पालेभाजीतले दिवे

Submitted by दिनेश. on 6 April, 2015 - 08:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
पारंपरिक पदार्थ आहे. हल्लीच लोकसत्तामधेही वाचला.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त क्रुती! लगेच केलेत ! पालेभाजी निवडून तयार होतीच्, मी ज्वारी+कणीक+२ चमचे डाळीच पिठ पण घातल त्याने मस्त चव आली,

resize dive.jpg

Happy प्राजक्ता तुझ्या फोटोत भाजी फार आहे, मी फक्त दिवे खाणार Wink दिवे एकदम मस्त दिसत आहेत.

सोपी कृती वाटते, नक्की करणार. आवडली.

धन्यवाद दिनेशदा!
क्रुती खरच सोपी आहे पटकन होते, कन्फर्ट फुड म्हूणुन छान आहे,

मला दिनेशदाचे दिवे ,मामी म्हणतेय तस न्योकी सारखे वाटयात, माझे रन्गाला डाळ-चिकोल्यासारखे वाटले.

भारी आहे हे.
असली काही डिश असते हेच माहित नव्हते.
देसी स्पिनाच पास्ता.

प्राजक्ता तुम्ही पाण मस्तं दिवे केलेयत.
Wink

रंगातला फरक बहुदा तुम्ही बेसनपीठ घातल्याने आणि जास्तं परतल्याने आणि तुम्ही वापरलेल्या भाजीचा रंग डार्क असल्याने आलाय.
पण मस्तं खरपूस झाले असणार असे दिसतेय.

मी हे नक्की करणार , पण मला एकटीलाच खावे लागतील.

छान प्रकार वाटतोय. पण ज्वारीचे पीठ फार जुने घेऊन नाही चालायचे बहुतेक..चव नाही यायची हवी ती. ताजे घेऊन करावे आपले..
प्रचि सुंदर!

वन डीश मील म्हणून चांगली वाटतेय. करून पाहिन बहुतेक एकटीलाच खावी लागेल. Happy

>>देसी स्पिनाच पास्ता.

घ्या म्हणून त्यांचे पास्ते जास्त फेमस होतात आणि आमचे दिवे मागे राहतात. साती, दिव्याच्या फोटोतला एखादा दिवा घेऊन टाक Wink

वा वा दिनेशदा तुम्ही खरे कल्पक !पौष्टिक पदार्थ आहेच ते पण घरीच उगवलेला सरसो वापरून म्हणाजे कमाल !!

मस्तच! यातलं सगळ्यात मस्त म्हणजे परसातलीच भाजी वापरलीये.
दिनेश असाच एक पारंपारिक पदार्थः दोडक्यातले मुटके.
कणीक, अगदी थोडं बेसन, धणे जिरे पूड, तीळ किंचित ओवा, थोडं तेल आणि चवीपुरतं चिंच गूळ मीठ तिखट घालून अगदी कमी पाण्यात हे सगळं भिजवून घेऊन याचे मुटके वळायचे. या मुटक्यांवर दुमडलेया चार बोटांचे खळगे उमटले पाहिजेत.
इकडे मोहोरी, हिंग हळद, हि.मिरच्यांची फोडणी करून त्यात हे मुटके परतून घ्यायचे. आणि मग यातच कोवळ्या दोडक्याचे तुकडे टाकायचे.(सालं काढून). शक्यतो वाफेवर शिजवायची ही भाजी. वाटलंच तर थोडं पाणी घालून शिजवा. भरपूर कोथिंबीर घालून वाढा.
खूप मस्त लागते.

कणिक + तांदूळाची पीठी, बारीक चिरलेला बेबी पालक घेऊन बनवले. मेथीचा स्वाद हवा म्हणून १/२ टीस्पू मेथीदाणे घातले. मस्त झाले होते.
(भाजीचे प्रमाण तुम्ही फोटोत दाखवले तेवढेच घेतले Happy )

Pages