शतपुष्प / बडिशोपेच्या कांद्याचे (Fennel Bulb) सूप

Submitted by आरती on 23 February, 2015 - 17:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बडिशोपेचा कांदा - १
छोटा कांदा - १
बटर - २ चमचे
मिरे - २
लिंबु - १/२
मीठ, साखर - चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती: 

बडिशोपेचा कांदा थोडी पानं आणि देठासहीत मिळतो (बरेचदा).
ती पानं काढुन बाजुला ठेउन द्यावी. देठं वेगळी काढुन त्याचे बारिक तुकडे करावे.
बडिशोपेचा कांदा आणि साधा कांदा चिरुन घ्यावा. भांड्यात बटर घेउन साधा कांदा आणि देठाचे तुकडे थोडे परतुन घ्यावे
हे तुकडे नीट निथळुन मिक्सरच्या भांड्यात काढुन घ्यावे, थोडे गार होउ द्यावे. मग त्यात २ मीरे, साखर, मीठ घालुन वाटुन घ्यावे. गरज वाटल्यास पाणी घालावे.
आता त्याच भांड्यात, शिल्लक असलेल्या बटर मधे, बडिशोपेच्या कांद्याचे तुकडे अगदी मंद आचेवर खरपुस होईपर्यंत परतावे.
वाटलेले मिश्रण परतलेल्या बडीशोपेच्या कांद्यात एकत्र करुन आवडीप्रमाणे पाणी घालावे, लिंबु पिळुन एक उकळी आणावी.
बाजुला काढुन ठेवलेली पाने बारीक चिरुन वरुन घालावी.

Fennel Soup to post.jpg

वाढणी/प्रमाण: 
एका कांदयाचे २ जणांना पुरते.
अधिक टिपा: 

१. हे सुप खुप पात्तळ करु नये.
२. देठा बरोबरच कांदा पण वाटुन वरुन त्यात गाजर / चिकन / मशरुमचे तुकडे घालुन पण चांगले लागते.
३. मिरे वाटणात न घालता वरुन मिरेपुड घातलेली पण चालु शकते.
४. मुळ पा.कृ. मधे मिळुन येण्यासाठी चमचाभर मक्याचे पिठ वापरले आहे. लिंबु आणि साखर वापरलेले नाही.
४. बडिशोपेच्या कांद्याला एक खास असा वास असतो तशी चव सुप तयार झाल्यावर येत नाही. पण मस्त लागते हे सुप. शिवाय उच्च पोषणमुल्ययुक्त आहार घेतल्याचे समाधान मिळते ते वेगळेच. Happy

[ One raw fennel bulb contains only 73 calories, 0.5 grams of fat, 0 milligrams of cholesterol, 2.9 grams of protein, 17 grams of carbohydrate, and 7 grams of dietary fiber (28% of daily requirements).

That same serving provides 27% of daily potassium needs, 5% of sodium, 6% vitamin A, 11% calcium, 46% vitamin C, 9% iron, 5% vitamin B-6 and 10% of daily magnesium needs. ]

माहितीचा स्रोत: 
ईंटरनेट आणि किरकोळ बदल.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटतोय हा प्रकार.
बडीशोपेच्या कांद्याला इंग्रजीत काय म्हणतात?

बहुतेक फेनल म्हणतात .. ह्या फॅमिलीतल्या लीकचं सूप इकडे अमेरिकेत बघितलं आहे ..

रेसिपी छान आहे .. सूप मिळून येण्याकरता काही करायचं नाही का?

fennel सगळीकडे ग्रोसरी स्टोअर मध्ये मिळेल. माझी बर्याच दिवसांपासून हे करायची इच्छा आहे.

धन्यु!

सशल,
देठ + कांद्याचे मिश्रण पुरेसे आहे मिळुन यायला. मुळ पा.कृ मधे मकापिठ वापरले आहे.

आणि छोट्या कांद्याचा फोटो खास तुझ्यासाठी आहे Wink

ह्म्म्म.. मस्त वास आला इथपर्यन्त.. थिन , क्लिअर कंसिस्टंसी वाले सूप्स आर माय वीकनेस.. आणी शोपेसारखा वास येत नाही म्हणालीस , तर हे सूप करून पाहीनच.. थिकनिंग एजंट नकोच वाटतात मला सूप्स मधे..

सशल .. झाला का मॅच तुझा कांदा Lol

छान आहे सुप. आमच्याकडे असलीच सुपे लागतात, पातळ Happy

फक्त बडिशोपेचा कांदा मिळवण्यासाठी कुंडीत लावावी लागेल बडिशोप. पेरुन बघते थोडीशी Happy

साधना,
मी एकदा पेरली होती, पुण्याला असताना. पेरली म्हणाजे जाळी लागली म्हणुन कुंडीत टाकली होती. मस्त वाढली, पिवळा फुलोरा आणि मग कोवळी बडीशोप पण आली होती.
नंतर मी ८-१० दिवस घरी नसल्याने जळाली, त्यामुळे कांद्यापर्यंत काही मी पोहोचले नव्हते. तु तो ही प्रयोग करुन बघ. Happy

सायो,
लाल कांद्याची का ? नाही येत. कारण बटरवर परतलेला आहे. आणि अगदी छोटा / थोडा घालायचा आहे.

बडिशोपेच्या कांद्याचा तर जो पानांना वास येतो तो अजिबातच रहात नाही नंतर. मला खरतर ती पण चव आवडली असती. Happy

आरती, सगळ्यात आधी सॉरी, निगेटीव्ह रिप्लाय लिहीणारे म्हणून.

आज करून बघितलं हे सूप. चोथा पाणी व काहीच चव नाही आली. तो कांदा तसाच न परतता सगळंच मिक्सरमधून काढायला हवं होतं असं वाटलं नंतर. मिक्सरला फिरवताना एखादी मिरचीही घातली असती तर चाललं असतं कारण ४ मिर्या घातल्या होत्या पण त्या मिक्सरमध्ये वाटल्या गेल्याच नव्हत्या.

सॉरी परत एकदा.

ओह, अरेरे ...

सॉरी कशाला ... तुझाच हिरमोड झाला असेल खरंतर. Sad

चु़कुन पुन्हा करावेसे वाटलेच तर मक्याचे पिठ लाउन बघ थोडे Happy

अरे वा! मस्त.. धन्यवाद. हा कांदा अनेकदा पाहिला. ह्याचं काय करत असतील- असा विचार पण केला.. Happy पण त्यानंतर काही विशेष शोध घेतला नाही. आता हे सूप करून बघेन.