आयपीएल-८ (२०१५)

Submitted by स्वरुप on 1 April, 2015 - 11:55

आयपीएल चे आठवे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच स्मित

हा धागा आयपीएल-८ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टॉस जिंकुन कोलकत्त्याने पहिली बॉलिंग घेतलीय..... I think it's a wise decision
करीअप्पाला बॉलिंग करताना बघायची उत्सुकता होती..... पण त्यासाठी अजुन थोडी वाट बघायला लागणार.... दुसर्‍या मॅचनंतर शकीब परत गेल्यावर कदाचित त्याला चान्स मिळेल
All the best to both the teams Happy

पहील्या १० ओव्हर्समध्ये ५०-६० च्या आसपास घुटमळणार्‍या मुंबईने १६८ म्हणजे चांगलीच मजल मारली
रोहीत शर्मा चांगलाच फॉर्ममध्ये आहे.... एक मोर्केल सोडला तर एकाचीही बॉलींग भेदक वाटली नाही.... नरीनचा नव्या एक्शनमुळे प्रभाव थोडासा कमी झाल्यासारखा वाटतोय.... शकीबच्या बॉलींगवर दोन सोप्पे कॅच सुटले रसेल आणि मोर्केलकडून नाहीतर थोडेफार वेगळे चित्र दिसले असते!

आता सगळे गंभीर आनि उथाप्पा या जोडीवरच..... विकेट नाही पडली पाहिजे पहील्या ५-७ ओव्हर्समध्ये!

बॅटीचे दोन तुकडे गंभीरच्या.... आणि तेही विनयकुमारच्या बॉलींगवर Wink

काल रोहित फलंदाज म्हणून जरी चमकला असला तरी कप्तान म्हणून बराच गंडला.... एकतर एंडरसन आणि पोलार्ड असताना पाच स्पेशालिस्ट गोलंदाज खेळवण्यामागचे लॉजिक कळलेच नाही.... त्यामुळे सातव्या नंबरपासून निव्वळ शेपूट चालू होत होते.... कदाचित त्यामुळेच तीन विकेट्स पडल्यानंतर मधल्या ओव्हर्स रोहीत आणि एंडरसनला फारच सावधपणे खेळून काढाव्या लागल्या
अणि सर्वात मोठी चूक म्हणजे गंभीर खेळत असताना दोन्ही बाजूने स्पिनर्स लावणे...... इतकी बेसिक चूक कुणी कशी करु शकतो?

असो.... आता आजच्या मॅचबद्दल
चेन्नई नि:संशय फेव्हरिट..... All the best Chennai Happy

रोहितचा मुर्खपणा की अँडरसन मलिंगा पोलार्ड इ. सोडुन त्याने बुमरो सारख्या नवख्या बॉलरला १५ ओव्हर नंतर आणले.

सर्वात मोठी चूक म्हणजे गंभीर खेळत असताना दोन्ही बाजूने स्पिनर्स लावणे...... इतकी बेसिक चूक कुणी कशी करु शकतो? >> +१. शिवाय अँडरसन दोन्ही बाजूने स्विंग करत असताना एका ओव्हर्स नंतर त्याला थांबवले. मनिष पांडे नि स्विंग ह्यांचे फारसे सख्य नाहिये हे विसरला का ? स्वरुप, सिमन्स ऐवजी फिंच होता हे लक्षात आले का ? Happy
पुढच्या मॅच मधे हेझलवूड ला खेळवले नाहि तर आश्चर्य वाटेल. त्याचा सध्याचा फॉर्म बघता तो नि मलिंगा एकत्र असावेत असे वाटतो. त्यासाट्।इ एक तर पोलार्ड ला बाहेर ठेवावे लागेल (नि अर्थात बुमराहऐवजी देशी बॅट्स्मन - चांद किंवा पटेल आणावा लागेल) किंवा फिंच च्या जागी ( बुमराहऐवजी देशी बॅट्समन पटेल). तसेच ओझा सारखा attacking spinner असताना त्याला तशा मोडमधे न वापरणे हि अक्षम्य चूक.

>>स्वरुप, सिमन्स ऐवजी फिंच होता हे लक्षात आले का ?
पाँट्या हेड कोच असताना ते अपेक्षितच होते.... पोलार्डला इतक्यात बसवणे अवघड आहे.... फिंचलाही अजुन एकदोन चान्स तरी मिळतील ... नाहीतर मग सिमन्सला पर्याय नाही!
बुमराह मात्र नक्की बाहेर आहे पुढच्या मॅचला
काल मला सुर्यकुमार यादवची खेळी फार आवडली..... एकदम आत्मविश्वासपूर्ण होती

मॅकल्लम फारच फाल्तू फटका मारून आउट झाला यार..... स्मिथ एव्हढा भारी खेळत असताना काही गरज नव्हती इतका आततायीपणा करायची
आठव्या ओव्हरलाच ३ बाद.... पण रनरेट जवळजवळ ९ चा आहे
धोनी आणि ब्राव्होच्या आधी जडेजा?

धोनी आणि ब्राव्होच्या आधी जडेजा? > >ताहिर असल्यामूळे राईटी लेफ्टी कॉम्बो.

काल मला सुर्यकुमार यादवची खेळी फार आवडली..... एकदम आत्मविश्वासपूर्ण होती >> हो. फक्त त्याच्यात consistency नाहि.

अरे व्वा, निघाला का धागा, पण मला आत्ताच दिसला

गांगुलीने खेळायचे बंद केल्यापासून मला आयपीएलमध्ये फारसा इंटरेस्ट राहीला नाही आहे
कुठलीच टीम तशी फार आवडची नाही

पण यंदा कोलकत्त्याला सपोर्ट करावा म्हणतोय

पोलार्ड बॉलर नाहीये. त्याला बॉलर समजण्याची चूक मागच्या सीजनला खूप महागात पडलीय.
ते तारे आणि रायडू वगैरे पुढे काय करत असतात, त्यापेक्षा पोलार्डला बॅटींगला पुढे आणायला हवे. तिथे येऊन मोठ्या इनिंग खेळला तर ठिकेय, नाही खेळला तर सरळ बसवावे. अन्यथा तो फुकट जाणार किंवा त्याचे ओझे होणार.

शर्माची कप्तानी काल गंडली हे मात्र खरेय. फक्त अँडरसनला उथप्पासमोर लवकर आणायची मूव्ह चांगली होती. त्यानंतर कलकत्ता सुरू झाली ते शर्मा सावरलाच नाही. गंभीर समोर दोन्हीकडून स्पिनर्स काढणे मुर्खपणा याच्याशी सहमत!
काल ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा देखील फटका बसला. मुंबईसाठी हे नवीन नाही. कॅचेस वेळच्यावेळी पकडल्या गेल्या असत्या तर शेवटी मलिंगाने दबाव टाकला असता. असो! कोरबो लोरबो जिंकली हे चांगले झाले.

दिल्लीच्या तीन विकेट पडल्या आणि अजून ड्युमिनी आणि युवराज मैदानावर नाहीत. ईंटरेस्टींग.!

पण मला युवराजला खेळताना बघायचेय... त्याला धोनीला हरवताना बघायचेय..

नेहरा कसला पेटलाय..... अश्विनचेही बॉल्स चांगले वळतायत.... एकूण अवघड आहे दिल्लीचे!
मागच्या वेळी ड्युमिनीला खाली खेळवण्यावरुन बरीच चर्चा रंगलेली.... यंदापण तीच फसलेली स्ट्रेटेजी पुढे चालू दिसतीय

केजेओ आणि एल्बीची जोडी नाही फुटली तर कठीण आहे चेन्नईला.. सेट झालेत, मागे युवी आणि ड्युमी आहेत बघून हे अचानक मारायला सुरुवात करतील लवकरच..

decent score in the end. हूडा आणी फॉकनर छान खेळले. आता बॉलिंग कशी होतेय राजस्थान ची ते बघायचं.

काल जरा बिझी होतो त्यामुळे इकडे यायला जमले नाही..... राजस्थानने मॅच जिंकली असली तरी त्यांना बॅटींग फेल्युअरवर विचार करावा लागेल

चेन्नई नि हैद्राबाद्ची मॅच अगदीच वनसाइडेड झाली....... मागच्या मॅचची कसर मॅकल्लमने भरुन काढली

बंगलोरची अगदीच गचाळ फिल्डींग!

ती सोनी सिक्सवर कोण बाई कॉमेंट्री करतीय..... चायनीज मेट्रोमधेली अनाउन्समेंट ऐकल्यासारखी वाटतीय Wink

अरे कुठे गेले सगळे?
मी एकटाच बोलतोय इकडे?

राजस्थान रॉयल्सचा सुंदर विजय..... हॅट्स ऑफ टू दीपक हुडा.... पण क्रेडीट गोझ टू रहाणे, मॉरीस आणि साउदी टू!
पण बॉलींग मध्ये मात्र राजस्थानने चांगलाच गलथानपणा केला.... मुळात सीमर्स चालत नाहीयेत म्हंटल्यावर स्मिथ, बिन्नीने एखाद दोन ओव्हर्स करायला हरकत नव्हत्या.... फॉल्कनरच्या चौथ्या ओव्हरऐवजी तांबेचा कोटा संपवायला हवा होता
फिल्डींगमध्येपण रहाणे आणि तांबेकडून कॅचेस सुटले.... पण करुण नायरने पकडलेला कॅच मात्र सुपर्ब होता
आता वॉटसन फिट झाल्यावर कुणाला बसवायचे हा प्रश्नच आहे

RR is a home of emerging stars and Hooda seems a star of this season Happy

दिल्लीने दोन्ही मॅचमध्ये चांगला खेळ केला पण विजयाने त्यांना हुलकावणीच दिली..... इम्रान ताहीरने स्पिन बॉलिंगचा क्लास नमुना पेश केला

स्वरूप, मी पण आहे. विकेंड ला जरा वावर कमी होतो, पण आहे. राजस्थान छान जिंकले. हूडा चांगला खेळाडू आहे.

आज हरभजनने जे केले त्याचा फायदा मुंबईला पुढच्या सामन्यात होऊ शकतो.. एक आत्मविश्वास देत लढण्याची जिगर फुंकलीय त्याने सर्व संघात ..

क्लिनीकल विन बाय राजस्थान रॉयल्स Happy

रहाणे आणि स्मिथने मस्त इनिंग बांधली..... हूडाच्या दोन सिक्सने आवश्यक धावगती आवक्यात आणली आणि मलिंगाची १७वी ओव्हर स्मिथने मस्त खेळून काढली.....तिथेच मॅच बर्‍यापैकी आवाक्यात आली

गुड लक रॉयल्स Happy

Pages