मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने

Submitted by ॲमी on 24 June, 2015 - 01:12

सध्या वेगवेगळ्या शहरात होणार्या 'मराठा क्रांती मोर्चा'च्या निमित्ताने थोडे म्युजींग...

आरक्षणाबद्दल लाऊड थिंकींग:

1. राजकीय आरक्षणामुळे मुठभर लोक अफेक्ट होतात. त्यामुळे त्याला सर्वसामान्यांचा फारसा विरोध असेल असे वाटत नाही.

2. सरकारी नोकर्यांमधील आरक्षणालादेखील फार विरोध असायचे कारण नाही. कारण एकूण नोकर्यांपैकी हार्डली २ ते ३ % नोकर्या सरकारी असतील. त्यामुळे अफेक्ट होणारे लोक कमी आहेत. आणि त्यातही आपल्यावर अन्याय होतोय किंवा गुणवत्तेनुसार बढती मिळत नाही वगैरे भावना झालीच तर बाहेर इतके व्हास्ट खाजगी क्षेत्र उपलब्ध आहे त्यात ते जाऊ शकतात.

3. शिक्षणक्षेत्रातील आरक्षण हा मात्र फार वादाचा विषय होतो. एकतर बर्यापैकी मोठी लोकसंख्या असलेल्या मध्यमवर्गीय व्हाइट कॉलर लोकांना शिकणे आणि नोकर्या करणे याखेरीज इतर पर्याय माहीत नसतात. त्यात परत यांच्या शहरी मुलांना घरातील पिढ्यानपिढ्याच्या शैक्षणीक वारसा किंवा वातावरणाचे पाठबळ मिळते. ट्युशन लावून, खर्डेघाशी करून यांना मार्क मिळतात. आणि मग आपण 'गुणवत्ताधारी' आहोत असे त्यांना+इतरांनादेखील वाटायला लागते. परीणामी 'मराठाजैनमारवाड्यांनी काढलेल्या खाजगी कॉलेजा'तील जागा आपल्याच 'हक्का'च्या आहेत अशी भावना निर्माण होते. ओऽ हैलो कॉलेज खाजगी आहे ना?

या ब्रेनपॉवरचा कुठेतरी, काहीतरी उपयोग करून घेणे हे सरकारच्या अनेक कामांपैकी एक. मग सरकार खाजगी कॉलेजने अॅडमिशन कशा करायच्या याचेदेखील नियम बनवते. अर्रेऽ पण कॉलेज खाजगी आहे ना?? मग सरकार का लुडबूड करतंय त्यांच्या कारभारात? शिक्षणसम्राटांना स्वजात+गुणवत्ता असे क्रायटेरीया लावून आपल्या कॉलेजातील १००% जागा का भरता येऊ नयेत? (याबद्दल पान ५ वरचा माझा प्रतिसाद वाचा)

बरं तेही एकवेळ ठीक आहे समजून ते नियम इतकी वर्ष पाळले. तरीही परत परत या सोकॉल्ड गुणवत्त्याधार्यांची किरकीर चालूच. 'आमच्यापेक्षा श्रीमंत आहे. माझ्यापेक्षा कमी मार्क मिळाले. तरी ति/त्याला अॅडमिशन मिळाली आणि मला नाही. केवळ आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे...'
अरे पण मग ओपन आणि आरक्षण दोन्हीकडे सोकॉल्डउच्चजातीतलेच गर्दी करतील की! जर परत पुर्वीसारखेच एक किंवा दोन जातीत शिक्षण रेस्ट्रीक्ट होत असेल तर उद्देश/उपयोग काय आरक्षणाचा?

ही एक बाजू झाली.

दुसर्या बाजूने पहायचे तर हेदेखील दिसते की
* क्रिमी लेयर ६ लाखपर्यंत वाढवली जाते
* दोनतीन पिढ्या आरक्षण घेऊनदेखील पुढची पिढी परत आरक्षणावरच अवलंबून राहते
* एकेकाळी स्वतःला देवैज्ञ ब्राह्मण म्हणवून घेणारे OBCत जायला तयार होतात किंवा
* मराठा जाट पटेल गुज्जर एवढंच काय ब्राह्मणदेखील आरक्षण मागायला लागतात.

जर नोटीसेबल लोकसंख्येत आरक्षणामुळे एकमेकांबद्दल कडवटपणा, अनरेस्ट दिसत असेल तर यावर उपाय काय?

घटना अशी आहे, कायदे तसे आहेत म्हणून यांच्या मागण्या, प्रॉब्लेम उडवून लावणार का? घटना, कायदेदेखील माणसांनीच माणसांसाठी बनवलेत ना? असेल त्याकाळी तो नियम सुटेबल. पण आत्ताच्या लोकांना तो पटत नसेल तर बदला ना घटना, कायदे. काय हरकत आहे याला?

a. एकदाच जातीनिहाय जनगणना करा आणि देऊन टाका प्रत्येकाला आपापल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. त्यातपरत सबक्याटेगरी करा जेंडर आणि आर्थिक अशी. उदा समजा मराठे २४% आहेत तर त्यांना तेवढ्या जागा. त्यातल्या १२% स्त्रियांना आणि १२% पुरुषांना. त्यातपरत ६% गरीब स्त्रियांना आणि ६% गरीब पुरुषांना.
b. क्रिमी लेयरऐवजी प्रत्येक गटातल्या EBCसाठी ५०% जागा ठेवा उत्पन्न <२.५ लाख.
c. दोन पिढ्यांनी आरक्षण घेतले असेल तर पुढच्या पिढ्यांना देऊ नका
d. सगळे सरकारी फायदे केवळ २ मुलगा/गींनाच मिळतील असा नियम करा.

खुश होतील का यापद्धतीत सगळेजण?
होतील वाटतंय मलातरी. अॅटलिस्ट काही काळ...

===

अॅट्रोसिटीबद्दल लाऊड थिंकींग:
माबोवरच एका धाग्यात वाचलं की संपुर्ण महाराष्ट्रात वर्षभरात अॅट्रोसिटीच्या फक्त ३५० च्या आसपास केस दाखल होतात. आणि त्यापैकी फक्त १५ ते २० मधेच गुन्हा सिद्ध होतो. एकूण गुन्ह्यांशी तुलना करता हा फारच मायनर आकडा आहे. पण तरीही जर या कायद्याची धमकी देऊन पैसे उकळणे वगैरे प्रकार होत असतील तर तो मॉडिफाय करायला हरकत नाही. हे थोडं सेक्शन ४९८अ सारखं वाटतंय. एकूण कायद्याला विरोध करता येत नाही पण त्याचा गैरवापरदेखील नाकारण्यासारखा नसतो.

===

बाकी कोपर्डी बलात्कार असो किंवा इतर कोणताही ग्रुसम गुन्हा, गुन्हेगार दलित की मराठा की इतर कोणत्या जातीचा हे न पाहता जलदगती तपास होऊन कडक शिक्षा व्हावी याबद्दल कोणाचेच दुमत नसेल.

===
मोर्चाबद्दल लाऊड थिंकींग:

मी जे काही थोडंफार वाचलं त्यानुसार याची सुरवात 'कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा' फक्त या हेतूनेच झाली. पण त्याला इतका जास्त रिस्पॉन्स मिळाला की संयोजकदेखील आश्चर्यचकीत झाले. आता इतके लोक उत्स्फुर्तपणे एकत्र येतच आहेत तर अधिक काही करता येइल का अशा विचारतून इतर शहरं आणि इतर मागण्या वगैरे हळूहळू अॅड होत गेलं.

आता यात छुपे हेतू, राजकारण, ब्राह्मण मुख्यमंत्री (सिरीयसली! तुम्हाला खरंच असं वाटतं का की सर्वसामान्याला मुख्यमंत्री कोणत्या जातीचा आहे याने फरक पडतो? आणि लोकांनी फडणवीस, भाजपा, रास्वसं यांना निवडून दिलं?? ती तो सगळाच मोदींचा करीश्मा होता???) वगैरे शोधायचं का हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. मीतरी शोधणार नाही.

इतकीसारी लोकं शिस्तीत, शांततेत, लोकशाही मार्गाने एकत्र येत आहेत त्याचं कौतुकच आहे.
मीदेखील सहभागी झाले असते पण गर्दीचं वावडं असल्याने सध्यातरी बाहेरून पण मनापासून शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती,

इंजिनियरींग करून मग बालाजी तांबेसारखी डॉक्टरकी करणारे, वा कोणत्याही काऊन्सिलकडे रेकग्निशन नसताना "आयुर्वेदिक" उपचार करणारे रामदेवबाबासारखे संभावित ***** राहिलेच बर्का. Wink

अंजली, तुम्ही मांडलेले बहुतेक मुद्दे तिथे मराठयांच्या , खरं तर, त्यांच्या आताच्या मागण्यांच्या बाजूने बोलणार्‍या, पण एकंदरितच जात्याधारित आरक्षण नको म्हणणार्‍या काहींनी मांडलेत, त्यांचा प्रतिवादही केला गेलाय. तुम्ही त्यापुढचं काही लिहाल असं वाटलेलं.

<आरक्षण हा सर्वात उत्तम उपाय नाही पण दुसरा कुठला उपाय सापडेपर्यंत हाच उपाय आहे" अशा अर्थाचं लिहीलेलंही पटलं. पण मेडीकल, इंजिनीअरींग(रस्ते, पूल वगैरे बांधणे), जिथे लोकांच्या जीवाशी संबंध येतो तिथे, तसंच देशाच्या सुरक्षिततेचा, संवेदनाशील विषयांमधे केवळ जातीच्या आधारे, आरक्षणाच्या आधारे प्रवेश मिळावा का? तिथे कुठलीही जात, आर्थिक स्तर वगैरे न बघता योग्य, लायक व्यक्तिंनाच प्रवेश मिळेल असं बघता येईल का? ते कसं साध्य करावं? >
अर्र, मला वाटलं काहीतरी नवीन लिहाल. मी कॉलेजमध्ये असताना १९८५-८८ दरम्यान (नक्की आठवत नाही, पण त्याच दिवशी शिवाजीराव निलंगेकरांनी आपल्या मुलीचे मेडिकलचे मार्क कसे वाढवून घेतले, याची हेडलाइन होती, हे नक्की) आरक्षणावर झालेल्या वादविवाद स्पर्धेतलेच मुद्दे मांडलेत. अरर्थात त्यात नवल काही नाही. कोलकत्त्यातला फ्लायओव्हर कोसळल्यावर त्याचं खापर रिझर्व्हेशनवर फोडणारे आणि डॉक्टरकडे जाताना तो रिझर्व्हेशनवाला आहे का हे तपासणारे आठवले.

यालाही त्या धाग्यावर उत्तर लिहिलंय.प्रतिप्रश्न पेड सीट्सवर अ‍ॅडमिशन घेऊन, मॅनेजमेंटवर दबाव आणून पास होणार्‍या डॉक्टर्स इंजिनीयर्सबद्दल तुम्हाला अशीच काळजी वाटेल का? की गुणवत्ता विकत घेतलेली चालते?

क्रीमी लेयरवर मी अनेकदा लिहिलंय. तेच आणायला कोणतेच राजकारणी तयार नाहीत, त्यांना जात्याधारित आरक्षण रद्द करायला तयार करणार?
उच्चवर्णीय जातींमधील आर्थिक दुर्बलांना आरक्षणाशिवाय कोणत्या प्रकारे मदत केली जाते , करता येईल तेही तिथे लिहिलंय.

त्या धाग्यावर मी आणि नंतर टण्यांनी एस सी , एस टी साठी जात्याधारित आरक्षण का आवश्यक आहे ते व्यवस्थित लिहिलं आहे. तुम्हाला समजून घ्यायचं नसेल, पटत नसेल तर राहिलं.

पण जे तिथे लिहिलं नसेल, ते इथे लिहितो : जोवर जातीवर आधारित भेदभाव समाजात दिसतोय, तोवर जातीवर आधारित आरक्षणाला मरण नाही.
मी एस सी, एस टी आरक्षण डिफेंड करत राहणार आणि त्याला जात हेच कारण असेल. बाकीच्या आरक्षणांबद्दल ते तसं नाही, हेही पुरेशा स्पष्टपणे लिहिलंय.
तुमच्यानंतर आलेल्या एका प्रतिसादात तोच मुद्दा उचललाय.
याऊपर काही लिहायचं झालं, तर त्या धाग्यावरचे माझे आणि माझ्याशी मिळतेजुळते काही प्रतिसाद आणून इथे चिकटवावे लागतील.

<मुळात जातीच नष्ट व्हायला हव्यात आणि त्यादृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. आरक्षणामुळे हा हेतू साध्य व्हायला अडचण होत आहे> सामाजिक उतरंडीशी आर्थिक उतरंडीने फारकत घेण्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता खरी आहे, हेच दिसून येतं.
जाती नष्ट व्हायला आरक्षण नष्ट करण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही? त्यासाठी मुळात जीतीभेद caste discrimination होत नाही अशी स्थिती आहे का?

ज्या जातींना जातीवर आधारित कोणतेही (सरकारी) फायदे मिळत नाहीत, त्यांना याची गरज नाही, त्यांनी जाती सोडल्या का? त्यांच्या जात्याधारित संघटना नक्की काय करतात? त्यांना जातव्यवस्था नष्ट होण्यात रस आहे का? शिक्षण नोकरीत अडत नसेल तर जगण्यच्या अन्य क्षेत्रांत जात आणत नाहीत, असं खात्रीने म्हणता येईल?

>>>>मला ९२% अन सीओईपी मिळालं नाही, (बीसीवाल्याला मिळालं,) असं म्हणणारा, अ‍ॅक्चुअली "बीसीवाल्याला ९२%वर मिळालं" हे सांगत असतो. अन "मला रेप्युटेड कॉलेज मिळालं नाही" असंही म्हणत नसतो. फक्त, सोयीच्या वा आवडीच्या सीओईपी ऐवजी थोड्या गैरसोयीचं दुसरं कोणतं मिळालेलं असतं, जे तो सांगत नसतो..<<<<

मी खूप विचार केला. असे लिहिणे योग्य होईल की नाही ह्यावर मंथन केले. पण अधिक चांगला शब्द नाही सुचला. हा वरचा उतारा दुर्दैवाने 'अज्ञानी' ह्या कॅटेगरीतच मोडतो. कृपया अ‍ॅमी व प्रशासक महोदय ह्यांनी मला माफ करावे अशी विनंती!

<>>>>मराठा, जाट, पटेल लोकांचे प्रश्न आरक्षणाने सुटण्यासारखे नाहीत. ते अर्थव्यवस्थेतल्या (शेतीशी संबंधित आणि अन्य) बदलांमुळे निर्माण झालेले आहेत.<<<<

यातला उत्तरार्ध सोडून फक्त पूर्वार्धावर लिहिलेल्या प्रतिसादाच्या नशिबी, सुनील गावसकर ऑफ स्टंप बाहेरच्या चेंडूचं जे करीत असे , तेच आहे.

घ्या , मी लिहीत असतानाच झाडू आणि सातींनीही तेच मुद्दे लिहिलेत. यावरून आम्ही तिघेही एकमेकांचे ड्यु आय डी असल्याचं (किंवा नसल्याचं) सिद्ध होतं. Wink

अ‍ॅमी, जरा सगळ्या प्रवाशांची तिकिटे आणि गंतव्यस्थाने तपासा बरं. उगाच भलतीकडे, तेही उलट दिशेला जायचे प्रवासी इथे यायचे. Wink

हो ना!

विदाऊट तिकिट - आय मीन विदाऊट अ‍ॅडव्हान्स बुकिंग/रिझर्वेशन- असूनही विचार बिचार करतात बिच्चारे! एकंदरितच कठीण आहे या देशाचं.

वाट्टेल ते करा म्हणजे गुणवत्ता सोडून हवं त्याला १००% प्रवेश द्या. मग तो जातीच्या आधारे असेल किंवा डोनेशन देण्याच्या पात्रते प्रमाणे. असं झालं तर केवळ जात आहे किंवा केवळ पैसा आहे अशा कारणाने मुलं येतील. त्यातील ज्यांच्यात गुणवत्ता असेल त्याचा प्रश्नच नाही, पण दुर्दैवाने डायव्हार्सिटी राहणार नाही. कुठल्याही क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा असं वाटत असेल तर डायव्हार्सिटी अत्यंत महत्वाची आहे. फक्त ब्राह्मण किंवा फक्त विशिष्ट जातीचे लोक आले आणि डायव्हार्सिटी साधली गेली नाही तर एकांगी विकास होईल. मी विकास म्हणजे नवे शोध, नवी तंत्रे असा विकास म्हणतोय. कम्युनिटीचा विकास म्हणत नाहीये.

असं एकांगी सुरु झालं की त्या संस्थेची गुणवत्ता घसरेल आणि तिकडे मग पैसा किंवा जात असूनही कोणी फिरकणार नाही.
भरत म्हणतायत त्यातील अनुसूचित जाती/ जमाती आरक्षण असावं असं मला वाटतं, ओबीसीने कॅन ऑफ वर्म्स बाहेर आले. माझा अभ्यास नाही पण पाहिलेल्या तुटपुंज्या sample साईज वर कितपत फायदा खऱ्या गरज असणाऱ्या व्यक्तीना झाला या बद्दल साशंक आहे.

कॅनडा आम्र्विकेत गुणवत्तेवर प्रवेश मिळतो. डायव्हार्सिटी हवी म्हणून नोकऱ्यांत विविध रंगाचे (त्वचेच्या) विविध ठिकाणहून आलेले, स्त्री आणि पुरुष घ्यावे यासाठी कंपनीला सरकारला रिपोर्ट द्यावा लागतो. तरीही नियमातून आडवाटा शोधतातच. एफर्ट चालू आहे.

अवांतर: झाडू म्हणजे इब्लिस का?

झाडू,
तुमच्या "आरक्षणाविषयी राग मनात कुठे ना कुठे भरलेला असतोच." यापुढे खरंतर काहीही बोलायची इच्छा नाही. आरक्षणाविषयी राग वगैरे म्हणून तुम्ही रूट कॉज कडे दुर्लक्ष करतायत. आणि त्याला उपाययोजना करण्याऐवजी परत जातींवर राग धरत आहात. भारताबाहेर असल्यामुळे व्यक्तिशः मला आरक्षणाचा परीणाम जाणवत नाही. पण भारत मूळ देश असल्यानं तिथे घडणार्‍या घटनांचा मानसिक तरी इंपॅक्ट जाणवतो. बाकी तुम्ही लिहीलेला प्रतिसादविषयी बोलण्यासारखं काहीही नाही.

साती,
मी विचारत नाही, कुणी उत्तरे देऊही नका! >>> असं बोलून तू अप्रत्यक्षरीत्या जे विचारलंस त्याचं उत्तर म्हणजे कुवत नसताना मॅनेजमेंट कोट्यातून किंवा पैसे भरून शिकणार्‍या लोकांकडूनही धोका आहेच. म्हणूनच माझ्या पोस्टमधे 'लायक' व्यक्तींनाच असं लिहीलं आहे ते वाचलं नाहीस का?

यालाही त्या धाग्यावर उत्तर लिहिलंय.प्रतिप्रश्न पेड सीट्सवर अ‍ॅडमिशन घेऊन, मॅनेजमेंटवर दबाव आणून पास होणार्‍या डॉक्टर्स इंजिनीयर्सबद्दल तुम्हाला अशीच काळजी वाटेल का? की गुणवत्ता विकत घेतलेली चालते?>>>> परत माझं पोस्ट वाचा. 'लायक' व्यक्ती मग ती कुठल्याही जातीची असू दे, कुठल्याही आर्थिकस्तरावरची असू दे.
तुम्हाला मुद्दे तेच तेच वाटत असतील. असू देत. तिथे होणार्‍या एवढ्या चर्चेत तरी नविन आणि वेगळे काय मुद्दे आहेत?

ज्या जातींना जातीवर आधारित कोणतेही (सरकारी) फायदे मिळत नाहीत, त्यांना याची गरज नाही, त्यांनी जाती सोडल्या का? त्यांच्या जात्याधारित संघटना नक्की काय करतात? त्यांना जातव्यवस्था नष्ट होण्यात रस आहे का? शिक्षण नोकरीत अडत नसेल तर जगण्यच्या अन्य क्षेत्रांत जात आणत नाहीत, असं खात्रीने म्हणता येईल?>>> मग त्यावर उपाय करा की. "जात्याधारित संघटना" म्हणजे कोणती? जातच नष्ट केली की बरेच प्रॉब्लेम्स सुटतील ;). त्या संघटनाही राहणार नाहीत आणि बाकी त्यांना मिळणार फायदेही.

१. वाट्टेल ते करा म्हणजे गुणवत्ता सोडून हवं त्याला १००% प्रवेश द्या.
<<
म्हणजे? व्यवस्थापन कोटा किती असतो तिकडे?
२.
कॅनडा आम्र्विकेत गुणवत्तेवर प्रवेश मिळतो. डायव्हार्सिटी हवी म्हणून नोकऱ्यांत विविध रंगाचे (त्वचेच्या) विविध ठिकाणहून आलेले, स्त्री आणि पुरुष घ्यावे यासाठी कंपनीला सरकारला रिपोर्ट द्यावा लागतो. तरीही नियमातून आडवाटा शोधतातच. एफर्ट चालू आहे.
<<

१००% गुणवत्तेवर प्रवेश मिळतो म्हटलात ना? मग ते काळे, पिवळे, तपकिरी, स्त्रिया/पुरुष गुणोत्तर हे काय आहे? तिकडेही आरक्षण आहे की काय?

नियमातून आडवाटा शोधतात म्हणजे आपल्याकडच्या "आपल्या" संस्थांतून "पात्र उमेदवार उपलब्ध नाही म्हणून जागा रिक्त" असा शेरा मारून आरक्षणाचा बॅकलॉग ठेवणेच ना?

एफर्ट चालू आहे म्हणजे काय? ट्रंपना निवडून आणाण्याचा प्रयत्न सुरू आहे कि काय? Rofl

बाकी तुम्ही लिहीलेला प्रतिसादविषयी बोलण्यासारखं काहीही नाही.
<<
निरुत्तर का काय म्हणतात ते हेच का? Wink

असो. तुम्ही नीट वाचला नाही माझा प्रतिसाद. अन तो तुमच्या प्रतिसादाच्या "अनुषंगाने" आरक्षणाबद्दल होता. तुम्हाला व्यक्तिशः उद्देशून नव्हता.
अहो, शेवटचे दोन परिच्छेद वाचा! कंय लिव्लंय! कंऽय लिव्लंऽय!! वाह!!! Rofl
असो.

रूट कॉज : root cause behind sc st reservation is caste based discrimination. and it does exist. and it is hale and hearty. Even if a person breaks the glass ceiling, he may not avail of reservation and prove himself equal or superior, he cannot delete his caste from the minds of those around him.

मला तर काय बै कळेचना !

आरक्षणामुले गुणवंतांवरअन्याy होतो व अपात्राला संधी म्ळत , असे म्हणुन ब्राह्मण व मराठे कोकलत होते.

आता मराठे आरक्षण मागताहेत व ब्राह्मण मराठ्याना पाठिंबा देत आहेत

सरकारी कागदपत्रे सोडली तर जात बाजूला ठेवायला लोकांना काय प्रॉब्लेम आहे?

ज्या जातींना जातीवर आधारित कोणतेही (सरकारी) फायदे मिळत नाहीत, त्यांना जात्याधारित संघटनाची गरज का वाटते?

"डायवर्सिटी जपण्या"च्या निमित्ताने, तो भारतात रिझर्वेशन आहे म्हणून टॅलेंट अमेरिकेत जाते म्हणून अमेरिका प्रगत आहे, हा जोक आठवला.

एक प्रश्न : इथे रिझर्वेशन नसते, त्यांना तिकडे काळे म्हणून वेगळ्याच प्रकारचे रिझर्वेशन मिळते का? Wink

caste based discrimination. and it does exist. and it is hale and hearty. Even if a person breaks the glass ceiling, he may not avail of reservation and prove himself equal or superior, he cannot delete his caste from the minds of those around him.>>> राईट. मग ते डिस्क्रिमिनेशन कसं बंद करता येईल, तुम्ही म्हणताय तशा व्यक्तिला सर्वसमान स्टॅटस कसे मिळेल यादृष्टीनं प्रयत्न केले तर? त्याच्या आजूबाजूची लोकं म्हणजे एकंदर समाज यांची मानसिकता बदलवणे हा उपाय नाही का? वेळ लागू शकतो (कदाचित पिढ्या लागू शकतील) पण तो उपाय योग्य नाही का? समाजामधे दुही माजवणारे, समाजात फूट पाडणारे उपाय दिर्घकाळ चालू राहिले तर ते समाजाला, देशाला, प्रत्येक व्यक्तीला, एकंदरीतच कुटूंब व्यवस्थेला घातक आहे. कधाचित हे विशफुल, अति आर्दशवादी असेल, पण योग्य उपाययोजना करण्यात देशाचं भलं आहे.

काल एका चॅनलवर मराठा भगिणींच्या मनातली 'खदखद' बघितली. आम्ही ओपन मध्ये असल्याने आम्हाला कमी मार्क्स असल्याने गव्हर्नमेंट जॉबसाठी पुरेशी संधी मिळत नाही. आणि इतर जातीतल्या लोकांना सहज संधी उपलब्ध होते. मात्र राज्यसेवा परीक्षेचा निकाल बघितल्यावर मनातली 'खदखद' नेमकी कोणती आहे ते लक्षात येते. दोन्ही परीक्षेचा निकाल समोर आहे.
ओपन फिमेल - 121
एससी फिमेल - 135

MPSC PRELIMS 2016 CUT OFF.
Open male - 153
SC male - 147
Open female- 121*
SC female. - 135

MPSC PRELIMS 2015.
Open Male- 125
Sc male - 122
Open Female-86*
Sc. Female - 98

14441139_1834861910063251_310837093525902837_n.jpg14469572_1834861776729931_2298908998503587464_n_0.jpg

/>

डिस्क्रिमिनेशन बंद करायचं, तर ते करणार्‍यांचं प्रबोधन व्हायला हवं. रिझर्व्हेशन हे डिस्क्रिमिनेशनचं , द्वेषाचं मूळ कारण आहे, हे पटवून घेणं कठीण आहे.
ते नसेल, तर उद्यापासून जातीभेद आणि द्वेष मिटतील असं कोणी लिहून देईल का?

म्हणूनच म्हटलेलं की देऊन टाका सगळ्यांना जात्याधारित आरक्षण. बघू द्वेष थांबतो का ते?

अमितव दादा, चालू ठेवाय्हची परवानगी मोठ्या मनाने दिल्याबद्दल आपला ॠणी आहे. कित्ती हो मोठ्या मनाचे तुम्ही! तुम्हाला अनेकानेक धन्यवाद!!

काळ्या रंगाच्या वेगळया आरक्षणाबद्दलची माझी शंका कुणी फेडेल का? की ते फक्त अफ्रिकन अमेरिकनांनाच असते?

३% ट्क्के लोक संख्या असनार्‍यांना आरक्षण द्यावे बाकी सगळ्यांना ओपन करावे जातिनिहाय जनगनना करायची गरज नाही उरनार पण इथे गंमत अशि आहे की ३% वाले ८५% जागा व्यापुन राहिलेत ते कोणाला दिसत नाही

रिझर्व्हेशन हे डिस्क्रिमिनेशनचं , द्वेषाचं मूळ कारण आहे>> Uhoh काहीतरी गेस करून बोलू नका. असं म्हटलंय का? पण रिझर्व्हेशनमुळे (किंवा हे एक कारण आहे असं म्हणू) लोक एकमेकांपासून दूर जात आहेत हे तर खरं?

डिस्क्रिमिनेशन बंद करायचं, तर ते करणार्‍यांचं प्रबोधन व्हायला हवं>> हेच मी म्हणतेय ना.

म्हणूनच म्हटलेलं की देऊन टाका सगळ्यांना जात्याधारित आरक्षण. >>> कशाला? त्यानं जास्त प्रॉब्लेम वाढतील की. आत्ता जातींवर आहे, काही दिवसांनी उपजातींवर आरक्षण द्या म्हणतील.

या वरच्या आकडेवारीमुळे आरक्षण घेऊन सीट अडवणारे सगळे गाढव घोड्यांना बाहेर ठेवतात ही ऑर्ग्युमेंट आठवली. इथेही ती जरा बर्‍या शब्दांत, गुणवत्ता, मेरीट हे शब्द घेऊन आलीय. आरक्षणवाले गाढव असतात ही मनात पक्की बांधलेली गाठ कधी सुटणार?

या जातीत जन्माला म्हणून हा व्यवसाय करायचा हे वाईट आणि याचे परिणाम भोगून झाल्यावर आता या या जातील जन्माला आणि त्या जातीचा ग्रोथ रेट इतका इतका आहे म्हणून त्यातील फक्त तेवढ्याच टक्के व्यक्तींनी शिक्षण (उच्च) घ्यायचं. छानच.

भरत तुमच्या कडून अशा वक्तव्याची अपेक्षा न्हवती. पहिल्या १-२ वेळा तिरकस म्हणून सोडून दिलेलं. आता ते तसं वाटत नाहीये.

Pages