डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

Submitted by डॉ. अभिराम दीक्षित on 17 July, 2015 - 17:21

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे. हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म विषयक मते या लेखात पाहूया . आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी - प्रगतीसाठी घटनाकारांनि काय उपाय सांगितले ते हि पाहूया.

[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]

images (3).jpgइस्लाम मध्ये समता आहे का ?

पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पुर्ण प्रकरण लिहिले आहे. त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टेग्नेशन . या प्रकराणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे वाक्य असे आहे .
"केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५)

download (1).jpg

बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदु आणि मुस्लिम अशा दोघातहि आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने दाखवले आहे. इस्लाम धर्मातील विषमता , गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात :
" इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु इस्लाम मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ इस्लाम धर्म आणि इस्लामिक देशातून झाला होता . " ( … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८)

इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा करताना आंबेडकर म्हणतात , " गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो पण त्याना मुक्त करा असे म्हणत नाही . इस्लाम धर्मानुसार गुलामाना मुक्त करण्याचे बंधन मुस्लीमावर नाहि. गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते - इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या रूपाने टिकून राहिली आहे , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पानभर दिले आहे . (८-२२९)

मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध आहे , व्यवसायावर जाती निर्धारण आहे. " (८-२२९,३०) त्यापुढे जाउन आंबेडकर लिहितात :

नक्कीच , हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि सर्व वाइट चाली आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि आहेत . अधिकच्या वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा : डॉ आंबेडकर (८-२३०)

images (4).jpg

.
मुस्लिम स्त्री हा एक दयनीय प्राणि आहे . इस्लामी धार्मिक जुलमाचे ते प्रतिक आहे अशी बाबासाहेबांची मांडणी दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी जेंव्हा धर्म घेतो तेंव्हा - त्याची चिकित्सा करताना - डॉ. आंबेडकरांच्या लेखणीला वेगळीच धार येत असे . धर्म चिकित्सा करताना बाबासाहेब निर्भिडपणे - सर्व धर्मांची चिकित्सा करत असत . हा गुण दुर्दैवाने आज लोप पावला आहे . आज भारतात इस्लाम चिकित्सा केली जात नाही हे सत्य आहे. तटस्थ , द्वेष रहित पण धारधार चिकित्सेची प्रेरणा बाबासाहेबांपासुन घेतली पाहिजे . डॉ आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात : -

" रस्त्या वर चालणार्या बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही " ( ८ - २३० , २३१)

पडदा पद्धतीच्या उगमाची आणि परिणामाची चर्चा करताना बाबासाहेब लिहितात - " बुरख्याची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभिर परिणाम झाले आहेत. मुस्लिम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे. अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याहि नितीमात्तेवर घातक परिणाम करतात. स्त्री - पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाइट प्रवृत्तीस जन्म देते हे सांगायला कोण्या मानसशास्त्रज्ञाची गरज नाही . अशा धार्मिक बंधनांमुळे लैंगिक अतिवासना आणि इतर अनैसर्गिक रोगट सवयिंचा प्रादुर्भाव या समाजात होतो . बुरख्यामुळे हिंदु मुस्लिम संवादात हि बाधा येते कारण - अतिशयोक्त वाटले तरी- हिंदुचे म्हणणे खरेच आहे कि - एका बाजूचे स्त्रीपुरुष आणि दुसर्या बाजूचे फक्त पुरुष यांचा निर्भिड संवाद होणार तरी कसा ? " (८- २३०, २३१)

जातीय स्तर आणि स्त्री / पुरुष अशा दोन्ही प्रकारची विषमता मुस्लिमात आहे आणि त्याचे समर्थन / प्रारंभ इस्लामी धर्मशास्त्रात आहे असा बाबासाहेबांचा निष्कर्ष दिसून येतो.

images (5).jpgबौद्ध धर्माचा विनाश का झाला ?

सर्व धर्मांची चिकित्सा करून झाल्यावर बाबासाहेबांना बुद्धाचा मार्ग योग्य वाटला होता. बुद्ध धम्मा च्या ऐतिहासिक उदय आणि अस्ताची त्यांनी तपशीलवार मिमांसा केली आहे. अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत . माझे सर्वात शेवटचे मत प्रमाण मानावे असे त्यांनी अनेकदा आपल्या अनुयायांना निक्षुन सांगितले आहे . त्यामुळे या विषयावर त्यांनी सर्वात शेवटी दिलेले भाषण पाहूया. साहेबांच्या महानिर्वाणापुर्वि सहा महिने २३ जून १९५६ रोजी अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत ते म्हणाले : -

" मुसलमानांनि या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून , बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्याना बूत शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत हा मुर्तिसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश ) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.….मुसलमानांनि बौद्ध व हिंदु धर्मावर आक्रमण केले होते . दोघांची मंदिरे उध्वस्त केली होती … . बर्याच बौद्ध भिक्कुची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ? हेच कळेनासे झाले . बौद्ध अनुयायी अंध:कारात चाचपडत राहिले " ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
अगदी असेच मत १० जून १९५० च्या जनता पत्रातील लेखातही व्यक्त केले आहे . ( खंड १८ -३ पान : २१५)

दुर्दैवाने घटनाकारांचे लवकरच महानिर्वाण झाले. या विषयावर ग्रंथ लिहणे जमले नाही . पण आयुष्याच्या शेवटी आंबेडकर अशा निर्णयाप्रत आलेले दिसतात कि, - मुस्लिमांकडुन विद्वान भिक्कुंचि कत्तल झाली वा त्यांना देशत्याग करावा लागला . मार्गदर्शन न मिळालेले बौद्धजन आता कोठे जातील ? तिकडे बोलघेवडे ब्राम्हण पुरोहित जन्मजात आयते तयार होत होतेच ! त्यासाठी भिक्कू प्रमाणे कठिण प्रशिक्षण - संस्काराची गरज नव्हती . इस्लामी आक्रमणामुळे वैचारिक नेतृत्व हरवलेला बौद्ध समाज पुढे ब्राम्हणी धर्माच्या तोंडप्रचारी तडाख्यात अडकला असा निष्कर्श बाबासाहेबांनी काढला आहे. आणि इस्लामी आक्रमण हे बुद्ध धर्माच्या नाशाचे एक महत्व पुर्ण कारण मानले आहे. ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )

मुस्लिम इतिहासाचे आंबेडकरी आकलन :

मुसलमान भारतात का आले ? त्यांच्या येण्या मागची कारणे - राज्य स्थापनेचे हेतू आणि भविष्यातील धार्मिक योजना याचे मुद्देसूद विवेचन घटनाकारांनि केलेले आहे. बाबासाहेब लिहितात : -

भारतातील मुस्लिम प्रवेश हे केवळ जमीन आणि लुटमार यासाठी नाहीत . आर्थिक - राजकीय कारणाप्रमाणे भारतात इस्लामचा प्रसार करणे हे धार्मिक कारणही आक्रमणा मागे महत्वाचे आहे. ( ८-५५). बाबासाहेबांनी मुस्लिम आक्रमणाचा धार्मिक हेतू सिद्ध करण्यासाठी अनेक मुस्लिम इतिहासकारांचि अवतरणे उधृत केलेली आहेत. उदा : तैमुर बादशाहाची बाबासाहेबांनी उधृत केलेली वाक्ये आहेत :

" माझ्या हिंदुस्थान वरील आक्रमणाचा हेतू काफ़िरांविरुद्धचि मोहीम चालवून त्यांना अल्लाच्या धर्मात आणणे हा आहे. प्रेषित मुहम्मदाच्या आज्ञेनुसार काफिरी श्रद्धांचे भंजन करून , सर्वदेवता समभावाचे उच्चाटन करून , देवळे आणि मुर्त्या यांच्यापासून हिंदुस्थान मुक्त केला तर मला गाझी आणि मुजाहिद म्हटले जाइल ." (८-५६)

भारतात मध्ययुगात हिंदु मुस्लिम एकता वगैरे अजिबात अस्तित्वात नव्हती. अगदी १८५७ चे बंड हा मुस्लिमांनी केलेला ब्रिटिश विरोधी जिहाद होता. सहाशे वर्ष मुसलमान या देशाचे मालक म्हणुन वावरत होते . ब्रिटिश राज्यात त्यांना हिंदुच्या समान नागरी दर्जा मिळाला हे मुस्लिमांच्या दृष्टीने अपमानास्पद होते. म्हणुन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला . १८५७ साली भारताला दार उल इस्लाम करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला तो जिहाद होता. असे आंबेडकरांचे मत होते (८-४९, २९५)

मुस्लिम हल्ल्यांमागच्या धार्मिक हेतूचे विवेचन करताना बाबासाहेब लिहितात

"इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोनच भागात केली आहे …. दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर - दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी … जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. " येथे बाबासाहेबांनी अनेक जिहादी युद्धांचे संदर्भ दिले आहेत. (८-२९५, २९६)

images.jpg

मुस्लिम आक्रमण - राज्य स्थापना - कर पद्धती यामागचे हेतू हि धार्मिक होते असे बाबासाहेबांचे मत आहे . हे मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकर कटाक्षाने मुस्लिम इतिहासकार किंवा बादशहा यांचेच संवाद आपल्या पुस्तकात पुन्हा उधृत करताना दिसतात .

झिजीया कर लादण्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काझी चा संवाद संपुर्ण पणे उधृत केला आहे . हा संवाद पुरेसा बोलका आहे .

" अल्लाह सांगतो कि हिंदुना हीन गुलामीत (धीम्मी ) ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे . कारण ते आपल्या प्रेषीतांचे कडवे शत्रू आहेत. आणि प्रेषीतांनिच आपल्याला आज्ञा केली आहे कि , हिंदुना इस्लामी बनवा नाहीतर ठार मारा , बंधक बनवा , त्यांची मालमत्ता लुटा . …. आपण सज्जन हनिफी मुस्लिम असल्यामुळे त्यांना झिजीया घेऊन सोडतो तरी.… हनिफी सोडुन इतर पंथात झीजियाचा पर्याय नाही. हिंदुपुढे दोनच पर्याय आहेत - " इस्लाम किंवा मृत्यू " (८-६३)

या उधृता नंतर निष्कर्ष काढताना आंबेडकर म्हणतात : मुहम्मद गझनी पासून अहमदशहा अब्दाली पर्यंतचि ७६२ वर्षांची कालकथा हि अशी आहे. (८-६३)

पाकिस्तान का बनले ?

डॉ. आंबेडकर फाळणीचे पुरस्कर्ते होते. हिंदु आणि मुस्लिम यांचे सहजीवन अवघड आहे . भारत अखंड राहिला तर धार्मिक संघर्ष इतके जास्त होतील कि हिंदुंचा सामजिक सुधार अशक्य होऊन बसेल त्यामुळे फाळणी करावी असे त्यांचे मत होते . पाकिस्तान बाबतीतले इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना ते म्हणतात :

"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत .काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही . इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच (low born ) आणि दर्जाहीन (without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही . "( ८ - ३०१)

पाकिस्तानवरील पुस्तकाचे एक प्रकरण राष्ट्रीय फ़्रस्ट्रेशन नावाचे आहे . त्यातील ३२८ -३३० या पानांवर बाबासाहेबांनी हिंदु मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा केलेली आहे . बाबासाहेब लिहितात " ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून भांडणे होतीच. (८-३२८) हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे. (8-229) . अकबर आणि कबीर या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही . " (८-३३०)

याचे अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : -

" इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही ..... भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला देत नाही . " (८-३३०)

images (7).jpg

अशा धार्मिक कारणांमुळे हिंदु मुस्लिम ऐक्य अशक्य आहे म्हणुन बाबासाहेबांनी फाळणीला पाठींबा दिला होता.

फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - " जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक, परिणामशुन्य राज्य बनेल- जणु जिवंत प्रेत, न पुरलेला मृतदेह " (८-३४०)

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली - बाबासाहेब म्हणाले होते. --

" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (१-१४६)

त्यावेळच्या अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे ३५% हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .

images (6).jpg

त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (१-१४६)

इशारा : हिंदु अधिक आक्रमक होत जातील

बाबासाहेबांनी ७५ वर्षा पुर्वी दिलेला इशारा आज महत्वाचा ठरताना दिसतो आहे . बाबासाहेब लिहितात :-

"मुसलमान राजकारणात गुंडगर्दि आणत आहेत .या दंगली त्याचे पुरावे आहेत. मुसलमान मुद्दाम सुटेडन जर्मन नाझिंचे अनुकरण करत आहेत. (झेक बाबतचे) . जोपर्यंत एकटे मुस्लिम आक्रमक होते तोवर हिंदु मार खात होते. भूतकाळ गेला आणि आज हे सत्य राहिले नाही . हिंदु लोक प्रतिकार शिकाले आहेत (learned to retaliate ) आणि मुस्लिमाना भोसकण्यात त्याना लाज वाटत नाही . गुंडगर्दिचा विरोध सवाई गुंडगिरीने करणे हा हिंदुचा नवा चष्मा बिभत्स आहे. ( ugly spectacle ) (८-२६९)

images (8).jpg

" मुस्लिम अतिरेक हा (native endowment) अंगभुत आहे, हिंदुपेक्षा जुना आहे आणि त्यांच्या संस्कृतीचे अंग आहे.. हिंदुचा अतिरेक हा आजकाल नव्याने प्रतिक्रिया म्हणुन तयार होतो आहे. आज या बाबतीत मुसलमान पुढे असले तरी हे असेच जर चालू राहिले तर…. कदाचित भविष्यात हिंदु त्याना मागे टाकतील . " (८-२४९)
हे दोन समाज अशाच प्रमाणे धर्मावरून भांडत राहिले तर , भारताचे काय होईल याचे चित्र बाबासाहेब आपल्यासमोर १९४० साली उभे करतात . आज फाळणी होऊन गेली आहे. काही वर्षाच्या शांततेत भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश च्या तुलनेत दैदिप्यमान प्रगती केलेली दिसते . मात्र हिंदु मुस्लिम संघर्ष राजकीय आणि धार्मिक स्वरूपात सुरूच आहे . त्यामागच्या राजकारणाची आंबेडकरांनी केलेली चिकित्सा अवश्य पाहिली पाहिजे .

धार्मिक राजकारणाचा आंबेडकरी अन्वयार्थ

हिंदु मुस्लिम राजकारणाच्या फियास्कोसाठी आंबेडकर हिंदु महासभा आणि कॉंन्ग्रेस या दोघांना जवाबदार ठरवतात . बाबासाहेब लिहितात "भाबड्या मनाच्या हिंदु सभेच्या देशभक्तांना वाटते कि हिंदुनि हिंसक पावित्रे घेतले कि मुसलमान सरळ होतील…. खरे तर हिंदु महासभा संवादाच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा आहे कारण त्याना एकता नकोच आहे. उदाहरणार्थ : ( ३५ % मुस्लिम असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या वास्तवात ) " हिंदुस्थान हिंदुचा ! " अशी घोषणा हिंदु सभेच्या अध्यक्षांचि आहे . वास्तव स्थिती पाहता हि घोषणा अतिशय अहंकारी आणि अक्षरश : अर्थहिन आहे . " (८-२७०)

कोंग्रेसच्या मुस्लिम अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या युरोप प्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . : डॉ आंबेडकर

कॉंग्रेसचेहि मुस्लिम / इस्लाम बाबतीतले धोरण पूर्णपणे चुकलेले आहे असा आंबेडकरांचा आरोप आहे. कोंग्रेसच्या धार्मिक राजकारणाला आंबेडकरांनी मुस्लिमांचा अनुनय / लांगुलचालन (Appeasement ) असे विशेषण वापरले आहे. अशी विशेषणे पाकिस्तान वरील पुस्तकात कोन्ग्रेस साठी शेकडो वेळा वापरली आहेत . एकट्या पान २७० वर लांगुलचालन (Appeasement ) हा शब्द सहा वेळा आलेला आहे. आंबेडकर लिहितात : -

" कॉंंग्रेसला अपिसमेंट आणि सेटलमेंट यातला फरक सुद्धा कळत नाही. अपिसमेंट - अनुनय म्हणजे लांगुलचालन! आक्रमकाचे हृदय जिंकण्या साठी त्यांनी केलेल्या खून, बलात्कार आणि निष्पापांच्या लूटमारी कडे दुर्लक्ष करणे हि कोङ्ग्रेसि अपिसमेंट ची नीती आहे . त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत .. सेटलमेंट म्हणजे दोन्ही बाजू समाधानी होतील अशी मर्यादित तडजोड होय . मुस्लिमाना धार्मिक आधारावर सवलती दिल्यास त्यांची आक्रमकता वाढीस लागलेली दिसते या सवलतिंचा अर्थ हिंदुचा भ्याडपणा (defeatism) असे मुस्लिम मनास वाटते. कोंग्रेसच्या अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या दोस्त राश्ट्रांप्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . " (८ - २७०)

सवाई गुंडगिरिचि आक्रमकता किवा लांगुलचालन यापैकी कोणत्याही मार्गाने हिंदु मुस्लिम प्रश्न सुटणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे.

समस्येवरील दोन उपाय

वकिली कायदे आणि सेटलमेंट करून हिंदु मुस्लिम प्रश्न हाताळावा लागतो - अपिसमेंट अथवा गुंडगिरी करून नाही - याची प्रचीती अजून भारतीय राजकारणाला झालेली नाही. फाळणी घडून भूतकाळात जमा झाली . आजच्या भारतातील हिंदु आणि मुस्लिमाना सहजीवन अपरिहार्य आहे . जुन्या मानसिकता जुने प्रश्न आजही तसेच्या तसे जिवंत आहेत . मुस्लिमांचा धार्मिक उन्माद , आक्रमकता, हिंदूची सवाई गुंडगिरी वा सवाई लांगुलचालन आजही तसेच आहे .

१) सेक्युलारीझम : यावर बाबासाहेबांनी सुचवलेला उपाय सेक्युलारीझम हा आहे . सेक्युलारीझम हा सर्व धर्म समभावाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे . त्यात धर्माचे स्थान फक्त पारलौकिक श्राद्धेपुरते मर्यादित असते. इहलोकात कसे वागावे ? किती विवाह करावेत ? बुरखा घालावा का ? याचे कोणतेच धार्मिक स्वातंत्र्य मिळत नाही . सर्व गोष्टी कायदा आणि शासनाच्या अखत्यारीत येतात . बाबासाहेबांची घटना आणि त्यातील कलमे सेक्युलर आहेत . त्यात कोणत्याहि धर्मास फाजील स्वातंत्र्य नाही . मात्र दुर्दैव असे कि याच घटनेत अनुसृत्य असणारा समान नागरी कायदा अजूनही होत नाही . कोंग्रेसच्या नाही - भाजपाच्या राज्यातही नाही .. शासन सेक्युलर रहात नाही . तलाक पिडीत मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा केला जात नाही .

download (2).jpg २) धर्म सुधारणा : मुस्लिम समाजात समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा करण्याची प्रोसेसच अस्तित्वात नाही. धर्म चिकित्सा हा विषय त्याज्य मानला गेला आहे . जी काही लाहान सहान सुधारक मंडळे आहेत ती कुराणाच्या परीभाषेबाहेर जात नाहीत . बुद्धीवादाचे समर्थन करण्यासाठी हदीस मधली पैगंबर वचने शोधली जातात. त्यामुळे मुस्लिमांचे प्रचंड नुकसान होणार आहे. विज्ञान निष्ठा आणि बुद्धिवाद याचा मुस्लिम समाजात प्रसार करणे बाबासाहेब आवश्यक मानतात. त्यासाठी त्यांनी रेनन ला उधृत केले आहे :
" इस्लाम विज्ञानाला सततच शत्रू समजत आला आहे. हे त्या धर्माचे एकनिष्ठ एकमेव सातत्य आहे . पण हे सातत्य धोकादायक आहे. इस्लामच्या दुर्दैवाने इस्लामला यश मिळत आले. विज्ञानाचा - बुद्धीवादाचा वध करून खरे तर इस्लामने स्वत:चाच वध केला आहे. जगाचे शाप घेतले आहेत आणि हीनत्व पत्करले आहे " ( ८ - २३५)
मुस्लिमांनी विज्ञान निष्ठेचा, बुद्धिवादाचा , आणि धर्म चिकित्सेचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही इतरांचेही भले होणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे .

समारोप

हिंदुच्या भल्यासाठी त्यांची धर्म चिकित्सा आणि प्रबोधन अत्यावश्यक आहे . पण मुस्लिमाना यापासून वंचित ठेवण्याचे काही कारण नाही . इस्लामची चिकित्सा केली तर हिंदुत्व वाद्यांना फायदा होतो या भ्रमातून आता बाहेर पडायला हवे . आणि इस्लाम हा मुक्तिदाता , समतेचा , शांततेचा धर्म आहे या कम्युनिस्टांनि पसरवलेल्या अंधश्रद्धेतुन हि मुक्त झाले पाहिजे . कम्युनिस्टांचे प्लेन आणि डोकी अभ्यासू असली तरी पुरोगामी वा संविधानिक निश्चित नाहीत. आपण आपले मेंदु कम्युनिस्टांकडे गहाण टाकण्याची गरज नाही .या विषयावर बाबासाहेबांचे विचार अभ्यासले पाहिजेत .

बाबासाहेबांनी इस्लामची कठोर चिकित्सा केली. त्या धर्मात समता नाही - सहिष्णुता नाही - आधुनिकता नाही - असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते . विज्ञान आणि विवेक याच्या प्रचारा शिवाय हे अशक्य आहे . इस्लाम धर्म चिकित्सा अटळ आहे. आपल्याला चिकित्सक बुद्ध्यांक वाढवावा लागणार आहे. बाबासाहेबांच्या Thoughts on Pakistan च्या मुळ आवृत्तीतल्या पहिल्या पानावरचे कोटेशन होते :

"“More brain, O Lord, more brain! or we shall mar
Utterly this fair garden we might win.”
―George Meredith

मेंदू दे देवा, मेंदु दे - बुद्धी दे देवा, बुद्धी दे
अन्यथा
मरेल विजयाची - सुनिश्चित आशा !

डॉ अभिरम दिक्षित

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]

संदर्भ ग्रंथांचे तपशील :

(1) - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(८ )- Volume 8. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(१८-३) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे : खंड १८ भाग ३ (मराठी ). उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन (२००२)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जनसामान्यांना ते "बंड" न वाटता "स्वातंत्र्य समर "वाटते त्याचे कारण सावरकर आहेत.
<<

हे बरोबर आहे.
१८५७ च्या बंडात मूळ उद्देश बहादूरशहा जफर याला दिल्लीच्या गादीवर परत बसवणे हाच उद्देश होता, असे शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकातूनही स्पष्ट केलेले आहे.
टेलेकम्युनिकेशन नसलेल्या त्या काळी देशव्यापी स्वातंत्र्यसंग्राम उभारणे, व एकाच वेळी अनेक ठिकाणी सैनिकी कारवाई होणे हे कसे कठीण/अशक्य होते वगैरे मुद्दे देखिल पुस्तकात वाचल्याचे आठतवते.

परंतू हे सगळेच धागा विषयाशी अवांतर आहे..

इब्लिस,

विशालदेव ह्यांच्या तो प्यारा जनरिक आहे. त्यात कुठलिही बाजू समोर आलेली नाही. कारण कुठलाही मुद्दा नाही त्यात)

परिस्थितीत मागासवर्गियांच्या मनात वेगळी भावना निर्माण करून देश स्वतंत्र करण्याच्या कामात व्यत्यय येईल हा विचार देखील आला असेल. आधीच हिंदू एकीकडे होते, मुस्लिमांना लीग आपल्याकडे खेचत होती. हिंदु मधे देखील इतर जातीजमातींमधे वितुष्ट होतेच अशा परिस्थितीत त्यांना एकत्र करण्याचे सोडून त्यांच्यात दरी वाढवली तर इंग्रजांविरुध्द कधीच एकजूट होऊन प्रतिकार करणे शक्य होणार नव्हते
>>>

आंबेडकर ह्यावर १९५५ मध्ये लिहितात की, वेगळा मतदारसंघ दिला असता तर चित्र असे झाले असते. शिख - वेगळा , मुस्लिम - वेगळा, दलित ( १००० टाईम्स स्ट्राँग ) - वेगळा आणि हिंदू वेगळा. आणि गांधींना ही भिती होती की सगळे वेगळे झाले तर हिंदू मतदारसंघांची संख्या कमी होईल आणि हिंदू एकटे पडतील.

हे सर्व परत आंबेडकर म्हणतात. मी नाही. आंबेडकर आणि गांधी ह्यात मतभेदच मतभेद होते, आंबेडकर- गांधी संबंध हे सावरकर- गांधी संबंधासारखे आहेत. नेताजी-गांधी ( प्रि १९३७ इलेक्शन) सारखे नाहीत, जिथे नेताजींनीच महात्मा पदवी दिली आणि नंतर ते गांधींचे विरोधक झाले. आंबेडकर हे पहिले काही वर्षे ( पुना पॅक्ट पर्यंत) गांधींना नेते मानत पण नंतर नाही.

आता टिळकांचा उल्लेख -

मुळात गांधी आणि लोकमान्य हे एकत्र फार काळ कधीच नव्हते. त्यांच्यात वाद होते ते नाममात्रच. ते पण एका प्रकरणामुळे - एकदा गांधी इन्फॉर्मल प्रपोझल घेऊन टिळकांना भेटले आणि टिळकांनी ते प्रपोझल उडवून लावले. त्यावर गांधींनी सारवासारव करत, मी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही तर तुमचा एक मित्र म्हणून ते प्रपोझल दिले आणि तुम्ही ( टिळकांनी) ते केसरीत जाहिर करायची गरज नव्हती कारण ती एक प्रायव्हेट चर्चा होती असे काहीसे उत्तर दिले. ( ह्या उत्तरातही गांधीचा पोलिटिकलपणा दिसून येतो - ते पत्र प्रकाशित आहे. अभ्यासूंनी वाचावे.)
टिळकांचा स्वभाव पाहता, टिळक कुणास बधणारे नव्हते. आणि ते साल १९१४ की १५ होते त्यामुळे गांधी अजून "महात्मा" म्हणून एस्टॅब्लिश झालेले नव्हते.

-

त टी. मला हे वर उल्लेखलेले सर्वच लोकं आवडतात. पण म्हणून त्यांच्यात अजिबातच दोष नव्हते असे मात्र मी म्हणत नाही, आणि उद्या जर गांधीविरोधात / नेताजी / आंबेडकर / सावरकर विरोधात एखादे पत्र (जुने ) उघडकीला आले तर त्याचा एक इतिहास अभ्यासक / इतिहास आवडणारा व्यक्ती म्हणून त्रासही होत नाही.

दोन जुन्या नेत्यांमधील मतभेद आज हवे तसे नोंदवून राजकारण करणे अश्या अर्थाच्या विधानाची फारच गंमत वाटली. लेखात आंबेडकरांची मते संदर्भपानासहित दिलेली आहेत. मूळ प्रश्न खरे तर हा असायला हवा की त्या मतांवर आजच का प्रकाश पडत आहे. (हे मी आधीही ह्या धाग्यावर लिहिले आहे). लेखात दिल्याप्रमाणे आंबेडकरांची मुस्लिमांबाबतची आणि केदार ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे आंबेडकरांची गांधींबाबतची मते पाहता 'काँग्रेसची सत्तापिपासा' हे एक कारण सोडले तर आंबेडकर आपल्या देशात महान ठरणे हा चमत्कारच म्हणावा लागेल.

गांधींना ही भिती होती की सगळे वेगळे झाले तर हिंदू मतदारसंघांची संख्या कमी होईल आणि हिंदू एकटे पडतील.
<<
या बद्दलचे काही संदर्भ, वक्तव्ये इ मिळालेत तर वाचायला आवडेल. की हे फक्त तुमचे निष्कर्ष आहेत?

कारण जर अशा प्रकारे गांधी वागले असते तर हिंदूचे तत्कालीन कैवारी गांधींना विरोध काय म्हणून करीत होते? की तसे कुणी हिंदुत्ववादी त्या काळी अस्तित्वातच नव्हते?

गांधीजींची हरिजनांबद्दलची मते थोड्या वेगळ्या प्रकाशात स्पष्ट केल्याबद्दल आभार! >> इब्लिस, गांधींची चातूर्वणाची मते आपल्याला ज्ञात असावित असे गृहित धरतोय. नसल्यास "हरिजण" सोबतच त्यांची इतर मते वाचावी. शुद्रांनी शुद्रच राहावे असे भगवंतानेच म्हणले आहे असे त्यांचे मत होते. मुळात हरिजन हा शब्द त्यांनी का योजला ह्याबद्द्लही वाचावे.

या बद्दलचे काही संदर्भ, वक्तव्ये इ मिळालेत तर वाचायला आवडेल. की हे फक्त तुमचे निष्कर्ष आहेत? >>> मी इथे जे लिहितोय त्याचा आधार पण लगेच लिहित आहे. मी वर लिहिलेले आहे की हे डॉ आंबेडकरांनी १९५५ मध्ये म्हणलेले आहे. ( हा निष्कर्ष कसा असेल इब्लिस? )

आंबेडकर ह्यावर १९५५ मध्ये लिहितात की, वेगळा मतदारसंघ दिला असता तर चित्र असे झाले असते. शिख - वेगळा , मुस्लिम - वेगळा, दलित ( १००० टाईम्स स्ट्राँग ) - वेगळा आणि हिंदू वेगळा. आणि गांधींना ही भिती होती की सगळे वेगळे झाले तर हिंदू मतदारसंघांची संख्या कमी होईल आणि हिंदू एकटे पडतील.>>>

मी काय कानडीत लिहिले होते का? Uhoh हिंदू एकटे झाल्यावर काय होईल. हे देखील पुढे स्पष्ट करा. आंबेडकर साहेबांनी ते देखील स्पष्ट लिहिले आहे. वाक्यांची तोडमोड करून लिहिले तर अर्थ बदलतात

टिळकांचा स्वभाव पाहता, टिळक कुणास बधणारे नव्हते.>>> उगाच कैच्याकै बाजु सावरायची म्हणून लिहू नका. टिळकांनी सामंजसपणे भुमिका घेतली होती. तुमच्यासारखे आडमुठेपणा केला नव्हता. इतिहासाची पाने पुन्हा एकदा चाळून पहावी.

आंबेडकरांची गांधींबाबतची मते पाहता 'काँग्रेसची सत्तापिपासा' हे एक कारण सोडले तर आंबेडकर आपल्या देशात महान ठरणे हा चमत्कारच म्हणावा लागेल. >>

परत एकदा काडीवाली पोस्ट . अशक्य आहे. आंबेडकरसाहेबांना घटनासमितीवर कोणी नेमले. त्यासाठी काय काय केले गेले. याची माहीती एकदा नजरेखालून घालण्यात यावी.

म्हणूनच मी पहिल्या पोस्ट मध्ये लिहिले होते की, आंबेडकरांचे लिखान खरच किती जनांनी वाचलं आहे. इट विल बी इंट्रेस्टिंग

टिळकांचा स्वभाव पाहता, टिळक कुणास बधणारे नव्हते.>>> उगाच कैच्याकै बाजु सावरायची म्हणून लिहू नका. >>> बाजू कुणाची सावरायची? मी योग्य मुद्दे मांडले आहेत. समाजासमोर ते प्रपोझल मांडल्यावर गांधींनी त्रागा केला. त्याबद्दल टिळक कुणास बधणारे नव्हते असे लिहिलेले आहे.

टिळकांनी सामंजसपणे भुमिका घेतली होती. तुमच्यासारखे आडमुठेपणा केला नव्हता >>. थँक्यु. ! म्हणजे गांधींनी माझ्यासारखी आडमुठी भुमिका घेतली त्या वादात असे म्हणता तर. ! ओके

इतिहासाची पाने पुन्हा एकदा चाळून पहावी. >>> प्रॉब्लेम तोच तर आहे. खूप लोकं नुसतेच चाळत आहेत. "वाचत"नाही त्यामुळे काय आहे ते तिथपर्यंत पोचतच नाहीये.

आणि हो असेच त्रस्त संमधासारखे का लिहिता म्हणून सारखा आयडी उडतो वाटत. जरा संमजसपणे लिहा की राव का उगाच चांगल्या चर्चेला वळण लावताय !

केदार मी कसे लिहावे ते शिकवू नये.
समाजासमोर ते प्रपोझल मांडल्यावर गांधींनी त्रागा केला >> परत चूक. अर्थात तुमचा कल पाहता तुम्ही सतत हेच म्हणणार आहे हे अधोरेखीत होते. उगाच त्रस्त होउ नका Proud
राहिले फाळणीचा प्रश्न ते द्विराष्ट्रवाद कोण रेटत होते त्यांना विचारावे. Wink

आंबेडकर साहेबांनी ते देखील स्पष्ट लिहिले आहे. वाक्यांची तोडमोड करून लिहिले तर अर्थ बदलतात >>> हा निष्कर्ष आहे का?

आंबेडकरांना तो प्रश्न मुद्दामहून विचारला गेला.त्यावर उत्तर म्हणून त्यांनी वर मी लिहिलेले आहे ते मांडले आणि १९३७ मध्ये गांधींचा कसा पराभव झाला हे ते बोलले. शिवाय अजून बरच काही.

आंबेडकरांना गांधी महात्मा वाटत नसत /आवडत नसत हे मान्य करायला तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय. असो तो माझा प्रॉब्लेम नाही.

राहिले फाळणीचा प्रश्न ते द्विराष्ट्रवाद कोण रेटत होते त्यांना विचारावे. >>>> Lol आंबेडकर हे देखील द्विराष्ट्रवादी होते हे लेखात लिहिले आहे की राव. सगळं तर तिथूनच सुरू झाले. आणि मी फाळणीबद्दल अजून एक अक्षरही लिहिले नाही. भारीच गमतीशीर आहात बॉ तुम्ही.

नसेल वाटत त्यात आश्चर्य अजिबात नाही. समकालीन नेत्यांमधे मतभेद असतात. आता काहींना लोकमान्य टिळक वाटत नव्हते आगरकर आणि टिळक वाद तर बराच जुना याचा अर्थ टिळक लोकमान्य नाहीतच असा होतो का?

ज्या अर्थी तुम्हाला गांधी महात्मा वाटत नाही तसे टिळक देखील लोकमान्य वाटू नये. विरोध सगळ्यांनाच असतो.

अजुन देखील नेते आहेत केदार. तुम्ही सोईस्कररित्या बगल देत आहे

या अर्थी तुम्हाला गांधी महात्मा वाटत नाही तसे टिळक देखील लोकमान्य वाटू नये. विरोध सगळ्यांनाच असतो. >>

Lol ह्याला म्हणतात वडाची साल पिंपळाला ! अहो ते डॉ आंबेडरांना वाटत आहे हो माझे वैयक्तीक काही नाही. केदार आयडी फक्त आंबेडकरांची मत लिहित आहे.

Lol

मी तुमची गोष्ट केली.
वडाची साल तुम्हीच पिंपळाला लावत आहे. वाक्य जरा नीट वाचा राव.

आंबेडकर साहेबांची मते त्यांच्या लिखित पुस्तकातून माहीती होतात आपण तसदी घेण्याची आवश्यकता नाही. स्वतःची काही मत असतील तर अवश्य मांडावीत

बेफिकीर आणि त्यांचे ट्रोल कट्टेकरांचे तमाशे इथे चालू झाल्याने पुढे चर्चा होणे अशक्य आहे.
तुर्तास थांबणे योग्य

सभ्य भाषेत नीट चाललेल्या चर्चेत दातकाढू स्मायल्या टाकून जे काय चालू आहे, ते कोण व कसे करीत आहे याची मा. अ‍ॅडमिन नोंद घेतील ही अपेक्षा.

केदार,

तुम्ही दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

जे लिहितोय ते रिकलेक्शनमधून. पुस्तके वाचून बरेच दिवस झालेत. पुन्हा एकदा फुरसत काढून कपाटातली धूळ झटकायला हवी.

माझी शंका इतकीच होती, की जर गांधीजींची सर्व मते तुम्ही सांगत आहात त्या प्रकारची होती, तर तत्कालीन हिंदुत्ववाद्यांना (व आजच्याही) गांधींची अ‍ॅलर्जी काबरे होती व आहे?

गांधींना ही भिती होती की सगळे वेगळे झाले तर हिंदू मतदारसंघांची संख्या कमी होईल आणि हिंदू एकटे पडतील.
<<
अशी भीती होती, हे गांधींनी कुठे म्हटले होते काय? त्या म्हणण्याचे डॉक्युमेंटेशन कुठे केलेले आहे काय? वरच्या विधानात फक्त 'सवर्ण' हिंदू वेगळे पडणार आहेत. चौथ्या वर्णातलेही नाही. बरोबर ना?

असो. यापुढे ही चर्चा विपुत घेऊन जायला हवी. आंबेडकरांची गांधींबद्दलची मते, असा हा धागा नाही. जामोप्या म्हणताहेत तसे बुरख्यावरून चरख्यावर यशस्वीरित्या आलो आहोत आपण.

पुन्हा गाडी तिकडे -म्हणजे बुरख्यावर- येईपर्यंत मी कल्टी.

लेख आणि सर्व चर्चा वाचली. एकुणात मुद्दे २.

१. सेक्युलारीझम (समान नागरी कायदा)
२. मुस्लिम धर्म आणि समाज सुधारणा

cold blooded prince वगळता, सर्व चर्चा करणारे या मुद्यांवर सहमत आहेत, असे मला वाटत आहे. (माझा निश्कर्ष चुकीचाही असु शकतो) धागाकर्त्याचा उद्देश ह्या दोन मुद्यांवर चर्चा व्हावी असा दिसतो आहे, पण स्वतः ते गायब आहेत. भारतात मुस्लिमां विषयी असाच द्रुष्टीकोण असणारी हिंदुत्ववादी संघटना आहे. बाबासाहेबांची हि मते तिच्या सोयीस्कर वगैरे आहेत, म्हणुन ते मुद्दाम असे लेख लिहीत आहेत..वगैरे वगैरे मुद्दे बाजुला ठेवुयात...

मायबोली वरती बरेच मुस्लीम आणि इतर धर्मीय बुद्धीजीवी आहेत. त्यांचा याला विरोध आहे का? असेल तर का आहे, ते जाणुन घ्यायला आवडेल. cold blooded prince शरीयतचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. याचा अर्थ त्यांचा वरील दोन्ही मुद्यांना विरोध आहे, असा अर्थ निघतो आहे, तो बरोबर आहे का? शरियत लागु करुन भारत व भारतीय अधिक सुखी व संपन्न होतील का?

एक भारतीय म्हणुन मला वरील विचार पटतात. ह्यात भारताचे आणि सर्व भारतीयांचे हित आहे, असे वाटते. अर्थात, माझे विचार म्हणजे काळ्या दगडा वरची रेघ वगैरे अजीबात नाहियेत. जर ह्या चाललेल्या चर्चेतुन असे निष्पण्ण झाले की ते इथल्या नागरीकांच्या मुळीच हिताचे नाही, तर माझे मत मी बदलण्यास तयार आहे. पण ती विरोधी बाजु काय आहे, हे कुठल्याही अभिनिवेषा शिवाय जाणुन घ्यायची इच्छा आहे. जाणकार अधीक प्रकाश टाकतील काय?

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम..

पं प्र मोदिंच्या चष्म्यातून इस्लाम असा पण एक धागा येवु दे ना? किंवा संघाच्या चष्म्यातून इस्लाम ....

गोधरा हत्याकांड वागैरे टाळुन.

दीमा,

>> माझी शंका इतकीच होती, की जर गांधीजींची सर्व मते तुम्ही सांगत आहात त्या प्रकारची होती, तर
>> तत्कालीन हिंदुत्ववाद्यांना (व आजच्याही) गांधींची अ‍ॅलर्जी काबरे होती व आहे?

Rofl

अहो, रामायण सांगून झाल्यावर रामाची सीता कोण असा प्रश्न तुम्हाला पडतोय.

तत्कालीन आणि आजच्या हिंदुत्ववाद्यांना गांधींची अ‍ॅलर्जी त्यांच्या मुस्लिमांना झुकते माप देण्यातून उद्भवली होती. म्हणूनच तत्कालीन आणि आजच्या हिंदुत्ववाद्यांना आंबेडकरांचा इस्लामकडे बघायचा चष्मा जवळचा वाटतो. नेमका हाच या बाफचा विषय आहे.

आ.न.,
-गा.पै.

टीप : केदार यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास तुमची अनुमती गृहीत धरतोय.

Pages