मुळ्याचा ठेचा/चटका

Submitted by योकु on 27 March, 2015 - 11:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- दोन मध्यम आकाराचे मुळे, फार जून नकोत
- ५/८ तिखट हिरव्या मिरच्या
- पाव लहान चमचा हळद
- मीठ
- तेल
- मोहोरी
- जरासा हिंग
- थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

- मुळे धूवून कीसून घ्यावेत
- मिरच्या धूवून अगदी बारीक चिराव्यात. मिक्सरमध्ये नकोतच.
- चमचा - दीड चमचा तेल तापवावं. त्यात मोहोरी घालावी.
- तडतडली की चिमूटभर हिंग घालावा. लगेच बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्यात.
- जरा परतून मुळ्याचा कीस घालावा. परतावं.
- मीठ घालावं चवीपुरतं.
- झाकण ठेवून वाफेवर मुळा शिजवावा.
- ठेचा/चटका तयार आहे.
- वर थोडी कोथिंबीर पेरावी.
- हवं असल्यास वर लिंबू पिळावं.

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तसं. मुळा आहे...
अधिक टिपा: 

- मुळा शिजवल्यानी अजिबात दर्प राहात नाही.
- हा चटका बर्‍यापैकी तिखट हवा तरच मजा येते. त्यामुळे मिरच्या घालण्यात कंजूषी करू नये.
- आपण डबा उघडला की बाकी लोक धारातीर्थी पडत नाहीत.
- लाल तिखट घालू नये. रंग बिघडतो.

माहितीचा स्रोत: 
आजी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किसलेला मुळा व मुळ्याचा पाला यांची भिजवलेली मूगडाळ, हिरवी मिरची घालून मोहरी, हळद, तिखटाच्या फोडणीत परतलेली भाजीही मस्त लागते. मीठ जरा जपूनच घालायचे, कारण मुळ्याच्या पाल्यात भरपूर क्षार असतात. रुचकर भाजी व तीही काही मिनिटांत तयार होते!

Pages