लाल भोपळ्या च भरीत

Submitted by अश्विनि-काजरेकर on 21 April, 2015 - 06:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य :
१/२ कीलो लाल भोपळा मध्यम चिरून (साल काढून)
१/२ वाटी दाण्याचा कूट
१ हिरवी मिरची
१/२ चमचा साखर
मीठ चवीनुसार
१ वाटी दही
फोडणी साठी :
१ tbsp तेल
१ tbsp जीरे
४-५ कढीपत्त्या ची पाने
१/४ चमचा हिंग
१/४ चमचा हळद

क्रमवार पाककृती: 

कृती :
प्रथम लाल भोपळा चिरून त्याचे मध्यम फोडी करून पाण्यात १५ ते २० मिनिटं शिजवावे. थंड झल्यावर पाणी काढून टाकावे. चमच्याचा साह्याने भोपळ्याचे फोडी हलके मॅश करून घ्यावे. आता त्यात दाण्याचा कूट, हिरवी मिरची, मीठ, साखर आणि फेटलेलं दही घालून मिश्रण एकजीव करावे.
एका लहान कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले की त्यात जिरे, कढीपत्ता, हिंग आणि हळदची फोडणी करून ही फोडणी भोपळ्या च्या मिश्रणावर घालावी. मिश्रण नीट एकत्र करून घ्यावे.
लाल भोपळ्या च भरीत तयार.पोळी आणि भाकरी बरोबर हे भरीत उत्तम लागते.
हे भरीत दह्या शिवाय सुधा छान लागत.

वाढणी/प्रमाण: 
४़ जण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपासाचंपण छान होतं भरीत. तूप जिऱ्याची फोडणी. मी भोपळा शिजवतानाच दोन मिरच्या शिजवते बरोबर.

साखर नाही घालत. इथे मिळणारा भोपळा गोड असतो चवीला.

माझीही सेम रेसिपी आहे. फक्त कढिलिंब आणि हळद नाही घालत. दही घालतेच. उपवासासाठी असेल तेव्हा तूप जिर्‍याची फोडणी करते आणि कोथिंबीर घालत नाही.

माझाही आवडता प्रकार. कधी कधी शिजवल्यावर भोपळ्याला फार पाणी सुटते, म्हणून मी तो भोपळा कुस्करून थोडावेळ फडक्यात टांगून ठेवतो.

पाणी काढून टाकावे>> सत्व निघुन जाईल ना सगळं?>> हो ना... भोपळ्याच्या फोडींवर मीठ साखार घालून चमचाभर पाणी घालून भांड्यावर झाकण ठेवलं तर भोपळ्याला चांगलं पाणी सुटत, आणि तेवढ्या वाफेवर-पाण्यावर जेमतेम ५-७ मिनिटात भोपळा चांगला बोटचेपा शिजतो.
दही-ताक घातलेल्या पदार्थाला तुपाची फोडणी जास्त छान खमंग लागते. मी ताकातल्या भाजीलाही तुपाचीच फोडणी देते.

मी भोपळा शिजवल्यावर उरलेलं पाणी सूपसाठी वापरते.
फोडणी तुपाची जास्त खमंग लागते. फोडणीत एक मेथीदाणा घालते, दाणेकूट न घालता करते. हिरवी मिरची नाही घालत. त्याऐवजी फोडणीत एखादी सुकी लाल मिरची किंवा किंचित तिखटही घालते.

माझी अकुसारखीच, तुपाची फोडणी त्यात मेथीदाणे. दाणेकूट, हळद, कढीपत्ता नाही. फोडणीत हिरव्या मिरच्या घालते.
अशीच कच्च्या पपईची कोशींबीर पण खूप छान लागते. फक्त त्यात मेथीदाणे घालत नाही.

अकू.. दे टाळी. मी फक्तं सूप करत नाही वेगळं. नुस्ते धुवून ठेवलेले सालं ल्काढलेले भोपळ्याचे तुकडे कुकरमधे छान शिजतात. सुटलेलं पाणी त्यादिवशी करत असलेल्या कोणत्याही आमटीत. आमटी आणि खाणारे कुणालाही फिकीर नसते.
फोडणीत मेथीदाणे, लाल मिरची, हिंग, मोहरी.
जेवायला बसायच्या अगदी जराच आधी काय ते मीठ, साखर, कोथिंबीर, घट्टं दही घालून हातानं कालवायचं. मग पाणी-बिणी सुटायचं ते तोंडालाच.
त्याच हातानं पानांत वाढायचं.... आपली बोटं आपणच चाटून साफ करायची Happy
वदनी कवळ घेता...

भाज्यांना सुटलेले पाणी म्हणजे तोच खरा अर्क असतो. त्यातच खरे जीवनसत्व असते. हे पाणी मुळीच काढून टाकू नये. चमच्यानी पिऊन टाकायचे.

दाद, अगदी अश्याच कोशिंबीरी माझी आजी करते. भांड्यात कोशिंबीरीची चिराचीरी करून वर नुसती फोडणी घालून बाजूला/फ्रिजात ठेवायची ती भांडं. इकडे पानं घेतली की, त्या कोशिंबीरीत, मीठ, साखर, दाकू/ दही, कोथिंबीर असलं सगळं घालून मस्तपैकी हातानी कालवायची अन त्याच हातानी वाढायची. त्या कोशिंबीरीला मग ना पाणी सुटत, ना ओघळ, ना काही विचित्र वास. अप्रतिम लागतात असल्या ऐनवेळेवरच्या कोशिंबीरी... Happy

दाद सेम पिंच ग.
नाहीतरी खाणार फक्त आपणच असतो . मी तर डब्यात पण अशीच आणते . ऑफिसमध्ये जेवताना दही मीठ साखर घालायचे .
नवीन पिढीसाठी काहीतरी fancy नाव शोधायला पाहिजे ह्याच्यासाठी . लाल भोपळ्याचे भरीत म्हणले की नाक मुरडतात & इतक्या सुंदर चवीला मुकतात

मस्त कृती.. मी एकच बदल करते तो म्हण्जे ला.भो. सालासकट स्वच्छ धुवून तुकडे भातवरणाच्या वर ताटली ठेवून उकडते. सुटलेले पाणी वरणात घाल्ते. यात सालही खाण्यात येते अन उकडल्यामुळे ते कुस्करले ही जाते.

साल वगळून फोडी पटकन मायक्रोवेव्ह मध्येही होतात चांगल्या मऊ. मला फार आवडते हे भरीत.
दुधीचंही सेम असंच करते पण तो मात्र कुकरलाच लावाव् लागतो,

सालासकट? इथे (सिडनीत) मिळणारा भोपळा .. तंबोर्‍याच्या भोपळ्याची भावंड असल्यासारखी साल असतेय... त्यामुळे हिंमतच केली नाही सालासकट शिजवायची. आता करून बघेन हं. अर्थात अधिक पौष्टिक होणारय.

ओहो... भारतीय ला.भो. ची एवढी जाड नसते ना म्हणून वापरता येतीये. अर्थात जाड सालीसकट छोटे तुकडे करून (वा फवून) पहा कसे लागतेय ते Happy