Submitted by दिनेश. on 6 April, 2015 - 08:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
२ जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत:
पारंपरिक पदार्थ आहे. हल्लीच लोकसत्तामधेही वाचला.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि दिलेले अन घेतलेले दिवेही
आणि दिलेले अन घेतलेले दिवेही नाही खायचेत

मस्त दिसतंय हे.
मस्त दिसतंय हे.
पण दिवे म्हणून खायला मन धजणार
पण दिवे म्हणून खायला मन धजणार नाही माझे >>> पेटवलेले दिवे नाही खायचेत. . >> > अश्विनी सही !!!
पदार्थ मस्त आहे. करुन बघणार नक्की.
तसे नाही पण माझी मानसिकता ही
तसे नाही पण माझी मानसिकता ही आहे की मी देवापुढे वाकून दिवा तेवतो. दिवा म्हणजे तो देवापुढेच असतो. तुळशीपुढे. अंगात रोंगाळीवर मधोमध. पुर्वजांच्या तसबीरीपुढी. मी तो दिवा ग्रहण करणे मला शक्यच नाही. ही भावना आहे माझी.
बी, श्रावण शुक्रवारी जिवतीची
बी, श्रावण शुक्रवारी जिवतीची पूजा झाल्यावर मुलांना पुरणाच्या पंचारतीने ओवाळायची पद्धत आहे. माझी आई पण आम्हा भावंडांना ओवाळायची. ती आरती शांत झाल्यावर (विझल्यावर) तेच वाती जळून खरपूस झालेले, तूपाचा स्वाद असलेले पुरण आम्हाला खायला सांगायची. खूप मस्त लागतं ते.
आणि इथे ह्या पाकृमध्ये तर नुसता दिव्याचा आकार येतोय त्या पिठाला. कुणापुढे ते तेवायचे नाहियेत. शिजले की खायचेत.
दिवा नको तर दुसरा आकार करा
दिवा नको तर दुसरा आकार करा
दिव्यांच्या अमावस्येला आम्ही
दिव्यांच्या अमावस्येला आम्ही गोड म्हणून दिवेच करतो ( कणकेत गूळ घालुन ती भिजवायची आणि त्याचे दिवे करुन ते उकडून घ्यायचे. खाताना वर तूप घालायचे. ) खायचे दिवे ही नवीन संकल्पना नाहीये.
दिनेशदा,
दिनेशदा, _________/\_________.


दिवे छानच दिसतायत.
तुमचा बर्याच पा.कृ. वाचायच्या राहील्यात.
भारीच एकदम!
भारीच एकदम!
मी आधी हा बीबी "पावभाजीतले
मी आधी हा बीबी "पावभाजीतले दिवे" असे वाचले
पिठोरी अमावस्येला पण आरतीतले
पिठोरी अमावस्येला पण आरतीतले दिवे, प्रसाद म्हणून खातात.
वर मानुषीने लिहिलेले मुटके आहेत त्यातही दोडक्याचा स्वाद छान लागतो. या दोडक्यात भातही छान शिजतो.
शिजवताना सुटलेले पाणी वाया जात नाही.
ती आरती शांत झाल्यावर
ती आरती शांत झाल्यावर (विझल्यावर) तेच वाती जळून खरपूस झालेले, तूपाचा स्वाद असलेले पुरण आम्हाला खायला सांगायची. खूप मस्त लागतं ते. >> + १००
पिठोरी आवसेचे दिवे पण चांगले लागतात. दिवाळीला कुठेतरी चॉकलेट दिया पण बघितला होता. (पेटवायचा नाही मात्र.)
अश्याच प्रकारची आई शेपूची फळं
अश्याच प्रकारची आई शेपूची फळं नेहमी करते.
http://www.maayboli.com/node/12527
प्रचंड आवडतात.
भारीच
भारीच
दिनेश .... काल डिनर मेनु
दिनेश .... काल डिनर मेनु होता......एक्दम झकास.....फोटो काढण्या पर्यन्त मजल गेलिच नाही ...त्या अधिच फस्त झाले ......:)
अरे वा, खुप जणांनी करून
अरे वा, खुप जणांनी करून बघितलेले दिसताहेत.
अगदी सोपा आणि सर्वांना हमखास आवडेल असा पदार्थ आहे हा. अवश्य करून बघा.
छान रेसीपी. आज करेन
छान रेसीपी. आज करेन संध्याकाळी.
मस्त प्रकार, नक्की करुन
मस्त प्रकार, नक्की करुन बघणार.
ओके ही रेस्पी मला कंम्प्लिट
ओके ही रेस्पी मला कंम्प्लिट मील म्हणून चांगली वाटली म्हणून फार आशेने करायला घेतली आणि मी काहीतरी चुकवलं म्हणजे शब्दशः दिवेच लावले. मोस्टली माझे दिवे जरा शहाबादी बोरांच्या आकाराचे झाले असावे आणि दिनेशदा तुम्ही हळद घातली होती का पीठात? माझे फारच पांढरट झाले होते. मिरच्या मी बिया काढून वापरते आणि इतर मसाले काही नाही त्यामुळे चव पण लागली नाही. वरून तूप घालणं मस्ट आहे का आणि तेल जास्त वापरून भाजी करणं? मी ते केलं नाही. अजून एकदा करून पाहिन. मी तांदळाचं आणि गव्हाचं पीठ घेतलं होतं. पुढच्या वेळी ज्वारीचं आणून पाहीन. नंतर थोडा आईने केलेला गरम मसाला पण घालून पाहिला पण माहित नाही काहीतरी कमी वाटत होतं. आणखी काय करायला हवं?
हा फोटो.

वेका, पालेभाजी कोणती घेतलीस ?
वेका, पालेभाजी कोणती घेतलीस ?
पालक? (त्यात कांदा आणि मुगडाळ
पालक? (त्यात कांदा आणि मुगडाळ भिजवून घातली आहे?)
नाही मेथी. मला वाटतं फ्रोजन
नाही मेथी. मला वाटतं फ्रोजन पण नक्की आठवत नाही. मला हा प्रश्न विचारायचा म्हणून फोटो काढला आणि विसरलेच.
मेथी होय? फोटोत देठं
मेथी होय? फोटोत देठं असल्यासारखं वाटतंय जी मेथीकरता खूप मोठी वाटली ..
वरुन लसणाची चरचरीत फोडणी विथ
वरुन लसणाची चरचरीत फोडणी विथ लाल तिखट घालुन चालली असती, यात भाजी कमी घालायची आहे माझ्याकडुन पण जरा जास्त झाली,
मी पिवळ्या मक्याचे पिठ वापरले
मी पिवळ्या मक्याचे पिठ वापरले होते म्हणून तसा रंग आलाय.
जर चव नाही आली तर वरून मिरच्यांची फोडणी देता येईलच. तूपामूळे अगदी कोरडे होत नाही खाताना. नाहीतर या पिठांचे दिवे शिजल्यावर आतून कोरडे होतात.
मला वाटल पालेभाजीवर आलेले
मला वाटल पालेभाजीवर आलेले काजवे किंवा उंबरातले किडे सारखे काही असेल
दा. मस्त प्रकार आहे. आम्ही असे दिवे तांदळाच्या पिठाचे करतो. पण ते फक्त ओवाळण्यासाठी असतात.
Sahi recipee. Nakki ka run
Sahi recipee. Nakki ka run baghnar dinesh daa.
आम्ही असे दिवे तांदळाच्या
आम्ही असे दिवे तांदळाच्या पिठाचे करतो. पण ते फक्त ओवाळण्यासाठी असतात._ amhipan karato same.
Pages