- दोन मध्यम आकाराचे मुळे, फार जून नकोत
- ५/८ तिखट हिरव्या मिरच्या
- पाव लहान चमचा हळद
- मीठ
- तेल
- मोहोरी
- जरासा हिंग
- थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
- मुळे धूवून कीसून घ्यावेत
- मिरच्या धूवून अगदी बारीक चिराव्यात. मिक्सरमध्ये नकोतच.
- चमचा - दीड चमचा तेल तापवावं. त्यात मोहोरी घालावी.
- तडतडली की चिमूटभर हिंग घालावा. लगेच बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्यात.
- जरा परतून मुळ्याचा कीस घालावा. परतावं.
- मीठ घालावं चवीपुरतं.
- झाकण ठेवून वाफेवर मुळा शिजवावा.
- ठेचा/चटका तयार आहे.
- वर थोडी कोथिंबीर पेरावी.
- हवं असल्यास वर लिंबू पिळावं.
- मुळा शिजवल्यानी अजिबात दर्प राहात नाही.
- हा चटका बर्यापैकी तिखट हवा तरच मजा येते. त्यामुळे मिरच्या घालण्यात कंजूषी करू नये.
- आपण डबा उघडला की बाकी लोक धारातीर्थी पडत नाहीत.
- लाल तिखट घालू नये. रंग बिघडतो.
वा. आजी याला 'मुळ्याचा आळस'
वा.
आजी याला 'मुळ्याचा आळस' म्हणायची. का माहित नाही. कायतरी फोबियामुळे लहानपणी खाल्ला नाही. करू आता.
मस्त लागत असेल आणि मला मुळा
मस्त लागत असेल आणि मला मुळा आवडतो
यातले मुळे दर्पोक्तीचा आळस
यातले मुळे दर्पोक्तीचा आळस करतात म्हणून असेल... :p
यात थोडा दाण्याचा कुट घातला
यात थोडा दाण्याचा कुट घातला अजुन छान चव येते!
योकु मुळेवाले , मस्त आहे
योकु मुळेवाले , मस्त आहे रेसिपी .
मुळ्याचे सगळे प्रकार फार
मुळ्याचे सगळे प्रकार फार आवडीचे आहेत. या प्रकाराला आम्ही मुळयाची कोशिंबीर म्हणतो आणि चटका मात्र थोडा वेगळा करतो पण. त्यात भरड वाटलेली हरभर्याची डाळ घालतो. आणि दही ऑप्शनल.
मुळा आमटीत घालुन पण मस्त
मुळा आमटीत घालुन पण मस्त लागतो.
आणि मुळ्याची कार्व करुन फुलं ही सुंदर होतात. ( स्मित)
मुळा मस्तच. मला आवडतो.
मुळा मस्तच.
मला आवडतो. कच्चा, भाजी, आमटी, कोशिंबीर कसाही.
खूप वर्षांनी हा मुळ्याचा चटका
खूप वर्षांनी हा मुळ्याचा चटका हा शब्द पुन्हा ऐकला
आमच्यात कोशिंबीर म्हणजे
आमच्यात कोशिंबीर म्हणजे मुळ्याच्या किसावर हे वर दिलेली फोडणी, कोथिंबीर, दाकु आणि दही/लिंबाचा रस यातलं एक. चटका म्हणजे भिजवलेली ह.डाळ वाटून मुळ्याच्या किसात मिक्स करायची. दोन्हीत मुळा कच्चाच ठेवायचा.
आमच्याकडे पण मुळ्याचा चटका
आमच्याकडे पण मुळ्याचा चटका आणि कोशिंबीर सिंडरेलानी दिलेल्या रेसिपीनी होतं.
योकुंनी वर दिलेली रेसिपी मुळ्याची परतून भाजी म्हणून केली जाते. हीच भाजी जरा जास्त परतून, म्हण्जेच पाण्याचा अंश अजून कमी करुन , कणकेच्या पारीत सारण भरुन पराठे होतात. कधी ह्या भाजीत मावेल एव्ढी कणीक घालूनही पराठे करते.
पण काहीही म्हणा, मुळा शिजवला की भारी वास सुटतो. योकूंना बिनवासाचा मुळा मिळाला का?
आमच्याकडे मुळा गोल चकत्या
आमच्याकडे मुळा गोल चकत्या करुन खातात. किंवा, किसून कोशोंबीरीत घालतात, किंवा तमिळ पद्धतीचा सांबार केला की त्यात मुळा घालतात. मला सांबारातील मुळा जास्त आवडतो. मस्त पारदर्शक शिजतो.
मी मुंबईला राहायचे तिथे त्या काकू मुळ्याच्या पानांची मस्त भाजी करायच्या. भिजलेली डाळ घालून पानांची भाजी मस्त लागते.
मला पण तेच वाटलं, मुळा शिजवला
मला पण तेच वाटलं, मुळा शिजवला की जास्त वास सुटतो.
शुगोल, तुम्ही भिजवलेली मुगाची डाळ घालता का भाजीत?
मला चटका म्हणजे
मला चटका म्हणजे आंब्याची(कैरीची) डाळ करतात तशीच सेम कच्या मुळ्याची करतात आणि त्यात लिंबू पिळतात हेच माहिती होतं.
अरे हो, चटक्यात आम्ही पण
अरे हो, चटक्यात आम्ही पण कच्चा मुळाच घालतो. हळद घालून केलेल्या कोशिंबीरीला मात्र वाफवून घेतो. दह्यातल्या पांढर्या कोशिंबिरीला पुन्हा कच्चाच.
बी, मुळ्याच्या चकत्या मला पण आवडतात जेवणात. दहाएक मिनीटं त्या मीठ घातलेल्या पाण्यात ठेवायच्या खायला घेण्याआधी.
शुगोल, तुम्ही भिजवलेली मुगाची
शुगोल, तुम्ही भिजवलेली मुगाची डाळ घालता का भाजीत? >>>सिंडरेला, हो !
बहीणीच्या घरी भिजवलेली ह. डाळ घालतात किंवा डाळीचे पीठ लावतात.
मी असाच करते. मला हा नुसता
मी असाच करते. मला हा नुसता खायलाही आवडतो. पण मी लाल तिखट घालते.
मुळा किसल्यावर पिळून पाणी काढून टाकते. म्हणजे तर अजिबातच दर्प येत नाही.
मुळ्याच्या पानांची भाजी (भिजवलेली मूगडाळ घालून) - तोंपासु.
वा वा, मस्त कृती. करून
वा वा, मस्त कृती. करून पाहाण्यात येईल.
छान आहे पाककृती.
छान आहे पाककृती.
मस्त.. केला असता पण
मस्त.. केला असता पण आमच्याकडचे मुळे फोफसे असतात.
गुजराती चटका: मफतनो मूळो केळो
गुजराती चटका: मफतनो मूळो केळो जेवो लागे ।:-))
बी, मुळ्याच्या चकत्या मला पण
बी, मुळ्याच्या चकत्या मला पण आवडतात जेवणात. दहाएक मिनीटं त्या मीठ घातलेल्या पाण्यात ठेवायच्या खायला घेण्याआधी.>> करुन बघेन. धन्स बिल्वा.
योकु , आम्ही अशी कोशिंबीर
योकु , आम्ही अशी कोशिंबीर करतो. शेंगदाण्याचा कुट घालून . पण मुळा न परतता. मुळा परतला म्हणजे मग ती भाजी झाली ना?
आमच्यात कोशिंबीर म्हणजे
आमच्यात कोशिंबीर म्हणजे मुळ्याच्या किसावर हे वर दिलेली फोडणी, कोथिंबीर, दाकु आणि दही/लिंबाचा रस यातलं एक. चटका म्हणजे भिजवलेली हडाळ वाटून मुळ्याच्या किसात मिस्क करायची. दोन्हीत मुळा कच्चाच ठेवायचा.>>> +१
हडाळ व दाणे भिजत घालून
हडाळ व दाणे भिजत घालून वाटायचे त्यात दही मीठ साखर वरुन हिंग व लाल तिखटाची फो त्याला आम्ही चटका म्हणतो... ही भाजी वाटतेय करुन पाहण्यात येईल... सांबारातला मुळा छान लागतो...
अशा शिजवलेल्या मुळ्यात मी
अशा शिजवलेल्या मुळ्यात मी कणीक घालून पराठे करते शुगोल +१.
चटका म्हणजे मानुषीताईंनी लिहिलाय तसा करते.
हा चटका काल केला होता .. खुपच
हा चटका काल केला होता .. खुपच आवडला .. धन्यवाद
>> चटका म्हणजे भिजवलेली हडाळ
>> चटका म्हणजे भिजवलेली हडाळ वाटून मुळ्याच्या किसात मिस्क करायची. >> हे आधी मी हडळ वाचल.. हडाळच्या ऐवजी. म्हटल ही फारच शूर आहेत मंडळी
लिहिण्याच्या नादात नेहमी
लिहिण्याच्या नादात नेहमी 'हडाळ' लिहिलं जातं आणि ते चुकून 'हडळ' वाचणारी एक तरी व्यक्ती असतेच
करुन बघण्यात येईल.. मूळा खुप
करुन बघण्यात येईल.. मूळा खुप आवडीचा नै पण नावडता पण नै. हाकानाका असा प्रकार
Pages