पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम

Submitted by MallinathK on 20 February, 2015 - 20:59
ठिकाण/पत्ता: 
सारस बाग, पुणे ते विवेकानंद स्मारक, कन्याकुमारीसायकल मोहीम.

पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम 

पुणे - दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदुषणाच्या भीषण समस्येच्या पार्श्वभूमीवर सायकलचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या हेतूने पुण्यातील काही सायकलप्रेमींनी पुणे ते कन्याकुमारी अशा सायकल मोहीमेचे आयोजन केले आहे. ही मोहीम सारसबाग येथून २१ फेब्रुवारीला प्रस्थान करणार असून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांतून प्रस्थान करत १६५० किमी प्रवास करून विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी येथे सांगता करण्यात येईल. 

 या मोहीमेचे नेतृत्व उपेंद्र शेवडे यांच्याकडे असून वेदांग शेवडे, आनंद घाटपांडे, सुह्रुद घाटपांडे, ओंकार ब्रम्हे, उमेश पवार, नंदू आपटे, चंद्रशेखर इती, अद्वैत जोशी आणि आशिष फडणीस हे या मोहीमेत सामील असतील. 

मोहीमेचा मार्ग - पुणे - कराड - निप्पाणी - हुबळी - अंकोला, मरवंथे - सुरथकल - पय्यानुर - कोझीकोडे - गुरुवायुर - कोची - चावारा - थिरुवनंतपुरम - कन्याकुमारी. 

- आशुचँप.

या कार्यक्रमाबद्दलचे अपडेट्स मी इथे टाकेन.

तारीख/वेळ: 
शुक्रवार, February 20, 2015 - 17:30 to Thursday, March 5, 2015 - 19:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शारिरिक थकवा जाणवायला लागला की मानसिकतेची खरी कसोटी असते. चँपा निभावून नेईल याची खात्री आहे

मध्ये १-२ दिवस शरिराला पुर्ण आराम देण्याकरिता मोकळे दिवस सोडले असावेतच.

२५ तारखे नंतरचे रुट सगळे जरा हेक्टीकच गेले.
२८ तारखेला ठरल्या प्रमाणे आठ दिवसात १०५२ किमीचा पल्ला झाला. धारवाड वरुन अंकोलाल जाताना २५ किमीचा घाट उतरले, ज्याच्या भन्नाट अनुभव चँपच्याच शब्दात ऐकण्यात मजा आहे. Proud समुद्र किनारपट्टीच्या भागातुन जाताना तर बसल्या बसल्या घामेघुम व्हायचे तिथे ७-८ तास ९ किलो सामान घेउन सायकल चालवल्यावर काय झाले असेल. Uhoh नुसतं शहाळं, कलिंगड आणि ओआरएस वर तग धरले सगळे. Happy
गेल्या काही दिवसात रोज याच वातावरणात १००-१२५ किमी प्रवास घडतोय.

वाटेत दोन किल्लेही सर केले. लुंगी घालुन देव दर्शनही झाले. Proud लुंगीचे फोटोज विना परवाना इथे टाकन्यास बंदी आहे, तरी ज्याना पहावयाचे आहे त्यांनी वैयक्तीक संपर्क साधावे.

आजच्या अपडेट नुसार कोचीला पोचलेत आणि अजुन ३०० किमी बाकी आहे. Happy

सायकल सफर मित्रांनो,
विश्रांतीच्या काळात अरुण वेढीकरांच्या मुंबई ते काश्मीर एक्कलकोंडा सायकल सफर नामा वाचा. कथा जरा जुनी १९७९ मधील आहे. तुम्हाला आमच्या शुभेच्छा...

ताज्या बातमी नुसार आजच्या १२० किमीच्या प्रवासा नंतर चँप मंडळी चवरा ला पोचले आहेत. Happy त्यांच्या शेवटच्या स्टॉपला तिथुन फक्त १७० किमीचं अंतर बाकी आहे. प्रवासा दरम्यान चँपला भेटलेल्या एका सायकलींग क्लबच्या व्यक्तीने चँपच्या ग्रुप साठी उद्या एक रिसेप्शन ठेवले आहे.

आता फक्त (?) १७० किमी.... Happy

ह्या मोहिमेच्या खबर-बाता वेळोवेळी पोचवल्याबद्दल धन्यवाद मल्ली

सही....आज पार्टीचा दिवस असेल. Happy अभिनंदन आशुचँप आणि टीम
मल्लीणा धन्यवाद. मस्त वाटत वाचायला.

"पुण्याला आलो तर हिलस्टेशन ला आल्याचं फिल होईल, एवढं उकडतंय." - इती चँप.

कॉल केला तेव्हा तमिळ मुलीने कैच्या कै बडबड ऐकवली. म्हंटलं "चांदी की सायकल...." म्हणत चँपने कोणाला लिफ्ट वगैरे दिली की काय? Uhoh नंतर त्याच मुलीने इंग्रजी मध्ये चँप बिझी असल्याचं कळवलं. म्हंटलं ही बेनी (बेनंचं स्त्रिलिंगी असंच ना? :अओ:) तर कस्टमर केअर वाली आहे तर.

पुन्हा एक्दोन्वेला ट्राय केल्यावर लगला एक्दाचा फोन. आजचा ९० किमीचा प्रवास संपवुन सगळे सुखरुप पणे तिरुअनंतपुरम ला पोचलेत. आजवर झाला नाही एवढा ट्राफिकचा त्रास झाला असं कळलं. आज का कुणास ठाउक चँपचं बोलणं क्लियर येत नव्हतं, मला निट कळतच नव्हतं. कदाचीत तमीळभाषेचा परिणाम झालेला दिसतोय. सारखं सारखं 'काय?' म्हणुन विचारावं लागायचं. Proud

संध्याकाळची रिशेस्प्सन पार्टी, विविध देवस्थान (केलेल्या पापांची गोळाबेरीज म्हणुन हा लगे हातो पुण्य कमवतोय Happy ) वगैरे वगैरे करनार आहेत.

चँपच्या संमंतीने त्याचे फोटो इथे टाकत आहे.

IMG-20150301-WA0003.jpgIMG-20150301-WA0004.jpgयन्ना रास्कल्ला.....
IMG-20150301-WA0005.jpg

व्वा व्वा व्वा... मस्त फोटो.... च्याम्प्या लुन्गीत अगदि केरळी/मद्रासी हिरोच वाटतोय... !
शुटिंग चालू अस्ताना हे तिथे पोचले तर चुकून कुठल्या शिनुमात गेस्ट हिरो म्हणुन घेतलनी नै म्हणजे मिळवली. अजुनही काय काय चुकून होऊ नये असे यादीत आहे. Proud

व्वा व्वा व्वा... मस्त फोटो.... च्याम्प्या लुन्गीत अगदि केरळी/मद्रासी हिरोच वाटतोय... !
याला फक्ट थोडं डांबर फासावं लागेल. Proud

मंडळी तुमच्या सर्वांच्या पाठींब्यामुळे आणि शुभेच्छांच्या जोरावर पुणे ते कन्याकुमारी अशी सायकल मोहीम यशस्वीरित्या पार पडली. बरोबर १३ दिवसात आम्ही १५६५ किमी अंतर पार करून भारताचे दक्षिण टोक गाठले.
पुण्यात आल्यावर सर्व मित्रपरिवार आणि कुटुंबियांनी भरघोस स्वागत केले. आणि आता लवकरच हा तपशील डोक्यात असतानाच वृत्तांत टाकावा अशा विचारात आहे.

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आणि विशेषत मल्लीला धन्यवाद...ज्याने मेहनत घेऊन हे अपडेट टाकण्याचे काम केले.

Pages