"दु:ख "

Submitted by मैथिलीपिंगळे on 2 April, 2015 - 18:23

भोगले जे दु:ख त्याला दु:ख तरी म्हणू कसे
हरेक क्षणी सुखाची आस होती
तुझी आश्वासक साथ होती
पण हाय रे , दुर्दैव माझे की
नावातच माझ्या वनवास होता
फक्त त्या वाटेवर उब तुझी यादगार होती

आजही ते दु:ख पांघरावे वाटते
दु:खाचेही साजरे करावे म्हणते सोहळे
कारण तूच फुलवलेस ताटवे वनवासी या
म्हणूनच झेलले हे दु:ख त्याला दु:ख म्हणवत नाही रे
शेवटी तू कितीही टाळलेस तरीही
हेच खरे की , नावातच माझ्या वनवास होता .....

-मैथिली

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद कैलासजी ...
पहिल्यांदाच मायबोलीवर कविता लिहिलेय. त्यानिमित्याने जाणकारांकडून चुका कळतील आणि सुधारण्यास वाव मिळेल हाच हेतू ....
'मैथिली' हेच ते नाव, त्याचा शब्दश: अर्थ वनवास नाहीय पण त्या नावाशी वनवास हा अर्थ जोडला जातो म्हणून ...

कविता खूपच साधारण आहे. मात्र डॉ.कैलास गायकवाड यांना दिलेल्या उत्तरातून तुमची शिकण्याची तयारी दिसते व तशी विनम्रता दिसते, याचा आनंद आहे.

तुम्हाला शुभेच्छा!