हिंदू समाजातील उपवर मुलांसाठी पोषाखाची कमतरता आणी त्यावर उपाय.

Submitted by बाळू पॅराजंपे on 25 March, 2015 - 14:03

गेल्या काही वर्षात शीर्षकात लिहिलेली समस्या प्रकर्षा ने जाणवू लागलेली आहे. विशेषतः पुण्या मुंबईबाहेर आणी आय टी व्यतिरिक्त इतर क्षेत्रात नोकरी करणार्‍या मुलांच्याबाबतीत तर जास्तच. शेती किंवा भिक्षुकी करणार्‍या मुलांच्या बाबतीत तर अजूनच जास्त. नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात सत्तर मुले आणी तीन मुली आल्या होत्या. तीनही मुलींनी मुलांचे पोषाख परिधान केले होते. मुलींनी परिधान केलेले पोषाख नको असं म्हटल्याने पोषाखाचे पर्याय कमी होत चाललेले आहेत. आधीच मुलांसाठी पर्याय अल्प असतात.

या समस्येची कारणे शोधणे फारसे अवघड नाही पण काही ठोस उपाय समाजिक पातळीवर होणे गरजेचे आहे.

१ . हिंदू मुलांनी पुरूषीच पोषाख हवा हा आग्रह सुरुवातीलाच सोडून देणे. मुलींनी पुरूषी पोषाखावर कब्जा केला असल्यास मुलींच्या पोषाखात बदल करून ते मुलांसाठी वापरण्यास हरकत नसावी. काही वर्षे पोषाख शोधण्यात गेल्यावर धोबी का कुत्ता अशी गत झालेली अनेक मुले पहाण्यात आहेत.

२ मुस्लिम समाजाप्रमाणे मुलांसाठी शेरवानी आणि मुलींसाठी बुरख्या ची प्रथा सुरु करणे.

इतर दूरगामी उपायांचे व सूचनांचे स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूकवाचक अफवा कशी पसरवेल?
काहितरी लिहेल तेव्हाच अफवा पसरेल ना?

हो पण धाग्याचे आणि ऋच्या ग'फ्रे चे काय कनेक्शन? जर तुम्हाला ऋ च्या ग्'फ्रे मध्ये रस असेल तर त्याला विपू करा, उगीच आमच्यावर आत्याचार का? Angry

उगीच आमच्यावर आत्याचार का>>>> तुम्हाला त्या असावा सुन्दर स्वप्नान्चा बन्गला मधल्या आत्तु उर्फ ताईसाहेबबद्दल बोलायचे आहे का?:अओ:

मूकवाचक अफवा कशी पसरवेल?
काहितरी लिहेल तेव्हाच अफवा पसरेल ना?
<<<<<ती वाचक म्हणून मूक आहे, मुळात मूक नाही

उफ्फ्फ्फ ऋ, रश्मी, साती प्लीज तुम्ही विपू-विपू खेळाल का?
>>>
तिघांमध्ये विपु विपु खेळणे जिकरीचे असते. कॉन्फरन्स विपुची सोय नाही मायबोलीवर Sad

मूकवाचक अफवा कशी पसरवेल?
काहितरी लिहेल तेव्हाच अफवा पसरेल ना?
>>>
हो ना, ड्यूआयडी वापरत असावी Wink

हो पण धाग्याचे आणि ऋच्या ग'फ्रे चे काय कनेक्शन?
>>>>
तिच्या लग्नाला मी एक हिंदु समाजातील उपवर मुलगा शेरवानी घालणार आहे हे कनेक्शन.

हो अ‍ॅक्चुअली,
जोक्स अपार्ट माझे प्रेमप्रकरण एका कॉन्फरन्स विपुचीच देण आहे.

मी माझी ग'फ्रेंड आणि आमची एक कॉमन फ्रेंन्ड एकत्र कॉन्फरन्स चॅट करायचो, त्यात त्या कॉमन फ्रेन्डने चिडवाचिडवी सुरू केली आणि आमचे जमले, अन्यथा आम्ही कोणी पुढाकार घ्यायचा यातच गंडलो असतो.

Pages