मी अमोरासमोर (समोरासमोर) पाहिलेले नट, नटी आणि कलाकार

Submitted by हर्ट on 21 April, 2015 - 02:39

ह्या धाग्याचा प्रपंच इतकाच आहे की तुम्ही जे कलाकार अमोरासमोर पाहिले त्यांची आणि तुमची भेट कशी झाली त्याबद्दल इथे आपण लिहिणार, बोलणार आणि वाचणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना कलाकारांशी थेट भेटायची खूप तीव्र इच्छा असते. पण संपुर्ण आयुष्य निघून जाते आणि आपण त्यांना प्रत्यक्षात पाहू शकत नाही. अशा वेळी आपल्या कुणी मित्राने जर तो कलाकार प्रत्यक्षात पाहिला असेल तर आपल्याला क्षणभर केवढा तरी आनंद होतो.

मी माझ्यापासून सुरवात करतो. इथे सिंगापुरमधे माझी आणि आश्विनी भावे ह्यांची भेट अगदी अवचित झाली. शाळेत असताना मी तिच्या मालिका पहायचो आणि मराठी क्षेत्रात ती त्यावेळी खूप आघाडीवर होती. माझ्या आईसोबत मला तिने फोटो घेऊ दिला आणि तोही हसतहसत मनापासून.

इथे अप्पा आणि बाप्पा हे एक नाटक होते. विक्रम गोखले थकून इथे आले होते. नाटकाच्या वस्तूंचा गराडा पडला होता. समोर सेट उभा राहत होता आणि मागिल बाजूस एका काळोखी जागेत टॉवेल अंथरुन विक्रमजी झोपले होते. त्यांच्या शरिरातून शीण बाहेर पडत होता. त्या संपुर्ण बॅकस्टेजला मी आणि तेच होते. मी त्यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांना पाहिले. ते ओळखायला देखील आले नाहीत. मी चोरपावलांनी परत मागे वळलो. ते उठले तेंव्हा लगेच त्यांना कडक चहा दिला. त्यांनी तो प्यायला. माझ्या डोळ्यात अगदी पाणीच आले. कारण मला त्या वेळी माझ्या वडीलांची आठवण आली. ते असेच दिसत.

आशा भोसलेंची मुलगी जेंव्हा आत्महत्येने गेली त्याच्या आधील दिवशी त्या इथे होत्या. तासभर त्यांची मुलाखत मी ऐकली. त्यांच मराठी खूप सुंदर आणि ओघवत आहे. त्या खूप छान गुद्दे मारतात बोलताना. थोडस तत्वज्ञानी बोलतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅक्टुअली, इथे बर्‍याच लोकांनी अशा कलाकारांची नावे लिहिली आहेत जी कधी ऐकली नाहीत बघणे तर दुरचे. मला मी भारतात असेपर्यंत हिन्दी सिनेमात जेवढे नट नट्या दिसायच्या तेवढेच अजूनही माहिती नाही. फार फार तर हृथिक हो नंतर आला. नट्या तर अजिबात माहिती नाही. हल्ली हल्ली कत्रिना कैफ माहिती झाली.

किश्श्यांच्या धाग्यावर लिहिलेला एक प्रसंग परत इकडे डकवतोय...

कॉलेजमध्ये असताना एन्.सी.सी. मध्ये होतो. तेव्हाचा हा किस्सा:

त्या वेळी पुण्यात मॅरेथॉन स्पर्धा चालू होती, आणि पोलीसांना मदत म्हणून सगळ्या कॉलेजच्या एन्.सी.सी. च्या मुलांनापण ट्रॅफिकची 'डुटी' लावली होती. म्हणजे काय, तर मॅरेथॉनच्या रूटवर ज्यावेळी कोणी स्पर्धक धावत येताना दिसेल त्या भागातले ट्रॅफिक तात्पुरते थांबवणे आणि स्पर्धक पुढे गेला की मग पुन्हा ट्रॅफिक सोडणे. माझी डुटी होती वेताळबाबा चौकात (सेनापती बापट रस्त्यावरच्या डॉमिनोज पिझाच्या जवळचा चौक). स्पर्धक युनिवर्सिटी-चतु:श्रुंगी-सेनापती बापट मार्ग-नळ स्टॉप-अलका टॉकीज चौक असे जाणार होते (म्हणजे तसा त्यांचा स्पर्धेचा मार्ग होता). काही स्पर्धक चतु:श्रुंगीच्या रस्तावरुन सेनापती बापट मार्गावरुन वेताळबाबा चौकाच्या दिशेने येताना दिसले. मी विरुध्द दिशेला होतो. सोबतच्या 'मामा' नी मला ट्रॅफिक थांबवायला सांगितले....मी थांबवले. सगळ्यात पुढे एक पांढरी फियाट होती. एक काकू चालवत होत्या.

काचा खाली करुन मला विचारले, "हिरवा सिग्नल आहे, तरी का थांबवलंय.."

"मॅरेथॉनचे स्पर्धक येत आहेत, २ मिनीटात ते जातील तेव्हा सोडतो.."

एव्हाना मला काकूंचा चेहेरा ओळखीचा वाटायला लागला होता... बरोब्बर.. त्या भारती आचरेकर होत्या !

त्या (त्रासिक चेहरा करत) "मी जरा घाईत आहे.."

"ह्म्म्म..."

"अहो पण ते लोक तर त्या बाजूने येतायत, तुम्ही इकडचं ट्रॅफिक थांबवून काय फायदा?"

मी थंडगार.. एकदम पॉइंटाचा मुद्दा होता त्यांचा !

माझाही चेहेरा एकदम.. आमाला पावर नाय... असा!

मित, भारती आचरेकरांचे ड्रायव्हींग कौशल्य अफाट आहे. जेव्हा मुंबई - पुणे एक्स्प्रेस हायवे नव्हता त्यावेळीही त्या पैज लावून पुणे गाठत असत. वयाची १८ वर्षे पुर्ण व्हायच्या आधीच त्या या कलेत पारंगत होत्या. त्या उत्तम गायिकाही होऊ शकल्या असत्या. पण त्यांनी गायनाकडे लक्ष दिले नाही.

इथे सिंगापुरमधे त्यांच्याशी आम्ही मनसोक्त गप्पा मारलेल्या आहेत. त्या उत्तम मराठी बोलतात. आणि स्वभावानी फार फार गोड आहेत. त्यांची बहिण वंदना गुप्ते त्याही फार गोड व्यक्तिमत्त्व आहे.

बी. माणिक वर्मा माहेरच्या मराठी आणि त्यांच्या सर्व मुली पुण्याला मामाकडे वाढल्यात आणि मराठी शाळेत शिकल्यात आणि राणी वर्मा छबिलदासला शिकलीय नंतर मुंबईत.

वंदना गुप्ते, भारती आचरेकर यांच्या मुलाखतीत ही माहिती वाचलीय.

माणिक दादरकर नाव होते त्यांचे !
मला नीट आठवत असेल तर भारतीने, हमिदाबाईची कोठी या नाटकासाठी काही गझला गायल्या होत्या.

भारतीताई हमिदाबाईची कोठी मधे सईदाची भूमिका करायच्या. त्या भूमिकेमधे गाणे अपेक्षित आहे.
पण पार्श्वसंगीत म्हणून असलेली बरीचशी गाणी माधुरी पुरंदर्‍यांच्या आवाजात आहेत.

कॉसमॉस बँकेचं शतकमहोत्सवी वर्ष होतं - २००५. त्यानिमित्त चिंचवडला एका मोठ्या मैदानावर अवधूत गुप्ते व वैशाली सामंत यांचा कार्यक्रम ठेवला होता. कॉसमॉसच्या सर्व खातेदारांना आग्रहाचं निमंत्रण होतं. त्यामुळे आम्ही सहकुटुंब तिथे गेलो. अवधूत फारच उथळ व पांचट विनोद करीत होता. त्यामानाने वैशाली सामंत शांत वाटत होती. पण एकंदरच त्यांच्या कार्यक्रमात रंग भरला जात नव्हता. बहुतेक जण सहकुटुंब आले असल्याने त्यांच्या गाण्यांना त्यांना हवी तशी (म्हणजे नाचून, ओरडून, चेकाळून) दाद मिळत नव्हती, म्हणून अवधूत फारच चिडला होता. कॉसमॉसचे खातेदार अजिबात रसिक नाहीत असं ओरडून पुन्हा पुन्हा सांगत होता. तरीही पब्लिक ढिम्मच.. त्याच्या अ‍ॅटीट्यूड मुळे लोकांनाही राग आला. सुरुवातीला माफक प्रमाणात टाळ्या वाजवित होते. शेवटी शेवटी तर त्यांनी तेही बंद केले. त्याला बहुदा नेहमी महाविद्यालयीन अथवा इतर तरूण जमावापुढे कार्यक्रम करायची सवय असावी. इथे जास्त भरणा मध्यमवयीन व ज्येष्ठ जोडप्यांचा होता.

मकरंद अनासपुरेंना एकदा गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी आमच्या गावी बोलावण्यात आलं होतं. त्यांना आणायला व परत सोडायला जाताना गाडीत गप्पा मारण्याचा योग आला होता. त्यावेळी ते फलटणच्या राजवाड्यात कुठल्यातरी चित्रपटाचं शूटिंग करत होते. मी त्यावेळी त्यांच्यापेक्षा लहान म्हणजे फक्त १९ वर्षांचा असेल. तरीही ते फार मस्तपणे बोलत होते माझ्याशी. अतिशय डाऊन टू अर्थ माणूस! त्यांचा वाचनाचा व्यासंग फार दांडगा आहे. त्यांना जेव्हा कळलं की मलाही वाचनाची आवड आहे मग जे काही पुस्तकांवर संभाषण सुरू झालं ते गाडीतून उतरल्यावरच थांबलं. बऱ्याच पर्सनल गोष्टी समजल्या. पैसे नसतानाही जो पैसा येईल तो पुस्तकांवर खर्च करायचो, मराठवाड्यात ग्रामीण भागात पथनाट्य करत होतो, नाना पाटेकरांनी 'यशवंत' मधून चित्रपट सृष्टीत एन्ट्री दिली वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी शेअर केल्या. कार्यक्रम संपल्यावर सत्काराची शाल एका आजीच्या अंगावर पांघरून कार्यक्रमातून बाहेर पडले. एकूण काय तर माणसं जपणारं आणि माणसांत मिसळणारं व्यक्तिमत्त्व वाटलं. (वयानं बरेच मोठे असाल्याने आवजाव उल्लेख केलेला आहे)

मि चन्कि पान्डे ला लहान अस्ताना पाहिले
अमिर खान ला वडाला आय्मक्स ला पाहिले होते
सयाजि शिन्दे याना मि बन्केत पहिले होते (कुर्ला नागरिक सह्.बैन्क)

Pages