Submitted by मैथिलीपिंगळे on 2 April, 2015 - 18:23
भोगले जे दु:ख त्याला दु:ख तरी म्हणू कसे
हरेक क्षणी सुखाची आस होती
तुझी आश्वासक साथ होती
पण हाय रे , दुर्दैव माझे की
नावातच माझ्या वनवास होता
फक्त त्या वाटेवर उब तुझी यादगार होती
आजही ते दु:ख पांघरावे वाटते
दु:खाचेही साजरे करावे म्हणते सोहळे
कारण तूच फुलवलेस ताटवे वनवासी या
म्हणूनच झेलले हे दु:ख त्याला दु:ख म्हणवत नाही रे
शेवटी तू कितीही टाळलेस तरीही
हेच खरे की , नावातच माझ्या वनवास होता .....
-मैथिली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कविता ठीक. नावातच वनवास
कविता ठीक.
नावातच वनवास असलेले नाव कोणते ?
धन्यवाद कैलासजी
धन्यवाद कैलासजी ...
पहिल्यांदाच मायबोलीवर कविता लिहिलेय. त्यानिमित्याने जाणकारांकडून चुका कळतील आणि सुधारण्यास वाव मिळेल हाच हेतू ....
'मैथिली' हेच ते नाव, त्याचा शब्दश: अर्थ वनवास नाहीय पण त्या नावाशी वनवास हा अर्थ जोडला जातो म्हणून ...
कविता खूपच साधारण आहे. मात्र
कविता खूपच साधारण आहे. मात्र डॉ.कैलास गायकवाड यांना दिलेल्या उत्तरातून तुमची शिकण्याची तयारी दिसते व तशी विनम्रता दिसते, याचा आनंद आहे.
तुम्हाला शुभेच्छा!
नक्कीच ...धन्यवाद खडूसराव !!
नक्कीच ...धन्यवाद खडूसराव !!