ओरिओ मिल्कशेक

Submitted by मॅगी on 16 June, 2015 - 03:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओरिओ बिस्कीटचे रु. १० चे पॅक (यात ५ बिस्किटे असतात) - प्रत्येक ग्लाससाठी एक
म्ह्शीचं फूल क्रीम दूध (मी चितळे वापरलं) - १ लीटर (यात ५ ग्लास मिल्कशेक झाला)
साखर - ५ टे.स्पू. किंवा कंडेंस्ड मिल्क १/२ ग्लास (किती गोड आवडतं, त्यानुसार)
चॉकलेट सॉस- थोडासा..

क्रमवार पाककृती: 

एका लग्नाच्या निमित्ताने घरी खूप लहान मुले आली आहेत.. त्यांचे हट्ट आणि मस्ती मॅनेज करता करता मोठ्यांनी हार मानुन खूप फटकेही दिले आहेत. तर अश्या रुसलेल्या वेळी त्यांची आवडती मामी/मावशी होण्यासाठी केलेला हा प्रयत्न!!
१. दुधात साखर विरघळवून घ्या (साखर वापरली तर)
२. सगळी बिस्कीट्स चार तुकडे करुन मिक्सरच्या भांड्यात टाका. (मुलं ही मदत आवडीने करतात, त्याना क्रेडीट द्या Wink )
२. मिक्सर कमीत कमी सेटींग वर ठेउन बिस्कीट्स चा बारीक चूरा करा. (१/२ मि. फक्त, नाहीतर ओरिओ लाडू होइल Lol )
३. आता त्यात दूध ओता, कंडेंस्ड मिल्क असेल तर ते सुद्धा. ब्लेंड करा.
४. मिल्कशेक तयार!! ग्लासमध्ये ओता आणि चॉकलेट सॉसने डिझाईन करा Happy
आवडती मावशी (काका/मामा ही होऊ शकता हं..) म्हणून मिळणार्‍या पाप्यांसाठी (किसेस Wink ) तय्यार रहा.

वाढणी/प्रमाण: 
पाच ग्लास होतील, दोन जण सुद्धा पिऊ शकतील ;) इती नवरोबा!
अधिक टिपा: 

मुलं स्वत:सुद्धा तयार करु शकतात, फक्त लक्ष ठेवा.
साखर किंवा कंडेंस्ड मिल्क चे प्रमाण आवडीनुसार बदला.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद रे, मुग्धट्ली आणि दिनेश..
फोटो नाही टाकता आला, कारण कॅमेरा आणेपर्यंत मिल्कशेक गायब झाला Lol

धन्यवाद सगळ्याना.. नेट वर बर्‍याच रेसिपी आहेत याच्या, पण मी असा प्रयोग करुन पाहिला आणि जमलासुद्धा..