मी अमोरासमोर (समोरासमोर) पाहिलेले नट, नटी आणि कलाकार

Submitted by हर्ट on 21 April, 2015 - 02:39

ह्या धाग्याचा प्रपंच इतकाच आहे की तुम्ही जे कलाकार अमोरासमोर पाहिले त्यांची आणि तुमची भेट कशी झाली त्याबद्दल इथे आपण लिहिणार, बोलणार आणि वाचणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना कलाकारांशी थेट भेटायची खूप तीव्र इच्छा असते. पण संपुर्ण आयुष्य निघून जाते आणि आपण त्यांना प्रत्यक्षात पाहू शकत नाही. अशा वेळी आपल्या कुणी मित्राने जर तो कलाकार प्रत्यक्षात पाहिला असेल तर आपल्याला क्षणभर केवढा तरी आनंद होतो.

मी माझ्यापासून सुरवात करतो. इथे सिंगापुरमधे माझी आणि आश्विनी भावे ह्यांची भेट अगदी अवचित झाली. शाळेत असताना मी तिच्या मालिका पहायचो आणि मराठी क्षेत्रात ती त्यावेळी खूप आघाडीवर होती. माझ्या आईसोबत मला तिने फोटो घेऊ दिला आणि तोही हसतहसत मनापासून.

इथे अप्पा आणि बाप्पा हे एक नाटक होते. विक्रम गोखले थकून इथे आले होते. नाटकाच्या वस्तूंचा गराडा पडला होता. समोर सेट उभा राहत होता आणि मागिल बाजूस एका काळोखी जागेत टॉवेल अंथरुन विक्रमजी झोपले होते. त्यांच्या शरिरातून शीण बाहेर पडत होता. त्या संपुर्ण बॅकस्टेजला मी आणि तेच होते. मी त्यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांना पाहिले. ते ओळखायला देखील आले नाहीत. मी चोरपावलांनी परत मागे वळलो. ते उठले तेंव्हा लगेच त्यांना कडक चहा दिला. त्यांनी तो प्यायला. माझ्या डोळ्यात अगदी पाणीच आले. कारण मला त्या वेळी माझ्या वडीलांची आठवण आली. ते असेच दिसत.

आशा भोसलेंची मुलगी जेंव्हा आत्महत्येने गेली त्याच्या आधील दिवशी त्या इथे होत्या. तासभर त्यांची मुलाखत मी ऐकली. त्यांच मराठी खूप सुंदर आणि ओघवत आहे. त्या खूप छान गुद्दे मारतात बोलताना. थोडस तत्वज्ञानी बोलतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समोरासमोर हा शब्दच माझ्या ओळखीचा पण अमोरासमोर कानाला खटकत नाहीये.. बरोबर असू शकतो.

हिंदीत आमनेसामने ..

अ नंतर काना नाही आहे. तो शब्द अ मो रा + स मो र असा आहे.
>>>?
जे काही असेल ते.

आत्ता समोरासमोर हा शब्द गूगलल्यास समोर अनेक बातम्या येतील ज्यात समोरासमोर हा शब्द वापरलाय. पण अमोरासमोर गूगलून पहा - शक्यतो फक्त विदर्भातल्या बातम्यांमधे हा शब्द दिसतोय.

असो! या धाग्याचं प्रयोजन अमोरासमोर बरोबर की समोरासमोर ते सांगा हे नसल्याने मी चर्चा थांबवते आहे.
असाच आणखी एक धागा माबोवर सापडला.

माधुरी दिक्षित - चक्क भेटून पाच मिनिटे गप्पा!
जॅकी श्रॉफ - एका पार्टीत! (बोललेलो वगैरे नाही, लांबून पाहिले)
दिलीप कुमार आणि सायरा बानू - अनौपचारीक भाषण जवळून ऐकायला मिळाले.
अमोल पालेकर
कबीर बेदी
सदाशिव अमरापूरकर - कोठीकरांच्या काव्यसंग्रह प्रकाशनावेळी थोडे बोलायची संधी मिळाली.

मराठीतील अनेकजण!

सोज्वळ आहे की नाही हे समजण्यासाठी तिच्याशी खूप जवळचे मैत्रीसंबंध असायला हवेत. हे सेलेब्रिटिज कोणत्याही क्षणी आपण सर्वोत्कृष्ट दिसू आणि सर्वांना आपले वागणे अत्तीअत्तिशय आवडत राहील हाच प्रयत्न करत असतात. तो त्यांच्या व्यवसायाचा एक अविभाज्य घटक आहे.

असे नाही बेफी. मी जुहुला एकदा जाताना मला कार मधे राकेश रोशन दिसले होते. आणि आम्हाला बघून त्यांनी कारची काच खालची वर केली होती. आणि लगेच गॉगल ओढून मान फिरवली होती. इतक अपमानित वाटल होत तेंव्हा कामचोर बघितल्याचा पश्चाताप झाला होता.

सोज्वळ आहे की नाही हे समजण्यासाठी तिच्याशी खूप जवळचे मैत्रीसंबंध असायला हवेत>>सा वर दोन मात्रा आहेत. सौज्वळ!!!!

बी,

तुम्ही जो प्रसंग लिहिलेला आहेत तो तत्क्षणी अपमानित वाटण्याजोगा नक्कीच असेल. तुमच्या भावनांबदल मला काही म्हणायचे नाही. पण एखाद्या क्षणी एखादा माणूस कसा वागला ह्यावरून आपण तो व त्याच्यासारखी अनेक माणसे कशी वागत असतील असे ठोकताळे कुठे मांडू शकतो?

अमिताभ बच्चनचा एका विमानतळावरचा किस्सा माहीत आहे ना?

अमिताभ बच्चनचा एका विमानतळावरचा किस्सा माहीत आहे ना?>>

कृपया सांगावात.

सौज्वळ आणि सोज्ज्वळ व सोज्वळ यांचा अर्थ कृपया आम्हा पामरांना सांगावे ज्ञान हे वाटल्याने समृध्द होते म्हणुन उपकृत करण्यात यावे.

धन्यवाद

अमिताभ एका विमानतळावर पेपर वाचत असताना एक वैमानिक तेथून चालला होता. अमिताभला पाहून तो वैमानिक इतका प्रचंड आनंदीत आणि उत्साहीत झाला की त्याला काय करू काय नको असे झाले. त्याने भावनेच्या भरात अमिताभसमोर जाऊन 'हॅलो सर' असे म्हणत हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. एकुणच फॅनगिरीच्या अतिरेकाने वैतागलेल्या अमिताभने चेहर्‍यावरची माशीही न हलवता डोके पुन्हा पेपरात खुपसले. ह्या अपमानाने क्रोधीत होऊन त्या माणसानेही तत्क्षणी स्वतःचा रंग दाखवला आणि अमिताभचा तिथल्यातिथे अपमान केला. स्वतःचा हात मागे घेऊन तो माणूस ताठ उभा राहिला आणि त्याने अमिताभला विचारले

"व्हॉट्स यूअर नेम प्लीज?"

>>>> समोरसमोर हा शब्द ठार चुकाचा वाटतो आहे मला. आधुनिक काळातल मराठी दिसत आहे <<<<
बी, "आमनेसामने" या हिंदी शब्दाचा भ्रष्ट अनुवाद वा भ्रष्ट अंधानुकरण म्हणजे "अमोरासमोर".
असा शब्द आमच्या माहितीतल्या मराठीमधे नव्हता/नाहीये. तू देखिल घुसडवू नकोस वा नविन उत्पन्न करू नकोस, वा निव्वळ ऐकिव/नेटलिखित वाचून त्याचे न तपासताच अनुकरण करू नकोस.
बाकि भाषा शुद्धी वगैरे बाबी खुन्टीलाच टान्गून ठेवायच्या असल्यास, व जौदे ना "भावना पोचल्याना - मग्ग झाले" असे असेल, तर माझी पोस्ट अनुल्लेखाने मार. अन्यथा वर दुरुस्ती कर.

.

छान धागा !
मी
उस्ताद झाकीर हुसेन,
U श्रीनिवास ,
V सेल्वागणेश ,
शंकर महादेवन ,
शिवमणी
यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे.
पैकी झाकीर हुसेन, शंकर महादेवन , शिवमणी यांना भेटलो होतो..
तो नितांत सुंदर अनुभव होता.. त्याबद्दल उद्या लिहन ..

त्यांच्या सह्या मी वहीमध्ये चिटकवून ठेवलेल्या आहेत.. Happy

माझा मावसकाका बाबा माजगावकर ( नाजूका मालिकेचा दिग्दर्शक ) काकी व बाबाची आई सर्वजण अकाली वारले. त्यावेळी बाबाचा मआलाप, आलाप ( मकडी मधला ताजमहाल ) याची देखभाल करायची जबाबदारी विशाल भारद्वाज, रेखा भारद्वाज, सुहासिनी मूळ्ये आणि टॉम आल्टर यांनी घेतली आणि अजूनही ते पार पाडताहेत. हे अगदी अभिमानाने सांगावेसे वाटतेय.

सुहासिनीचे माझ्या काकावर प्रेम होते पण आजीने सिनेमातली सून स्वीकारली नाही, तरीही त्यांनी अजिबात कटुता ठेवली नाही. शेवटपर्यंत काकाशी मैत्री ठेवली. काका गेल्यावर त्या माझ्या वहिनीला म्हणाल्या, बघ मी आज विधवा झाले असते.

मुंबईत असल्याने आणि त्यातही बालपण पश्चीम उपनगरात गेल्याने कलाकारांचे फारसे आकर्षण नाही तरी पण काही लोक मिळतातच..

मी बारावीला सिन्हाल्स क्लास मध्ये असताना जोन अब्राहम माझ्या शेजारच्या वर्गात होता .हाय हल्लो पुरती ओळख होती नंतर सुद्धा २-३ वर्षांनी येका मोडेल मित्राबरोबर गेलो असता हा भेटला होता. (१९९१)
बारावीनंतर अभियांत्रिकी ला प्रवेश मिळायच्या आधी ३ महिने BSC ला होतो रुपारेल ला . तेवा ऐश्वर्या राय १२ वी च्या वर्गात होती. आतापर्यंत पाहिलेली सर्वात striking मुलगी. तिचा येकदा मित्राबरोबर पाठलाग हि केला होता!
शाळेत असताना नितीश भरद्वाज ( महाभारतातला कृष्ण) माझ्याच इमारतीत राहायचा. अतिशय गर्विष्ठ आणि खडूस माणूस . तो पुडे आला नाही यात काहीच आश्चर्य नाही... असो. त्याला भेटायला वर्षा उसगावकर , रवी वासवानी आणि काही कलावंत यायचे ते दिसायचे.
तसेच शाळेत रसिका ओंक माझी २ वर्ष सेनिओर होती. बर्यापैकी ओळख ..आम्ही येका शाळेच्या नाटकात एकत्र काम हि केले होते.

सध्या माझा भाऊ ज्या इनोरबित परिसरात राहतो तिकडे बरेच सिरीअल तारे आणि तारका दिसतात. काही तर भावाच्याच इमारतीत राहतात. मी फारसा TV बघत नसलाने त्यांना ओळखत नाही..

तरी जागा विकत घेते वेळी आम्ही अझगर खान का विनोदी कलावंत बरोबर व्यवहार केला. फारच सभ्य आणि चांगला माणूस..

आणि
पटकथाकार योगेश विनायक जोशी माझा शाळासोबती आहे ( मुंबई मेरी जान , जजंतरम ममंतरम , हवा आणे दे ,तेंडूलकर ओउत .......) आणि मालिका कलावंत विनायक भावे याला पण मी चांगलाच ओळखतो ( आम्ही गोरेगाव ला असलो तर येकच चहाच्या अड्ड्या वर असतो.)

थोडी आत्मस्तुती करतोय पण अमिताभ बच्चनच्या बाबतीत माझाही एक किस्सा आहे. १९८७ ते १९८९ मी व्हीटेस ( मारुती डीलर ) मधे जॉब करत होतो. त्यावेळी आमचे डायरेक्टर महेंद्र कुमार सांघी यांना भेटायला अमिताभ बच्चन आले होते. सांघी साहेबांचे व माझेही ऑफिस बेसमेंट मधे होते. सगळा स्टाफ शो रुम मधे नुसता कल्ला करत होता. मी माझ्या ऑफिसमधेच काम करत होतो. अमिताभ सांघीना भेटायला बेसमेंट मधे आला. जाताना त्याची माझी नजरानजर झाली. त्याने माझी चौकशी सांघींकडे केली. आणि हे सांघींनी स्वतःच मला नंतर सांगितले.

रेखा, झीनत, भारती आचरेकर, झरीन खान ( हृतिकची सासू ) वगैरे मला तिथेच भेटल्या Happy बिलिंग संबंधी बोलणेही झाले होते त्यांच्याशी.

लिंबूटिंबू>> +१११

सोज्वळ आहे की नाही हे समजण्यासाठी तिच्याशी खूप जवळचे मैत्रीसंबंध असायला हवेत>>सा वर दोन मात्रा आहेत. सौज्वळ!!!!>>
सोज्वळ असाच शब्द आहे.

बीपी मूवीमधली चिऊ, जी आता झोपाळा नाटकात काम करते (भाग्यश्री शंखपाळ) हिची आत्या आमच्या सोसायटीत राहते आणि माझी मैत्रीण आहे त्यामुळे भाग्यश्री मागच्या वर्षी होळीला आमच्या सोसायटीत होती आणि धुळवडपण ती आमच्यात मिक्स होऊन खेळली.

खूप गोड आहे ती.

@ बी

नाही जन्म बाहेरचा असेल पण तिने दहावी आर्य विद्या मंदिर खर मधून केले . ( ICSE १९९०) ११ वी KC ला बारावी रुपारेल ला . PCM स्कोर बारा होता आणि कला पण त्यामुळे architecture ला प्रवेश घेतला .( बहुदा रचना ला) ते मात्र पूर्ण केले नाही.

मी तिच्या सौंदर्याचा ती अबिनेत्री बनण्य आधी पासूनचा दिवाना आहे . सो ती अभिनय आणि मोडेल्लिंग मध्ये येण्या आधी track ठेवला होता Wink आणि तिच्या वर्गात माझी येक मैत्रीण होती ...

१) प्रसिद्ध गायक, गीतकार आणि चित्रपट निर्माते, बाबूजी अर्थात श्री सुधीर फ़डके यांना, भेटण्याचीच नाही तर त्याच्या पाया पडण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्यच. ---- : स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे शुटींग नवीन मराठी शाळेत सुरु होते. माझा भाऊ त्या शाळेशेजारीच रहातो. त्याने मला आणि आई-वडीलांना बोलावले. चित्रपटात "परदेशी कपड्यांची होळी" करण्यासाठी आणलेले कपड्यांचे गाठोडे, चूकून रमणबागेत ठेवण्यात आले होते. हे बाबूजींना समजले तेव्हा माझा भाऊ आणि भाची त्यांचय जवळच उभी होती. त्यांनी त्वरीत जाऊन ते गाठोडे आणून दिले. आणि त्या दोघांनाही फ़ार आनंद झाला. नंतर त्याच चित्रपटात "परदेशी कपड्यांची होळी" या चित्रिकरणात माझे आईवडील पण उभे होते.
चित्रीकरण संपल्यावर आम्ही त्यांना भेटलो आणि पाया पडलो. आणि आम्हाला फ़ार आनंद झाला .
तेव्हा फ़ार थकले होते तेव्हा ते.

२) प्रसिद्ध जेष्ट अभिनेते, चंद्रकांत गोखले. ---------: हे बर्‍याच वेळा बसमध्ये असायचे. एकदा ते उभे असताना त्यांना बसायलाही जागा दिली, तेव्हाच २ शब्द बोललो. नेहमी माझी घरी जायची वेळ आणि त्यांची फिरायला जायची वेळ एकच होती. त्यामुळे नेहमी भेट व्हायची पण बोललो कधीच नाही. आता खूप वेळा वाटतं, तेव्हा त्यांना घरी घेऊन जायला हवं होतं गप्पा मारायला. ते नक्की आले असते.

३) प्रसिद्ध अभिनेते, राजा गोसावी--------: मी तेव्हा हॉस्पीटल मध्ये नोकरी करत होते. त्यांच्या आईला तिथे अ‍ॅडमिट केले होते. म्हणून नेहमी यायचे . निगर्वी माणूस.

४) प्रसिद्ध अभिनेत्री, ज्योती सुभाष ------: एका गाण्याच्या कार्यक्रमात भेटल्या होत्या. छान बोलल्या. अजिबात गर्व नाही.

५)अभिनेत्री मेघना एरंडे ---------: शेजारीण. भेटली की बोलल्याशिवाय जात नाही. ललिता पंचमीला तिच्या घरी हळदीकुंकवाला बोलवलं होतं. तिथे माझ्या भाचीला गायला सांगितल. आणि मेघनाच्या वडीलांनी तबल्याची साथ दिली. तिचे आई वडील पण खूप प्रेमळ आहेत. ती पण निगर्वी आणि प्रेमळ आहे.
-

मी १९९२ मध्ये माधव वझे यांना भेटलोय. त्यांनी शामची आई चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगाचे अनेक किस्से सांगितलेत.

मला पूर्वी बुलेट वेगाने चालवायचा भारी शौक होता म्हणून माझ्या मित्रांनी मला २००३ मध्ये नेहरू मेमोरिअल हॉल, पुणे येथे नेले. तिथे एम्टीवी रोडीज् या कार्यक्रमाकरिता स्पर्धक निवडायचे होते. मुदलात मला घरी उपग्रह वाहिनी नसल्याने एम्टीवी वरील हा कार्यक्रम म्हणजे काय तेच ठाऊक नव्हते. फक्त अनुभवी बाईकचालकांना निवडणार इतकेच ठाऊक होते. तिथे एक तरूण व तरूणी उभे होते. त्यांना मी आयोजक समजून फॉर्म भरणे व इतर तांत्रिक बाबींविषयी प्रश्न विचारले असता ते गोंधळून गेले. नंतर मला कळले की तो तरूण सायरस ब्रोचा व ती तरूणी म्हणजे शेहनाझ ट्रेझरीवाला हे होते. अशा प्रकारे मी कलाकारांना भेटत असताना मला ते कलाकार असल्याची जाणीवच नव्हती.

बाकी कुठल्या अभिनेत्याला नाही पण जानेवारी २००५ मध्ये एका अभिनेत्याच्या वडिलांना भेटलो. कुठल्याही अभिनेत्यापेक्षा रुबाबदारपणात ते अजिबात कमी नव्हते.

From सरकार कडून अपेक्षा

बोलण्यातही भारी सौजन्य. वरचे छायाचित्र देखील केवळ त्यांच्याच सौजन्याने घेता आले. वर्षा निवासी भेटीस जाताना मी सुरक्षेच्या कारणास्तव कॅमेरा नेलाच नव्हता. सोबत असलेले श्री. शेखर खोपडे यांनी मात्र कॅमेरा आणला होता. ते मुख्यमंत्र्यांबरोबर स्वतःचे छायाचित्र काढून घेत असताना, मुख्यमंत्र्यांनी मलाही सोबत उभे राहण्यास सुचविले आणि त्यामुळे मलाही त्यांच्यासोबत छायाचित्राचा लाभ मिळाला. जाताना त्यांनी मला आपला व्यक्तिगत भ्रमणध्वनी क्रमांकदेखील दिला व कुठलीही समस्या असल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले, जे त्यांनी पुढे २००६ साली मी त्यांना फॅक्स पाठविला असता पाळले.

आरे हान आणि सिद्धार्थ रोय कपूर , चित्रपट निर्माता आणि विद्या बालन चा नवरा कॉल्लेगे मध्ये सेनिओर होता. बर्यापैकी ओळख होती .
तसेच दोन मित्र निर्माते आहेत तर येकदा भारत जाधव आणि संजय नार्वेकर भेटले होते.

शेह्नाझ त्रेझ्रीवाला एकदा माझ्या management collecge मध्ये आली होती तेवा तिला काही माहिती दिली होती. she was hot !

भारतात जेवा concert झाली होती तेवा Pink floyd च्या Roger Waters ला जवळून पहिले होते . मला तरी सगळ्यात थ्रिल्लिंग तेच वाटते.

आणि अमिताभ चा हा किस्सा खरा आहे ? कारण मला ७-८ लोक त्याला भेटलेले माहित आहेत आणि सर्वांचः अनुभव चांगला होता....

Pages