मालवणी-कोकणी शब्दार्थ

Submitted by नीलू on 14 January, 2009 - 12:40

'मालवणी शिकायचय?' या बाफला मिळालेला प्रतिसाद बघून कोकणी/मालवणी शब्द आणि त्यांचे अर्थ यांचे संकलन ईथे नवीन हितगुजच्या विभागात करावे असे वाटले. काही सोप्या मालवणी शब्दांपासून मी सुरुवात करतेय पण मालवणी/कोकणी जाणकारांनी कृपया त्यात भर टाकावी. जेणेकरून नवीन-जुन्या सर्वच गजालीकरांना ईथे पाहिजे त्या शब्दांचे दुवे मिळणे सोपे जाईल. बाकी शब्दरचना वगैरे तिथे 'मालवणी शिकायचय?' या बाफवर कळेलच. पण शक्यतो ईथे गप्पा न मारता फक्त माहितीच पोस्ट करण्यात यावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा भाऊनू खरच मस्त!! बरेच शब्द बर्याच दिवसात ऐकूक गावले नव्हते. जसो की चुडात.
आजीकडसून नेहमी ऐकी आमी चुडता वळून पैसे जमव ईं ई :).
पतारो गोळा करुचो रवलो हा.
माड पण शिपूचे आसत. नंतर बाकीच्या झाडांका अळा करुचा पण आसा. वाक्यात उपयोग करा असा काय तरी करुक होया Happy
ग्रेस तुमी सांगलेले शब्द मी अगदीच ऐकलय नाय. फक्त एक पात्राव सोडून. हे पूर्ण गोवन शब्द दिसतत. बरी माहिती गावली. Happy

<<आमी "आगर" न म्हणता "जोळंक" म्हणतो>>भ्रमर, बर्‍याच गावात त्या गावापुरते किंवा परिसरापुरते असे विशिष्ठ शब्द रुळलेले असतात; आमच्या गावच्या एका भागाला "बानाची आळी"म्हणतात. नदीच्या बांधावर लावलेल्या माडांसाठी केलेल्या अळ्यांवरून [ बांधावरचीं अळीं] हा शब्द रुळला असावा हा आपला माझा तर्क !

mbs_nibandh.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.

स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम

तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.

धन्यवाद
संयोजक_संयुक्ता

मालवणी शब्दांची व्युत्पति शोधणंही इंटरेस्टींग असतं. "शिरां रे पडो त्येच्यावर !", हा मालवणीतला सर्वश्रुत शाप. माझ्या एका भाषातज्ञ मित्रानं याच्या अर्थाविषयीचं माझं कुतूहल कांहीसं शमवलं; सुकलेल्या काड्या-काटक्याना मालवणीत "शिरडं" किंवा ""शिरां" म्हणतात. हीं जर घरावर पडलेली असलीं तर उन्हाळ्यात घरालाच आग लागण्याची शक्यता असते. म्हणून, कुणाची तरी राखरांगोळी व्हावी या अर्थाचा हा शाप ! [अर्थात, आता मित्रा-मित्रांत सुद्धा सहजगत्या तशा अर्थाशिवाय याचा वापर होतो ].
असलां कायतरी कोणाच्या लक्षांत इलांच तर हंयसर टांकूक हरकत असण्याचां कारण नाय. Wink

'आवशीचो घो' आपल्याकडेच म्हणतत. हि काय शिवी नाय. पण आपला कसा आसता आपणाक आपल्या आई-वडलांचा नाव उगाच कोणी चिडवण्याच्या उद्देशान घेतला तर राग येता म्हणान ती लोकांका शिवी वाटत आसात.

त्याहीपेक्षा भावना, कोणी खयच्या उद्देशानं आणि कशा पद्धतीनं म्हटला त्यावरुन ठरता गो ह्या, असा आपला माका वाटता. आता कोकणी, मालवणी गाळींचो बाफ होतलो की काय हो? Light 1

गोव्याच्या कोकणीत समुद्रकिनार्‍याला दर्यावेळ असे म्हणतात

कोकणातले दोन "मारूचे "(मारण्याचे) प्रकार.
१) वाडवणीनं / मुगड्यानं मारीन.(झाडुने मारणे)
२) व्हाणेन मारीन.(चपलेने मारणे)

मालवणी म्हणी.
हळकूंडाच्या पदरात शेळकूंड.
पोरांच्या मळणेत बी नाय नी भात नाय.
तळा राखीत ता पाणी चाखीत.
पायलेभर वरये घेवा पण माका गावकारीन म्हणा.

गुरूकाका, विवेक, शैलजा, भावना, निलू...
हे सगळे म्हणी मी एकत्र करून (हितगूजवर होते ते) एकत्र करून ठेवलय..
डॉक्यूमेंट माझ्याकडे आसा.. पण कोणाक होये झाले तर जपान ठेवा..
भर घालूक हरकत नाय...

गजालीन खाल्लो घो.
आवडत्या म्हशीची बुळक गोड.
घो गे करीनस, तूच गे जायनस
रिकामको सुतार, बायलेचे कु. ताशी
भाविण नाचली म्हणान न्हावीण नाचली
सोमा गेलो आणि पाट परूळां करून इलो.
काखेत कळसो, आणि गावाक वळसो
धोडियाच्या कपाळाक तीन धोंडे
तेलकारय रडता आणि नालकारय रडता.
गाबताक गोरू आणि भटाक तारू
हिरी हिरी फापारी आणि जॉत धरीत तो भिकारी
जिकडे फुडो, तिकडे मुलूख थोडो
चुकला गोरू, धामपूरच्या तळ्यार
बाव बांबुळी, वशाड पिंगूळी
वशाड गावात येरंड बळी
हाडाची काडा, आणि ...चां तुनतुना
अहिल्या, मंदोदरी, सीता, तारा, भुतूर आमचां गोदलां सारा
आळश्याक दुप्पट, कॄपणाक तिप्पट
सबंध दिवस रेटारेटी, चांदन्यात वाती कापूस काती
बाबा माजो खेळो, घरदार जळो
जवळची व्हकाल कुरडी
बाबाय गेलो, पुडक्यांय गेलां
लाजेची व्हकाल, तिनशे गरे खाता.
वाघ पडलो घाळी, केडलां दाखयता नळी
दियात वात, तोंडात हात
शिमगो सरलो, कविट रवलां
पडलो तर वसा, नाय पडलो तरी वसा, कित्याक रे जांव पापियांच्या देसा
भरल्या बामणाक धय करकरीत
बारा हात तवसां तेरा हात बी
कोणाची जळता दाडी, तर कोण पेटवता विडी
तेंडल्याक मांडव, वासराक खांडव
बेबलां बावीत पडलां, आणि कातडा स्वच्छ झालां.
येवाजलेला साधात, तर दळीद्र कित्याक बाधात?
नागड्याच्या घराक उघडां गेला, आणि कुडकुडान मेलां
पायात काटो, आणि माथ्यार कांदो
केला तुका जाला माका
नको थंय बोल्लस आणि माती खाल्लस
आडघाड्याक पडघाडी
घो नाय घरा, व्हयां ता करा
आयजीच्या जीवार बायजी उदार, आणि सासवेच्या जीवार जावंय सुभेदार
नको नको जावया, व्हायन चाटून खावया
नगार्‍याची घाय, थंय तुनतुन्याचा काय?
इलय तरी वडे, नाय इलय तरी वडे
अमवासेचो जल्म, आणि तसलाच कर्म
शेरभर वरयो घ्या, आणि गावकारीन म्हणान घ्या.
डाक्टरांची पोरां, गांडूळानी खाल्ली
रांड म्हणा, पण जेवाक वाढा
मांजराचां खेळणां , उंदराचा मरणां
काट्यांची वय नसाची, माणसांची वय असाची.
येड्यांचो बाजार आणि पिशांचो शेजार
नवटाक मारून शेराचा बोलणां
देणां नाय घेणां आणि कंदील लावन येणा
भवानेक नाय होतो घो, आणि वेताळाक नाय होती बायल.
जो पेजेक देतलो, तो शेजेक घेतलो
भरल्या बामणाक रुंबड कडू
खळ्यात मुतलेलां, आणि जावयाक घातलेलां, सारख्या.
करून गेलो गाव, आणि काणेकराचा नाव
बोच्याखाली आरी, आणि चां..र पोरां मारी
करून करून भागलो, आणि देवपूजेक लागलो
हगतल्याक नाय तर बगतल्याक होई (लाज).
पाण्यात हगलेलां उफेल्याशिवाय रवाचां नाय.
जेच्या हातात आणो, तो म्हणता मीच शाणो.
जेच्या मनात पाप, तेका पोरा होतीत आपोआप
नशीब माजां गांडू, तर कोनावांगडा भांडू
चोराची पावलां चोरच जाणा
आये सोसता, बापूस पोसता
पोरांच्या मळणेक बी नाय भात, पोरां गेली श्याण खात
घरात नाय कवडी, आणि घेवाक बगता शालजोडी
घरासारखो गूण, सासू तशी सून
चार आण्याची कोंबडी बारा आण्याचो मसालो
चोराक चावलो विंचू, तो करीना हूं की चूं.
पाडवो आणि सणावर आडवो
जेच्या मनात कपट, तेचां होतलां तळपट
जेका नाय स्वताची अक्कल, तेची होता चवाट्यार नक्कल
म्हशीन रांदला, बैलान खाल्लां
मीट लाया, माका खाया
जकडे सू, तकडे दोरो
मोन्याची खूणा, राम जाणां
कोकणी तो भात बोकणी
दौतीत रांदणा, आणि लेखणेन वाढणां.
कोणाचे म्हशी, कोणाक उठाबशी
मरणार्‍या बैलाक, चरण्याचे वडी
पयल्या दिवशी पावणो, दुसर्‍या दिवशी नय, तिसर्‍या दिवशी अक्कल गय
घटका इली भराक, आणि न्हवर्‍याक जाला हगाक..
देव गेल्लो हगाक आणि .. गेल्लो अक्कल मागाक
जेचे मोठे कुले, तेका जग भुले
होळयेक पोळी, आणि शिमग्याक गाळी
एकादशीकडे, शिवरात्र खाय वडे
पाट्यार वाटता, आणि जमनीवयलां चाटता.
बायल मरो, मेवणी उरो
वाढतां पोर, जीवाक घोर
जावचां थंय खावचां, थाळी घेवान सटकाचां
कावळो येता पिंड घेवान जाता
गायच्या शापान बाय मरना नाय
गवळ्याची करणी, दुधातल्यान पाणी
भुकेक भाकरीचो तुकडो, आणि निजाक मोडको बाकडो
रगताचा नाता, रगातच खाता
येक चुकली येष्टी गाडी, वसाड पडना नाय सावंतवाडी
नाकापेक्षा मोती असा नये जड, आणि घोवापेक्षा बायल असा नये वरचड
पयल्यान पडता टक्कल, मागल्यान येता अक्कल
येता साडेसाती, सुखात कालवता माती
मयत कालावलीचां, मशाण वालावलीचां
मेल्ल्या म्हशीक पाचशेर दुध
बायल फोडता कपबशी, घोव काडता उठाबशी
माजा माजा यमाचा खाजां
भरतले घडे तेवां मिळतले वडे
जेना नाय देखलो दिवो, तेना देखलो आवो
हांड्येर चडो, आणि सोदता सगळो वाडो
चल चल फुडे, तीन तीन वडे
नको त्या जाग्यार झालां गळू, आणि वैज माजो शेजारचो बाळू
नाव भोजने, आणि धंदो खाल्ल्या घराचे वासे मोजणे
काय दिवस सकल्याचे काय दिवस नकल्याचे
लग्नाआदी झाला तर पाप, लग्नानंतर बनता बाप
लागलो तर मटको, नायतर फटको
तरण्याक दूर राजापूर, थेरड्याक विजापूर
बायल माजी मैना, संसारातल्यान दैना
राशन मुठभर, पिशवी हातभर
जावय कुडाळचो, सासरो सुकळवाडचो
सासू आचर्‍याची, सून कोचर्‍याची
नांव अनपूरना, मीठ नाय वरना
अडाणी बायलेशी पडली गाठ, म्हणता ऊठ मेल्या चटणी वाट
माजलेलो रेडो, धावता सगळो धुरीवाडो
येडां तां येडां, धावता सगळां मेढा
नांव गंगू पण गूण काय सांगू
सासू मेली पिडा गेली, सगळी इष्टक माका मिळाली
घो करी काम , बायल करी आराम
घरात नाय अनपानी, म्हणता मिया राजाची राणी
घोवाचा नाव मुरली, माजी बाय खाज जिरली
बायलेची पावलां, मायारच्या वळणाक वळतली
जितेपणी वाकडां, मेल्यार घालता लाकडां
घोवाचा भांडान, बायलेचां मरान
जित्या जिवाक नाय कांदो, पण मुडद्याक खांदो
देव पावो, आणि माका गावो
सांगल्यापेक्षा केल्लां बरां, आणि कपाळ आपटून मेल्लां बरां
करूक गेलो गणपती, पण झालो मारूती
मराचां पन भूत होवान उठाचां
सासू उदार झाली, आणि सुपारी हातात दिली
पचात तां खावचां, आणि रुचात तां बोलाचां
र्‍हवात तेचां घर, आणि घासात तेची भांडी
आपलां ठेवचां झाकून आणि दुसर्‍याचा बगुचां वाकून
सासरो पारखून पोरगी करूची
सखला सकाराम राजी, तर काय करतलो मेलो दाजी
येडो खाय वडे, शाणो भूकेन रडे
हिजड्यांची शाळा, आणि मंत्र्याचा उद्घाटन
तुका नाय माका, घाल कुत्र्याक
भेरा म्हणता तेरा, माजां तुनतुनाच खरां
देवाच्या जीवार पुजारी तरता, पण देव मात्र उपाशीच मरता
तिरळी ती तिरळी, आणि म्हणता मी खंडोबाची मुरळी
बायल झाली सती, आणि जितो होता पती
येष्टीची गाडी आणि उतारूंका वडी
शुभ बोलात शकू, तर फुसलां जायय कुकू
आदीच आळशी, तशात बसलां ईटाळशी
बायल माजी काळी, डोक्यार त्याल चोळी, आणि खाटल्यार लोळी
येडो मागता वडो, आणी येताळ देता धोंडो
डोक्यार पगडी, आणि घरात बायल नागडी
सटवी लिवता भाळी, चुकना नाय कदीकाळी
दारूड्यासमोर वाचली ज्ञानेश्वरी, तो म्हणता कालची हातभट्टेची होती बरी
भटाक दिली खूर्ची, भटणीक झोंबली मिरची
ढोरां गेली पांदीत, मी बसलंय रांदीत
मशनात गेली लाकडां, आता कित्या वाकडां
जकडे तकडे भांडनाक पेव, आणि देवाक सांगतत सुखी ठेव
घरात नाय घरन, तेचां सगळीकडेच मरन
मानसाक गावलां नि देवाक पावलां
सराय सुदी, उंदराक बायको दोगी तिगी
सोडू नको भाव, इचारूचो नाय गाव
खोटो होता मोठो, तेव्हां खर्‍याक येता काटो
देवापेक्षा देवपनार भरवसो
जितेपनी घान, आणि मेल्यार करता दान
मालकाचा जाता भोसकाट, कोठावळ्याच्या दुखता पोटात
बायल झाली सरपंच, आणि वार्‍यार उडालो परपंच
देणा नाय घेणा आणि लाटन (कंदील) लावन येणा
दिसला कोलीत, पेटव विडी
बापाशीक नाय म्हटलो बाबा, तर चुलत्याक खयलो काका
आगासली ती मागासली, आणि पाटसून इली ती गुरवार रवली
गावात नाय ईडियेची पत, आणि नांव माजां श्रीपत
मुर्खाक देवची पाट, आणि अडाण्याक देवची वाट

नशीबान घो खावचो.
पाणी घाल म्हटल्यार घालूचां , लोम्बता काय तां इचारू नये.
फटकोचो वांको इलो.
शिरां पडो तोंडार.
कुत्र्याच्या भॉंकभर..

आजच आठावलेले दोन म्हणी...

१> वारश्याक वारशी नसाय, आणी बोणगेत बसलो गोसांय
२> तुका सांगा नी गावभर करा, चार पैशे गावतीत ते नाय करा

Wink

परदेसाई...
कुल्यात नाय गू आणि कावळ्याक आमान्त्रण!
बिभतीचा मूळ रेड्याच्या बोच्यात!

हे माका म्हायत असलेले अजून

होपळी... (मांजार होपळेक बसलां).. कोवळे ऊन.
वाडवण (गो जरा वाडवण मार... ) - झाडू...
कांडाप (अगदी कांडाप काडल्यान).. कांडण..
खुटावरो - वापरल्यामुळे हीर मोडुन मोडुन जूनी झालेली वाडवण.

गोव्याच्या कोंकणीत अनुस्वार उच्चारले आणि लिहिलेही जातात. त्यामुळे शब्दांचे लिंग स्पष्ट होते.
मालवणी लोकांनी हे अनुस्वार गाळून का टाकले? मराठीचा प्रभाव म्हणून? भाऊ नमसकरांच्या लिखाणात हे अनुस्वार दिसतात. म्हणजे एकेकाळी अनुनासिके स्पष्ट होती. आता का नाहीत?

*मालवणी लोकांनी हे अनुस्वार गाळून का टाकले?* - शहरी भागांत कांहींसं असेल पण ग्रामीण भागात अनुस्वारांची रेलचेल असतेच.
दुसरी एक खासियत आहे मालवणीची ( व बहुधा गोव्याचीही). मोठया आडनांवातलं शेवटच्या आधीचं अक्षर आकारांतच उच्चारायचं ! 'नमसकरचो भाऊ' कधीच नाहीं, नमसकाराचो भाऊ' . ' आणि, चमचाभर मालवणी इरसालपणाही त्यांत टाकून सांगायचं तर- ' होयरे, खुळ्यासारखां कायय सांगत असता ना, तोच भाऊ नमसकार !' Wink
सुनील गावसकर जगभर 'लिजंड' म्हणून गाजला, तरीही मालवणी माणसाच्या तोंडी हेंच येणार - ' वयल्या घरच्या गावसकाराचो सुनलो तो ! Wink
छोटं आडनाव असेल तर ' परबची जमीन' नाहीं, ' परबाची जमीन', जुवेकरचां चेडू' नाही, ' जुवेकराचां चेडू' !

Pages