मालवणी-कोकणी शब्दार्थ

Submitted by नीलू on 14 January, 2009 - 12:40

'मालवणी शिकायचय?' या बाफला मिळालेला प्रतिसाद बघून कोकणी/मालवणी शब्द आणि त्यांचे अर्थ यांचे संकलन ईथे नवीन हितगुजच्या विभागात करावे असे वाटले. काही सोप्या मालवणी शब्दांपासून मी सुरुवात करतेय पण मालवणी/कोकणी जाणकारांनी कृपया त्यात भर टाकावी. जेणेकरून नवीन-जुन्या सर्वच गजालीकरांना ईथे पाहिजे त्या शब्दांचे दुवे मिळणे सोपे जाईल. बाकी शब्दरचना वगैरे तिथे 'मालवणी शिकायचय?' या बाफवर कळेलच. पण शक्यतो ईथे गप्पा न मारता फक्त माहितीच पोस्ट करण्यात यावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खेतुर - कित्यात आसो जाता गोयचे भाशेत. तेच्या वांगडा मगेन कित्यामदे (कशामध्ये), कित्यावर्(कशावर) ई....

एका मराठी गाण्याचे कोंकणित स्वैर भाषान्तर

अन्त्याच्या हातान
कमळ्याच्या घोवान
दिल्यार घेतलय कितले
तुज्या दोन हातान

ओळखा पाहू ?

विजय

घराच्या संदर्भातून काही शब्द: -
१. पावळी ... पागोळी
२. पावंडि ... पायरी
३. लोटो ... सगळ्यात बाहेरची खोली - थोड्क्यात 'दिवाणखाना'
४. वाणशी ... मधली खोली
५. हवरो ... स्वयंपाक घर
६. न्हाणी ... आंघोळीची जागा - बाथरूम
७. भितड ... भिंताड - भिंतीची बाहेरची बाजु
८. बाळंदो ... बाकडा
९. माच ... मंचक किंवा मचाण
१०. रवळी ... बांबुच्या पातळ पट्ट्यांनि विणुन बनविलेली 'डबा' सद्रुष्य कलाक्रुती
११. डाळी ... बांबुच्या पातळ पट्ट्यांनि विणुन बनविलेली 'चटई'
१२. फांटी/ फांटा ... मोठ्या आकाराची 'टोपली'

माण- दुकान
ताती- अन्डी
जुता- चप्पल
जोर येता- ताप येतो

टकली फोड्ता- डोके दुखते
केन्ना येता- केव्हा येशील
शिवराक- शाकाहरी
निस्त्याक - आमटी
तोर- कैरी
आमाडी- पिकलेली कैरी

रविवार - आयतार
गुरुवार - बिरेस्तार

>>
यातील मूळ शब्द आहे आईतवार . त्याचा मूळ शब्द आहे ' आदित्यवार' म्हनजेच पुन्हा रविवार नाही का?:)

तसेच गुरुवारबाबत . बेस्तरवार. त्यात मूळ शब्द 'बृहस्पतीवार' . बृहस्पती हादेवांचा 'गुरु' अस्ल्याने गुरुवार Proud

नदी व खाडीच्या संदर्भातले कांही मालवणी शब्द -
भाट - नदीच्या मधेच असलेला वाळूचा उथळ पट्टा;
कोंड - मधेच असलेला खूप खोल पाण्याचा भाग;
सुकती - ओहोटी;
पगार - रुंद पाठ असलेली होडी;
सौदा - लांबलचक मोठी होडी;
होडक्यां - जहाजाची लहान प्रतिकृति;
डुबक्यां - जेमतेम एक-दोन माणसं जातील अशी छोटी होडी;
नाळ - होडीचं पुढचं टोक;
उलांडी - होडी कलंडू नये म्हणून बांधलेली लांकडी जोड;
साण - होड्या लावण्यासाठी केलेली/झालेली जागा;

.

भाऊ, मी मालवणला किनारा या अर्थी "वेळ" असा शब्द लहानपणी ऐकलाय. आता तो वापरत नाही का ? इथे कुणी वापरताना दिसत नाही.

मी आधी लिहिले होते इथे, परत लिहितो. माझे वडील मालवणचे आणि आई कोल्हापूरची. दोन्ही घरात प्रमाण मराठीच बोलत असत. पण बाकिचे कुणी गावाहून आले, कि आईची फजिती होत असे.

काकांचा एक मित्र आला होता, त्याने आईला विचारले, "गे वैनी, कासो असा ?"
आई म्हणाली, "छे, आमच्याकडे कुठले (कासव)."
तेवढ्यात काका बाहेर आला. तर तो मित्र म्हणाला, "गे वैनी, ह्या काय ?"

काकाचे नाव, काशिनाथ. अजून आई हा किस्सा सांगते.

>>आमच्याकडे कुठले (कासव)>>>:खोखो:
होय दिनेशदा किनार्‍याक वेळच म्हणतत.. येळेर गेलो हा वगैरे. Happy

माझी आजी (वडीलांची आई) राजापुरची. दुसरी आजी (आईची आई) साखरप्याची. चार माम्या कोकणातल्या चार गावच्या (हर्चिरी, तेरं, ताम्हाणे आणि मालगुंड ) काक्याही वेगवेगळ्या गावच्या आणि पोटजातीच्या पण. त्यामूळे आमच्या घरात, अनेक हेल आणि बोलीभाषा असतात. आणि प्रत्येक स्त्री हि आपापलीच भाषा बोलते. हे सगळे सूक्ष्म बदल लिहिण्याईतक्या बारकाईने मी त्यांचे बोलणे ऐकले नाही.

गोव्यातही उत्तर आणि दक्षिण भागात, वेगवेगळ्या तर्‍हेने कोकणी बोलतात. (असे ऐकले आहे.)
हे सगळे इथे कुणी लिहील का ?

<<गोव्यातही उत्तर आणि दक्षिण भागात, वेगवेगळ्या तर्‍हेने कोकणी बोलतात. (असे ऐकले आहे.)
हे सगळे इथे कुणी लिहील का ?>> दिनेशदा, अशक्य नाही पण कठीण आहे; मालवणीतलंच साधं "इथून ये " हे वाक्यच किती तर्‍हेने बोललं जातं पहा - "इकडसून ये", "इकडच्यान ये", "इकडशान ये","हडेसून ये", "हडेच्यान ये" "ह्येना ये" व "हंयसून ये" इ.इ. शिवाय, हे बोलण्याचे हेलही अनेक. "माय फेअर लेडी"तल्या प्रोफेसर हिगीन्सनाच ही "फोनेटीक्स"ची स्पेशल अझाइनमेंट द्यावी लागेल ! Wink
"वेळे"वर बहुधा "वाळू"वरून प्रचलित झाला असावा.

नाही हो भाउ. मायबोलीकर कदंब यांच्या एका लेखात लिहिल्याप्रमाणे तो शब्द "सागरवेला" वरुन आलाय. आता सागरवेला जर वाळूवरुन आला असेल तर माहित नाय. Wink

असुदेजी,
मी नुसताच अंदाज मांडला होता; कुणी अभ्यासपूर्वक व्युत्पत्ति शोधली असेल तर त्यांच अर्थातच खरं असणार.

मालवणी शब्द सांगताना एक महत्वाचं मांडायचं राहिलं. मालवणी व मराठी यांची एकत्र मोट बाधणं कटाक्षानं टाळायला हवं. आतां या "वेळे"चंच उदाहरण घ्या -
walking.JPG नोकरीवर असताना कधीही वेळेवर ऑफिसला नाही गेलात. आता रिटायर झाल्यार सकाळच्याक, सांजच्याक वेळेर जाऊन त्येचां उट्टां काढताहास कीं काय !

या वेळे वरुनच आठवलं. सिंधुदूर्ग किल्ल्यात जो आडोसा आहे त्याला राणीची वेळ म्हणायचं कि वेळा ? मी लहानपणापासून कधी या शब्दाचे अनेकवचन नाही ऐकले.

भाऊ, माझे काका कै. शंकर शिंदे यांनी, हयंसरच पिकवूया सोना, असे नाटक लिहिले होते. त्याचे प्रयोग मुंबईत झाले होते व आकाशवाणीवरही ते सादर झाले होते.

दिनेश थयसर राणीची वेळच म्हणताना मिव ऐकलय. अनेकवचन कसा येयत.. वेळा म्हणजे अनेक किनारे ते कसे आसतीत?
भाउ विनोद नि चित्र मस्त Happy

<<पण शक्यतो ईथे गप्पा न मारता फक्त माहितीच पोस्ट करण्यात यावी ही विनंती.>> सुरवातीची ही दटावणी काय फक्त आमच्यासारख्या गरीब बापड्यांकच कीं काय ? Wink

>>पण शक्यतो ईथे गप्पा न मारता फक्त माहितीच पोस्ट करण्यात यावी ही विनंती.>>अख्ख्या पानभर शोधलय ह्या वाक्य तर ता हेडरात सापडला.. कर्माची कथा.. Proud आसो. तसा गप्पा मारण्यात मी आसयच तेव्हा मी पण बापडाच झालय. Proud
भाऊनू अजून काय वेगळे शब्दार्थ आसतीत तर टाका. ता चित्र एकदम मस्त. Happy

गोव्यातील (मुख्यता दक्षिणेकडील) कोकणीवर पोर्तुगीज भाषेचा बराच प्रभाव झालेला आढ्ळतो.
उदा:,
बलकान्व -- ओसरी
पदेर -- पाव विकणारा
इरमाव -- मोठा भाऊ
लिसाव -- अभ्यास
कादेन -- वही
प्राय -- समुद्र किनारा
कोदेल -- खुर्ची
ओब्रिगाद -- धन्यवाद
जोनेल -- खिडकी
कुल्यार -- चमचा
कोफ़ुसाव -- भान्ड्ण
पात्राव -- साहेब
पिक्यान -- लहान मुलगा
कामरान -- नगरपालीका

बागयतीच्या संदर्भातले कांही मालवणी शब्द -
आगर - घराच्या आसपासची नारळी-पोफळीची [सुपारी] बाग;
माड - नारळाचं झाड;
अळं - माडाच्या मुळाशीं पाणी रहावं म्हणून घातलेला वर्तुळाकार बांध;
खाडू - माडावर व पोफळीवर चढताना पायाना पकड मिळण्यासाठी वापरायची दोरीची गुंडाळी;
आकडी - माडावर चढताना [व इतर वेळीही] कमरेच्या मागे कोयता अडकवायला बांधलेला पट्टा;
चुडात/झांप - माडाचं तुर्रेबाज पान;
झांप - आडोशासाठी या माडाच्या पानाच्या वळून/विणून केलेल्या सुबक चटया;
चुडा - झांपाचा झाडाला चिकटलेला सुरवातीचा भाग;
पोय - पोफळीच्या पानाचा चुडा;
विरी - लवचिक पोय दुडून केलेला मोठा द्रोण;
बेडा - वेष्ठनासहीत सुपारी;
सोडण - नारळाचं तंतुमय वेष्ठन; [हेंच कुजवून त्याचा काथ्या करतात व मग दोर्‍या वळतात];
पत्यारा - सुकून पडलेल्या पानांचा कचरा;
बेणणे - बागाईतीत वाढलेली निरुपयोगी झुडपं काढून टाकणे;
उतारा - माडावरचे नारळ काढणे.

Pages