Submitted by काउ on 17 February, 2015 - 09:01
दिवसातून फक्त एकदाच जेवण घेऊन रहाणे , हा प्रयोग कुणी केला आहे का ?
एकच वेळ जेवायचे असल्यास शाकाहारी पदार्थ वापरुन कोणत्या पद्धतीने जेवण करावे लागेल ?
http://www.finalcall.com/artman/publish/Health_amp_Fitness_11/article_89...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्या ओळखी च्या दोन आज्या
आमच्या ओळखी च्या दोन आज्या एकवेळ जेवायच्या. दोघीही शाकाहारी. दुपारी नेहमीचे जेवण जेवायच्या. रात्री फक्त कपभर दूध. त्यातल्या एक आजी घरच्या पार्टीसाठी सगळा साग्रसंगीत स्वयंपाक करायच्या पण स्वतः काही खायच्या नाहीत.
मी गेले काही महिने हेच
मी गेले काही महिने हेच करतोय.. त्यामुळे फरक काही पडला नाही.. पण चालू आहे..
संध्याकाळच्या वेळेस काय खायचं
संध्याकाळच्या वेळेस काय खायचं पण मग? अॅट्लिस्ट पहिले काही दिवस सवय होईपर्यंत तरी?
(मी असलं काही कधी करणार नाही हे मात्र नक्की ;))
मी हा प्रयोग सलग तीन महिने
मी हा प्रयोग सलग तीन महिने केला आणि मी माझी विनंती की हा प्रयोग चुकुनही करु नका. ह्या परिणाम असे होतात की एक वेळ जेवण केल्यामुळे शरिराला जे जीवनसत्व हवे असतात ते मिळत नाहीत. परिणामी, हाडे ठिसूळ होतात, कार्यक्षमता एकदम कमी होते, केस लवकर पिकतात, पचन संस्था बिघाडते. त्यापेक्षा आहार कमी करा पण तिन्ही वेळा थोडे थोडे खा आणि सगळी जीवनसत्वे मिळतील असे खा. विविध चौफेर ताहार ठेवा. रसभाज्या, फळभाज्या, पातीच्या भाज्या, वेगळ्या रंगाची कडधान्याच्या उसळी, दही, ताक, हे रोज असू द्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आठवड्यातून एक दिवस निरंकार उपवास करा. फक्त एक कप दुध वा केळी इतकेच फक्त. ह्यानी पोट स्वच्छ राहते. फक्त एकच की उपवास असेल तर तो देवाच्या नावानी करु नका आणि त्यादिवशी शारिरिक कष्ट होणार नाही असा आरामात उपवास करा. घरी बसून. पुर्वीच्या काळी लोक उपवास करायचे पण त्यांना तशी कामे कमी होती. आता बाहेर कामे करुन पोटात अन्न नाही म्हणाजे त्याचा विपरित परिणामच जास्त होतो.
असो. मी हे खोटे लिहित नाही. अनुभवातून गेलो आणि तीन महिने एक वेळ जेवल्याची फळे अजून भोगत आहे.
छान.... शास्त्रीय दृष्ट्या
छान....
शास्त्रीय दृष्ट्या एक वेळ जेवणे आकर्षक असले तरी प्रॅक्टिकली तसे करणे अवघड आहे.
विशेषतः रोज ५० ग्रॅम प्रथिने व जीवनसत्वे हे गणित फार्फार मुष्किल आहे.. मांसाहार्याना कदाचित हे गणित जमवता येईल. ( म्हणुनच मांसाहारी लोक रोजा सहजपणे ठेऊ शकतात .. )
शाकाहार्याना जरा मुश्किल आहे.
वर बी बोल्ले तसे कॅल्शियम , विटॅमिन डी हेही गणित जमवणे अवघड आहे.
आठवड्यातुन एक दिवस असे करता येईल.
गोष्टी गावाचे तुमचे वजन किती
गोष्टी गावाचे तुमचे वजन किती आहे ? रात्रीचा आहार डिटेल लिहु शकाल का ?
पण जामोप्या असं करायचं कारण
पण जामोप्या असं करायचं कारण काय ?
़कारणे दोन तीन आहेत. नंतर
़कारणे दोन तीन आहेत. नंतर लिहितो
प्रत्येक शरीराची
प्रत्येक शरीराची टेंडन्सी/गुणधर्म वेगळे असतात. आपल्या शरीराच्या गुणधर्मानुसार ठरवावे.
मी प्रयोग म्हणून एक वेळ खाणे वगैरे करून पाहिले आहे. मला फायदा झालाय. एकूणच मी दोन वेळ पूर्ण खाल्लाय असं रोज घडत नाहीच. पण माझा मेटॅबोलिझम तसा आहे, त्यामुळे मला ते सूट होतं.
शिवाय मी जास्तीत जास्त किती दिवस काहीही न खाता (फक्त पाणी / चहा) राहू शकते ह्याचेही प्रयोग करुन झाले आहेत. साधारण १०-११ दिवस एनर्जीमधे कणभरही फरक न पडता (कोणाला कळाणारही नाही की मी काहीही खाल्ल नाहीय) मी राहू शकलीये. पण तो एक स्वतःच्या लिमीटस शोधायचा प्रयोग होता. परत उगाच उठून करायला जाणार नाही कदाचित, पण वेळ आली तर मला माहितीये की मी १० दिवस अन्नावाचून काढू शकेन अॅसीडीटी वगैरे न होता.
कारणे सोडा असे केल्यास
कारणे सोडा असे केल्यास मेटाबॉलिझम का काय तो कमी होतो आणि मग नॉर्मल पचनही धड होत नाही असे आहारतज्ञ सांगतात.
तुम्हाला जास्त माहित असेल याबद्दल.
डावर्यांकडे वजन कमी करायला जातात त्यांची अचाट आणि अतर्क्य डाएटे असतात असे ऐकले होते. त्यातले काही नाही ना हे?
एकवेळ जेवण घ्यायचे असल्यास
एकवेळ जेवण घ्यायचे असल्यास डाळींचे प्रमाण वाढवा ,शिजवलेली मूगडाळ ,तूर डाळ फक्त मीठ टाकून घ्यायची. कडधान्य भाजी करुन वा वाफवून घ्यायची. भात बंद करुन चपाती वाढवायची ,थोडक्यात हाय फायबर प्रोटीन घेतल्याने पोट बर्याच काळ भरल्यासारखे राहते व भूख कमी लागते विशेषतः शिवजवलेल्या डाळी घेतल्यास बराच काळ पोट भरल्याचा फिल येतो, डाळीतल्या हाय फायबरचा परिणाम.
कार्ब्जसाठी जेवण झाल्यावर एखादे फळ खावे केळे चिकू वगैरे.
(सदरची माहिती माझ्या वैयक्तीक अनुभवातुन लिहलेली आहे, फक्त मी एकवेळचे जेवण विभागुन दिवसातुन दोनदा घेतो, आहार मात्र एकवेळेचाच घेतो आहे .)
नै हो. डावरॅ डाएट वगैरे
नै हो. डावरॅ डाएट वगैरे नाही.
आज दुपारी सहज जेवताना हाफिसात विषय निघाला. यावर्षी जुन मध्ये रमजान आहे.
सगळेजण म्हणाले दोन्चार दिवस आपणही करुन बघु या. रोजा उन्हाळ्यात आला तर कठीण असतो.
पण पावसाळ्यात त्यामानाने सुसह्य होतो.
मग सहज विचारले .. की आयुष्यभर असेच करायचे ठरवले तर चालते का ? सिस्टर बोल्लल्या की काही लोक करतात असे ऐकुन आहे.
म्हणुन याबाबतचे अनुभव , शास्त्र , फायदे तोटे यासाठी हा धागा काढला आहे.
मलादेखील शुगर कंट्रोलसाठी एखादा चांगला प्लॅन हवा आहे.
शुगर कंट्रोलसाठी बेस्ट प्लॅन
शुगर कंट्रोलसाठी बेस्ट प्लॅन इज शुगर कंट्रोल ...चहा/कॉफीमधे वरुन साखर घेणं बंद करणे. पहिले काही दिवस चवीची सवय व्हायला वेळ लागेल, पण एकदा सवय झाली की काहीही फरक पडत नाही. जाता-येता, जेवणानंतर गोड खाणे बंद. फळात, भाज्यांत जी नॅचरल शुगर असते ती तशीही जातेच खाण्यातून, त्यामुळे शरीराला अजून वेगळी शुगर पुरवणे कमी करणे.
रमजानात २ वेळा जेवतात. १ वेळा
रमजानात २ वेळा जेवतात. १ वेळा नाही. फक्त दिवसा ऐवजी रात्री जेवतात.
नक्तं एकभुक्त रोगमुक्त असली काहीतरी म्हण अर्धवट आठवतेय.
रमजानात २ वेळा जेवतात. १ वेळा
रमजानात २ वेळा जेवतात. १ वेळा नाही. फक्त दिवसा ऐवजी रात्री जेवतात. <<< सकाळी सहरीला हलकासा नाश्ता केलेला असतो (हलका म्हटलं तरी भरपेट असतोच) संध्याकाळी सर्व चमचमीत पदार्थ.
रमझानचे उपास करताना त्यातलं कम्युनीटी फीलिंग, सर्वांनी एकत्र येऊन प्रार्थना करणं, एकमेकांच्या घरी जाणं, भेटणं, दिवसाभरातलं कुराणवाचन वगैरे बर्याच गोष्टींमुळे भुकेची जाणीव होत नाही. एकट्यानं करायचं झाल्यास ते फार अवघड काम होतं. मी एकेकाळी जमतील तितके रोजे केले आहेत. सध्या गेली काहीवर्शं एक किंवा दोन रोजे.
गोष्टी गावाचे तुमचे वजन किती
गोष्टी गावाचे तुमचे वजन किती आहे ? रात्रीचा आहार डिटेल लिहु शकाल का ? <<<<
वजनः १८० पाऊंड. वय ५१
दिवसाचा आहार:
सकाळी डोसा, पोहे, आमलेट इत्यादी. साखरेशिवाय चहा..
कमीत कमी अर्धा तास व्यायाम.
दुपारी: २ शिजवलेल्या भाज्या , किंवा १ उसळ १ भाजी (दोन्ही मोठी वाटी भरून ).
संध्याकाळी: १ आवाकाडो..केव्हातरी साखरेशिवाय चहा... १५ - ३० मिनिटे व्यायाम.
रात्री: १ ग्लास फळांचा रस.
गोड खाणे पूर्ण पणे बंद... वाईन /वारूणी सहा महिन्यातून एकाद्यावेळी.
वजनः वाढतेच आहे, वाढतेच आहे..वाढतेच आहे.. (सगळ्या टेस्ट करून झाल्यात. काहिही सापडलेले नाही).. एकाद्या दिवशी बाहेर गेल्यावर काहीतरी जास्त खाल्यास जे वजन वाढते ते कायमचेच....
व्यायाम गेली १७ वर्षे चालू आहे. साखर बंद करून १० वर्षे झाली आहेत. पोळी भात बंद करून आता ३ वर्षे होतील..
( ही माझी समस्या आहे.. सगळ्यांचे असे होईल असे मी म्हणत नाहीय... )
कॉलेजच्या वर्षात खिसे रिकामे असल्याने 'भूक मारली' ती आता कायमचीच मागे लागली आहे. पूर्वी मी स्वतःचा डबा खाऊन इतर तीन/चार जणांच्या डब्यातले आरामात संपवायचो..
गोगा, या आहारात फायबर्स,
गोगा, या आहारात फायबर्स, प्रोटिन्स इ. फार कमी आहेत.
गोगा, एवढं सगळं करूनही जर
गोगा, एवढं सगळं करूनही जर वजनावर काही परिणाम नाहीच, उलट वाढतंच आहे तर का करताय?
यातले फळांचे रस (ताज्या
यातले फळांचे रस (ताज्या फळांचे असल्याने) फायबर आणतात. त्या व्यतिरिक्त मी फायबर - गमी खातो.
अंडे, उसळ्या, आणि कधी कधी खाल्लेले मासे ते प्रोटिन्स साठी.
खाणे वाढवणे शक्य दिसत नाही.. आणि चिकन/ मटन खात नसल्याने अधिक प्रोटीन खाणे होत नाही...
जामोप्या डॉक्टर अहेत ना ? मग
जामोप्या डॉक्टर अहेत ना ? मग शुगर कन्ट्रोल साठी एकच वेळ जेवणे हा ऑप्शन योग्य नाही हे माहित असेलच. ठराविक अंतराने थोडे थोडे खावे म्हणाजे शुगर फ्लक्चुएशन होत नाही असं डॉक्टर्स पण सांगतात.
भारतात जमेल का माहित नाही पण
भारतात जमेल का माहित नाही पण वायटामिक्स ब्लेंडर असेल तर एक वेळेस जेऊन दुसर्^या वेळेस भाज्या,फळे,प्रोटीन(अल्मंड मिल्क्/नट्स वगैरे) घातलेल्या स्मूदी खाऊन बरेच जण राहतात. त्यांना बाकी काही त्रास होत नसावेत. माझ्या माहितीत आहेत एक दोन जण. म्हणजे ट्रेडिशनल जेवण नाही घेत पण कार्ब,प्रोटीन आणि फायबरचा समतोल राखला जातो. ब्रेड्/चपाती टाळल्यामुळे अवास्तव कार्ब्ज पोटात जात नाहीत. तुम्हाला पहिले असं काही ट्राय करायचं आहे का?
मला स्वतःला फक्त स्मूदी/ज्यूस वगैरे प्यायलं तरी भुकेसाठीची भूक का काय म्हणतात ती लागते त्यामुळे मी ही स्मूदी कमी प्रमाणात साईड आयटम म्हणून खाते. (मुख्य जेवणाची एखादी पोळी बिळी कमी करून.)
माझ्या दोन्ही आजी, एकाच वेळी
माझ्या दोन्ही आजी, एकाच वेळी जेवायच्या . दोघेही ९०+ वय जगल्या. मरेपर्यन्त त्याना कसलाही आजार न्हवता.
जेवण सकाळी १० वाजता एकच वेळा आणि ५ वाजता दुध. मध्ये पाणी पण घेत नसत. जेवणात दुघ,, गोड पदार्थ किंवा सिझनला आमरस किंवा शिखरण , डाळ, भात, भाजी, चपाती, नाचणिची अंबिल , .
रमजानात रात्री दोन जेवणे
रमजानात रात्री दोन जेवणे होतात. पण आमची नाइट + डे असल्याने रात्री एकदाच जेवणे पॉसिबल आहे.
गोगा, व्यायाम पुरेसा दणदणीत
गोगा, व्यायाम पुरेसा दणदणीत होत नाहिये का?
फुलके वगैरे काही खात नाही का तुम्ही?
एकवेळच जेवण, जमणार नाही. म्हातारपणी जमेल पचनशक्ती कमी झाल्यावर बहुतेक. आता नाही बा, प्रयत्न पण करणार नाही.
बी चा प्रतिसाद पटला.
एकेकाळी वजन बरेच कमी झाल्याने आहारतज्ञाकडे जावे लागले होते. तिने मस्तपैकी दर ३-४ तासांनी खायचा तक्ता दिला (सर्व पौष्टिक पण तब्येत चांगले करणारे पदार्थ, तरीही फॅट न वाढु देणारा तक्ता). पण बापरे! बर्यापैकी खावे लागत होते. ८-१० दिवसांनी तिने विचारले, 'how is new diet treating you?' तेव्हा नाईलाजाने सांगावे लागले की, 'it is killing me, you are making me eat too much!'. पण छान उपयोग झाला. ४-६ महिन्यात वजन बरोबर हवे तितके झाले.
एकंदर लोकांचा अनुभव पहाता एक पटलय... तरुण असताना, सर्व पचतय की, काही होत नाही असा विचार करुन लोक वाटेल तसे खातात किंवा उपास करतात पण ते सर्व प्रयोग उतारवयात शिक्षा देतात.
काऊ आहाराच्या दृष्टीने जरा जास्त लिहाल.
रमजानाप्रमाणे रात्रीतच एक दोन
रमजानाप्रमाणे रात्रीतच एक दोन जेवणे घेउन दिवसभर उपाशी रहाता येईल का ? याची चाचपणी सुरु आहे.
कारण नसेल तर उपाशी राहण्याची
कारण नसेल तर उपाशी राहण्याची अजिबात सवय करू नका.. ते चांगले नाही..
मी उपाशी रहात नाही (कार्ब फक्त दिवसातून एकदाच खातो)..
मी करुन पाहिलं आहे काही
मी करुन पाहिलं आहे काही वर्षांपुर्वी, मला चांगला अनुभव आला. वजन पण कंट्रोल मध्ये राहिलं होतं. वर काही लोकांनी म्हंटलय तसं हे जमायला तुमचं वय, मेटॅबोलिजम, त्या एका जेवणामधून मिळणार्या कॅलरी आणि विविध घटक हे सगळं खुप महत्वाचं आहे.
माझच उदाहरण द्यायचं तर तेव्हा मी मांसाहारी होतो आणि त्यामुळे दुपारी एकदा व्य्वस्थित जेवलो की पार दुसर्या दिवशी दुपार पर्यंत आरामात भूक निघायची. ह्याच बरोबर व्यायाम पण फार सुरु नव्हता त्यामुळे कधीच काही प्रॉबलेम नाही आला. एक गोष्ट होती की त्या एक वेळच्या जेवणात मिळणार्या कॅलरीं पुरेशा ठरत होत्या पण त्यातून मिळणारं न्युट्रिशन (वाईटॅमिन्स, प्रोटिन्स वगैरे) कितपत पुरेसे होते ते माहित नाही. एकदा न्युट्रिशन व्यवस्थित अॅडजस्ट केले तर हे अगदी व्यवस्थित मॅनेज करता येऊ शकते. मी ह्याबाबतीत केलेल्या थोड्याफार वाचनावरुन सांगायचं तर माणसाचं शरिर अजून हंटर/गॅदरर (वेचून खाणे) जीवनशैली आजिबात विसरलेलं नाहीये. बराच काळ ते अन्न न खाता राहू शकते (म्हणूनच उपासमार झाली तरी शरिराचं वजन ताबडतोब कमी होत नाही) आणि एक अख्खा दिवस काढणे अगदी सोपं आहे फक्त कॅलरी आणि न्युट्रियंट्स ह्याकडे लक्ष दिलं म्हणजे झालं. आजकाल ते दिवसातून ५-६ वेळा खा वगैरे चरण्याच्या पद्धतीचा बोलबाला आहे, जे काही चुकीचं नाही पण तेच बरोबर आहे हे ही तितकच चुकीचं आहे. आता एक वेळ खातानाच जर कोणी बेदम खात असेल तर त्यांच्याकरता तो जास्त वेळा कमी कमी खाण्याचा सल्ला आहे.
आता फास्ट फॉर्वर्ड ५ वर्ष, मी शाकाहारी झालो. ही पद्धत आजिबात जमेना मला!. शाकाहरी जेवणातल्या कॅलरी आजिबात पुरेशा ठरत नव्हत्या आणि त्यामुळे रात्रीच्या झोपेवर परिणाम व्हायला लागला. तुम्ही जर तळलेलं वगैरे काही खात नसाल आणि जास्त भर सॅलड, डाळी, बीन्स ह्यांच्यावर असेल तर खुप जास्त प्रमाणात ह्या गोष्टी खाव्या लागतात तुमची कॅलरीक रिक्वायरमेंट मीट करण्याकरता. आता मला निव्वळ अशक्य झालय एक जवणावर भागवणं. सकाळी ब्रेकफास्ट (ओटमील), दुपारचं जेवण (सॅलड्+बीन्स) रात्रीचं जेवण (पोळी/भाजी).
एक वेळ जेवण वगैरे मला तरी
एक वेळ जेवण वगैरे मला तरी चुकीचं वाटत.
बॉडीला चुकीचा मेसेज जातो.
एकाच वेळी कसे काय सर्व वायटॅमिन्स मिळणार आणि ती त्या त्या वेळची झीज कशी भरून काढणार?
मी ११ वाजता समजा भरपेट जेवले( एक वाटी डाळ, एक उकडा मासा, एक पालेभाजी आणि जरासा भात/चपाती) पण त्याधी (११ वाजायच्या आधी) आणि नम्तर नुसती बसून होते/राहिले तर ठिक.
पण चालले एक तास/ व्यायाम केला तर नक्कीच थकवा येणार. पण तरी सर्व वायटॅमिन्स मला नाही मिळणार. आणि पोटाला चुकीचा मेसेज जाणार की पोटाला कमी मिळणार आहे, चला साचवूया.
मला सर्व जेवलेल पचत असेलही हे सुद्धा नाही कळणार/कळत. म्हणजे खालेल्य जेवणातून, सगळेच वायटॅमिन्स तसेच्या तसे शोष्ले जातील ह्याची सुद्धा गँरटी नाही.
त्यामुळे हे टोटल नो नो आहे. एकदा बिघडलेली पचनसंस्था सुधारायला वेळ लागतो. किंवा सुधारतच नाही.
मी कमी खाल्ले तरी मला थकायला होते. म्हणून मी व्यव्स्थित खाते आणि व्यायम करते. मला एक वेळ जेवून चालत नाही हे कळलय. तेव्हा प्रत्येकाने ते स्वतःला ठिक असेल तर करावे. केस गळत नाहीत ना? (मी पाहिले माझ्या बाबतीत, पहिले चिन्ह असतं वजन कमी करताना केस गळती, मग पाय दुखणे, चिडचिडेपणा असे सर्व होत नसेल तर ठिक समजा).
----------------------------
बाकी, गोगा आहार तपासून पहा एकदा. भाज्यांचे सूप, ज्युस घेता की फळं सुद्धा टाकता? ते हि तपासून पहा.सकाळी प्रोटीन्स खा काहितरी. खूप फरक पडतो.
पोह्यात शेंगदाणे टाका वगैरे.
नाहितर काका आहात म्हणून वजन वाढतय असे समजा.
एवढं सगळं करूनही जर वजनावर
एवढं सगळं करूनही जर वजनावर काही परिणाम नाहीच, उलट वाढतंच आहे तर का करताय? <<< सायो... आहे त्यापेक्षा वाढू नये म्हणून....
१०-१२ शेंगदाणे/बदाम इत्यादी दिवसातून २ दा खातो.. लिहायला विसरलो..
फळांचे रस हे घरी फळे आणून मिक्सर मधे घालून करूनच पितो..
व्यायाम कमी पडतो ? शक्य आहे.. पण त्यात धावणे शक्य नाही.. (पाय दुखतो).. पण इतर बरेच बदल करून झालेत. जिम मधे वजने, बॉक्सिंग .. Treadmill , Stretching , Cycling इत्यादी दोन वर्षे केलं... प्रयत्न चालू आहेत. फक्त त्यापेक्षा जास्त व्यायाम करायचा असेल तर घर / नोकरी सोडून द्यावी लागेल...
गोगा, कच्चा कोबी खाता का?
गोगा, कच्चा कोबी खाता का?
Pages