डोसे प्रकार

Submitted by आरती. on 17 April, 2015 - 04:42
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

प्रत्येक डोश्याच्या जिन्नसमध्ये जो तांदूळ दिला आहे तोच वापरून वेगवेगळ्या चवीचे डोसे चाखा. Happy प्रत्येक प्रकारच्या डोश्याची एक वेगळी चव आहे.

१. पेपर डोसा / साधा डोसा
डोसा राईस / कोणताही जाड तांदूळ - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून
20151219_164812.jpgमसाला डोसा ची बटाट्याची भाजी

फोडणीत उभा चिरलेला कांदा, राई, चणाडाळ, उडिद डाळ. हि. मि. कढीपत्ता, घालून डाळींचा रंग लालसर झाला की त्यात थोडी हळद घालायची त्यात २ टे. स्पून पाणी घालून थोड उकळू देऊन मग त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, चवीनुसार मीठ घाला आणि ढवळून घ्या. पाणी आटत आल की त्यात ओल खोबर आणि कोथिंबीर घाला.

२. सेट डोसा / स्पंज डोसा / आंबोळ्या / पोळ्ये

डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून
P26-05-13_06.31[1].jpgP26-05-13_06.32[1].jpg

३. दावणगिरी डोसा
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
साबुदाणा - १/२ वाटी
चणा डाळ - १/४ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून

४ - थंडीतील सेट डोसा हा थोडा कडवड लागतो. Happy
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १/४ वाटी
हळद - २ टी. स्पून
kadu dosa.jpg

५ - सेट डोसा (अजून एक प्रकार)
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टि. स्पून
चणा डाळ / चटणी डाळ - १/४ वाटी
मुगाची डाळ - १/४ वाटी

६ - नाचणी डोसा
नाचणीच पीठ - ४ वाटी
उडदाची डाळ - १/४ वाटी
मेथी - १/४ टी स्पून
पोहे - १/२ वाटी

७- नीर डोसा,

जूना कोणताही तांदूळ - ४ वाटी ( नविन तांदूळाचा थोडा सांभाळून करावा लागतो पण चविष्ट होतात म्हणून ही टीप. Happy
ओल खोबर - २ टे. स्पून
साखर - १ टी. स्पून
मीठ - चवीनुसार
neer dosa.jpg

८. मूग डोसा (पेसाराट्टू)
मूग - २ वाटी
बेडगी मिरची - ४-५
काळी मिरी - ७-८
आल - १/२ इंच
मीठ - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

१. सकाळी तांदूळ व मेथी एकत्र भिजत घाला. उडिद डाळ वेगळी भिजत घाला. साबुदाणे थोडे जास्त पाणी घालून भिजत घाला. संध्याकाळी वाटायच्या १५ मि.अगोदर पोहे भिजत घाला. चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ ही तांदूळाबरोबर भिजत घाला.

२. ग्राइंडर किंवा मिक्सरमध्ये तांदूळ + मेथी दाणे + पोहे + चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ / साबुदाणे एकत्र बारीक वाटून घ्या. उडदाची डाळ कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्या.

३. एका डब्यात मिश्रण ओतून घ्या. त्यात चवीपुरते मीठ घाला. चमच्याने मिश्रण एकाच दिशेने फेटा. १ टे. स्पून कच्चे तेल मिश्रणावर चमच्याने घाला आणि डब्याला झाकण लावून ठेवा.

४. सकाळी मिश्रण फुगून वर येईल. चमच्याने एकाच दिशेने ढवळून घ्या.

५. बीडाचा तवा तेल लावून गरम करून घ्या. चमच्याने मिश्रण तव्यावर घालून डोसे काढा.

नाचणीच्या डोश्यासाठी

सकाळी उडीद डाळ आणि मेथी वेगवेगळ भिजत घाला. संध्याकाळी दोन्ही एकत्र बारीक वाटून घ्या.
त्यात नाचणीच पीठ, चवीपुरत मीठ, थोड पाणी घालन एकाच दिशेने ढवळून पीठ आंबवायला ठेवा.
सकाळी पेपर डोसे काढा. ह्याचे सेट डोसे मला नाही आवडत. हा डोसा गरम खायला जास्त चांगला लागतो.

नीर डोसा

रात्री तांदूळ भिजत घाला. सकाळी तांदूळ, ओल खोबर, साखर घालून मिक्सरवर वाटून घ्या. एका भांड्यात हे मिश्रण काढून घ्या आणि त्यात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घाला. हे मिश्रण पातळ हव.

बिडाच्या तव्याला तेल लावून तापवून घ्या. गॅसची फ्लेम मोठीच ठेवा. मिश्रण तव्यावर ओता आणि लगेच फ्लेम स्लो करा. मंदाग्नीवर हा डोसा करतात. हव तर दुसर्‍या बाजूने एक सेंकंद भाजा. हे डोसे जाळीदार आणि पांढरे शुभ्र होतात. प्रत्येक वेळी डोसा घालताना फ्लेम मोठी हवी. घालून झाल्यावर फ्लेम स्लो करा.

मूग डाळ डोसा

मूगाची डाळ रात्री भिजत घाला. सकाळी डाळ, बेडगी मिरची, काळी मिरी, आल घालून वाटून घ्या. चवीनुसार मीठ घालून लगेच डोसे करा.

डोश्याच्या पीठाचे अजून काही प्रकार

पेपर डोशाच पीठ तव्यावर पसरवल की लगेच त्यावर थोड जिर आणी उभा बारीक चिरलेला कांदा स्प्रिकंल करा. थोड तेल घालून जिर आणि कांदा दाबून घ्या. डोसा फोल्ड करून खायला घ्या. उन्हाळ्यात हा डोसा बनवला जातो. क्रिस्पी जिर कांद्याचा डोसा यम्मी लागतो. नुसता किंवा चटणीबरोबर. Happy

सेट डोशाच पीठ तव्यावर पसरवून त्यावर कच्च अंड फोडून घालून त्यावर मीठ , काळीमिरी पूड, कोथिंबीर, हि. मि. बारीक कापून स्प्रिकंल करतात आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजतात.

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढे
अधिक टिपा: 

१. डोसा राईस आणि ईडली राईस मॉलमध्ये सहज उपलब्ध आहेत. केरला स्टोअर्समध्ये फक्त ईडली राईस मिळतो.
२. पीठात कच्चे तेल घातल्यावर पुन्हा ढवळू नये.
३. पीठ आंबल्यावर त्यात पाणी घालू नये त्याने डोसे नीट होत नाहीत. जी काही कंन्सिस्टंसी पीठाची करायची असेल ती डाळ तांदूळ वाटल्यावर लगेच करावी.

मूगाचा डोसा
उपवासाला चालतो. रोजच्यासाठी बनवायचा असेल तर डोसा तव्यावर पसरवल्यावर त्यावर कांदा बारीक चिरून स्प्रिंकल करा.

क्रिस्पी पेपर डोश्यासाठी टिप्स
तवा व्यवस्थित तापवून घ्या. गॅस मिडीयम फेल्मवर ठेवा. रुमाल मीठाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात बुडवून तापलेला तव्यावर ओला रूमालने पुसून घ्या. त्यावर चमच्याने मधोमध पीठ घालून संपूर्ण तव्यावर पसरवा. एक टिस्पून तेल / बटर / घी डोश्याच्या वरच्या बाजूला सगळीकडे लागेल अस शिंपडा आणि पसरवून घ्या

सेट डोसा, दावणगिरी डोसा बनवताना प्रत्येक वेळेस तव्याला तेल /बटर/ तूप लावून मग त्यावर पीठ घालून तुम्हाला हव्या त्या जाडीचा डोसा पसरवा.

सेट / दावणगिरी डोसे प्रवासासाठी उपयुक्त. २-३ दिवस सहज टिकतात. सॉफ्टही राहतात.
प्रवासासाठि नेताना हे डोसे थंड करून डब्यात भरायचे. त्याला अजिबात वाफ सुटायला नको तसेच पाण्याचा हात लावू नका.

माहितीचा स्रोत: 
आई आणि अम्मा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांकली, पीठ पातळ हव. फोटो काढेन वेळ मिळाला की.

क्रोशाचे नाजुक रुमालच जणुं <<<< ममो, Happy

देविका, धन्यवाद अजून कृती अ‍ॅड केल्याबद्दल.

प्राची धन्यवाद.

छान आहे हा धागा. इथे पेपर डोसा म्हणजे नेहमीचा साधा डोसा का ? नसेल तर प्लीज साधा डोसाचे प्रमाण देणार का ?

इथे पेपर डोसा म्हणजे नेहमीचा साधा डोसा का ? <<<<< पारु हो. तुम्हाला किती पातळ डोसा हवा तसा तव्यावर चमच्याने पसरवा.

माझा दावणगिरी बराच चिकट झाला का बरे? <<<<< प्रमाण काय घेतल होत? तांदूळ कोणता वापरला होता? पीठ कस केल होत? तवा अगोदर तापवून घेतला होता का?

Ukda rice vaparla hota praman same ghetle hote tava nonstick hota. Pahila dosach nave sarv tasech hote kase base prakaran nistarle. Tel barech ghalat lagle nonstick aala tari tel ghalavech lagte ka

इडली राईस म्हणजे नक्की कोणता राईस अस्तो? बिग बाझारमधे इडली राईस असेच नाव होते. वाण्याकडे इडली राईस नव्हता....तो नाव विचारतो.

मनीशा <<<< तवा व्यवस्थित तापवून घेतला होता का? आम्ही नॉनस्टीकचा तवा कधीच वापरत नाही त्यामूळे नाही माहित. मी वर दिलेल्या प्रमाणात आमचे व्यवस्थित दा.डो. होतात. पीठ व्यवस्थित आंबल होत का?

सुमेधाव्ही<<<< हो ईडली राईस नावाने सर्व मॉलमध्ये मिळतो.
हा ईडली राईसचा फोटो
P12-05-15_07.41[1].jpg

आरती, डोश्याच्या असन्ख्य प्रकाराबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. डोसे मला बर्‍यापैकी जमतात. पण एक शन्का आहे. तू दिलेले वरचे प्रमाण किती जणाना पुरते? किन्वा ४ जणान्करता तान्दुळ व डाळीचे किती प्रमाण घ्यावे?

आरती इथे नसल्यास कुणीही डोसा प्रेमीनी सान्गीतले तरी चालेल.

४ जणान्करता तान्दुळ व डाळीचे किती प्रमाण घ्यावे?<<<<< रश्मी, तुम्ही नेहमी ४ माणसांसाठी डोसे बनवायला जी वाटी घेता त्या वाटीच्या प्रमाणात करुन बघा. मला तेवढा अंदाज नाही. Happy

रश्मी.., आरतीने वर दावणगिरी डोश्याचं प्रमाण दिलं आहे, त्या प्रमाणात ४ फुल दोन हाफ माणसांनी पोटभर डोसे खाल्ले. डोश्यांची नेमकी संख्या आणि आकार मला आत्ता सांगता येणार नाही. पण अंदाज यावा यासाठी लिहिलं आहे.

आरती ओके. मन्जूडी धन्यवाद.:स्मित:

मला इडलीचा अन्दाज आहे, पण डोश्यान्चा नाही. कारण बसल्या जागी एखादी व्यक्ती ४ ते ५ खाते, तर दुसरी जास्त खाऊ शकते. बाकी भाजी आणी चटणी असल्याने कदाचीत सगळ्याना पुरतील. नेहेमीचे खाणारे या वेळी आजारपणामुळे बाजूला आहेत. तरीही ४ वाट्यान्चे आरतीने दिलेले भिजवते.

आजारपणामुळे बाजूला आहेत. <<<<रश्मी, सोबत सांबांर नाहीतर रस्सम बनवा, तोंडाला चव येईल आणि हेच लोक जास्त संपवतील. तरीसुद्धा उरले तर शेजारी कधी कामी येतील. Proud

४ वाट्यान्चे आरतीने दिलेले भिजवते. <<<< हो पण वाट्यांच्या साईझही बदलत असतात. Happy

चालेल आरती. साम्बार बरे की. आणी शेजारी गावाला गेल्याने ते पण नाहीत.:फिदी: पण राहु दे उरले पीठ तर दुसर्‍या दिवशी परत नाश्त्याला होईल.:स्मित:

दे उरले पीठ तर दुसर्‍या दिवशी परत नाश्त्याला होईल <<<< दुसर्‍या दिवशी त्याच पीठात कांदा, कोथिंबीर, हि.मि. घालून आप्पे करा. Happy नाहीतर त्याच पीठाचे सेट डोसे आदल्या दिवशी काढून ठेवा. सकाळी गरम करून चहात बुडवून खा. एकदम टेस्टी ब्रेफा.

धन्यवाद आरती...पण ह्या तांदूळाचे दुसरे काही लोकल नाव असू शकेल का? वाण्यांना इडली राईस समजत नाही ग.

सुमेधा, शुक्रवार पेठेत, भरत नाट्य मन्दिराजवळ एक कोकणमेवा नावाने दुकान आहे, त्यान्च्याकडे बघ की. कोकणातले सर्व प्रकार मिळतात तिथे असे माझ्या जावेने सान्गीतलेय. मागे तिने आमसुले वगैरे दिली होती. उकडा तान्दुळ मिळु शकेल.

दुसर नाव काही नाही, हा खास ईडलीचा तांदूळ आहे. ह्या तांदूळाची ईडली अशी पांढरी शुभ्र आणि स्पाँजी होतात.

P13-05-15_07.32[2].jpg

का नाही ममो?? मला जमल्या मग तुम्हाला तर नक्कीच येतील. Happy

सुमेधाव्ही, डोसासाठी, लाल, पिवळा, सफेद किंवा ईडली राईस ह्या पैकी कोणताही उकडा तांदूळ चालेल. ईडलीसाठी फक्त ईडली राईसच हवा.

आरतीला हाणा. नेमक्यावेळी नेमके फोटो टाकून जीव कासावीस करतेय...

हा माझा झब्बू:

a5.jpg

पण या इडल्या इडली रव्याच्या आहेत, इडली तांदुळाच्या नाहीत.

मन्जूडी, इडल्या आणी चटणी दोन्ही मस्त दिसतायत.

आरती, इडलीसाठी किन्वा डोस्यासाठी हैद्राबादला जी लाल टॉमेटोची चटणी मिळते ( हॉटेलमध्ये देतात म्हणे) त्याची कृती आहे का तुझ्याजवळ? किन्वा दुसरी चटणी रेसेपी नारळाव्यतीरीक्त.

मुळगापोडी आणी कान्दा चटणी माहीत आहे.

लाल टॉमेटोची चटणी मिळते <<<< तेल किंवा तूपामध्ये कांद्याच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी, लसूण, आल, बेडगी मिरची परतून घ्यायची. थंड झाल्यावर चवीपुरत मीठ घालून हे मिश्रण वाटायच. वरून हिंग, राई, कढीपत्ताची फोडणी द्यायची. ही चटणी ईडली बरोबर एकदम टेस्टी लागते.

डोसासाठी शेंगदाणा चटणी एकदम बेस्ट. शेंगदाणे भाजून, साल काढून, लसूण, आल, बेडगी मिरची, चिंच हे मिक्सरला वाटून घ्या. वरून फोडणी.

आल्याची चटणी ही सुद्धा ईडलीबरोबर झणझणीत टेस्टी लागते. आल छोटे तुकडे करून पाव वाटी, बेडगी मिरची, चणाडाळ आणि उडीद डाळ १ टे.स्पून, लसूण १-२ पाकळ्या नसल्यातरी चालतात, हे तेलात भाजून चिंच, गूळ मीठ घालून मिक्सरवर बारीक पेस्ट करा. वरून फोडणी द्या.

Pages