सय

Submitted by _हर्षा_ on 17 June, 2015 - 03:54

धुंद पाऊस रम्य गारवा
झरझर झरतो तनुवर मारवा
त्याच्या मिठीतही तुझेच भास
नजरेत इंद्रधनु ओलेते श्वास
श्वासांची लय गंधित स्वर
लाडिक मिठी तरीही कातर
गंधाळल्या तनुस शब्दांचाही भार
श्वासांच्या लयीत जणू मेघमल्हार
आठवांचा वळीव बरसतो जरी
मन धुंद हळवे तरी
प्रेमाची सय घेऊन वारा
वेचित जाई आसमंत सारा
मधाळ स्पर्श अल्लड मिठी
फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<गंधाळल्या तनुस शब्दांचाही भार
श्वासांच्या लयीत जणू मेघमल्हार<<
अहाहा... किती गोड!
आदे, लिहित रहा ग! तुझ्या प्रतिभेला धुमारे फुटलेत की ! Happy