Submitted by vilasrao on 11 May, 2015 - 03:18
गजल :पाहतो मी
आरसा हा रोज आता तोडण्याला पाहतो मी !
साक्ष आताची खरी ही फोडण्याला पाहतो मी !
कोरलेल्या ह्या कपाळा सोसलेल्या मी नशीबा
'रूप माझ्या वेदनेचे ' खोडण्याला पाहतो मी !
हा दिलासाही नकोसा ना कुणाचाही भरोसा !
तोडलेल्या काळजाला जोडण्याला पाहतो मी !
जीव झोके घेत राह्या दोर कोणी बांधली ही
वंचनेचे खेळणे या पाळण्याला पाहतो मी !
काल येथे वेढलेला झाकलेला घोळक्यांनी
का मलाही एकटा मी सांगण्याला पाहतो मी !
साक्षखोटी चांदण्यांची चंद्रमाही डागलेला
चांदण्याचा मांडवाला मोडण्याला पाहतो मी!
ह्या मनाशी आदळे ही लाटमोठी वादळांची
भावना आता अशाही रोखण्याला पाहतो मी!
विलास खाडे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
vilaswkhade@gmail.com
vilaswkhade@gmail.com
बेफिकीर सरांचा गजलतंत्रा वर
बेफिकीर सरांचा गजलतंत्रा वर लिहिलेल्या मार्गदर्शनपर लेख वाचुन ,गजल रचना,पहिला प्रयत्न !
आपण वृत्तात ब-यापैकी लिहीत
आपण वृत्तात ब-यापैकी लिहीत आहात. काही बदल आवश्यक आहेत (उदा. आयुषाचे हवे आयुष्याचे ज्याच्या मात्रा २२२२ होतात). वृत्तात आपल्याला जे सांगायचे आहे ते सांगत आहोत का वृत्ताला धरून लिहिले जात आहे, हा विचार गरजेचा आहे. शुभेच्छा.
समीर
धन्यवाद! चुका असतीलच हे माहित
धन्यवाद!
चुका असतीलच हे माहित होत पण नेमक्या कोठे हाच संभ्रम होता,,,
धन्यवाद समीरजी
वा वा.......
वा वा.......
संपादित
संपादित
मला तुमची गझल खूप आवडली छान
मला तुमची गझल खूप आवडली छान लिहता । आणी आणखी चागली लिहा। नाव आणि मो नं लिहा