मी अमोरासमोर (समोरासमोर) पाहिलेले नट, नटी आणि कलाकार

Submitted by हर्ट on 21 April, 2015 - 02:39

ह्या धाग्याचा प्रपंच इतकाच आहे की तुम्ही जे कलाकार अमोरासमोर पाहिले त्यांची आणि तुमची भेट कशी झाली त्याबद्दल इथे आपण लिहिणार, बोलणार आणि वाचणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना कलाकारांशी थेट भेटायची खूप तीव्र इच्छा असते. पण संपुर्ण आयुष्य निघून जाते आणि आपण त्यांना प्रत्यक्षात पाहू शकत नाही. अशा वेळी आपल्या कुणी मित्राने जर तो कलाकार प्रत्यक्षात पाहिला असेल तर आपल्याला क्षणभर केवढा तरी आनंद होतो.

मी माझ्यापासून सुरवात करतो. इथे सिंगापुरमधे माझी आणि आश्विनी भावे ह्यांची भेट अगदी अवचित झाली. शाळेत असताना मी तिच्या मालिका पहायचो आणि मराठी क्षेत्रात ती त्यावेळी खूप आघाडीवर होती. माझ्या आईसोबत मला तिने फोटो घेऊ दिला आणि तोही हसतहसत मनापासून.

इथे अप्पा आणि बाप्पा हे एक नाटक होते. विक्रम गोखले थकून इथे आले होते. नाटकाच्या वस्तूंचा गराडा पडला होता. समोर सेट उभा राहत होता आणि मागिल बाजूस एका काळोखी जागेत टॉवेल अंथरुन विक्रमजी झोपले होते. त्यांच्या शरिरातून शीण बाहेर पडत होता. त्या संपुर्ण बॅकस्टेजला मी आणि तेच होते. मी त्यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांना पाहिले. ते ओळखायला देखील आले नाहीत. मी चोरपावलांनी परत मागे वळलो. ते उठले तेंव्हा लगेच त्यांना कडक चहा दिला. त्यांनी तो प्यायला. माझ्या डोळ्यात अगदी पाणीच आले. कारण मला त्या वेळी माझ्या वडीलांची आठवण आली. ते असेच दिसत.

आशा भोसलेंची मुलगी जेंव्हा आत्महत्येने गेली त्याच्या आधील दिवशी त्या इथे होत्या. तासभर त्यांची मुलाखत मी ऐकली. त्यांच मराठी खूप सुंदर आणि ओघवत आहे. त्या खूप छान गुद्दे मारतात बोलताना. थोडस तत्वज्ञानी बोलतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहेर ची साडी चा हिरो-रमेश भाटकर (हिरो वाटत नसला तरिही)
अजिंक्य देव हिरोईन (रडलका कुबल) चा सावत्र भाउ असतो.

माहेर ची साडी चा हिरो-रमेश भाटकर (हिरो वाटत नसला तरिही)>> मग ठिक आहे Happy . हार्ट्बीट स्किप झाली ना माझी Wink

-------

चंद्रकांत गोखले ना पौड रोड ला रामबाग कॉलोनी मध्ये फिरताना पाहिलं आहे .

शाळेत जात असताना रवींद्र महाजनी यांनाहि पौड रोड ला बेडेकर गणपती मंदिरा जवळ पहिले आहे.

मी हरिश्चंद्र ट्रेक ला गेलो होतो तेव्हा John Abraham आणि Genelia D'Souza ला पहिले होते force movie च शुटींग चालू होत घाटात .....

माळशेज च्या बोगद्यात aftab shivdasani ला पहिले होते futpath movie च शुटींग चालू होते

आगाऊ, मी चुकीचे नाही लिहिले. मधु सप्रे ही नागपुरचीच आहे: इथे वाचा हव तरः http://en.wikipedia.org/wiki/Madhu_Sapre

आणि मिलिंद सोमण सुद्धा नागपुरचे आहेत असे वाटते पण ह्याबद्दल मी ठाम नाही.

सुजा मस्तच ग.

रजनी वेलणकर माझ्या आतेनणंदेची भाची. पण माझी प्रत्यक्ष ओळख नाही. त्या आमच्या घरी यायच्या तेव्हा सांगायच्या भाची आणि नातींबद्दल.

मला एकदा आरती अंकलिकर टिकेकर अचानक भेटल्या होत्या. दुपारी चार वाजता मी मॅगी आणायला जात होते आणि त्या समोर आल्या. त्या आमच्या अपार्टमेंट मधल्या पं. कशाळकरांकडे यायच्या रियाजा साठी. मस्त 2-5 मिनिटे गप्पा मारल्या त्यांनी. छान वाटलं. आम्ही आधी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या जवळ राहत असल्याने नाट्यगृहाच्या गेट समोरून जातांना खूप कलाकार अचानक दिसायचे. सुनील बर्वे मस्त hi करायचा कधीही त्याच्याकडे बघून हसलं तरी... Wink

मिलिंद सोमण नागपूरचा नाही. जन्मही महाराष्ट्रातला नाही त्याचा. (परदेशात जन्म आणि शिक्षण -असं फार पुर्वी कधीतरी वाचलेलं..)

अमिता खोपकर मला खूप वर्षापूर्वी शिवाजी मंदिरजवळ एका दुकानात भेटल्या. छान बोलल्या दोन मिनिटे. खूप स्लीम होत्या तेव्हा.

आरती अंकलीकर आणि उदय टिकेकर.. माझ्या कॉलेजमधले. आरती त्यावेळीदेखील गात होती. अर्थातच रोजच बघायचो त्यांना.

लहानपणी एकदा आमच्या जवळ्च्या दवाखान्यात कोणत्यातरी मालिकेची शुटिंग होती तेव्हा कै.चंदु पारखी ह्याना पहिल होत.....

शिवाजी साठम आणि अभिजीत साठम हे दोघ आमच्या साप्ताहिकाच्या प्रकाशन सोहळ्याला आले होते......

लालबागला प्रदीप वेलणकर, मधुरा वेलणकर - साठम, तेव्हा परत अभिजीत साठम ह्याना पहिल होत.....
तसेच लालबागला सुशांत शेलार नेहमी दिसतो....

प्रभादेवीला पुष्कर श्रोत्री आणि जितेंद्र जोशीला पहिले ....... पुष्कर श्रोत्री स्मोकिन्ग करत कार शेजारी उभा होता.....

आणि जितेंद्र जोशीला कुठेतरी जायच होत त्याने आमच्या समोर टॉक्सि थांबवून स्वातःच टॉक्सिच मिटर डाऊन करुन टॉक्सित बसला......

म्रुणाल दुजानिसला(माझिया प्रियाला प्रित कळेना) कोल्हपुरला महालक्शमी मंदिरात पहिल होत....सह कठुंब होती...
आई-वडिल आणि दोन लहान भाऊ ......

अमिता खोपकर मला खूप वर्षापूर्वी शिवाजी मंदिरजवळ एका दुकानात भेटल्या.
>>
मी हे वाक्य ३ वेळा वाचलं अणि तिन्ही वेळा "आरती खोपकर मला खूप वर्षापूर्वी शिवाजी मंदिरजवळ एका दुकानात भेटल्या" असंच वाचलं Lol

तशा आरती खोपकर पण्भारीच सेलिब्रिटी आहेत म्हणा फक्त त्यांना मी अमोरासमोर आणि समोरासमोर भेटलेले नाही Proud

Girish Oak ani pratiksha lonkar- eka hospitals madhye shooting karayla aale hote teva.
Farhaan Akhtar- Aamchya office madhye shooting la ala hota teva
Sachin- Supriya- Siddhivinayak mandirat
Tushar dalavi ani madhura velankar- Solapur station var

shivay mi jithe job karte tithe nehmi shooting hote, tyamule barech jan

मी आत्तापर्यंत श्री प्रभाकर पणशीकर, प्रशांत दामले , कविता लाड, दिलीप प्रभावळकर यांना मेकप रूम मधे जौन भेटलोय (त्यांच्या त्यांच्या नाटका नंतर ), फ़क्त श्री पणशीकर यांनी व्यवस्थित विचारपूस केली, बाकीचे स्वाक्षर्‍या देऊन मोकळे झाले.

मी कधीच कोणत्याच प्रसिध्द व्यक्तीला भेटले/प्रत्यक्ष पाहिले नाही.. पण हा बीबी वाचायला मजा वाटतेय. प्रसिध्द व्यक्तीबदल उत्सुकता वाटतेच ना सामान्य माणसांना.. त्याशिवाय का पेपर्/इतर मासिकातले गॉसिप कॉलम्स चवीने वाचले जातात ?

N D studio कजॆतला जाण्याचा योग आलेला तेव्हा तिथे सुप्रिया पाठक व पंकज कपूर दिसलेले.सुप्रिया पाठक सोबत फोटो सुध्दा काढलेला,अतिशय down to earth. त्याच वेळेस Ztv वरच्या झाशिची राणी च शुटिंग बघितलेल. मागच्या वर्षी त्याच ठिकाणी सलमान खानला बघितल,किकच शूटिंग सुरू होत. जोधा अकबर मधली अकबरची बहिणही होती त्यांच्या अटायर मध्ये.असच एकदा आमच्या कारच्या बाजूने महेश मांजरेकर कारने सह परिवार जाताना दिसलेले. सांताक्रूझ एअरपोर्ट वर राकेश ओम प्रकाश मेहरा (रंगदे बसंती चा डायरेक्टर), शेफ हरपाल(चींगस् ची अॅड करणारा),उंच माझा झोका मधली सासू, हिंदी मालिका नट एवढे सवॆ एकाच दिवशी पहायला मिळाले.

अश्विनी भावेचे माहेर आमच्याच कॉलनीत आहे. तिची आई व माझी आई मैत्रिणी आहेत. पण मी कधी तिला बघितले नाही. लेखिका स्नेहलता दसनूरकर पण आमच्याच कॉलनीतल्या. गायिका उषा तिमोथी पण आमच्याच कॉलनीत रहात असे. दर गणेशोत्सवात, जो ऑर्केष्ट्रा आला असेल त्यांच्या साथीने मराठी गाणी म्हणत असे ती.. जिवलगा, राहिले रे... ची फर्माईश तिला होत असे नेहमी.

अशोक सराफ, सचिन यांना आयडियाची कल्पना सिनेमाच्या प्रमोशनवेळी भेटलो होतो. अशोक सराफ खूपच कमी बोलतात. सचिनचा तोरा नेहमीचाच. मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे यांनाही भेटलोय. अगदी जमिनीवरची माणसं. अवधूत गुप्ते, नितीन चंद्रकांत देसाई, सुबोध भावे यांच्याही मुलाखती घेतल्यात. जाोगवाच्या वेळी उपेंद ‌लिमयेची मुलाख्‍ात घ्‍ाेतली हाेती. ‌‌नितीन देसाइ अजिंठ्यावर ‌सिनेमा करण्‍ाार ही बातमी प्रथ्‍ाम मीच छापली हाोती. मात्र, सर्वात आठवणीत राहिली ती रमेश देव यांची मुलाखत. कॉक्स अॅण्ड किंग्जचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून आले असताना त्या ऑफिसमध्ये केवळ आम्ही दोघेच होतो. दीड तास समोरा समोर बसून गप्पा मारल्या. खूपच साधा माणूस. आताचे चित्रपट सृष्टीतील बहुतेक कलाकार आता प्रमोशनसाठी आमच्या ऑफिसला भेट देतात. पण त्यांना कुणी फारसा भाव देत नाही. सिध्दार्थ जाधव मागील महिन्यात ऑफिसात अचानक आला, पण त्याला पाहून कुणालाच ना कौतुक वाटले ना आनंद. तीच गत आदेश बांदेकरची. एकदा मुंबईला झी सिने अॅवॉर्डसला गेलो होतो. त्यात तीस मार खाँ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार, कटरिना कैफ आले होते. त्यांना पाहिलंय. त्यानंतर झी टीव्हीचे सर्व कलाकार त्या कार्यक्रमात पाहिले, त्यांच्याशी बोललो. पुरस्कार सोहळ्यानंतर आम्हाला या कलाकारांसमवेत ट्रायडण्टमध्ये पार्टी होती. तेव्हा मालिकेत दिसणाऱ्या या सोज्वळ कलाकारांचे खरे रूप कळाले. तेथे केवळ सुदेश बेरी (बॉर्डर फेम) आणि मी सोडून बाकी सर्व मनसोक्त पिऊन धिंगाणा घालत होते. बाबुजी (आलोक नाथ) याला तर बोलताही येत नव्हते, इतका तो टल्ली झालेला होता. त्यांच्या बरोबर आम्ही डान्स फ्लोअरवर डान्सही केला होता.

काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या एका रेस्टॉरंटमधे जॉन आब्राहम आणि बिपाशा बसू यांचं दर्शन झाले! जॉन लगेच ओळखता आला, जसा सिनेमात दिसतो तसाच जबरी दिसतो Happy बिपाशा मात्र प्रत्यक्षात अगदीच सामान्य, अगदी न ओळखू येइल अशीच दिसत होती. मेकअप नव्हता त्यामुळे चेहर्‍यावर वय दिसत होते. एकटी असती तर कदाचित तिच्याकडे लक्षही गेले नसते. जॉन मस्त ह्सून फोटो, स्वाक्षरी देत होता. ती दुर्मुखलेला चेहरा करून बसली होती. ती बिपाशा हे गर्दीतल्या एका छोट्या मुलीला सांगताक्षणीच ती मुलगी जोराने 'couldn't be, Bipasha is so pretty' असे ओरडली. बिपाशा (आणि जॉनचाही!) चेहरा बघण्यासारखा झाला. नंतर लगेच त्यांनी तिथून काढता पाय घेतला Happy

मेकअपविरहित प्रियांका चोप्रा आणि दीपिकालाही एअरपोर्ट्वर बघितलं आहे. दोघीही अगदी चारचौघींसारख्या दिसतात. पडद्यावर हिरॉईनच्या सुंदर दिसण्यात मेकअप आणि कमेरामन यांचा किती सिंहाचा वाटा असतो याची तेव्हा प्रचिती आली!

चीकू छान लिहिलस!!!!

टोच्या तुम्ही पण छान लिहिल. तुम्ही नक्की काय काम करता? एक जस्ट उत्सुक्ता!!!

<< टोच्या तुम्ही पण छान लिहिल. तुम्ही नक्की काय काम करता? एक जस्ट उत्सुक्ता!!! >>

टोच्या महाराष्ट्र टाईम्सचे वार्ताहर आहेत.

चिन्मयी सुर्वे : एकदा रात्री लोकल ट्रेनने येत होते , तेन्व्हा माझ्या समोरच बसली होती.

सुदेश बेरी : पुण्याला जाताना सकाळी सकाळी एक्स्प्रेस वे च्या आधीच्याच मॅक्डी मध्ये थांबलो होतो , तेन्व्हा दिसला .
आम्हाला तो सुराग आणि वंश मुळे फार आवडायचा . त्यामुळे लगेच बहिणीला समस केला , एक्साईट होउन !

( मला वाटत होतं , मी फक्त बिपाशा बासू आणि अभिशेक बच्चनलाच बघितल आहे . धाग्याच्या निम्मिताने कळलं यादी तशी फार मोठी नसली तरी बर्याच जणाना बघितल आहे Happy )

धाग्याच्या निम्मिताने कळलं यादी तशी फार मोठी नसली तरी बर्याच जणाना बघितल आहे
>>
+१
एका पोस्टी नंतर माझ्याही हे लक्षात आलं म्हणुनच मी लिहीत नाहीये Happy

जून्या जमान्यातील गायिका मोहनतारा अजिंक्य ( जयदेवी मंगळा गौरी च्या गायिका ) या आमच्या घरमालकिण. त्यांच्याकडे येणे जाणे होते. पण तेव्हाही त्यांनी गाणे सोडले होते. त्यांच्या मुलाच्या मुंजीत जयश्री टी आणि मीना टी आल्या होत्या ( त्यांच्या भाच्या ) दोघींनी मला गोडाचा घास भरवला आहे.

कुलवधू नाटकात, ज्योत्स्नाबाईंच्या सासुबाईच्या भुमिका करणार्‍या, शांताबाई बेडेकर यांच्या घरी पण मला माझी आत्या बेबीताई ( अलका आचरेकर ) घेऊन गेली होती. त्यांच्याघरी मसाला दूध प्यायलो होतो.

माझ्या आवडत्या कलाकार मनोरमा वागळे यांच्या माहीमच्या घरी जायचा योग आला होता, पण त्यावेळी ता हयात नव्हत्या. त्यांना भेटायला खुप आवडले असते.

वरती कुणितरी आर्या आंबेकरचा उल्लेख केला आहे. ती आणि तीची आई मला आमच्या इथल्या इझी डे मध्ये दिसल्या(भेटल्या होत्या) चेंजिंग रूमला माझ्या मागे उभ्या होत्या. मी आर्याकडे पाहून स्मित करण्याचा प्रयत्न केला तिने मान वळवली Uhoh मग तिच्या आईने माझ्या पुढच्या बाईला विचारलं की तुम्ही नक्की कोणत्या चेंजिंग रूम साठी नंबर लावलाय. त्यावर ती बाई म्हणाली की असं काही नाही जी रिकामी होईल त्यात मी जाईन. त्यावर आंबेकर मॅडम त्या बाईशी आणि तिथल्या सिक्युरिटी कम हेल्पर बाईशी चक्क वाद घालू लागल्या. Uhoh

Pages