मी अमोरासमोर (समोरासमोर) पाहिलेले नट, नटी आणि कलाकार

Submitted by हर्ट on 21 April, 2015 - 02:39

ह्या धाग्याचा प्रपंच इतकाच आहे की तुम्ही जे कलाकार अमोरासमोर पाहिले त्यांची आणि तुमची भेट कशी झाली त्याबद्दल इथे आपण लिहिणार, बोलणार आणि वाचणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना कलाकारांशी थेट भेटायची खूप तीव्र इच्छा असते. पण संपुर्ण आयुष्य निघून जाते आणि आपण त्यांना प्रत्यक्षात पाहू शकत नाही. अशा वेळी आपल्या कुणी मित्राने जर तो कलाकार प्रत्यक्षात पाहिला असेल तर आपल्याला क्षणभर केवढा तरी आनंद होतो.

मी माझ्यापासून सुरवात करतो. इथे सिंगापुरमधे माझी आणि आश्विनी भावे ह्यांची भेट अगदी अवचित झाली. शाळेत असताना मी तिच्या मालिका पहायचो आणि मराठी क्षेत्रात ती त्यावेळी खूप आघाडीवर होती. माझ्या आईसोबत मला तिने फोटो घेऊ दिला आणि तोही हसतहसत मनापासून.

इथे अप्पा आणि बाप्पा हे एक नाटक होते. विक्रम गोखले थकून इथे आले होते. नाटकाच्या वस्तूंचा गराडा पडला होता. समोर सेट उभा राहत होता आणि मागिल बाजूस एका काळोखी जागेत टॉवेल अंथरुन विक्रमजी झोपले होते. त्यांच्या शरिरातून शीण बाहेर पडत होता. त्या संपुर्ण बॅकस्टेजला मी आणि तेच होते. मी त्यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांना पाहिले. ते ओळखायला देखील आले नाहीत. मी चोरपावलांनी परत मागे वळलो. ते उठले तेंव्हा लगेच त्यांना कडक चहा दिला. त्यांनी तो प्यायला. माझ्या डोळ्यात अगदी पाणीच आले. कारण मला त्या वेळी माझ्या वडीलांची आठवण आली. ते असेच दिसत.

आशा भोसलेंची मुलगी जेंव्हा आत्महत्येने गेली त्याच्या आधील दिवशी त्या इथे होत्या. तासभर त्यांची मुलाखत मी ऐकली. त्यांच मराठी खूप सुंदर आणि ओघवत आहे. त्या खूप छान गुद्दे मारतात बोलताना. थोडस तत्वज्ञानी बोलतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, तुम्हाला फ़क्त सिने-नाटक कलाकार अपेक्षीत आहेत की कलाकार म्हणजे इतर कलाकार पण चालतील..
जसे संगीत, चित्रकार, शिल्पकार इत्यादी

त्यांच्या शरिरातून क्षीण बाहेर पडत होता >> शीण म्हणायचंय कां??

बाकी धाग्याचे प्रयोजन अप्रस्तुत वाटत आहे हेमावैम.

इवान, मला अमोरासमोरच म्हणायचे आहे. हा शब्द बरोबर आहे. समोरासमोर असे आपण दोन समोर लावत नाही सहसा.

ते जाऊ देत.. तुम्ही तुमच्या आठ्वणी लिहा इवान.

आठवीत असताना आम्ही पु. लं. वर एक हस्तलिखित केले होते त्यावर त्यांची सही घ्यायला आम्ही चारपाच मैत्रिणी गेलो होतो. अगदी १० मिनिटेच तिथे होतो. पण खूपच मस्त अनुभव होता.

स्कॉटलंड मध्ये आम्ही पहिल्यांदा मराठी नाटक आणले होते (श्री तशी सौ) तेव्हा प्रशांत दामले, वंदना गुप्ते, किरण माने, अक्षय पेंडसे असे सगळे लोक आमच्या गावी २-३ दिवस राहून गेलेत. त्यांच्याशी ओळख झाली. त्यांना पुन्हा सोडायला आम्ही ग्लास्गो पर्यंत ट्रेनने गेलो होतो. इतक्या गुणी कलाकारांबरोबर एवढा वेळ घालविण्याची ही पहिलीच वेळ.

त्यानंतर एकदा मराठी मंडळ मध्ये कौशल इनामदारांचा कार्यक्रम केला होता (http://www.maayboli.com/node/50408)

गेल्या वर्षी युरोपियन मराठी संमेलन केले होते तेव्हा खूप कलाकार भेटले. दिलिप प्रभावळकर (http://www.maayboli.com/node/50279), रीमा, सोनाली कुलकर्णी, गिरिश कुलकर्णी, ऋषिकेष जोशी, वैभव जोशी, गिरिश जोशी, अभिनय देव, स्पृहा जोशी, श्रुती मराठे, मिलींद फाटक, किरण यज्ञोपवित, ऋषिकेष रानडे, सावनी रविन्द्र, अमर ओक, सत्यजित प्रभु.

त्यानंतर ऋषिकेष जोशी आणि वैभव जोशी ह्यांचा "काहीच्या काही"चा पहिला प्रयोग आमच्या मराठी मंडळामध्ये झाला होता.

प्रत्येक कलाकारावर लिहिण्यासारखे खूप आहे!!

वैशाली सामंत ची भेट इतकी अविस्मरणीय आहे. मस्त आहे ती. एकदम डाऊन टू अर्थ वगैरे.
एका सेमीनार साठी आलेली कॉलेजात आणि आम्ही तिला असिस्ट करत होतो. काय हवं काय नाही ते पहात होतं (सटरफटर कामांसाठी)

तीला भूक लागली तेंव्हा तिने स्वत:साठी चहा -सामोसा (की वडापाव ते नेमकं आठवत नाहीये) मागवला. फक्त तिच्यासाठी आणलेला बघुन चटकन म्हणाली की या मुलींनी पण सकाळपासून काही खाल्ल नाहीये. माझ्यासोबत फिरतायेत. त्यांची पण सोय करा.

हे म्हणाली नसती तरी चाललं असतं कारण तिने आमच्याकडे लक्ष द्यावं इतकंही इंटरॅक्शन नव्हतं आमचं Happy
सचिन खेडेकरला भेटलेय समोरासमोर याच सेमिनार मधे....फारसा आवडला नाही तो.

कौशल इनामदार आणि मिलिंद गुणाजी वेगवेगळे घरी येऊन गेले होते वांद्र्याला असताना. कौशलदादा बराच वेळ गायला होता. मिलिंद गुणाजीसुद्धा गायला. मस्त आवाज आहे त्याचा.

आईमुळे शास्त्रीय संगीतक्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना भेटलो, त्यांच्यासह काही वेळ राहिलोही आहे. सगळ्यांबद्दल सांगता येणार नाही.

खेळाडू ह्यात समाविष्ट आहेत की नाही माहित नाही. पण अमोल मुजुमदारला मी बोलिंग केली होती आणि माझ्या मते तो पायचीत होता.

बी, मी फक्त यादी देतो... कुणालाही हेवा वाटेल अशी यादी आहे ही !

पंडितराव नगरकर, भार्गवराम आचरेकर, अलका आचरेकर, मधुबाला चावला, बाबा माजगावकर, आलाप माजगावकर, श्यामलाबाई माजगावकर, राजन जावळे, रेणूका शहाणे, टॉम आल्टर, सुहासिनी मूळ्ये... ( हे सगळे माझे नातेवाईक, अर्थातच प्रत्यक्ष बोलणे झालेच )

या कलाकारांशी मी बोललोय...

जयमालाबाई शिलेदार, किर्ती शिलेदार, पं. मालिनीबाई राजूरकर, कान्होपात्रा किणीकर, भक्ती बर्वे, सुकन्या कुलकर्णी, सयाजी शिंदे, अश्विनी मुळगुंद, बेगम परवीन सुलताना, भारती आचरेकर, कुसुमाग्रज, बापू नाडकर्णी...

या कलाकारांना, त्यांच्या कला सादरीकरणाच्या व्यतीरिक्त बघितलेय.. ( म्हणजे अगदी रस्त्यावर, किंवा शुटींग व्यतीरिक्त, साध्या वेशात पण त्याच तेजस्वी रुपात )

आशालता, सुधा करमरकर, सुलभा देशपांडे, रीमा, लालन सारंग, सोनाली कुलकर्णी, आशा भोसले, दिलीप प्रभावळकर, बाळ कुरतडकर, पं. शिवकुमार शर्मा, प्रशांत दामले, उत्तरा केळकर, शबाना आझमी, शेरॉन प्रभाकर, बाळ ठाकरे, रजनी जोशी, सुहास जोशी, अश्विनी भिडे, मधुवंती दांडेकर, प्रभाकर कारेकर, बकुल पंडित, दुर्गा भागवत, झीनत अमान, मजहर खान, रेखा, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, वहिदा रेहमान, जया भादुरी, रिना रॉय, राकेश रोशन, अमिताभ बच्चन , विजय अरोरा, मदनपुरी, इंद्राणी बन्सल, नूतन,

ज्या कलाकारांना प्रत्यक्ष नाट्यप्रयोगात वा मैफीलीत बघितलेय, त्यांची यादी खुपच मोठी आहे.

कित्येक कित्येक कित्येक...
न संपणारी लिस्ट आहे..
यातही क्रिकेटपटूंची एक वेगळी लिस्ट बनेल..
तुर्तास ऑफिसमध्ये असल्याने अर्धविराम!

समोरासमोर जास्त प्रचलित शब्द आहे. अमोरासमोर मी पहिल्यांदा मीना प्रभूंच्या पुस्तकात वाचला.

सिरीयलमध्ये काम करणारी 'माधवी सोमण' ही माझी सख्खी भाची असल्याने तिच्याशी चांगली ओळख आहेच आणि ती वयाने थोडीच लहान असल्याने मैत्रीही आहे.

ऐश्वर्या नारकर (पल्लवी आठल्ये), आमच्याच शाळेची विद्यार्थीनी आणि माझ्या लहान बहिणीची batch mate. तिला लहानपणापासून बघितलंय. आमच्याच एरियात राहायची.

मीता सावरकर ही माझ्या काकूची भाची म्हणून तिलापण लहानपणापासून बघितलं आहे. हल्ली भेट नाही बरीच वर्ष.

अरे देवा !
>> +१

बी, तसच मला आमोरासमोर शब्द चुकीचा वाटतोय. मराठी भाषा पावला पावलावर बदलते ती अशी Happy

Pages