पाहतो मी

Submitted by vilasrao on 11 May, 2015 - 03:18

गजल :पाहतो मी

आरसा हा रोज आता तोडण्याला पाहतो मी !
साक्ष आताची खरी ही फोडण्याला पाहतो मी !

कोरलेल्या ह्या कपाळा सोसलेल्या मी नशीबा
'रूप माझ्या वेदनेचे ' खोडण्याला पाहतो मी !

हा दिलासाही नकोसा ना कुणाचाही भरोसा !
तोडलेल्या काळजाला जोडण्याला पाहतो मी !

जीव झोके घेत राह्या दोर कोणी बांधली ही
वंचनेचे खेळणे या पाळण्याला पाहतो मी !

काल येथे वेढलेला झाकलेला घोळक्यांनी
का मलाही एकटा मी सांगण्याला पाहतो मी !

साक्षखोटी चांदण्यांची चंद्रमाही डागलेला
चांदण्याचा मांडवाला मोडण्याला पाहतो मी!

ह्या मनाशी आदळे ही लाटमोठी वादळांची
भावना आता अशाही रोखण्याला पाहतो मी!

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण वृत्तात ब-यापैकी लिहीत आहात. काही बदल आवश्यक आहेत (उदा. आयुषाचे हवे आयुष्याचे ज्याच्या मात्रा २२२२ होतात). वृत्तात आपल्याला जे सांगायचे आहे ते सांगत आहोत का वृत्ताला धरून लिहिले जात आहे, हा विचार गरजेचा आहे. शुभेच्छा.

समीर