बेळगावी कुंदा

Submitted by दिनेश. on 6 July, 2015 - 05:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
फोटोत दाखवलाय तेवढा बशीभर कुंदा तयार होईल.. किती जणांनी खावा ते म्या काय सांगावे ?
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
प्रयोग !
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार सुरेख आहे फोटो,
कोल्हापूरला गेलो की सहज उपलब्ध असल्याने रेसिपी शोधावी असे वाटले नव्हते, पण ही करून बघायलाच हवी

ज्याने बेळगावी कुंदा खाल्ला असेल त्याची तडफड फक्त तोच सांगू शकतो अश्यावेळी.>>> खरच.

कसला टेंम्टीग फोटो आला आहे. मस्तच Happy

कुंदा माझा alल टाइम फेवरिट. वरचा फोटो पाहून अगदी तोम्पासु झाले . उद्या बेळगाव ला जातेच.

रच्याकने करदंत पण माझे भारीच आवडते आहे.

दिनेशदा, _/\_

काल केला मी कुन्दा तुमच्या कॄती प्रमाणे.
फक्त मिल्क पावडर ऐवजी घरात बनवलेल्या मऊ पनिरचे केले.
बाकी प्रोसेस तुमची...

नवरा म्हणाला - कुन्दा कुठुन आणला ? एकदम फ्रेश आहे.... Happy

फोटो काढला आहे, जमला तर टाकते येथे..

उत्तम झाला दिनेशदादा. आधी थोडा कोरडा झाला मग परत थोड गरम पाणी घालून परतला. अगदी भारतात गेल्या सारख वाटल. धन्यवाद असेच प्रयोग तुम्ही करत राहा आणि अशा सोप्या कृती आमच्या सारख्यंसाठी एथे टाकत राहा Happy

वॉव्,सोपी रेसिपी.. झटपट होणारी ही वाटतीये.
ओरिजिनल रेसिपीत खवा वापरतात का?? बेसिकली मला मिल्क पावडर ची चव आवडत नाही... म्हणून लिटिल
अ‍ॅप्रीहेंसिव्ह..
तू साखरेऐवजी स्प्लेंडा वापरलास कि नै???? Happy

आभार,

किरण, ते शेवटचं गरम पाणी पण अत्यावश्यक आहे. त्यानेच तो अलवारपणा येतो.

वर्षू, तू एकदा खाऊन बघच ( यावेळी भेट होणार असती तर आणलाच असता. ) हा प्रकार ओरिजिनलसारखाच लागतो. ( अर्थात तो खव्यापासूनच करतात. ) मलाही आधी मिल्क पावडरचा वास आवडत नसे. पण निडो ब्रांडचे दूध जवळ जवळ ताज्या दूधासारखेच लागते...

आणि मी फक्त एक टिस्पून चव बघण्यापुरताच खाल्ला. शक्य तिथे शुगर रिप्लेसमेंट वापरतो आणि रोजच्या चहा कॉफीत तर तिही नाही. पण इथे कॅरॅमल करणे आवश्यक होते म्हणून एवढी साखर वापरावी लागली. हे टिस्पून सुद्धा शीग लावून नव्हेत ( हिप्ड नाहीत )

बेळगाव च्या , पुरोहित च्या दुकानाला टाळं लावायलात की दिनेश्दा!
Happy
करून पहावाच लागेल. बेळगाव हुन आलेला एक बॉक्स , पुरवून पुरवून खायची गरज नै आता

आमच्या घरी पण झटपट आणि एकदम तसाच चवीचा बनतो.

२ वाटी नीरसं दूध तापवून जरासं थंड झालं की एक चमचा अधमूरं फेटलेलं घट्ट दही घालून बाजूला ठेवायचं. आणि त्यात तूपात परतलेली एक चमचा डिंक पूड टाकायची.(रवाळ पणा आणि चवीला आणखी चिकटपणा यायला).

१ वाटी साखर कॅरामल करून झाली की वरच सगळं मिश्रण(फाटलेल्या पाण्यासकट) तसच आटवायचं.
आटला की सुका मेवा वरून.

मस्त लागतो. केला की फोटो टाकेन.

आर्च, मस्तच जमलाय.
मनी, नंतरचे पाणी टाकणे मस्ट आहे, शिवाय साखरही खुप तपकिरी नाही करायची, नक्की जमतो.

दिनेश जी मस्त एकदम

आम्ही बॉर्डर वरचे पण बेळगाव अगदी जवळ आणी कुंदा म्हणाल तर जेव्हा कधी गावी जातो किमान ८-१० बॉक्स तरी शेजारी व कलीग साठी विकत आणतो. सगळ्यांचे आवडता पदार्थ.

प्रयत्न करुन पाहील

Pages