ओरिओ बिस्कीटचे रु. १० चे पॅक (यात ५ बिस्किटे असतात) - प्रत्येक ग्लाससाठी एक
म्ह्शीचं फूल क्रीम दूध (मी चितळे वापरलं) - १ लीटर (यात ५ ग्लास मिल्कशेक झाला)
साखर - ५ टे.स्पू. किंवा कंडेंस्ड मिल्क १/२ ग्लास (किती गोड आवडतं, त्यानुसार)
चॉकलेट सॉस- थोडासा..
एका लग्नाच्या निमित्ताने घरी खूप लहान मुले आली आहेत.. त्यांचे हट्ट आणि मस्ती मॅनेज करता करता मोठ्यांनी हार मानुन खूप फटकेही दिले आहेत. तर अश्या रुसलेल्या वेळी त्यांची आवडती मामी/मावशी होण्यासाठी केलेला हा प्रयत्न!!
१. दुधात साखर विरघळवून घ्या (साखर वापरली तर)
२. सगळी बिस्कीट्स चार तुकडे करुन मिक्सरच्या भांड्यात टाका. (मुलं ही मदत आवडीने करतात, त्याना क्रेडीट द्या )
२. मिक्सर कमीत कमी सेटींग वर ठेउन बिस्कीट्स चा बारीक चूरा करा. (१/२ मि. फक्त, नाहीतर ओरिओ लाडू होइल )
३. आता त्यात दूध ओता, कंडेंस्ड मिल्क असेल तर ते सुद्धा. ब्लेंड करा.
४. मिल्कशेक तयार!! ग्लासमध्ये ओता आणि चॉकलेट सॉसने डिझाईन करा
आवडती मावशी (काका/मामा ही होऊ शकता हं..) म्हणून मिळणार्या पाप्यांसाठी (किसेस ) तय्यार रहा.
मुलं स्वत:सुद्धा तयार करु शकतात, फक्त लक्ष ठेवा.
साखर किंवा कंडेंस्ड मिल्क चे प्रमाण आवडीनुसार बदला.
मस्तच
मस्तच
वॉव्व.. आता मी माझ्या
वॉव्व.. आता मी माझ्या भाच्याची लाडकी मामी होणारच...
छान !
छान !
धन्यवाद रे, मुग्धट्ली आणि
धन्यवाद रे, मुग्धट्ली आणि दिनेश..
फोटो नाही टाकता आला, कारण कॅमेरा आणेपर्यंत मिल्कशेक गायब झाला
मस्त आयडिया.
मस्त आयडिया.
आयडीया छान आहे. असेही मुलांना
आयडीया छान आहे. असेही मुलांना ओरिओ बिस्कीटे आवडतातच, प्रयोग करून पाहण्यात येईल.
मुलांना आवडेल अशी आणि सोपी
मुलांना आवडेल अशी आणि सोपी पाकृ.. इतकी सोपी की मी ही करु शकेन
मस्त...
मस्त...
धन्यवाद सगळ्याना.. नेट वर
धन्यवाद सगळ्याना.. नेट वर बर्याच रेसिपी आहेत याच्या, पण मी असा प्रयोग करुन पाहिला आणि जमलासुद्धा..
आहा.. भाचीच्या वाढदिवसाला हा
आहा.. भाचीच्या वाढदिवसाला हा प्रयोग करणार
टीना, नक्की कर. बच्चेकंपनी
टीना, नक्की कर. बच्चेकंपनी खूश होइल..