मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने

Submitted by ॲमी on 24 June, 2015 - 01:12

सध्या वेगवेगळ्या शहरात होणार्या 'मराठा क्रांती मोर्चा'च्या निमित्ताने थोडे म्युजींग...

आरक्षणाबद्दल लाऊड थिंकींग:

1. राजकीय आरक्षणामुळे मुठभर लोक अफेक्ट होतात. त्यामुळे त्याला सर्वसामान्यांचा फारसा विरोध असेल असे वाटत नाही.

2. सरकारी नोकर्यांमधील आरक्षणालादेखील फार विरोध असायचे कारण नाही. कारण एकूण नोकर्यांपैकी हार्डली २ ते ३ % नोकर्या सरकारी असतील. त्यामुळे अफेक्ट होणारे लोक कमी आहेत. आणि त्यातही आपल्यावर अन्याय होतोय किंवा गुणवत्तेनुसार बढती मिळत नाही वगैरे भावना झालीच तर बाहेर इतके व्हास्ट खाजगी क्षेत्र उपलब्ध आहे त्यात ते जाऊ शकतात.

3. शिक्षणक्षेत्रातील आरक्षण हा मात्र फार वादाचा विषय होतो. एकतर बर्यापैकी मोठी लोकसंख्या असलेल्या मध्यमवर्गीय व्हाइट कॉलर लोकांना शिकणे आणि नोकर्या करणे याखेरीज इतर पर्याय माहीत नसतात. त्यात परत यांच्या शहरी मुलांना घरातील पिढ्यानपिढ्याच्या शैक्षणीक वारसा किंवा वातावरणाचे पाठबळ मिळते. ट्युशन लावून, खर्डेघाशी करून यांना मार्क मिळतात. आणि मग आपण 'गुणवत्ताधारी' आहोत असे त्यांना+इतरांनादेखील वाटायला लागते. परीणामी 'मराठाजैनमारवाड्यांनी काढलेल्या खाजगी कॉलेजा'तील जागा आपल्याच 'हक्का'च्या आहेत अशी भावना निर्माण होते. ओऽ हैलो कॉलेज खाजगी आहे ना?

या ब्रेनपॉवरचा कुठेतरी, काहीतरी उपयोग करून घेणे हे सरकारच्या अनेक कामांपैकी एक. मग सरकार खाजगी कॉलेजने अॅडमिशन कशा करायच्या याचेदेखील नियम बनवते. अर्रेऽ पण कॉलेज खाजगी आहे ना?? मग सरकार का लुडबूड करतंय त्यांच्या कारभारात? शिक्षणसम्राटांना स्वजात+गुणवत्ता असे क्रायटेरीया लावून आपल्या कॉलेजातील १००% जागा का भरता येऊ नयेत? (याबद्दल पान ५ वरचा माझा प्रतिसाद वाचा)

बरं तेही एकवेळ ठीक आहे समजून ते नियम इतकी वर्ष पाळले. तरीही परत परत या सोकॉल्ड गुणवत्त्याधार्यांची किरकीर चालूच. 'आमच्यापेक्षा श्रीमंत आहे. माझ्यापेक्षा कमी मार्क मिळाले. तरी ति/त्याला अॅडमिशन मिळाली आणि मला नाही. केवळ आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे...'
अरे पण मग ओपन आणि आरक्षण दोन्हीकडे सोकॉल्डउच्चजातीतलेच गर्दी करतील की! जर परत पुर्वीसारखेच एक किंवा दोन जातीत शिक्षण रेस्ट्रीक्ट होत असेल तर उद्देश/उपयोग काय आरक्षणाचा?

ही एक बाजू झाली.

दुसर्या बाजूने पहायचे तर हेदेखील दिसते की
* क्रिमी लेयर ६ लाखपर्यंत वाढवली जाते
* दोनतीन पिढ्या आरक्षण घेऊनदेखील पुढची पिढी परत आरक्षणावरच अवलंबून राहते
* एकेकाळी स्वतःला देवैज्ञ ब्राह्मण म्हणवून घेणारे OBCत जायला तयार होतात किंवा
* मराठा जाट पटेल गुज्जर एवढंच काय ब्राह्मणदेखील आरक्षण मागायला लागतात.

जर नोटीसेबल लोकसंख्येत आरक्षणामुळे एकमेकांबद्दल कडवटपणा, अनरेस्ट दिसत असेल तर यावर उपाय काय?

घटना अशी आहे, कायदे तसे आहेत म्हणून यांच्या मागण्या, प्रॉब्लेम उडवून लावणार का? घटना, कायदेदेखील माणसांनीच माणसांसाठी बनवलेत ना? असेल त्याकाळी तो नियम सुटेबल. पण आत्ताच्या लोकांना तो पटत नसेल तर बदला ना घटना, कायदे. काय हरकत आहे याला?

a. एकदाच जातीनिहाय जनगणना करा आणि देऊन टाका प्रत्येकाला आपापल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. त्यातपरत सबक्याटेगरी करा जेंडर आणि आर्थिक अशी. उदा समजा मराठे २४% आहेत तर त्यांना तेवढ्या जागा. त्यातल्या १२% स्त्रियांना आणि १२% पुरुषांना. त्यातपरत ६% गरीब स्त्रियांना आणि ६% गरीब पुरुषांना.
b. क्रिमी लेयरऐवजी प्रत्येक गटातल्या EBCसाठी ५०% जागा ठेवा उत्पन्न <२.५ लाख.
c. दोन पिढ्यांनी आरक्षण घेतले असेल तर पुढच्या पिढ्यांना देऊ नका
d. सगळे सरकारी फायदे केवळ २ मुलगा/गींनाच मिळतील असा नियम करा.

खुश होतील का यापद्धतीत सगळेजण?
होतील वाटतंय मलातरी. अॅटलिस्ट काही काळ...

===

अॅट्रोसिटीबद्दल लाऊड थिंकींग:
माबोवरच एका धाग्यात वाचलं की संपुर्ण महाराष्ट्रात वर्षभरात अॅट्रोसिटीच्या फक्त ३५० च्या आसपास केस दाखल होतात. आणि त्यापैकी फक्त १५ ते २० मधेच गुन्हा सिद्ध होतो. एकूण गुन्ह्यांशी तुलना करता हा फारच मायनर आकडा आहे. पण तरीही जर या कायद्याची धमकी देऊन पैसे उकळणे वगैरे प्रकार होत असतील तर तो मॉडिफाय करायला हरकत नाही. हे थोडं सेक्शन ४९८अ सारखं वाटतंय. एकूण कायद्याला विरोध करता येत नाही पण त्याचा गैरवापरदेखील नाकारण्यासारखा नसतो.

===

बाकी कोपर्डी बलात्कार असो किंवा इतर कोणताही ग्रुसम गुन्हा, गुन्हेगार दलित की मराठा की इतर कोणत्या जातीचा हे न पाहता जलदगती तपास होऊन कडक शिक्षा व्हावी याबद्दल कोणाचेच दुमत नसेल.

===
मोर्चाबद्दल लाऊड थिंकींग:

मी जे काही थोडंफार वाचलं त्यानुसार याची सुरवात 'कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा' फक्त या हेतूनेच झाली. पण त्याला इतका जास्त रिस्पॉन्स मिळाला की संयोजकदेखील आश्चर्यचकीत झाले. आता इतके लोक उत्स्फुर्तपणे एकत्र येतच आहेत तर अधिक काही करता येइल का अशा विचारतून इतर शहरं आणि इतर मागण्या वगैरे हळूहळू अॅड होत गेलं.

आता यात छुपे हेतू, राजकारण, ब्राह्मण मुख्यमंत्री (सिरीयसली! तुम्हाला खरंच असं वाटतं का की सर्वसामान्याला मुख्यमंत्री कोणत्या जातीचा आहे याने फरक पडतो? आणि लोकांनी फडणवीस, भाजपा, रास्वसं यांना निवडून दिलं?? ती तो सगळाच मोदींचा करीश्मा होता???) वगैरे शोधायचं का हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. मीतरी शोधणार नाही.

इतकीसारी लोकं शिस्तीत, शांततेत, लोकशाही मार्गाने एकत्र येत आहेत त्याचं कौतुकच आहे.
मीदेखील सहभागी झाले असते पण गर्दीचं वावडं असल्याने सध्यातरी बाहेरून पण मनापासून शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या जातीत जन्माला म्हणून हा व्यवसाय करायचा हे वाईट आणि याचे परिणाम भोगून झाल्यावर आता या या जातील जन्माला आणि त्या जातीचा ग्रोथ रेट इतका इतका आहे म्हणून त्यातील फक्त तेवढ्याच टक्के व्यक्तींनी शिक्षण (उच्च) घ्यायचं. छानच. >> ह्या पोस्टीला अनुमोदन, अमित.

कास्ट बेस्ड आरक्षण रद्द करा हे म्हणणं जितकं टोकाचं आहे (हे सगळ्यांना वाटत नाही, हेही आहे), त्याला तितकंच टोकाचं उत्तर देणं भाग आहे.
पुन्हा एकदा, ओबीसी आरक्षणाबद्दल बोलता येण्यासारखं काही नाही. आरक्षणवाले आर्थिक मागास नसतात म्हणणारे क्रीमी लेयरची लॉजिकल, व्हाएबल मागणी का लावून धरत नाहीत?
याऊपर ज्याला जे वाटून घ्यायचं ते वाटो.

वरवर पहाता सकुरांनी दिलेला तक्ता पाहिल्यावर वाटेल की आता SC / ST आणि ओपन मध्ये तेवढीच कॉम्पिटिशन आहे.

पण हा वरील तक्ता एकुण समाज पाहता दिशाभूल करणारा ठरेल. / आहे.

हे जे वर SC / ST मधले लोकं आहे ते मुख्यतः मुळ प्रवाहाबरोबर गेले अनेक वर्षे राहिलेले असावेत. आणि तुलनेने आर्थिकदृष्ट्या देखील ओपन सारखेच असावेत. पण अजूनही तळागाळाच्या लेवलला SC/ST हे भयंकर गरीब आहेत, शिक्षण नाही, त्यामुळे मला असे वाटते की SC / ST / NT ह्यांना आरक्षण ठेवावे.पण गोम अशी आहे की आता हे मुळ प्रवाहात आलेले SC/ST आरक्षण इतर भाईबंदांपर्यंत कसे पोचू देणार?

वरचा तक्ताच पाहिला तर इथे मग कुठल्यातरी पाड्यावरून फर्स्ट जनरेशन शिक्षण घेणारा SC / ST त्याचाच भाईबंदासोबत, जे ऑलरेडी ओपनला मार्कांमध्ये टक्कर देत आहेत, त्यांच्याशी, ह्या फर्स्ट जनरेशन शिक्षितची अनावधानाने कॉम्पिटिशन होते आहे. जे की परत चुकीचेच आहे.

SC /ST / NT आरक्षण हवे. पण आरक्षणासोबत आणखीही काही हवे जेणे करून खरंच तळागाळातल्यांना त्याचा फायदा होईल असा काही मार्ग हवा.

बाकी सर्व आरक्षण OBC सहीत कॅन्सल करावे. मग भलेही कोणी कितिही मोर्चे काढो वा शक्ती प्रदर्शन करो. OBC आरक्षण हा पोलिटिकल गेम आहे,

3. शिक्षणक्षेत्रातील आरक्षण हा मात्र फार वादाचा विषय होतो. एकतर बर्यापैकी मोठी लोकसंख्या असलेल्या मध्यमवर्गीय व्हाइट कॉलर लोकांना शिकणे आणि नोकर्या करणे याखेरीज इतर पर्याय माहीत नसतात..... >>>

हा मुद्दा समजला नाही. म्हणजे व्हाइट कॉलर / शहरी लोकं सरसकट उच्चजातीतलीच असतात आणि म्हणून त्यांना आरक्षणाविषयी प्रॉब्लेम होतो असं म्हणायचं आहे का?

हे जे वर SC / ST मधले लोकं आहे ते मुख्यतः मुळ प्रवाहाबरोबर गेले अनेक वर्षे राहिलेले असावेत.
<<

Lol

Data?

मला वाटते जी दलित समाजातली लोक वरच्या पदावर पोहंचतात ती स्वता होऊन आरक्षण नाकारतात अशि शेकडो उदाहरण मी पाहिलेली आहेत
टिना दाबानी दलित होती पण तिने आरक्षण कोट्यातुन आय एस परिक्षा दिलेली नव्हती रोहित वेमुला पण आरक्षित कोट्यातुन नव्हता.
माझी मुलगी इन्फोसिस मधे जॉब करत होती तेंव्हा तिचे बरेच sc, st obc मैत्रिणी मित्र होते जे आरक्षित कोट्यातुन इंजनिअरिंग करुन इन्फोसिस मधे सिलेक्ट झाले होते जिथे आरक्षण नाही आहे त्यांच्या ३ स्तरातिल परिक्षा पास होऊन खुप ट्फ ट्रेनिंग पुर्ण करावे लागते ज्यात बरिच ओपन कॅटेगिरी तली मुले पण बाहेर व्हायची
आरक्षण चा आधार शिडी सारखा असावा वर पोहंचल्या वर शिडी कोणी डोक्यावर वागवत नाही .

Data ?

Happy

Don't ask them data. Happy

ठेवावे.पण गोम अशी आहे की आता हे मुळ प्रवाहात आलेले SC/ST आरक्षण इतर भाईबंदांपर्यंत कसे पोचू देणार . ?

Happy

What the educated SC ST are supposed to do ? Do they need to become Bhishmacharya by refusing the reservation so that some other poor will take that opportunity ?

Do Mumbai born Kulkarnis perform the same thing for Rural Kulkarnis ?

मी मागेपण लिहिलं होतं-
ओपनमधून मिळणारी दूरच्या कॉलेजातली पण सेम विषयाची सीट सोडून एस सी तून मिळणारी सेम विषयातली पण सायनमधली सीट घ्यावी म्हणून ओपन शिष्ट्मंडळाने मला खूप कॅनवास केलं होतं.
तेव्हा तू असं करून ओपनची एक सीट 'खातेयस' असा युक्तीवाद केला होता.
जळ्ळा माझ्या सोयीचा युक्तीवाद म्हणा किंवा तेव्हा मी मॉरली इतकी स्ट्राँग नसल्याने म्हणा- मी ते फॉलो केलं होतं.
(आमच्यावेळेस ईअरमार्किंग नव्हतं! नंतरपण ते लगेच रद्द झालं म्हणा!)
तर उलट वर कुणीसं म्हटलंय तसं आम्ही एस सी, एस टी वाल्यांनी परिस्थिती चांगली आहे म्हणून किंवा गरज वाटत नाही म्हणून ओपन लिस्टमधून ओपन सीट घेतली तरी फोडणारे लोक खडे फोडणारच!

Happy

Don't ask them data. >> Lol

खरे तर मी काय लिहितोय ते नीट वाचले असते तर कळाले असते की, " SC-ST ला अजून खूप पल्ला गाठायचा आहे. त्या एवढ्याश्या चार्टवर भूलून जाऊ नका असे मी लिहिले आहे.

पण विरोधाचा चष्मा असला तर काय लिहिले ह्या पेक्षा कोणी लिहिले, ह्याला जास्त महत्व तुम्ही देता, हे नेहमीचेच! तर ते असोच !

आता तुम्हाला हवा असलेला सांखिकी !

२००१ च्या सेन्सस प्रमाणे.

Literacy and educational level
7. Literacy and level of education are two basic indicators of the level of
development achieved by a group/society. The literacy results in more awareness
besides contributing to the overall improvement of health, hygiene and other social
conditions. According to 2001 Census, percentage of literate persons (those who can
read and write with understanding) aged 7 years and above, among SC population of
Maharashtra is 71.9 per cent, which is lower than 76.9 per cent reported for state
population as a whole.
The literacy data show that the SC population of the state has made significant improvement in literacy during the decade 1991-2001. The literacy rate, which was 56.5 per cent in 1991, has increased by 15.4 percentage points in 2001.

Among the major SCs, Bhangi are reported to have the highest 77.1 per cent literacy rate, followed by Bhambi (74.9 per cent), Mahar (74.1 per cent) and Mang (62.2 per cent). The female literacy rate of 60 per cent among SC population is lower as compared to 67 per cent among females of the state. As in literacy rate, the highest and lowest female literacy rate of 66.9 per cent and 48.6
per cent have also been recordedamong Bhangi and Mang.

आणि आता २०११ चा तक्ता देतो.

SC_ST_2011_edu.PNG

आता हा डेटा लक्ष देऊन पाहा आणि आकलन करा.

म्हणजे डिकेड ऑन डिकेड (कळतंय का मी काय म्हणलं ते ? ) जास्त प्रगती आहे. लक्ष देऊन पाहिले तर रुरल विभाग २००१ ते २०११ मध्ये जास्त बाजी मारतो आहे.

१९६१ मध्ये पूर्ण लोकसंख्येच्या १०.२७ टक्के SC साक्षर होते तर २०११ प्रमाणे ६६.१० टक्के आहेत. विशेष म्हणजे २००१ ते २०११ मध्ये एकुण प्रगती २००१ च्या ९० टक्के आहे. म्हणजे ड्र्स्टिक चेंज.

मी वर लिहिले की ", " प्रगती दाखवणारी कुटुंब कदाचित सेकंड जनरेश शिक्षणात आहेत. म्हणजे आई-वडिल शिकलेले. आणि आता मुलं अजून पुढ जात आहेत. " त्याचा हा पुरावा. डिकेड ऑन डिकेड % वरून ते कुणाच्याही सहज लक्षात येईल, अन्यथा ओपन आणि SC/ST चे क्लोज % समान नसले असते.

मी पुढे म्हणालो आहे की, "( जो तो सकुरांचा चार्ट दाखवत आहे) ही लोकं तुलनेने जास्त कम्प्टीट करू शकतात. कोणा विरुद्ध, तर सेम SC ST मधील फर्स्ट जनरेशन मध्ये जे शिक्षण घेत आहेत त्यांच्याच विरुद्ध.

म्हणजेच जर हा डेटा थोडा जरी खरा मानला, तर मोठ्या गावातील दलित लोकसंख्या ही शिक्षणविषयक मेनस्ट्रीम मध्ये सामावली जात आहे. ( खाली अजून डेटा / शहर / गाव/कॉलज आहे. तो पाहा)

आता हा चार्ट आणखी एक - ज्यात शहर विरुद्ध गाव - कॉलेज इत्यादी इत्यादी दाखवतो --- अं नको, सगळे मीच दिले तर तुम्ही काय कराल? म्हणून आता तुमच्या साठी थोडी एक्झरसाईज..

इथे जा आणि तक्ते उतरवून घ्या.

http://www.censusindia.gov.in/2011census/SCST-Series/SC08.html
http://www.censusindia.gov.in/2011census/C-series/C10.html

BTW ते डाउन अ‍ॅरो म्हणजे, परिस्थिती डाउन नाही, तर ते "डाउनलोड" आहे. हो नाही तर कुणी तर " अहो तिथे सगळे डाउन दिसत आहे, असे लिहायचे.

तर त्याप्रमाने गावात किती / तालुक्यात किती / राज्यात किती चे आकडे मिळतील. त्याला व्हि लुकप लावून ते कॉलेज प्रमाणे ( म्हणजे शहर / खेडेगाव) सॉर्ट करा.

What the educated SC ST are supposed to do ? Do they need to become Bhishmacharya by refusing the reservation so that some other poor will take that opportunity ?>>

डु यु रियली नो व्हॉट आर यु टॉकिंग? वर मी काय लिहिले ते परत वाचा !!!!!!!!! मी फक्त विदिन सेक्टर कॉम्पिटिशन बद्दल लिहितोय. त्याच्या पुढचे तुम्हीच माझ्यावर थोपवत आहात. कृपया हे थांबवा.

Do Mumbai born Kulkarnis perform the same thing for Rural Kulkarnis ? >>>>

आरक्षण हे केवळ आर्थिक स्थिती पाहून दिलेले नाही. तर सामजिक स्थिती पाहून दिलेले आहे. त्यामुळे "कुळकर्णी" चा प्रश्न येत नाही. त्याला केवळ आर्थिक दृष्ट्या सह्कार्य हवे. जे EBC मध्ये काही अंशी पूर्ण होते. आणि तसे नीट होत नसेल तर आर्थिक दृष्ट्या काही मदत मिळाली तर OBC ते मराठा ह्या सर्वांना आरक्षणाची जरूरी भासू नये. सध्या ही प्रोसेस स्ट्रीमलाईन करण्याची जरूरी आहे. ती झाली नाही म्हणूनच सगळीकडे आरक्षण विरोधी मत आपोआप तयार होते. जे पोलिटिकल ग्रूप्सना हवेच आहे !

SC ST आरक्षण असावं. बाकीच्यांना आरक्षण असू नये. पेमेंट सीट्स, डोनेशन्स सीट्स ही बंद कराव्यात. गरीब विद्यार्थ्यांस कर्ज किंवा फी माफी मिळावी.
SC ST आरक्षण आहे तसं चालू द्यावं.

पदाधिकारी चिड्लेत वाट्टं? चिडू नका, समजून उमजून प्रतिवाद करायचा प्रयत्न करा.

रिझर्वेशन वाल्यांनी चांगले मार्क मिळवायला सुरु केले, तरी त्याबद्दल "हे जे वर SC / ST मधले लोकं आहे ते मुख्यतः मुळ प्रवाहाबरोबर गेले अनेक वर्षे राहिलेले असावेत." असे विधान आपण केलेत.

ज्या लोकांना चांगले मार्क मिळालेत, ते सगळे किंवा त्यातले बहुसंख्य, हे फर्स्ट किंवा सेकंड जनरेशन लिटरसीवाले असूच शकत नाहीत, हे आपल्या म्हणण्याचे सार आहे.

आता, आपण दलितांतील वाढलेल्या लिटरसीचा डेटा देऊन हे कसे काय प्रूव्ह करणार आहात?

चुकीचा, असंबद्ध, डेटा कितीही हातभर डकवला, तरी मूळ स्टेटमेंट निराधार आहे, त्यापाठी विदा नाही, हे सत्य आहे.

सकुरा यांच्या लिस्टीतील मार्क मिळवणारी मुले, व त्यांच्या फॅमिली किती वर्षे "मूळ प्रवाहासोबत राहिल्या" याचा डेटा असेल, तर काही अर्थ आहे. अन्यथा, "चालू द्या"

*

माझा पूर्वीचा प्रतिसाद वाचलात तर 'आरक्षणाचा फायदा घेऊन वर आलेले समाजातील एलिट्स समाजासाठी काही करत नाहीत अशी ओरड आरक्षितांतही आहेच' हे वाक्य ही दिसेलच.

>>पण विरोधाचा चष्मा असला तर काय लिहिले ह्या पेक्षा कोणी लिहिले, ह्याला जास्त महत्व तुम्ही देता, हे नेहमीचेच! तर ते असोच !<< Lol

कीचा, असंबद्ध, डेटा कितीही हातभर डकवला, तरी मूळ स्टेटमेंट निराधार आहे, त्यापाठी विदा नाही, हे सत्य आहे. >>

"हे जे वर SC / ST मधले लोकं आहे ते मुख्यतः मुळ प्रवाहाबरोबर गेले अनेक वर्षे राहिलेले असावेत." असे विधान आपण केलेत. >>.

ह्याच्या अर्थ ते इंटर ब्रिडिंग करतात असा नाही. तो तुम्हीच घेऊ शकता. ते वाक्य केवळ आणि केवळ शिक्षणापुरते मर्यादित आहे. त्याला क्वालिफाय करण्यासाठी पुढे मी सेकंड जनरेशन शिक्षण हे लिहिले आहे. त्यातील "मुळप्रवाह" हा शब्द मिस्लिड करत असावा, तिथे मी मुळप्रवाहातील शिक्षण ( जसे MBA, CA, LAW, IAS इत्यादी इत्यादी) असे लिहिले असते तर जास्त बरोबर झाले असते. पण आपण शिक्षणाबद्दल बोलत होतो, तर ते अध्याऋत होते. मे बी सगळे उलगडूनच लिहायला हवे होते !

फर्स्ट जनरेशन शिक्षण = हो आहे की. फेसबुकवर अडाण्याच्या मुलगा जिल्हाधिकारी झाला असे अनेकदा वाचले आहे. पण त्यांचे प्रमाण कमी असते. पण काय आहे की हेच आर्ग्युमेंट करायचे तर मग आरक्षणाची गरजच काय? फर्स्ट असो ही हन्ड्रेथ सगळे समानच नाही का? असेच तर लोकं म्हणत आहेत. आणि आर्थिक आरक्षण द्या म्हणत आहेत. मग तुमचा त्यालाही विरोध का?

थोडक्यात एक हलका दुवा पाहून विरोधासाठी विरोधच चालू ठेवायचा. Happy

हा केंद्रशासनाचा डेटा आहे. देताना विवाहाचा डेटा दिलेला नाही. तो ही आहे. पण मी फक्त शिक्षणाचाच दिला आहे. आधी डेटा मागायचा, मग तो दिला की परत रडायचे, नाही दिला, तर बघा हो, चुकीचा डेटा दिला म्हणून परत गळा काढायचा. तुमच्याशी वाद घालने कठिण आहे बुवा ! का घालतो मी वाद?

बरं बुवा मान्य करतो. तुम्हीच महान. सगळं जे काय आहे ते तुम्हालाच माहिती. !

अन्यथा, "चालू द्या" >> थँक्यु झाडू जी ! आपण चालु द्या म्हणून उपकृत केल्यामुळे मला आधार मिळाला आहे. आपण आधारवड आहात ! थॅंक्स अगेन.

काळाबरोबर ओवरऑल सगळेच शिक्षित होतायत.
हा डाटा इथे या मुद्द्यांवर टाकायचं प्रयोजन कळलं नाही.

सरकारी धोरणानुसार स्वतःची सही स्वतःच्या भाषेत करता येणे याला ' साक्षरता' म्हणतात.
म्हणजे, धोरण काही असो, तपासले एवढेच जाते.

यामुळे त्या लोकांची प्रगती झाली म्हणणे हे महान आहे.

तुम्ही त्यापेक्षा एस सी एस टी तल्या पदवीधरांचा डाटा शोधून टाका.
ते जास्त रिलायबल राहिल.
चौथी, सातवी आणि दहावी हे टप्पे पार करणे एकंदरच शोषितांना कसे कठिण आहे 'यात ग्रामिण , आदिवासी, एस सी, एस टी, स्त्री पुरुष आणि सगळ्याच कॅटॅगरीतल्या एक्दर स्त्रिया येतात.

हा डाटा इथे या मुद्द्यांवर टाकायचं प्रयोजन कळलं नाही. >>. मला डेटा मागितला, मी आधी दिला नव्हता. मुद्दा सेकंड जनरेशन शिक्षणातून आला.

सरकारी धोरणानुसार स्वतःची सही स्वतःच्या भाषेत करता येणे याला ' साक्षरता' म्हणतात. >> डेटा वाचला तर केवळ आणि केवळ सही करणार्‍यांचा तो डेटा नाही.

तुम्ही त्यापेक्षा एस सी एस टी तल्या पदवीधरांचा डाटा शोधून टाका.
ते जास्त रिलायबल राहिल.

>> अहो साती, दिला आहे की हो. असे काय करता! जरा थोडी तुम्हीही मेहनत घ्या की वाचायची. कॉलेज मध्ये जाणारे / २ री पास / १० वी पास / व्होकेशनल असे सर्व आहे.

माझा मुद्दा असा होता. : " कट ऑफ रेट (सकुरा डेटा) जरी चांगला दिसत असला तरी तो मिसलिडींग आहे, कारण अजून तळागाळात प्रगती नाही. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. असे लिहिले. वर कदाचित ती लोकं मेनप्रवासोबत सेकंड जनरेशन शिक्षणातली असतील असे लिहिले. तर मग लगेच त्यावर मला डेटा मागीतला, तो दिला. ज्यातून डिकेड ऑन डिकेड प्रगती दिसते. सर्वणांचा तुलनेत चित्र वाईट आहे, पण भंयकर कॅटॅगिरीतून बाहेर पडताना दिसत आहे.

असो.माझे मुद्दे संपले आहेत. मी वर दोनदा तेच ते लिहिले आहे. ह्याचा अर्थ एकतर मी चुकीच्या ट्र्क वर चर्चा करतो आहे, किंवा मी म्हणतो आहे ते पोचत नसेल.

ह्याच्या अर्थ ते इंटर ब्रिडिंग करतात असा नाही. तो तुम्हीच घेऊ शकता.

<<

बाप्रे! Rofl इंटरब्रिडींग कुठून आलं यात??

मान गये आपको और आप की कल्पना की उडान को! इतकी कल्पनेची झेप नाही बा आमची! Lol

केदार काय म्हणताहेत ते मला कळलंय असं वाटतं. आरक्षणाची गरज का आहे, तर फर्स्ट जनरेशन लर्नर्स ट्रॅडिशनल लर्नर फॅमिलीजमधून आलेल्यांच्या स्पर्धेत टिकू शकत नाहीत. पण याचा अर्थ त्यांच्याकडे गुणवत्ता नसते असा नाही, तर त्यांच्यासमोर अडथळे जास्त असतात. (हे ब्लँकेट जनरलायझेशन/प्रिज्युडिस असल्यास सांगा)

स्पर्धेत कॅटेगरी टॉपर्समध्ये किती कमी अंतर आहे यावरून त्यांना गाढव म्हणणार्‍यांच्या डोळ्यांत अंजन पडावं.
(पण तेच लोक याचाच अर्थ आरक्षणाची गरजच नाही म्हणतील याचीही कल्पना आहे.)
जिथे कट ऑफची आकडेवारी पाहिलीय तिथे बर्‍यापैकी तफावत आहे, म्हणजे अजूनही पुश करायची गरज आहे.

हे त्यांनी लिहिलंय, ते मीही अनेकदा लिहिलंय. अर्थातच याच्याशी सहमत.

माझा मुद्दा असा होता. : " कट ऑफ रेट (सकुरा डेटा) जरी चांगला दिसत असला तरी तो मिसलिडींग आहे, कारण अजून तळागाळात प्रगती नाही. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. असे लिहिले. वर कदाचित ती लोकं मेनप्रवासोबत सेकंड जनरेशन शिक्षणातली असतील असे लिहिले. तर मग लगेच त्यावर मला डेटा मागीतला, तो दिला. ज्यातून डिकेड ऑन डिकेड प्रगती दिसते. सर्वणांचा तुलनेत चित्र वाईट आहे, पण भंयकर कॅटॅगिरीतून बाहेर पडताना दिसत आहे.

<<

हाच मुद्दा होता तर ह्याच भाषेत लिहायला काय अडचण होती? हेच तर आम्ही लिहितोय, की पल्ला गाठायचा बाकी आहे, म्हणून आरक्षणाची गरज संपलेली नाही.

- आधारझाड / वड झाडू Wink

आरक्षण = गुणवत्तेवर काट असं समीकरण करणारर्‍यांसाठी तिथे काही किमान गुणवत्ता असावी लागते, ती पुरेशी आहे असं कोणीतरी ठरवलेलं आहे. त्यांना त्यातलं काहीच कळत नसेल असं म्हणायचं का?

मला पडलेला प्रश्न : मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत लांंबून गंमत बघणारे लोक सर्व जातींना लोकसंख्याप्रमाणात आरक्षण द्यावे असं म्हटल्यावरच मैदानात का उतरले?

सध्या फक्त सुरवातीचे ६० प्रतिसाद वाचले आहेत.

साहिल, प्रतिसाद आवडला.
महाराष्ट्रात ०.७% जैन आहेत त्यामुळे जर सराकारी कॉलेज मध्ये ६० जागा असतिल तर आमच्या वाटेला ० जागा येतिल >> यावर उपाय म्हणजे कॉलेजात एकूण किती जागा आहेत ते पहायचे. FE साठी एकूण ३०० जागा असतील तर त्यातल्या २ जैनांना मिळतील.

अमितव आणि अंजली, इतर धाग्यांवर इतरांशी तुमच्या काय चर्चा झाल्यात त्याला इथे किंवा तिथे ती ती लोकं उत्तरं देत आहेतच. पण लेखातल्या मुद्द्यांना तुम्ही 'काहीही' म्हणल्याने काही प्रश्न:
1. प्रत्येक वयस्क भारतीयाला एका मताचा हक्क आहे इर्रिस्पेक्टीव ऑफ लिंग, आर्थिकस्थिती, जात/धर्म. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचा सरकारमधे एक स्टेक/शेअर आहे हे मान्य आहे का?
2. तुम्ही जर पॉलिसीमेकर असता तर सध्याची स्थिती कशी हाताळली असती? तुमची वैयक्तीक मतं काय आहेत हे इथे म्याटर करत नाही. सध्या काहीएक फॉर्म्याटमधे आरक्षण आहे, त्यातले कोणतेही काढून घेता किंवा कमी करता येणार नाही हा फ्याक्ट आहे आणि आरक्षण नसलेली लक्षणीय संख्या अ/हिंसक पद्धतीने निदर्शन करत आहे. तर तुम्ही काय कराल?
3. शाळा कॉलेज आणि नोकर्या यांचे सरकारी आणि खाजगी असे दोन प्रकार करता येतील यातल्या सरकारी प्रकारात काय करायचे ते ठरवायचा पुर्ण हक्क सरकारला आहे हे मान्य?
4. खाजगी शाळेत २५% खाजगी नोकर्यांत ०% पण तेच खाजगी कॉलेजातमात्र ८०% जागा कशा भरायचे हे सरकार ठरवते. हा काय प्रकार आहे?

अय्यो,
इंटर ब्रिडींग मिस झालं!

ते केदारनी आपल्याला पुरेसा मानसिक एक्सरसाईज मिळावा म्हणून लिहिलं असणार.
सगळं तेच स्पष्ट लिहिणार मग आपण काय करणार, नै का?
Wink

एकूण .. कठीण आहे!

ठेवावे.पण गोम अशी आहे की आता हे मुळ प्रवाहात आलेले SC/ST आरक्षण इतर भाईबंदांपर्यंत कसे पोचू देणार ?

Can anybody tell me what is the exact meaning of this sentence ?

Mobile problem... So typing english

मूळ प्रवाह या शब्दात गोम आहे.

त्याला मूळ प्रवाह न म्हणता मुख्य प्रवाह किंवा आणखी काही समर्पक म्हणता येईल.

कुठेही जा, काहीही करा, तुम्ही मूळ प्रवाहातून काही बाहेर पडू शकत नाही. जात नाही ती जात.

लिहलं की वर.
ज्या लोकांना स्वतःसाठी एस सी एस टी आरक्षणाची गरज वाटत नाही त्यांनी त्या जागा आपल्या आर्थिक्/सामाजिक दुर्बल भाईबंदांसाठी सोडायच्या म्हणे!
आणि ओपनमध्ये कंपिट करायचं!
मग आमच्या सीटस खाल्ल्या म्हणून ओपनवाल्यांच्या शिव्या खायच्या.

किंवा ओपनवाल्याला कधीही कॅटॅगरीची सीट मिळत नाही (खरे तर हे अझंप्शन चुकीचे आहे. 'रिक्त' सीटा ओपनलाच येतात फिरून ) आणि कॅटॅगरीवाल्याला ओपनची सीट घेता येते हा अन्याय आहे असा युक्तीवाद ऐकून घ्यायचा.

म्हंजे रेल्वेत बायका जनरल डब्यात बसू शकतात पण पुरुष कधीच बायकांच्या डब्यात नाही, या धर्तीवरच्या युक्तीवादावर माना डोलवायच्या.

कळलं!

खैरलांजीला आज १० वर्ष झाली अजुन खटला चालू आहे. यातील आरोपींवर अ‍ॅट्रोसिटी कायदा लावला नाही. का लावला नाही? सरकारी वकिलांनी मागणी का केली नाही?

जे २०-२३ आरोपी होते त्यांना जामीन मिळला आहे आणि भोतमांगे अजून न्याय मागत फिरत आहे.

हा अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग आहे ?

ज्यांचा आरक्षणास पाठिंबा आहे, त्याची उपयुक्तता पटते त्यांच्यात विस्तव जात नाही. ज्यांच्या मनात मुळातच आरक्षणाप्रती चीड/द्वेष/अज्ञान आहे त्यांचे काय उद्बोधन होणार.

दुसरे, अ‍ॅडमिशनला आरक्षण आहे. पास व्हायला किती टक्के आरक्षण असते? की पास होणारे सगळेच रिझर्वेशनवाले नालायक असतात?

ओपनचे नालायक, वा लाचखाऊ सरकारी नोकर किती पाहिलेत तुम्ही आजपर्यंत? की दिसलेच नाहीत?
>>
अरक्षणविषयक आकडेवारी नीट पाहिली, तर ओपन व रिझर्वेशनमधे मार्कांत आजकाल तरी खूप कमी फरक दिसतो.
मला ९२% अन सीओईपी मिळालं नाही, (बीसीवाल्याला मिळालं,) असं म्हणणारा, अ‍ॅक्चुअली "बीसीवाल्याला ९२%वर मिळालं" हे सांगत असतो. अन "मला रेप्युटेड कॉलेज मिळालं नाही" असंही म्हणत नसतो. फक्त, सोयीच्या वा आवडीच्या सीओईपी ऐवजी थोड्या गैरसोयीचं दुसरं कोणतं मिळालेलं असतं, जे तो सांगत नसतो..>>
एकही मार मगर जोर्से मारा Happy

Pages