थान मुक्त केला तर मला गाझी आणि मुजाहिद म्हटले जाइल ." (८-५६)

भारतात मध्ययुगात हिंदु मुस्लिम एकता वगैरे अजिबात अस्तित्वात नव्हती. अगदी १८५७ चे बंड हा मुस्लिमांनी केलेला ब्रिटिश विरोधी जिहाद होता. सहाशे वर्ष मुसलमान या देशाचे मालक म्हणुन वावरत होते . ब्रिटिश राज्यात त्यांना हिंदुच्या समान नागरी दर्जा मिळाला हे मुस्लिमांच्या दृष्टीने अपमानास्पद होते. म्हणुन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला . १८५७ साली भारताला दार उल इस्लाम करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला तो जिहाद होता. असे आंबेडकरांचे मत होते (८-४९, २९५)

मुस्लिम हल्ल्यांमागच्या धार्मिक हेतूचे विवेचन करताना बाबासाहेब लिहितात

"इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोनच भागात केली आहे …. दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर - दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी … जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. " येथे बाबासाहेबांनी अनेक जिहादी युद्धांचे संदर्भ दिले आहेत. (८-२९५, २९६)

images.jpg

मुस्लिम आक्रमण - राज्य स्थापना - कर पद्धती यामागचे हेतू हि धार्मिक होते असे बाबासाहेबांचे मत आहे . हे मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकर कटाक्षाने मुस्लिम इतिहासकार किंवा बादशहा यांचेच संवाद आपल्या पुस्तकात पुन्हा उधृत करताना दिसतात .

झिजीया कर लादण्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काझी चा संवाद संपुर्ण पणे उधृत केला आहे . हा संवाद पुरेसा बोलका आहे .

" अल्लाह सांगतो कि हिंदुना हीन गुलामीत (धीम्मी ) ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे . कारण ते आपल्या प्रेषीतांचे कडवे शत्रू आहेत. आणि प्रेषीतांनिच आपल्याला आज्ञा केली आहे कि , हिंदुना इस्लामी बनवा नाहीतर ठार मारा , बंधक बनवा , त्यांची मालमत्ता लुटा . …. आपण सज्जन हनिफी मुस्लिम असल्यामुळे त्यांना झिजीया घेऊन सोडतो तरी.… हनिफी सोडुन इतर पंथात झीजियाचा पर्याय नाही. हिंदुपुढे दोनच पर्याय आहेत - " इस्लाम किंवा मृत्यू " (८-६३)

या उधृता नंतर निष्कर्ष काढताना आंबेडकर म्हणतात : मुहम्मद गझनी पासून अहमदशहा अब्दाली पर्यंतचि ७६२ वर्षांची कालकथा हि अशी आहे. (८-६३)

पाकिस्तान का बनले ?

डॉ. आंबेडकर फाळणीचे पुरस्कर्ते होते. हिंदु आणि मुस्लिम यांचे सहजीवन अवघड आहे . भारत अखंड राहिला तर धार्मिक संघर्ष इतके जास्त होतील कि हिंदुंचा सामजिक सुधार अशक्य होऊन बसेल त्यामुळे फाळणी करावी असे त्यांचे मत होते . पाकिस्तान बाबतीतले इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना ते म्हणतात :

"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत .काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही . इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच (low born ) आणि दर्जाहीन (without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही . "( ८ - ३०१)

पाकिस्तानवरील पुस्तकाचे एक प्रकरण राष्ट्रीय फ़्रस्ट्रेशन नावाचे आहे . त्यातील ३२८ -३३० या पानांवर बाबासाहेबांनी हिंदु मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा केलेली आहे . बाबासाहेब लिहितात " ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून भांडणे होतीच. (८-३२८) हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे. (8-229) . अकबर आणि कबीर या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही . " (८-३३०)

याचे अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : -

" इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही ..... भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला देत नाही . " (८-३३०)

images (7).jpg

अशा धार्मिक कारणांमुळे हिंदु मुस्लिम ऐक्य अशक्य आहे म्हणुन बाबासाहेबांनी फाळणीला पाठींबा दिला होता.

फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - " जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक, परिणामशुन्य राज्य बनेल- जणु जिवंत प्रेत, न पुरलेला मृतदेह " (८-३४०)

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली - बाबासाहेब म्हणाले होते. --

" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (१-१४६)

त्यावेळच्या अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे ३५% हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .

images (6).jpg

त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (१-१४६)

इशारा : हिंदु अधिक आक्रमक होत जातील

बाबासाहेबांनी ७५ वर्षा पुर्वी दिलेला इशारा आज महत्वाचा ठरताना दिसतो आहे . बाबासाहेब लिहितात :-

"मुसलमान राजकारणात गुंडगर्दि आणत आहेत .या दंगली त्याचे पुरावे आहेत. मुसलमान मुद्दाम सुटेडन जर्मन नाझिंचे अनुकरण करत आहेत. (झेक बाबतचे) . जोपर्यंत एकटे मुस्लिम आक्रमक होते तोवर हिंदु मार खात होते. भूतकाळ गेला आणि आज हे सत्य राहिले नाही . हिंदु लोक प्रतिकार शिकाले आहेत (learned to retaliate ) आणि मुस्लिमाना भोसकण्यात त्याना लाज वाटत नाही . गुंडगर्दिचा विरोध सवाई गुंडगिरीने करणे हा हिंदुचा नवा चष्मा बिभत्स आहे. ( ugly spectacle ) (८-२६९)

images (8).jpg

" मुस्लिम अतिरेक हा (native endowment) अंगभुत आहे, हिंदुपेक्षा जुना आहे आणि त्यांच्या संस्कृतीचे अंग आहे.. हिंदुचा अतिरेक हा आजकाल नव्याने प्रतिक्रिया म्हणुन तयार होतो आहे. आज या बाबतीत मुसलमान पुढे असले तरी हे असेच जर चालू राहिले तर…. कदाचित भविष्यात हिंदु त्याना मागे टाकतील . " (८-२४९)
हे दोन समाज अशाच प्रमाणे धर्मावरून भांडत राहिले तर , भारताचे काय होईल याचे चित्र बाबासाहेब आपल्यासमोर १९४० साली उभे करतात . आज फाळणी होऊन गेली आहे. काही वर्षाच्या शांततेत भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश च्या तुलनेत दैदिप्यमान प्रगती केलेली दिसते . मात्र हिंदु मुस्लिम संघर्ष राजकीय आणि धार्मिक स्वरूपात सुरूच आहे . त्यामागच्या राजकारणाची आंबेडकरांनी केलेली चिकित्सा अवश्य पाहिली पाहिजे .

धार्मिक राजकारणाचा आंबेडकरी अन्वयार्थ

हिंदु मुस्लिम राजकारणाच्या फियास्कोसाठी आंबेडकर हिंदु महासभा आणि कॉंन्ग्रेस या दोघांना जवाबदार ठरवतात . बाबासाहेब लिहितात "भाबड्या मनाच्या हिंदु सभेच्या देशभक्तांना वाटते कि हिंदुनि हिंसक पावित्रे घेतले कि मुसलमान सरळ होतील…. खरे तर हिंदु महासभा संवादाच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा आहे कारण त्याना एकता नकोच आहे. उदाहरणार्थ : ( ३५ % मुस्लिम असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या वास्तवात ) " हिंदुस्थान हिंदुचा ! " अशी घोषणा हिंदु सभेच्या अध्यक्षांचि आहे . वास्तव स्थिती पाहता हि घोषणा अतिशय अहंकारी आणि अक्षरश : अर्थहिन आहे . " (८-२७०)

कोंग्रेसच्या मुस्लिम अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या युरोप प्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . : डॉ आंबेडकर

कॉंग्रेसचेहि मुस्लिम / इस्लाम बाबतीतले धोरण पूर्णपणे चुकलेले आहे असा आंबेडकरांचा आरोप आहे. कोंग्रेसच्या धार्मिक राजकारणाला आंबेडकरांनी मुस्लिमांचा अनुनय / लांगुलचालन (Appeasement ) असे विशेषण वापरले आहे. अशी विशेषणे पाकिस्तान वरील पुस्तकात कोन्ग्रेस साठी शेकडो वेळा वापरली आहेत . एकट्या पान २७० वर लांगुलचालन (Appeasement ) हा शब्द सहा वेळा आलेला आहे. आंबेडकर लिहितात : -

" कॉंंग्रेसला अपिसमेंट आणि सेटलमेंट यातला फरक सुद्धा कळत नाही. अपिसमेंट - अनुनय म्हणजे लांगुलचालन! आक्रमकाचे हृदय जिंकण्या साठी त्यांनी केलेल्या खून, बलात्कार आणि निष्पापांच्या लूटमारी कडे दुर्लक्ष करणे हि कोङ्ग्रेसि अपिसमेंट ची नीती आहे . त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत .. सेटलमेंट म्हणजे दोन्ही बाजू समाधानी होतील अशी मर्यादित तडजोड होय . मुस्लिमाना धार्मिक आधारावर सवलती दिल्यास त्यांची आक्रमकता वाढीस लागलेली दिसते या सवलतिंचा अर्थ हिंदुचा भ्याडपणा (defeatism) असे मुस्लिम मनास वाटते. कोंग्रेसच्या अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या दोस्त राश्ट्रांप्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . " (८ - २७०)

सवाई गुंडगिरिचि आक्रमकता किवा लांगुलचालन यापैकी कोणत्याही मार्गाने हिंदु मुस्लिम प्रश्न सुटणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे.

समस्येवरील दोन उपाय

वकिली कायदे आणि सेटलमेंट करून हिंदु मुस्लिम प्रश्न हाताळावा लागतो - अपिसमेंट अथवा गुंडगिरी करून नाही - याची प्रचीती अजून भारतीय राजकारणाला झालेली नाही. फाळणी घडून भूतकाळात जमा झाली . आजच्या भारतातील हिंदु आणि मुस्लिमाना सहजीवन अपरिहार्य आहे . जुन्या मानसिकता जुने प्रश्न आजही तसेच्या तसे जिवंत आहेत . मुस्लिमांचा धार्मिक उन्माद , आक्रमकता, हिंदूची सवाई गुंडगिरी वा सवाई लांगुलचालन आजही तसेच आहे .

१) सेक्युलारीझम : यावर बाबासाहेबांनी सुचवलेला उपाय सेक्युलारीझम हा आहे . सेक्युलारीझम हा सर्व धर्म समभावाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे . त्यात धर्माचे स्थान फक्त पारलौकिक श्राद्धेपुरते मर्यादित असते. इहलोकात कसे वागावे ? किती विवाह करावेत ? बुरखा घालावा का ? याचे कोणतेच धार्मिक स्वातंत्र्य मिळत नाही . सर्व गोष्टी कायदा आणि शासनाच्या अखत्यारीत येतात . बाबासाहेबांची घटना आणि त्यातील कलमे सेक्युलर आहेत . त्यात कोणत्याहि धर्मास फाजील स्वातंत्र्य नाही . मात्र दुर्दैव असे कि याच घटनेत अनुसृत्य असणारा समान नागरी कायदा अजूनही होत नाही . कोंग्रेसच्या नाही - भाजपाच्या राज्यातही नाही .. शासन सेक्युलर रहात नाही . तलाक पिडीत मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा केला जात नाही .

download (2).jpg २) धर्म सुधारणा : मुस्लिम समाजात समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा करण्याची प्रोसेसच अस्तित्वात नाही. धर्म चिकित्सा हा विषय त्याज्य मानला गेला आहे . जी काही लाहान सहान सुधारक मंडळे आहेत ती कुराणाच्या परीभाषेबाहेर जात नाहीत . बुद्धीवादाचे समर्थन करण्यासाठी हदीस मधली पैगंबर वचने शोधली जातात. त्यामुळे मुस्लिमांचे प्रचंड नुकसान होणार आहे. विज्ञान निष्ठा आणि बुद्धिवाद याचा मुस्लिम समाजात प्रसार करणे बाबासाहेब आवश्यक मानतात. त्यासाठी त्यांनी रेनन ला उधृत केले आहे :
" इस्लाम विज्ञानाला सततच शत्रू समजत आला आहे. हे त्या धर्माचे एकनिष्ठ एकमेव सातत्य आहे . पण हे सातत्य धोकादायक आहे. इस्लामच्या दुर्दैवाने इस्लामला यश मिळत आले. विज्ञानाचा - बुद्धीवादाचा वध करून खरे तर इस्लामने स्वत:चाच वध केला आहे. जगाचे शाप घेतले आहेत आणि हीनत्व पत्करले आहे " ( ८ - २३५)
मुस्लिमांनी विज्ञान निष्ठेचा, बुद्धिवादाचा , आणि धर्म चिकित्सेचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही इतरांचेही भले होणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे .

समारोप

हिंदुच्या भल्यासाठी त्यांची धर्म चिकित्सा आणि प्रबोधन अत्यावश्यक आहे . पण मुस्लिमाना यापासून वंचित ठेवण्याचे काही कारण नाही . इस्लामची चिकित्सा केली तर हिंदुत्व वाद्यांना फायदा होतो या भ्रमातून आता बाहेर पडायला हवे . आणि इस्लाम हा मुक्तिदाता , समतेचा , शांततेचा धर्म आहे या कम्युनिस्टांनि पसरवलेल्या अंधश्रद्धेतुन हि मुक्त झाले पाहिजे . कम्युनिस्टांचे प्लेन आणि डोकी अभ्यासू असली तरी पुरोगामी वा संविधानिक निश्चित नाहीत. आपण आपले मेंदु कम्युनिस्टांकडे गहाण टाकण्याची गरज नाही .या विषयावर बाबासाहेबांचे विचार अभ्यासले पाहिजेत .

बाबासाहेबांनी इस्लामची कठोर चिकित्सा केली. त्या धर्मात समता नाही - सहिष्णुता नाही - आधुनिकता नाही - असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते . विज्ञान आणि विवेक याच्या प्रचारा शिवाय हे अशक्य आहे . इस्लाम धर्म चिकित्सा अटळ आहे. आपल्याला चिकित्सक बुद्ध्यांक वाढवावा लागणार आहे. बाबासाहेबांच्या Thoughts on Pakistan च्या मुळ आवृत्तीतल्या पहिल्या पानावरचे कोटेशन होते :

"“More brain, O Lord, more brain! or we shall mar
Utterly this fair garden we might win.”
―George Meredith

मेंदू दे देवा, मेंदु दे - बुद्धी दे देवा, बुद्धी दे
अन्यथा
मरेल विजयाची - सुनिश्चित आशा !

डॉ अभिरम दिक्षित

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]

संदर्भ ग्रंथांचे तपशील :

(1) - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(८ )- Volume 8. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(१८-३) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे : खंड १८ भाग ३ (मराठी ). उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन (२००२)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमुक एका धर्माचा आहे म्हणून हिंदूंनी कधीच हत्या केल्या नाहीत. आणि झाल्या असल्या तरी त्या नगण्य आहेत.

......

कधीच केल्या नाहीत.

हे लिहून मग

नगण्य आhet....

हॅही लिहायचे !

म्या धन्य झालो .

..

खुप छान आणि अभ्यासपू्र्ण लेख..
पण प्रतिक्रिया पाहुन एक गोष्ट खटकते, स्वतःला आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेणारे प्रत्यक्षात मात्र फक्त सद्यकालिन नेत्यांचेच अनुयायी आहेत, त्यांनी आंबेडकरांचे लेखन कधीच न वाचल्यामुळे प्रतिक्रिया रस्ता चुकल्यासारख्या वाटतात.

चु भू द्या घ्या

lalitshinde,

>> कधीच केल्या नाहीत.
>> हे लिहून मग
>> नगण्य आhet....
>> हॅही लिहायचे !
>> म्या धन्य झालो .

अशा हत्या कधीच केल्या नाहीत याचा अर्थ तसं अधिकृत धोरण नव्हतं. मात्र धर्मभ्रष्टतेच्या सबबीखाली काही हत्या झाल्या आहेत. (उदा. : पेशवाईतल्या पटवर्धनांनी केलेल्या दैवज्ञ ब्राह्मणांच्या हत्या.) मात्र अशी उदाहरणं नगण्य आहेत.

आ.न.,
-गा.पै.

३. सगळे मुस्लिम अतिरेकी , वाईट असतात यावर विश्वास ठेवणार नाही.

>>>
हे असे आहे

३. सगळे मुस्लिम, अतिरेकी / वाईट असतात यावर विश्वास ठेवणार नाही.
किंवा
३. सगळे मुस्लिम हे अतिरेकी , वाईट असतात यावर विश्वास ठेवणार नाही.

आक्का, परवा पण तुम्ही असाच चिन्हांचा घोळ केला होतात. तुमच्या व्याकरण अभ्यासात चिन्हे ऑपशनला टाकली होती वाटतं Wink
Light 1

चांगली चर्चा होत असलेल्या धाग्याची गामा पैलवानाने वाट लावली. Sad
कट्टेकरी ट्रोल आयडी एकही धागा नीट चालू देत नाही. प्रत्येक ठिकाणी विष पसरवलेच पाहिजे असा त्यांचा नियम आहे.

lalitshinde,

तुमचा इथला संदेश वाचला.

१.
>> लेख वाचून गोळवलकर गुरुजींच्री आठवण आली व मन सद्गगदीत झाले.

वा फार छान!

२.
>> इस्लाम मुस्लिम याविरुद्ध व हिंदुत्वाच्या प्रचारासाठी गुरुजीनी वुइ द नेशन हे पुस्तक लिहिले होते. त्ञा
>> पुस्तकाने खळबळ माजल्यावर इंग्रजानी गुरुजींविरुद्ध वॉरंट काढले. गुरुजी भूमिगत झाले . पण इंग्रजी
>> ससेमिरा चुकत नाही हे पाहिल्यावर ते प्रकट झाले व हे पुस्तक माझे नाही , बाबाराव सावरकरांच्या एका
>> मराठे पुस्तकाचे हे भाशांतर अहे असा कांगावा करुन ते नामानिराळे राहिले. ( बाबाराव आधीच स्वर्गवसी
>> झाल्याने त्यांच्या अटकेचा सवालच नव्हता ! )

वुई द नेशन १९४८ साली मागे घेतलं होतं. त्याचा इंग्रजी राजवटीशी कसलाही संबंध नव्हता.

३.
>> वाक्यावाक्यावर दिवंगत आंबेडकरसाहेबांचे नाव लिहुन मुस्लिमद्वेषी विधाने मांडुन म्हटलं तर आपला लेख
>> आणि संकट आल्यास बाबासाहेबांचं नाव असा नरो वा कुंजरो वा असा खास हिंदू आदर्श धर्मराजी
>> साळसूदपणा पाहून गुरुजीही गहिवरले असतील !

Rofl

हिंदूंनी मुस्लिमांचा द्वेष करायची गरजच काय मुळातून? तेच आपापसांत इतका द्वेष बाळगून आहेत की हिंदूंना काहीच करायची गरज नाहीये. पाकिस्तानात काय चाललंय ते दिसंत नाही वाटतं तुम्हाला?

अशीच विनोदी विधाने करून वाचकांचं मनोरंजन करीत जा. Lol

आ.न.,
-गा.पै.

बेफिकीर,

>> प्रश्न खरे तर हा असायला हवा की आंबेडकरांनी हे लिहून ठेवलेले असताना इतकी वर्षे त्यावर एखादी विशिष्ट
>> राजकीय किंवा धार्मिक भूमिका कोणाकडूनच का घेण्यात आली नाही हे आश्चर्यकारक वाटते.

याचं कारण म्हणजे मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांशिवाय सत्ता मिळंत नाही, असा आपल्या सेक्युलर वृत्तपत्रांचा लाडका सिद्धांत आहे. अगदी वाजपेयींनाही मुस्लिम मतांपुढे झुकावं लागायचं. त्या नादात हिंदूंकडे दुर्लक्ष होत गेलं. साहजिकच भारतातला मुस्लिम प्रश्न हा लोकोक्त खोलीतल्या हत्तीसारखा (proverbial elephant in the room) होऊन बसला आहे.

या सिद्धांताला सर्वात पाहिलं आव्हान दिलं ते मोदींनी. गुजरात भाजप तर्फे नगण्य मुस्लिम उमेदवारांना तिकिटे (लोकसभा आणि विधानसभा) देऊन सूतोवाच केलं. पुढे दहाबारा वर्षांत भक्कम हिंदू मतपेढी उभी केली.

या धोरणाचा मुख्य परिणाम म्हणजे मुस्लिम नेत्यांचे निरर्थक लांगूलचालन करणाऱ्या काँग्रेसचे शून्य खासदार गुजरातेतून निवडून आले. नवल आहे नाही? मुस्लिमांना झुकतं माप न देताही राजकारण करता येतं. आणि ते बहुसंख्य मुस्लिमांना मान्य आहे.

कर्तृत्वहीन मुस्लिम नेत्यांना फुकटचं डोक्यावर चढवून ठेवण्यात आलेलं आहे. असल्यांना त्यांची जागा दाखवून देणं सर्वसामान्य मुसलमानाला आवडलंय. सेक्युलर लोकं मोदींच्या नावे कितीही बोंबाबोंब करोत. सामान्य मुसलमानाला काही फरक पडंत नाही. सेक्युलर पत्रसृष्टीचे लाडके सेक्युलर सिद्धांत फाट्यावर मारणे हेच हिंदूंना आणि मुस्लिमांना दोघांनाही अंतिमत: हितकारक आहे.

आ.न.,
-गा.पै.

पैलवान ,

पुस्तकावर बंदी गांधीहत्येनंतर आली होती.

इंग्रजांनी गुरुजीना ताब्यात घ्यायच ठरवले होते. कआरण त्यात अनेक आक्षेपार्ह विधाने होती.

पुस्तक १९३९ ला आले होते.

बाबारावांचे निधन१ओ९४५ ला झाले. अनवधानाने मी चुकीची महिते दिली. ते दुरुस्त करत आहे.

लेखातल्या दर ४-६ वाक्यांआड बाबासाहेबांचे फोटो का पेरले आहेत?
ते सर्व प्रताधिकारमुक्त असतीलच Wink पण समहाऊ हे फक्त बाबासाहेबांचे मत आहे असे ठसवत राहण्याचा हा परिणाम आहे काय?

दीमा,

>> लेखातल्या दर ४-६ वाक्यांआड बाबासाहेबांचे फोटो का पेरले आहेत?
>> पण समहाऊ हे फक्त बाबासाहेबांचे मत आहे असे ठसवत राहण्याचा हा परिणाम आहे काय?

बाबासाहेबांचे चाहते मजकूर न वाचता फक्त फोटो पाहून लेखाच्या प्रेमात पडण्याइतके निर्बुद्ध आहेत काय? Rofl

असा प्रकार सिनेमातल्या नटनट्यांचे फोटो पाहून होतो, असं ऐकून आहे. Wink

आ.न.,
-गा.पै.

>>>भुतकाळात मुस्लिमांनी अत्याचार केल्याचे दाखले देऊन सांप्रत मुस्लिमांना नागरिकत्वाच्या व्याख्येतुन वगळा अशी बोंब ठोकण्यात काहीच अर्थ नाही.,<<<

ह्या विधानाचा मथितार्थ अनेक बाबींना जसाच्या तसा लागू होतो ह्याचा विशेष आनंद वाटला. अशीच भूमिका आजच्या सर्व सुजाण नागरिकांनी स्वीकारली तर ९० टक्के विद्वेष नष्ट होऊ शकेल.

फक्त मग 'करायचे तरी काय' हा प्रश्न बहुतेकांना पडेल, ते अलाहिदा.

आजच्या सर्व सुजाण नागरिकांनी स्वीकारली तर ९० टक्के विद्वेष नष्ट होऊ शकेल. > अनुमोदन

'करायचे तरी काय' हा प्रश्न बहुतेकांना पडेल, ते अलाहिदा > बहुतेकांना नाही काही संघटनांना प्रश्न पडेल

>>>मुस्लीमांचे अपीजमेंट हे एक मिथक आहे जे काही लोकांच्या सोयीसाठी ठीक आहे. अगदी ब्रिटिश काळापासून अपीजमेंट सुरु असती तर आज राजकारण, नोकरशाही, उच्च शिक्षण अशा अनेक बबतीत मुस्लिमांची स्थिती दलितांपेक्षा वाईट नसती<<<

दलितांची स्थिती हा एखादा बेंचमार्क नव्हे. पण बहुतांशी मुस्लिमांची स्थिती कशी आहे हे आपण सगळे जाणतोच. वर लेखात अश्रफ, अजलफ आणि अर्जल अशी वर्गवारी दिलेली दिसते. अर्जल मुस्लिम वर्ग बहुसंख्य आहे असे आढळते.

मतांसाठी कोणतेही सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करते हे सगळ्यांनीच मान्य करायला हरकत नसावी. मोदींनीही गांधी आणि आंबेडकरांच्या प्रतिमांचा वापर केला असे आपण आज म्हणतो. मग काँग्रेसचाच तेवढा हेतू उदात्त असणार असे म्हणणे भाबडेपणाचे किंवा फसवेगिरीचे ठरेल.

मला वाटते की सरकारी अनुदाने आणि आरक्षणे ह्यातून स्वतःचा विकास साधणारा वर्ग स्वतःच्या पुढच्या पिढ्यांनाही विकासासाठी तोच मार्ग अवलंबवयाला लावतो. जो वर्ग सरकारी अनुदाने / आरक्षणे असूनही ती न स्वीकारता स्वतःच्या हिंमतीवर पुढे येतो तो खरा विकसित होतो व तो पुढच्या पिढीला तश्याच विकासाची दिशा दाखवतो. आंबेडकरी आरक्षणाचा टेकू २०१५ मध्येही आवश्यक आहे हे दुर्दैव दुर्लक्षिण्यासारखे नाही. त्यात आणखी आंबेडकरांची इस्लामबाबतची लेखातील मते पाहून संभ्रमीत व्हायला होते.

आंबेडकरांना सोयीनुसार हुकुमी एक्का बनवण्याचे राजकारण आजवर झाले की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे.

इस्लाम धर्म हा अत्यन्त धार्मिक आहे हे वास्तव आहे.एखादया धर्मातिल लोक जेव्हा अति धार्मिक होतात तेव्हा त्यांच्यातिल लबाड,धुर्त लोक हे त्यांचा गैरफायदा घेतात.अशा लोकांची संख्या ही नगण्य असते.मात्र समाजाचे नि देशाचे नुकसान करण्यास समर्थ असते.मुस्लिमांची समाजसुधारणा होणे आवश्यक आहे.एखादा आंबेडकर व फुले ज्या वेळि त्यान्च्या धर्मात होइल तेव्हाच अज्ञानाच्या खाइतुन त्यान्चि मुक्त्तता होइल.

>>> सचिन पगारे | 19 July, 2015 - 20:49 नवीन

इस्लाम धर्म हा अत्यन्त धार्मिक आहे हे वास्तव आहे.एखादया धर्मातिल लोक जेव्हा अति धार्मिक होतात तेव्हा त्यांच्यातिल लबाड,धुर्त लोक हे त्यांचा गैरफायदा घेतात.अशा लोकांची संख्या ही नगण्य असते.मात्र समाजाचे नि देशाचे नुकसान करण्यास समर्थ असते.मुस्लिमांची समाजसुधारणा होणे आवश्यक आहे.एखादा आंबेडकर व फुले ज्या वेळि त्यान्च्या धर्मात होइल तेव्हाच अज्ञानाच्या खाइतुन त्यान्चि मुक्त्तता होइल.
<<<

हा प्रतिसाद हिंदवी पारंपारीक भाबडेपणाचे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा त्यांचे अस्सल नेते म्हणजे मुल्लामौलवी हे शिकवायला लागतील की आपल्याचसोबत जगात इतरही श्रद्धा बाळगणारे आपल्याइतक्याच हक्काने जगू शकतात तेव्हा त्यांची मुक्तता होईल. आंबेडकर आणि फुले त्यांच्यात खूप आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? फक्त त्या त्यांच्यातल्या आंबेडकर, फुलेंना शायरीच्या मंचावर बसवून टाळ्या वाजवून दाद दिली जाते इतकेच!

जेव्हा त्यांचे अस्सल नेते म्हणजे मुल्लामौलवी
<<

हे म्हणजे शंकराचार्य किंवा भगवे साधू "आपले" अस्सल नेते होत, असे म्हणण्यासारखे झाले.

बेफि,

कधीतरी इंटरनेटवरच उदा. आय आरसी वापरून वगैरे जिथे पाकिस्तानी लोक जास्त असतात अशा ठिकाणी चॅट करून पहा. मॅक्सिमम लोक मुल्लामौलवींना शिव्या देताना सापडतील.

मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते <<<<,
डॉ. अभिराम दीक्षित,पुणे<<<<

विश्वास बसतोय का?

बेफि आंबेडकर,फुले मुस्लिम लोकांत खुप आहेत हे तुमचे विधान वाचून बसलेल्या धक्क्यातून अजुन सावरलो नाही.हे तुम्हि मुद्दाम करता की तुम्हाला खरचं तस वाटतय....

<<.हे तुम्हि मुद्दाम करता की तुम्हाला खरचं तस वाटतय....>>
Wink
हे बर्‍याच ठिकाणी वापरता येण्याजोगं वाक्य आहे.
मस्तं आहे.

>>> सचिन पगारे | 19 July, 2015 - 23:03 नवीन

बेफि आंबेडकर,फुले मुस्लिम लोकांत खुप आहेत हे तुमचे विधान वाचून बसलेल्या धक्क्यातून अजुन सावरलो नाही.हे तुम्हि मुद्दाम करता की तुम्हाला खरचं तस वाटतय....
<<<

आंबेडकर, फुले, मुस्लिम लोकांत खूप आहेत.

मुस्लिम लोकांसकट त्या (त्यांच्यातल्या) आंबेडकर आणि फुल्यांनाही माहीत आहे की त्यांच्यातल्या आंबेडकर, फुले ह्या सर्वांसकट इतर सर्व मुस्लिमांना बेसिकली अस्तित्त्वात राहण्यासाठी आणि काही ना काही राजकीय / सामाजिक फायदे मिळवण्यासाठी त्यांचा धर्म हा पहिला, दुसरा, शेवटचा आणि एकमेव हुकुमी एक्का आहे.

प्रश्न त्यांचा किंवा हे प्रतिसाद देणार्‍या माझ्यासारख्यांचा नसून तुमच्यासारख्यांचा आहे. त्यांच्या धर्मावर विसंबून आता सत्ताही नाही आणि त्यांच्यावर टीका करणे हे आजवरच्या परंपरेला शोभतही नाही.

ह्याला अवघड जागचे दुखणे असे मराठीत म्हंटले जाते.

असो.

हा लेख इथे आणखी दुसर्‍या संस्थळावरही आहे.
दोन्हीकडे -
हे आंबेडकरांच्या अनुयायांना कळेल तो सुदिन.
हे आंबेडकरांच्या अनुयायांना कधी कळणार

अश्या अर्थाच्या प्रतिक्रीया जास्त आहेत.

जणू आता अभिराम यांनी मुस्लिमांच्या संदर्भात आंबेडकरांची काय मते होती ती गोळा करून इथे लिहिल्यावर आम्ही लगेच 'हर हर महादेव' घोषणा करत मुस्लिमांवर तुटून पडावे अशी या प्रतिसाददात्यांची इच्छा आहे असे दिसतेय.
Wink

बेफि सत्ता वैगरे गोष्टि जावु द्या.अहो आंबेडकर,फुले हे प्रस्थापित समाजाविरूध्दचे,अन्याया विरूध्दचे बंड होते.मृतप्राय झालेल्या समाजाला त्यांनी नवे जिवन दिले.आणि तुम्ही बोलताय कि मुस्लिमांत आंबेडकर नि फुले खुप आहेत.तुमच्या बद्दल नवल करावे की किव हेच कधिकधि कळेनासे होते.

>>> सचिन पगारे | 19 July, 2015 - 23:43

बेफि सत्ता वैगरे गोष्टि जावु द्या.अहो आंबेडकर,फुले हे प्रस्थापित समाजाविरूध्दचे,अन्याया विरूध्दचे बंड होते.मृतप्राय झालेल्या समाजाला त्यांनी नवे जिवन दिले.आणि तुम्ही बोलताय कि मुस्लिमांत आंबेडकर नि फुले खुप आहेत.तुमच्या बद्दल नवल करावे की किव हेच कधिकधि कळेनासे होते.
<<<

माझे देवदयेने बरे चालले आहे. माझी कीव आपण करावीत इतके मला उपकृत करू नयेत. माझ्या म्हणण्याचा अर्थ तुमच्या समविचारींना आणि काही विशिष्ट मुस्लिमांना समजेल तेव्हा बरे होईल.

बाकी दोन चार दिवस उलटून गेल्यावर धाग्याबद्दलची खदखद विशिष्ट मुखांमधून बाहेर पडू लागली हे पाहून गंमत येत आहे.

छान माहिती आहे.

मला या लेखातून एवढे समजले की साधारण १९४५ च्या सुमारास बाबासाहेबांची मुस्लिम समाजाबद्दल मते ही अशी होती. त्याचा आता काही रिलेव्हन्स असेल असे नाही. तेव्हा ते तसे म्हणाले म्हणून आता मुस्लिम समाजाविरूद्ध काही करावे असे तर अजिबात नाही. मात्र हे नक्की की एकूण त्या समाजाबद्दलची मते बाबासाहेबांची व कट्टर हिंदुत्त्ववाद्यांची फारशी वेगळी नव्हती.

पण येथील प्रतिक्रिया वाचून सोशल नेटवर्क्स वरचा एक हट्टी लिबरल पॅटर्न सहज दिसला - ट्रोलिंग प्रतिक्रिया वगळूनही. लेखकाने सगळे संदर्भ दिलेले आहेत. लेखही डॉ आंबेडकरांच्या तेव्हाच्या विचारांबद्दल आहे - ते सगळे आत्ता लागू होईल (ते ही पाकिस्तान वेगळे झाल्यावर) असा कोणताही आग्रह नाही. तरी लेखनाच्या उद्देशाबद्दल शंका? लेखक किमान येथे नवीन दिसत आहेत, ते हिंदुत्त्ववादी आहेत किंवा काय ते तुम्हाला काय माहीत? की केवळ आडनावावरून स्टीरीओटाईप करून टाकले?

दुसरे म्हणजे 'संदर्भ सोडून दिलेले' वगैरे शेरे. तुम्ही स्वतः खात्री केली असेल पुस्तक वाचून तर तसे लिहा. नाहीतर उगाच संशय कशाला?

विकु - तुमचा अपीजमेण्ट बद्दलचा मुद्दा तर आणखीनच इंटरेस्टिंग आहे. अपीजमेण्ट चा समाजाच्या उत्कर्षाशी काहीच संबंध नाही. कारण बहुतांश वेळा ही अपीजमेण्ट समाजातील न्यूसन्स व्हॅल्यू असलेल्या लोकांच्या मागण्या पुरवून केली जाते, ज्यात त्या समाजाचे हित सहसा नसते. शाहबानो प्रकरण , "देशाच्या मालमत्तेवर अल्पसंख्य समाजाचा पहिला अधिकार" ई विधाने यातून मुस्लिम समाजाचे काय भले होणार होते? याने हिंदू राईट विंगर्स ना फायदा होउन जनरल तेढ वाढीस लागते आणि असली विधाने/कायदे फायदेशीर नसल्याने त्या समाजाचेही काही भले होत नाही. त्यामुळे इतक्या वर्षांच्या अपीजमेन्ट नंतर मुस्लिमांची अवस्था का चांगली नाही हे सहज समजण्यासारखे आहे.

ही लेखकाला प्रतिक्रिया - वरती 'सेक्युलरिझम' चा उल्लेख आहे व अर्थ वेगळा वगैरे लिहीलेले आहे. पण तो काय वेगळा आहे ते लिहीलेले नाही. निधर्मीपणा हा कदाचित मूळ अर्थ व सर्वधर्मसमभाव व हा सध्या प्रचलित अर्थ - असे आहे काय ते?

बाकी दोन चार दिवस उलटून गेल्यावर धाग्याबद्दलची खदखद विशिष्ट मुखांमधून बाहेर पडू लागली हे पाहून गंमत येत आहे. > हे गामा बद्दल बोलत आहात का? कारण लेख एकावर आणि त्यांचे भलतेच चालू आहे.
इतर धाग्यांवर इतरांना समज देताना स्वतःच्या विचारबंधूंना देखील समज द्यावी.

Pages