डोसे प्रकार

Submitted by आरती. on 17 April, 2015 - 04:42
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

प्रत्येक डोश्याच्या जिन्नसमध्ये जो तांदूळ दिला आहे तोच वापरून वेगवेगळ्या चवीचे डोसे चाखा. Happy प्रत्येक प्रकारच्या डोश्याची एक वेगळी चव आहे.

१. पेपर डोसा / साधा डोसा
डोसा राईस / कोणताही जाड तांदूळ - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून
20151219_164812.jpgमसाला डोसा ची बटाट्याची भाजी

फोडणीत उभा चिरलेला कांदा, राई, चणाडाळ, उडिद डाळ. हि. मि. कढीपत्ता, घालून डाळींचा रंग लालसर झाला की त्यात थोडी हळद घालायची त्यात २ टे. स्पून पाणी घालून थोड उकळू देऊन मग त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, चवीनुसार मीठ घाला आणि ढवळून घ्या. पाणी आटत आल की त्यात ओल खोबर आणि कोथिंबीर घाला.

२. सेट डोसा / स्पंज डोसा / आंबोळ्या / पोळ्ये

डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून
P26-05-13_06.31[1].jpgP26-05-13_06.32[1].jpg

३. दावणगिरी डोसा
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
साबुदाणा - १/२ वाटी
चणा डाळ - १/४ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून

४ - थंडीतील सेट डोसा हा थोडा कडवड लागतो. Happy
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १/४ वाटी
हळद - २ टी. स्पून
kadu dosa.jpg

५ - सेट डोसा (अजून एक प्रकार)
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टि. स्पून
चणा डाळ / चटणी डाळ - १/४ वाटी
मुगाची डाळ - १/४ वाटी

६ - नाचणी डोसा
नाचणीच पीठ - ४ वाटी
उडदाची डाळ - १/४ वाटी
मेथी - १/४ टी स्पून
पोहे - १/२ वाटी

७- नीर डोसा,

जूना कोणताही तांदूळ - ४ वाटी ( नविन तांदूळाचा थोडा सांभाळून करावा लागतो पण चविष्ट होतात म्हणून ही टीप. Happy
ओल खोबर - २ टे. स्पून
साखर - १ टी. स्पून
मीठ - चवीनुसार
neer dosa.jpg

८. मूग डोसा (पेसाराट्टू)
मूग - २ वाटी
बेडगी मिरची - ४-५
काळी मिरी - ७-८
आल - १/२ इंच
मीठ - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

१. सकाळी तांदूळ व मेथी एकत्र भिजत घाला. उडिद डाळ वेगळी भिजत घाला. साबुदाणे थोडे जास्त पाणी घालून भिजत घाला. संध्याकाळी वाटायच्या १५ मि.अगोदर पोहे भिजत घाला. चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ ही तांदूळाबरोबर भिजत घाला.

२. ग्राइंडर किंवा मिक्सरमध्ये तांदूळ + मेथी दाणे + पोहे + चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ / साबुदाणे एकत्र बारीक वाटून घ्या. उडदाची डाळ कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्या.

३. एका डब्यात मिश्रण ओतून घ्या. त्यात चवीपुरते मीठ घाला. चमच्याने मिश्रण एकाच दिशेने फेटा. १ टे. स्पून कच्चे तेल मिश्रणावर चमच्याने घाला आणि डब्याला झाकण लावून ठेवा.

४. सकाळी मिश्रण फुगून वर येईल. चमच्याने एकाच दिशेने ढवळून घ्या.

५. बीडाचा तवा तेल लावून गरम करून घ्या. चमच्याने मिश्रण तव्यावर घालून डोसे काढा.

नाचणीच्या डोश्यासाठी

सकाळी उडीद डाळ आणि मेथी वेगवेगळ भिजत घाला. संध्याकाळी दोन्ही एकत्र बारीक वाटून घ्या.
त्यात नाचणीच पीठ, चवीपुरत मीठ, थोड पाणी घालन एकाच दिशेने ढवळून पीठ आंबवायला ठेवा.
सकाळी पेपर डोसे काढा. ह्याचे सेट डोसे मला नाही आवडत. हा डोसा गरम खायला जास्त चांगला लागतो.

नीर डोसा

रात्री तांदूळ भिजत घाला. सकाळी तांदूळ, ओल खोबर, साखर घालून मिक्सरवर वाटून घ्या. एका भांड्यात हे मिश्रण काढून घ्या आणि त्यात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घाला. हे मिश्रण पातळ हव.

बिडाच्या तव्याला तेल लावून तापवून घ्या. गॅसची फ्लेम मोठीच ठेवा. मिश्रण तव्यावर ओता आणि लगेच फ्लेम स्लो करा. मंदाग्नीवर हा डोसा करतात. हव तर दुसर्‍या बाजूने एक सेंकंद भाजा. हे डोसे जाळीदार आणि पांढरे शुभ्र होतात. प्रत्येक वेळी डोसा घालताना फ्लेम मोठी हवी. घालून झाल्यावर फ्लेम स्लो करा.

मूग डाळ डोसा

मूगाची डाळ रात्री भिजत घाला. सकाळी डाळ, बेडगी मिरची, काळी मिरी, आल घालून वाटून घ्या. चवीनुसार मीठ घालून लगेच डोसे करा.

डोश्याच्या पीठाचे अजून काही प्रकार

पेपर डोशाच पीठ तव्यावर पसरवल की लगेच त्यावर थोड जिर आणी उभा बारीक चिरलेला कांदा स्प्रिकंल करा. थोड तेल घालून जिर आणि कांदा दाबून घ्या. डोसा फोल्ड करून खायला घ्या. उन्हाळ्यात हा डोसा बनवला जातो. क्रिस्पी जिर कांद्याचा डोसा यम्मी लागतो. नुसता किंवा चटणीबरोबर. Happy

सेट डोशाच पीठ तव्यावर पसरवून त्यावर कच्च अंड फोडून घालून त्यावर मीठ , काळीमिरी पूड, कोथिंबीर, हि. मि. बारीक कापून स्प्रिकंल करतात आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजतात.

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढे
अधिक टिपा: 

१. डोसा राईस आणि ईडली राईस मॉलमध्ये सहज उपलब्ध आहेत. केरला स्टोअर्समध्ये फक्त ईडली राईस मिळतो.
२. पीठात कच्चे तेल घातल्यावर पुन्हा ढवळू नये.
३. पीठ आंबल्यावर त्यात पाणी घालू नये त्याने डोसे नीट होत नाहीत. जी काही कंन्सिस्टंसी पीठाची करायची असेल ती डाळ तांदूळ वाटल्यावर लगेच करावी.

मूगाचा डोसा
उपवासाला चालतो. रोजच्यासाठी बनवायचा असेल तर डोसा तव्यावर पसरवल्यावर त्यावर कांदा बारीक चिरून स्प्रिंकल करा.

क्रिस्पी पेपर डोश्यासाठी टिप्स
तवा व्यवस्थित तापवून घ्या. गॅस मिडीयम फेल्मवर ठेवा. रुमाल मीठाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात बुडवून तापलेला तव्यावर ओला रूमालने पुसून घ्या. त्यावर चमच्याने मधोमध पीठ घालून संपूर्ण तव्यावर पसरवा. एक टिस्पून तेल / बटर / घी डोश्याच्या वरच्या बाजूला सगळीकडे लागेल अस शिंपडा आणि पसरवून घ्या

सेट डोसा, दावणगिरी डोसा बनवताना प्रत्येक वेळेस तव्याला तेल /बटर/ तूप लावून मग त्यावर पीठ घालून तुम्हाला हव्या त्या जाडीचा डोसा पसरवा.

सेट / दावणगिरी डोसे प्रवासासाठी उपयुक्त. २-३ दिवस सहज टिकतात. सॉफ्टही राहतात.
प्रवासासाठि नेताना हे डोसे थंड करून डब्यात भरायचे. त्याला अजिबात वाफ सुटायला नको तसेच पाण्याचा हात लावू नका.

माहितीचा स्रोत: 
आई आणि अम्मा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही फोटोंमधल्या इडल्या अप्रतिम!

आरतींचा हा धागा आवडत्या दहात घातला आहे. इथल्या प्रमाणानुसार आज स्पंजदोश्याचं भिजवलंय.

एवढ्यात एका अम्मानी केलेली नारळाची चटणी खाली. साधं नारळ, लाल सुक्या मिरच्या, मीठ अन जिरं घातलेलं होतं. हिरव्या मिरच्यांऐवजी सुक्या लाल मिरच्यांनी वेगळीच पण मस्तच चव होती.

मस्त धागा आहे हा आरती. खूप टेम्प्टिंग फोटोज आहेत

सेट डोसा मध्ये तू लिहिलय <<<डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी>>>

मला डोसा राईस , ईडली राईस वेगळे मिळत नाहीत (असे वाटते). डोसा राईस/ ईडली राईसला उकडा तांदुळ बोलतात ना...
वर लिहिलेले दोन तांदुळ कोणते आहेत ते सांग प्लीज

अप्रतिम चवीचा स्पंजदोसा झाला आहे. थँक्यूआरती!

आई किंवा अम्मा ह्यांपैकी ही ज्यांची पाककृती असेल त्यांना देखिल खूप धन्यवाद!

sponge-dosa-maayboli.jpg

माश्याच्या कालवणाशी खाणार्‍यांना हे काँबिनेशन फार आवडलं. आता दरवेळी कालवणाबरोबर स्पंजदोसे होणार आहेत. दोसे जरा जास्तं जाड घालायला हवे आहेत हे जाणवलं. तीन वेगवगळ्या रंगांवर काढून पाहिले. मधला सर्वानुमते बेस्ट आहे. Happy

sponge-dosa-curry-maayboli.jpg

थँक्स सशल!

बाकीचे अजून करून बघितले नाहीत, पण स्पंज दोश्याचं प्रमाण इतकं परफेक्ट आहे की बिघडायचा चान्स वाटत नाही. मी ह्यात दोसा राइसऐवजी कॉस्टकोतला ब्राउन बासमती वापरलाय, आणि इडली राइसऐवजी इडलीचा रवा.

माझी जाहिरात, Happy

http://www.maayboli.com/node/53911

इथे मी चटणीचे प्रकार लिहिलेत, इतरांना त्यांचे चटणी करायचे प्रकार लिहायला आमंत्रित करते. Happy

आरती, सॉरी.. हायजॅक करत नाहीय तुमचा बीबी, पण डोसा ला चटणी शिवाय मजा नाही. Happy

स्पंज डोसा मस्त दिसतोय मृ!

आता माझ्या लिस्टवर आरतीचे नीर डोसे आहेत. सोबत काळ्या वाटाण्यांची उसळ करूया म्हणून का.वा. आणून ठेवले आहेत. बघूया कधी मुहुर्त मिळतो.

आता माझ्या लिस्टवर आरतीचे नीर डोसे आहेत. सोबत काळ्या वाटाण्यांची उसळ करूया म्हणून का.वा. आणून ठेवले आहेत

कोणे एके काळी हा आमच्याकडे हिट्ट मेन्युप्रकार होता. नीर डोस्याच्या जागी आंबोळ्या आणि कावाउ. Happy

डोसा पुराण वाचते आहे. माझा हात बरा व्हायची वाट बघतेय मग मी एकदम डोसे एक्स्पर्टच होणारे असं वाटायला लागलंय हा धागा वाचून. Proud
धागाकर्तीचे आणि भर घालणार्‍या सगळ्यांचे खूपच आभार.

>>>आता माझ्या लिस्टवर आरतीचे नीर डोसे आहेत. सोबत काळ्या वाटाण्यांची उसळ करूया म्हणून का.वा. आणून ठेवले आहेत. <<< नको गं अशी नीर डोश्यांची वाट लावू मंजू... त्या लुसलुशीत नीर डोश्यांबरोबर मालगुडी वाल्यांसारखे मस्त व्हेज स्ट्यू किंवा ते महेश लंच होमात असते तसे मल्लिपुरम व्हेज करून खा की.

मंजूडी, माझे झाले करुन नीर डोसे आरतीच्या रेसीपीने. मस्तच झाले होते. पांढरे शुभ्र, मऊ, लुसलुशीत, जाळीदार, आणि नाजुक,

साधना, त्या पांढर्‍याशुभ्र जाळीदार आंबोळ्यांचं प्रमाण मला हवं आहे. ऑफिसच्या खोपच्यात नाहीतर मायबोलीच्या खोपच्यात दे.

नी Lol
त्या प्रतिसादात तुला टॅगच करणार होते, पण म्हटलं फोटो टाकल्यावर टॅग करू Proud

मृण्मयी, धन्यवाद, फोटो एकदम मस्त आहे.

देविका, अग चालेल. इथेसुद्धा मी काही चटण्या दिल्या आहेत. Happy

प्रिंसेस, तुमच्या एरीयातील सा.इ. मैत्रिणींना विचारा त्याबरोबर सांगतिल कुठे मिळेल ते.
डोसा राईस/ ईडली राईसला उकडा तांदुळ बोलतात <<<<< नाही ग. डोसा राईस - कोणताही जाडा तांदूळ चालेल. ईडली राईस फक्त ईडलीसाठी वापरतात. आणि डोसासाठीही चालतो. उकडा तांदूळ लाल, पिवळा, सफेद तीन प्रकारचे आहेत.

मंजूडी, पांढरी शुभ्र आंबोळी साठी ईडली राईस वापर आणि गॅस मोठा ठेवायचा पीठ घालताना आणि मग लगेच स्लो करायचा. नंतर स्लो फ्लेमवर बनवायचा. आई छान बनवते. सेम स्पंज डोसाच प्रमाण.

हा पांढरा डोसा आम्ही पिझा बेस साठी वापरतो.

धन्यवाद सर्वांना. Happy

आरती, तू सांगतेस ते ओल्या आंबवलेल्या पीठाचं.
मला कोरड्या पीठाचं प्रमाण हवं आहे. गरज लागेल तेव्हा पाणी घालून भिजवायचं नी आंबोळ्या घालायच्या. खास मालवणी पाकृ आहे ती.

माझे नीर दोसे लय ब्येक्कार झाले. तुम्ही थोड्या तपशीलवार टीपा लिहा ना प्लीज.
मी बिनडोकासारखे पाणी घालून वाटल्यामुळे उसका सत्यानाश हो गया. Happy

दावणगिरीत काय खबरदारी घ्यायची असते ते पब्लिकने मज सांगुन उपकृत करावे. अथवा दावणगिरीचा धीर होत नाहीये अजून.

हिकडे पब्लिक एक से एक फोटु टाकु टाकु राह्यले आणि आमचा सपशेल पचका. Happy

रैना माझा पचका ईडली बनवताना झाला होता खूप वेळा. Proud तेव्हा अक्षरशः रडकुंडीला आले होते कारण आठवड्यातून दोन -तीन वेळा खायची सवय आणि बनवायला येत नव्हते. Sad
सगळे डोसे आई आणि अम्माच्या (माझी आजी) हाताखाली नीट बनवता आले.
बिनडोकासारखे पाणी घालून वाटल्यामुळे उसका सत्यानाश <<<< तू बिनडोक नाही Happy पाणी घालूनच वाटायचे.

नी Lol रियाज, रियाज

धन्यवाद आरती. मग पुन्हा प्रयत्न करायला हवा. मी काय चुकले ते शोधायला युट्ञुब व्हिडियोज पाहिले, त्यात एका अम्माने फार पाणी घालून वाटु नका असे सांगीतले. तिचे म्हणणे, आधी वाटून घ्या आणि मग पाणी घाला आणि प्रत्येक वेळेस दोसा तव्यावर घालताना नीट ढवळून घ्या नाहीतर तांद्ळाची पेस्ट खाली जाऊन बसते.

असो. मी पुन्हा करायचा प्रयत्न करेन नक्की. तुमचे नीर दोसे फारच सुंदर दिसतायेत. Happy

लवकार टिपा टाका सुगरणीनो.
ह्या आठवड्यात मला पण मुहूर्त करायचाय. ( महत्वाचे कारण म्हणजे बाई सुट्टीवर जाणार आहे आणि माझ्याकडे उधारीवर आणलेला wet Grinder आला आहे )

डोसा राईस, इडली राईस दोन्ही आणण्यात आले आहेत. बाकी सहित्य जय्यत तयार आहे. शुक्रवारपासून पुढे डोसा सप्ताह. दावणगिरी डोसा कधीपासून करायचा होता. तो आधी.

नाचणीचे डोसे करुन पाहिले. अप्रतिम झाले. जरासं मुगाचं पिठही अ‍ॅड केलं होतं.

पुन्हा पुन्हा करण्यात येईलच तेव्हा फोटो येईल.

१. पेपर डोसा
डोसा राईस / कोणताही जाड तांदूळ - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून

सगळ्यात सोपा पेपर निवडला आहे. हे वाटून आले आहे . मेथी दाणे १ चमचा ( पोहे खायचा ) जास्त नाही न होणार
डोसा राईस वाटल्यावर चिकट होतो का ? का हि माझ्या wet Grinder ची कमाल आहे

open दोसा कसा करतात ?
मी प्रचंड प्रेमात पडले आहे त्या पदार्थाच्या !
तयार करू शकणार नाही बहुतेक पण माहिती असुदे कधी चुकून जमलाच तर … Happy

डोसा राईस वाटल्यावर चिकट होतो का ? <<< मृणाल१, तांदूळ मेथीबरोबर वाटल्याने चिकट पीठ होत. वेट ग्राईंडर काही कमाल नाही करत फक्त पीठ लवकर फुगवायला मदत करत आणि त्यात मस्त ग्राईंड होत. Happy काल डोसे कसे झाले?

लीलावती, ओपन डोसा सोपा आहे. पेपर डोसाच पीठ तव्यावर घातल की त्यावर लाल चटणी ( टोमॅटो किंवा आल्याची) लावायची, नंतर बटाटा भाजी मधोमध घालायची किंवा डोसावर पसरवायची. त्यात सजावटीसाठी किसलेल गाजर, बीट, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, किसलेल चिज / पनीर घालू शकता. हा डोसा फोल्ड करायचा नाही म्हणून त्याला ओपन डोसा म्हणतात. Happy नक्की जमेल तुला. घरी गेली की ट्राय कर आणि आई जाम खूष होईल तुझ्यावर. Happy ह्यात व्हेरीएशन चायनिज डोसा बनवू शकतेस.

धन्यवाद शर्मिला.

Pages