मालवणी-कोकणी शब्दार्थ

Submitted by नीलू on 14 January, 2009 - 12:40

'मालवणी शिकायचय?' या बाफला मिळालेला प्रतिसाद बघून कोकणी/मालवणी शब्द आणि त्यांचे अर्थ यांचे संकलन ईथे नवीन हितगुजच्या विभागात करावे असे वाटले. काही सोप्या मालवणी शब्दांपासून मी सुरुवात करतेय पण मालवणी/कोकणी जाणकारांनी कृपया त्यात भर टाकावी. जेणेकरून नवीन-जुन्या सर्वच गजालीकरांना ईथे पाहिजे त्या शब्दांचे दुवे मिळणे सोपे जाईल. बाकी शब्दरचना वगैरे तिथे 'मालवणी शिकायचय?' या बाफवर कळेलच. पण शक्यतो ईथे गप्पा न मारता फक्त माहितीच पोस्ट करण्यात यावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकेकाळी अनुनासिके स्पष्ट होती. आता का नाहीत? >>> हा प्रश्न कश्यामुळे पडला...
पण एकंदरीत मराठी लिहीताना अनुनासिके गायब होत चालली आहेत.. तेच कशाला व्याकरण गायब होत आहे.

निंबार - कडक ऊन (सूर्याची किरणे).
कुणगो - जमिनीचा (शक्यतो आयताकृती ) तुकडा, ज्याला मेर असते.
मेर - मातीचा बंधारा..
वय - कुंपण

म्हामना - गणपती विसर्जनादिवशीचे नैवेद्याचे जेवण,
म्हाळ - पितृपक्षात पितरांसाठी केलेला विधी व जेवण
धोयामेळा- लग्नानंतर नातेवाईक शेजारी यांना दिलेली मांसाहारी मेजवानी ( वराच्या घरी)
पाचपरतावन- मांडवपरतणी

लग्नानंतर मुलीच्या माहेरच्या देवांना नमस्कार करण्यासाठी नवरा नवरीला माहेरी नेतात, त्यावेळी वरपक्षाकडून सोबत आलेले नातेवाईक, माहेरचे नातेवाईक, शेजारी यांना मांसाहारी, शाकाहारी मेजवानी. (मुख्यतः मांसाहारी )

फकी - (चायची फकी दी रे पावकिलो)... पावडर ... (उगाच गैरसमज नको म्हणुन शब्द टाकला)....

पानन/ पाणन - वास्तविक हा शब्द ' पाणंद' ( विहीरीकडे वगैरे जाणारी वाट ) यावरून आला असला तरीही 'दोन्ही बाजुला कुंपण असलेली अरूंद वाट' यासाठी सर्रास वापरला जातो.

'किरडू' ऐवजीं ' पायाबुडचां ' म्हणतत कांहीं जण. उदा. -
' तीनसांज झालीहा. जातांना पायाबुडच्यांक सांभाळून जा रे बाबा ! '

नाव घेतल्यास साप येतो या (गैर) समजुतीने पायाबुडचां म्हणण्याची पध्दत पडली असावी... बाकी कोकणात मण्यार, घोणस, दिवड इत्यादी पायाखाली येण्याची शक्यता असतेच...

*नाव घेतल्यास साप येतो या (गैर) समजुतीने पायाबुडचां म्हणण्याची पध्दत पडली असावी* - +1.
( पतिचां नांव न घेण्यामागेय अशीच कांय (गैर) समजूत तर नाय ना ! Wink )

*तो चपलाबुडीचो* - हयां नवीनच ! 'बायलेच्या आंगठयाखालचो', ' मुठीतलो', ' धाकातलो', ' बाईलखुळो', ' ताटाखालचां मांजर', .. इ.इ. ऐकलेलंय !!! Wink

धमाल. बरंच काही माहिती नाही.

एकतर कोकणात कमी जाणे होतं आणि घरात प्रमाण मराठी भाषेचा वापर होतो, कुठेही सासरी माहेरी त्यामुळे घरातली लोकं बाहेरच्यांशी बोलताना शब्द कानावर पडतात किंवा ते माझ्याशी तिथल्या भाषेत बोलतात, मी उत्तर प्रमाण मराठीत देते.

माझ्याशी तिथल्या भाषेत>>>>>आम्ही लहान असताना आजोळच्या एका कुळवाड्याने(सॉरी,पण याला दुसरा शब्द माहीत नाही.कदाचित कुणबी असावा) एकदा आपल्यामधे मराठीत म्हटले की दोंपारचा निबार कसां कमकमतां ना.मला काहीच कळले नाही.आम्हांला कोकणी बोलायला नीट यायचे नाही.घरी सुरुवात केली की आजी खेकसायची'असां चिडय्ल्यावारी कोकणी बोलू नकां"

शब्द काही वेगळे वाटले तर विचारते घरातल्या लोकाना, पण बहुतेकदा समजतं.

लग्नाआधी मला संगमेश्वरी भाषा, माहेरच्या कोकणात बोलतात ती आणि कारवारी कोंकणी ऐकायची जास्त सवय होती, सख्खे शेजारी कारवारी होते ना. उलट कोकणातल्या भाषेऐवजी मला ती जास्त समजते आणि जवळची वाटते, ती जास्त ऐकल्याने.

बाकी आम्ही आणि आजूबाजूला रत्नागिरी, मालवण, राजापूरचे सर्वच प्रमाण मराठी भाषेत बोलणारे, घरातही. त्यामुळे फक्त कोकणात आणि मच्छिंद्र कांबळी यांच्या नाटकात छान भाषा ऐकायला मिळायची.

मीं जन्मतः मुंबैकर . मूळचे मालवणी असलो तरी घरात मराठीच. पण शाळा- काॅलेजात असताना सुट्टीत मात्र गांवींच. मुंबैत सुट्टीची वाट बघितच दिवस काढायचे. तिथेच कोकणाच्या आणि मालवणीच्या प्रेमात पडलंय आंणि तां दिवसेंदिवस वाढतच गेलां. अजूनय थांबण्याचां नांव नाय घेणां ! जाईन थंय मालवणी माणूस शोधून मालवणी गजाली करतंयच, घासून पुसून माझां मालवणी चकाचक ठेवणयाचो जिवापाड प्रयत्न करतंय.

जाईन थंय मालवणी माणूस शोधून मालवणी गजाली करतंयच, घासून पुसून माझां मालवणी चकाचक ठेवणयाचो जिवापाड प्रयत्न करतंय.>> भाऊकाकानू आमच्यागेर येवा मग, माजो घोव तर रिक्षावालो भैय्या आसलो तरी तेच्या वांगडा मालवणी बोलता.

*माजो घोव तर रिक्षावालो भैय्या आसलो तरी तेच्या वांगडा मालवणी बोलता.* त्येंका ( घोवाक, भैयाक नाय ! Wink ) माझो दंडवत !!!

Pages