आज टी व्ही ९ या चॅनल वर एक सनसनाटी बातमी ऐकायला मिळाली. सोमाटणे फाटा देहुरोड - जुना मुंबई - पुणे रोड या ठिकाणी आकारला जाणारा टोल २००८ सालापासुन जे काम पुर्ण करुन आकारला जाणे आवश्यक होते ते काम पुर्ण न होताच आकारला जातोय.
निगडी चौक ते टोलनाका हा साधारण ६ किमी चा रस्ता चौपदरी होणे आवश्यक होते. हे काम पुर्ण न करताच आधीच्या सरकारने हा टोल आकारायला परवानगी दिली आहे अशी धक्कादायक माहिती याच भागात रहाणारे आर टी आय कार्यकर्ता श्री आगरवाल यांना या कायद्याच्या अंतर्गत मिळाली आहे.
यामागे स्थानिकांचा विरोध किंवा याच भागात असलेली डिफेन्स ऑफिसेस च्या परवानग्या ही कारणे असु शकतील.
ही माहिती मिळवण्यासाठी त्यांना खुप झगडावे लागले व शेवटी ही माहिती मिळाली.
सध्याचे टोल धोरण हे कंत्राटदार धार्जीणे आहे यावर चर्चा करण्यात काही नवे नाही.
जर काम अपुर्ण आहे तर टोल आकारणीचा कालावधी किंवा टोल च्या रकमेत काही सुट नागरिकांना मिळाली आहे का हा प्रश्न निर्माण होतो. यावर जनहितार्थ याचिका दाखल होणे गरजेचे आहे.
महत्वाचे म्हणजे सध्याच्या शासनाने टोल मुक्त महाराष्ट्राचे आश्वासान देऊन निवडणुका जिंकल्या आहेत. सत्तेवर आल्यावर यावर आम्ही धोरण तयार करु असे मा. मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यात चार वर्षे गेल्यास काही उपयोग नाही याची ही आठवण मा. मुख्यमंत्री आणि केंद्रिय मंत्री मा नितीन गडकरी यांना वारंवार देणे गरजेचे आहे.
युप!
युप!
सगळ्यात जास्त टोल मुंबई-पुणे
सगळ्यात जास्त टोल मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर लागतो. ८४ किमी च्या रस्त्याकरता १९५/- सिंगल
एन्ट्री. एक्स्प्रेस वे च्या क्वालिटीबद्दल + डायवर लोकांबद्द्ल तर बोलायलाच नको.
<<
खारघरचे ३० रुपये अॅड करा त्यात.
>>>>
खारघरच्या ३० रु.ची पावती त्यानी जपून ठेवली नसेल ::फिदी:
पुणे नाशिक रस्त्यावर चाकणच्या
पुणे नाशिक रस्त्यावर चाकणच्या आधी मोशी टोलनाका आहे. काही वर्षापुर्वी मला चाकणला दररोज जावे लागत होते, मी टोल भरत नव्हतो विचारले तर लोकल गाडी आहे म्हणून सांगायचो किंवा टोल बूथजवळ लाईट चालू करायचो, पण एकदा भांडण झाले होते, मी दररोज प्रवास करत असून गाडी एम एच १४ ची आहे असे सांगूनही लोकल म्हणजे फक्त मोशी च्या लोकांना टोल नाही , माझ्याकडे मोशीचा पत्ता असलेली कागदपत्रे असली तरच सोडण्यात येईल असे सांगीतले, तशी माझी मोशी चाकण परिसरात चांगल्या ओळखी असल्याने मी पण टोल भरणार नाही असे ठासून सांगितले आणि पुढे जाऊ लागलो ( ते आडव येणारे दांडक बंद पडले होते) , तेवढ्यात एका गूंड माणसाने खिडकीतून हात घालून माझी कॉलर पकडली , इथे माझा पारा भयंकर चढला मी त्याझा हात तसाच पिळला आणि गाडी रेस केली साधारण ८-१० मीटर त्याला त्या हातावर ओढला आणि पुढे जाउन डाव्या हाताने नाकावर पंच दिला, तो पडला ते पाहून बाकीचे काही गूंड गाडीजवळ येऊ लागले , मी ब-यापैकी पुढे गेलो असल्याने तिथून पळ काढला आणि चाकण गाठले. पण मला दररोज प्रवास करायचा असल्याने त्यांना धडा शिकविणे गरजेचे होते, त्यानंतर काही वेळातच मी चाकणचे काही मित्र बरोबर घेवून त्या कॉलर पकणा-या इसमाकडे गेलो त्याला व्यवस्थित सर्वासमोर कानशिलात देवून समजावले , त्यानंतर मात्र गाडीला टोल भरावा लागला नाही.
पण मग यांच्याबरोबर प्रत्येक वेळी भांडणे शक्य नसते त्यात फॅमिली किंवा आणखी मंडळी बरोबर असतील तर आपण मूकाट टोल देतो.
खारघरचे ३० रु.
खारघरचे ३० रु. देशनिर्मितीसाठी वापरले जाणार आहेत, त्याबद्दल बोलायचे काम नाही.
आगाउ +१०००००
आगाउ +१०००००
>>>> भाजपाची भाटगिरी करणारे
>>>> भाजपाची भाटगिरी करणारे असे धागे काढु लागले हे पाहुन सखेद सानंद आश्चर्य वाटले <<<
त्या आश्चर्याचे जौद्याहो, पण एकाच वेळेस खेद होउन खेदाबरोबरच आनंद होणे हे कशाचे लक्षण आहे ते इथल्या मानसिक शास्त्राच्या डॉक्टरांना विचारुन त्यावर औषधौपाय करुन घ्याच हा कळकळीचा सल्ला ... !
आता हा सल्ला समजुन घेऊन मग उपाययोजना करण्यायेवढी स्थिती राहिली नसेल, फारच बिघडली असेल तर मात्र इथल्या मानसिक/शारिरिक शास्त्राच्या डॉक्टरना विनंती की तुम्हीच लोकहितास्तव पुढाकार घेऊन जरा या "आयडी" वर उपचार कराच हो.... तुमचे लई उपकार होतील.. मायबोलिवर!
भाजपे मित्रांचा अपेक्षाभंग
भाजपे मित्रांचा अपेक्षाभंग झाला म्हणुन खेद.
आपण भाजप्ये नाही याबाबत आनंद
...
एका डोळ्यात आसु एकात हसु , गड आला सिंह गेला ... अशा म्हणी पालकानी तुम्हाला शिकवलेल्या दिसत नाहीत.
पुढच्या पिढीत तरी चूक सुधारा.
या टोलनाक्याचे नाव दिसले नाही
या टोलनाक्याचे नाव दिसले नाही लिस्टमधे...
Pages