Submitted by काउ on 17 February, 2015 - 09:01
दिवसातून फक्त एकदाच जेवण घेऊन रहाणे , हा प्रयोग कुणी केला आहे का ?
एकच वेळ जेवायचे असल्यास शाकाहारी पदार्थ वापरुन कोणत्या पद्धतीने जेवण करावे लागेल ?
http://www.finalcall.com/artman/publish/Health_amp_Fitness_11/article_89...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कारण त्यात अनेक इंनग्रेडियंट
कारण त्यात अनेक इंनग्रेडियंट असे आहेत जे इतर फूड, ड्रग्ज बरोबर इंटर अॅक्ट करू शकतात आणि त्या इंटरॅक्शनचे परिणाम डॉक्युमेंटेड नाहीत. >>> मग FDA त्याला मान्यता कसं काय देतं ? की चालतं असं ?
FDA ची मान्यता ही फार ट्रीकी
FDA ची मान्यता ही फार ट्रीकी गोष्ट आहे, आणि इथेच फार्मा/फुड इंडस्ट्री लूपहोल्स शोधते.
घटकांच्या पातळ्या एका लिमीटच्या खाली हव्या अशी गाईडलाईन असते, पण किती खाली हे कुठेही लिहिलेले नसते.
आणि परत एकदा ' वन टाइम मेझर (अक्ञुट) विरुद्ध 'अॅक्युम्युलेटेड (क्रॉनीक)' ह्यातला फरक कुठेही लिहिलेला नसतो.
हा मोठा ग्रे झोन आहे, ज्यात इंडस्ट्री वावरते.
आता आता १० वर्ष विटॅमीन युज, १५ वर्ष ह्या पोस्ट मार्केटींग स्टडीजचे रिझल्ट्स यायला लागलेत, परिणाम दिसायला लागलेत. त्यामुळे ओटीसी व्हिटॅमीन्स सध्या वादात आहेत.
मधे हायड्रोक्सीकट ह्या 'वजन कमी करण्याच्या' गोळीवर खूप वादंग झाले. डाययूरेटीक इफेक्ट्ने वजन कमी होतं, पण किडनीच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो हे क्रॉनिक वापराने दिसून आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत फिटनेस इंडस्ट्रीमधलीही.
फूड , फार्मा, कॉसमेटीक्स ही प्रचंड लूपहोल्सवाली आणि नेमकी डायरेक्ट हेल्थ अफेक्ट करणारी इंडस्ट्री आहे.
अजून एक उदाहरण म्हणजे सायकलींग करताना इलेक्ट्रोलाईट्स म्हनुन आम्ही 'नुन' टॅबलेट्स पाण्यात घालतो. राईडनंतरच्या एक दोन दिवसात मला किडनी स्टोन सारखं पोटात/कमरेत दुखण्याचं फीलींग यायला लागलं. मग ट्युब पेटली की मला स्टोन ची टेंडन्सी आहे (आणि गेली अनेक वर्ष काहीही त्रास होत नसला तरी) ते जास्तीचे इलेक्ट्रोलाईटस मला लगेच त्रास देताहेत.
अश्या वेळी मी केवळ १ बाटली इलेक्ट्रोलाईटसची (नाहीतर २०० माइल्स करताना क्रँप्स येतील) आणि ते वॉश आऊट करायला पाणी (३ दिवस लागतात मला विकेंडचे इलेक्ट्रोलाईट्स पूर्ण वॉश ऑट करायला) असं करते.
शिवाय काही मित्रांच्या बाबतीत ब्लडप्रेशर ची पातळी नेहमीपेक्षा जास्त वाटायला लागली... कारण घामातून, यूरीनमधून कितीही इलेक्ट्रोलाईट्स बाहेर टाकले गेले तरी काही मागे उरतातच.
हे लिहायचा उद्देश हा की कोणताही प्रॉडक्ट निर्माण करताना 'जनरलाइज्ड लेव्हल लक्षात घेऊन ' (eg. FDA levels) केलेला अस्तो, पण वापरताना तो खूप 'परसनलाइज्ड' परिणाम करू शकतो.
छान माहिती देतेयस रार . फूड ,
छान माहिती देतेयस रार .
फूड , फार्मा, कॉसमेटीक्स ही प्रचंड लूपहोल्सवाली आणि नेमकी डायरेक्ट हेल्थ अफेक्ट करणारी इंडस्ट्री आहे. >>> हायला हे तर सरळ सरळ कन्झ्युमरच्या हेल्थशी खेळणं झालं की.
फूड इंडस्ट्री तशीही फ्रॉड
फूड इंडस्ट्री तशीही फ्रॉड आहेच.
वन मील अ डे शेवटी पुन्हा फूड
वन मील अ डे शेवटी पुन्हा फूड शब्दावर तरी आला मला वाटलं फायनली गोगांचा गेम करणार का काय सगळी चाळ :दिवा:. असो लगता है हळूहळू हा धागा मील आणि मग काउंचं वन मील वर पण येईल.
आता वाचल्यावर लक्षात आलं की काउ स्वत:च डागदर आहेत मग त्याक्षेत्रातल्या कुणाचा सल्ला घ्यायला ते इकडे
कलियुग रे बाबा कलियुग.....;)
रार, चांगली माहिती! >>फूड ,
रार, चांगली माहिती!
>>फूड , फार्मा, कॉसमेटीक्स ही प्रचंड लूपहोल्सवाली आणि नेमकी डायरेक्ट हेल्थ अफेक्ट करणारी इंडस्ट्री आहे. >> +१
या इंडस्ट्रीचे लॉबिइंग सगळ्यात दणकट आहे.
रार, चांगली माहिती! धागा
रार, चांगली माहिती! धागा योग्य वळणे घेत मुख्य रस्त्यावर येतोय तर
केदार तू व्हे प्रोटिन घेतोस
केदार तू व्हे प्रोटिन घेतोस का? >>> हो पोस्ट राईड एक फुल चमचा २०० ML पाण्यात.
रार सगळे मसल बिल्डर व्हे प्रॉडक्टस चांगले असतात असे नाही. अमेरिकेत Hammer ह्या कंपनीचे ट्राय कर.चांगले आहेत.
यकलींग करताना इलेक्ट्रोलाईट्स म्हनुन आम्ही 'नुन' टॅबलेट्स पाण्यात घालतो. >>>
लाँग डिस्टन्स सायकलिंग करतात त्यांनाच गरज असते. कारण घामावाटे (तितके तास) ते निघून जातात. त्यामुळे नून ऐवजी तू दुसरे काही तरी ट्राय कर. मे बी पावडर वगैरे. शिवाय योग्य प्रमाणात न मिसळवले तर इलेक्ट्रोलाईट्स हे उलटे काम करतात, म्हणजे तितक्या पाण्यात तुम्ही प्रमाणाबाहेर त्या गोळ्या वा पावडर टाकले तर इनफॅक्ट ते बॉडीतले पाणी शोषतात. म्हणून केअरफुली वापरावेत.
कारण घामातून, यूरीनमधून कितीही इलेक्ट्रोलाईट्स बाहेर टाकले गेले तरी काही मागे उरतातच. >> आधी लिहिल्यासारखे ओव्हर युज वाटतेय मला तरी.
२०० माईल्स ( ३०० किमी) मध्ये मी फक्त २ सॅशे १५०० मिली पाण्यासोबत घेतले आणि अर्थातच किती ह्युमीड आहे ह्यावरही अवलंबून आहे. अर्थात तुझ्या शहरातले तापमान खूपच जास्त असते पुण्यापेक्षा
http://www.hammernutrition.com/products/heed-reg--sports-drink.he.html किंवा
http://www.hammernutrition.com/products/perpetuem-reg-.pp.html?navcat=AL...
ट्राय कर एकदा. खूप लोकांकडून सायकलीग फोरम्सवर चांगले रिव्ह्यू आले आहेत.
फूड , फार्मा, कॉसमेटीक्स ही प्रचंड लूपहोल्सवाली आणि नेमकी डायरेक्ट हेल्थ अफेक्ट करणारी इंडस्ट्री आहे. >> +1 कुडन्ट अॅग्री मोअर !
व्हे प्रोटिन म्हणजे दुधातील
व्हे प्रोटिन म्हणजे दुधातील केसीन आणि व्हे असतं त्यातलंच व्हे ना? दही लावल्यावर केसीन कोअॅग्युलेट झाल्यावर जो द्राव सुटतो तोच ना?
हो ते दुधापासूनच तयार करतात.
हो ते दुधापासूनच तयार करतात. (शाकाहारी व्हे) मांसाहारी व्हे मध्ये लार्ड असतं त्यामुळे नुसतंच व्हे असे लिहिले असेल तर ते शाकाहारी असेलच असे नाही.
केदार, ओके. मी ते
केदार, ओके. मी ते दह्याबरोबरचं व्हे खूप उपयुक्त असतं म्हणून कधीच टाकत नाही. नुसतंच पिऊन टाकते. दह्याचं सुटलेलं पाणी, सफरचंदाची सालं, फळांचा चोथा, आमटीतील कढिलिंब वगैरे कचरा म्हणून फेकून देणं हा कर्मदळिद्रीपणाच.
पण व्हे हे स्पोर्ट्स न्युट्रिशन आहे हे माहित नव्हतं.
आहारात लाल भोपळा, लाल माठ,
आहारात लाल भोपळा, लाल माठ, शेपू, बीट वगैरेचा अधुनमधुन आवर्जून समावेश असावा. हे पदार्थ 'मन्यू' म्हणजे उत्साह वाढवतात. उत्साह म्हणजे उतावळेपणा नाही. एखाद्या कार्यासाठी जी गती आवश्यक आहे त्याच गतीने ते कार्य पुर्ण करण्यासाठी जाऊ शकणे. जेव्हा १०० स्पीड आवश्यक असेल तेव्हा १०० नेच. जेव्हा १० आवश्यक असेल तेव्हा १०नेच.
काउ, तुम्ही हे एकभुक्त राहण्याच्या विचारामागचं कारण काय आहे? वेट लॉस का? की मनावरचा ताबा वाढवण्याची प्रॅक्टिस म्हणून?
अश्विनी सफरचंदाची सालं नको
अश्विनी सफरचंदाची सालं नको खाऊ.
त्याला पॅराफिन लावलेले असते.
हल्ली कुठलीच फळे सालांसकट खायच्या लायकीची राहिलीनाहियेत.
हो त्या साली वॅक्स
हो त्या साली वॅक्स लावल्यासारख्या दिसतात. पण त्याच साठी अगं मी सालीसकट खायची फळं बराच वेळ गरम पाण्यात बुडवून ठेवते आणि मग पुसून खाते. मग जात असेल का ते वॅक्स? :अओ:. सफरचंदांच्या सालीचे सगळे फायदे जातील ना मग :-(. अजून काही उपाय आहे का व्हॅक्सविरहीत साल करायचा?
सफरचंदाच्या बिया मात्रं जराही पोटात जाऊ देऊ नये.
http://www.ehow.com/how_59363
http://www.ehow.com/how_5936301_remove-wax-apples.html आणि http://blog.thenibble.com/2011/10/24/tip-of-the-day-how-to-remove-wax-fr... मिळालं.
बापरे! धागा कुठला, हे तर
बापरे! धागा कुठला, हे तर आख्खे वस्त्र च विणले गेले आहे.
पण खरच.. एक भुक्त हे अवघड आहे. आपल्या आज्ज्या, पणज्या करयच्या पण तेंव्हाची परीस्थिति- हवा, पाणि, काळज्या, प्रक्रुति आणि माणसे वेगळी होती, आजच्या पेक्षा.
घरचे, सत्विक, पोउश्टिक, आनंदाने आणि भुकेच्या वेळेला खाणे, २ बोट कमी खाणे हे महत्वाचे.
अजुन रुजुता दिवेकर आणि तीच्या डाएट प्लान चा संदर्भ कोणीच कसा काय दीला नाही?
जांभळावर इतकं घाणेरडं तेल
जांभळावर इतकं घाणेरडं तेल लावले असतं आणि ती १२० रु किलोने वगैरे .
काल ८५ वर्षाचा विदर्भाच्या
काल ८५ वर्षाचा विदर्भाच्या खेड्यात राहणारा शेतकरी मामा भेटायला आला. त्याला भेटूनच इतकं छान वाटतं ना... एकही गोळी औषध नाही. आर्थिक परिस्थिती अगदी बेतास बात हे विदर्भाच्या ह्यावरुन लक्षात आलेच असेल. असो! हंडे उचलून पाणी भरतो.. शेतात काम करतो... रोज ४ किमी चालणं असतं..डोळ्याला चष्मा नाही तरी वाचन करतो... दात नाही पण चिवडा खातो. २ वर्षापुर्वी मामी वारली वर्षभरापुर्वी मुलगी गेली. मुलगा वाईट मार्गाला लागला त्याच्या मुलांचा सांभाळ हाच करतो.. कधीही आपलं रडगाणं सांगत बसत नाही. आहार फक्त दोन वेळच अगदी साध जेवण.. प्रोटीन्स , विटॅमिन्स काय असतात ते त्याला माहित नाही. घरच्या करडईच्या तेलाची धार आजही वरण - पिठल्यात असते. ५-६ पुरण पोळ्या वर आग्राहाला मान देत दोन एक सहज खाऊन घेतो.... त्याच्याकडे बघून विचार येतो की ह्याच्या आरोग्याच रहस्य काय ... हेही दिवस जातील ... सगळ्यांचं फक्त कौतुक... माणसांना व अन्नाला नांवं ठेवण नाही ... नशिबाला दोष देणं नाही ...
सगळ्यांचं फक्त कौतुक...
सगळ्यांचं फक्त कौतुक... माणसांना व अन्नाला नांवं ठेवण नाही ... नशिबाला दोष देणं नाही ...>>>> हे खूप महत्वाचं आहे मंजूताई
मामीबद्दल एक गोष्ट लिहायची
मामीबद्दल एक गोष्ट लिहायची राहिली ... मामीला ८ वर्षापुर्वी बायपास सांगितली होती. एक लाख खर्च ऐकून मामा म्हणाला एवढे पैसे खर्च करुन जगेल किती हे माहिती नाही सो आता ती सत्तर वर्षाची आहे सगळी मुलंअबाळ सुखात आहे आयुष्य उपभोगून झालंय जगेल तितके दिवस जगेल ... जुजबी औषध द्या... जुजबी औषधांवर ती सहा वर्ष जगली... आज आपण शहरी लोक जास्त/अति आरोग्य सजग झालो आहोत .. खाण्यातला आनंद घालवून बसलोय... आपल्या शरीराचं ऐकण्यापेक्षा स्मुपदेशकाचंच ऐकतो का? @काऊ डॉ म्हणून तुम्ही काय सांगाल?
त्यांना पुढे ६ वर्ष काही झालं
त्यांना पुढे ६ वर्ष काही झालं नाही हा नशिबाचा भाग आहे.
आरोग्यसजग झालो तर ते चांगलच आहे.
अॅटिट्युड चांगला ठेवला की त्याचा फायदा मनाला होतो शरिराला नाही. थोडाफार होत असेल पण शेवटी जीवनाविषयी चांगला अॅटिट्युड ठेवून कोणी चुकीचा आहार घेत असेल तर त्याचा शरिरावर परिणाम होतोच.
वैबु, सजग असणं चांगलच! अति
वैबु, सजग असणं चांगलच! अति झालो आहोत .. त्याचे परिणाम आहेत का?
काही उदाहरणांबाबत खरं असू
काही उदाहरणांबाबत खरं असू शकेल
फक्त लोकं थोडं काहीतरी करतात, फॅड आहेत म्हणून जास्त लक्ष देत नाहीत आणि पुढे जाऊन घात होतो.
@ मंजू तुमच्या मामान वरुन मला
@ मंजू
तुमच्या मामान वरुन मला माझा चुलत मामा आठवला.
सोलापूर जवळील खेड्यात रहायचा..९८ वर्षे जगला. भिक्शुकी कारयचा त्यावरुन कळेलच परीस्थिती यताथताच होती. गोड पुरण पोळी अणि वर पीठी साखर पेरुन खायचा..वयाच्या ९० पर्यंत सायकल वर फ़िरायचा ते पण रोजचे ३० किमी.
बायको, २ मुली आणि १ मुलगा यान्चे 'जाणे' सहन केले..कायम हसतमुख आणि एकुणच सगळ्या चांगल्या गोष्टी न वर विश्वास
निरा - एटीट्युड खूप महत्वाचा
निरा - एटीट्युड खूप महत्वाचा हेच ह्या दोन्ही उ. वरून वाटतं. मला तर हसू येत... लोकांचे फॉड बघून... कुकरमध्ये शिजवलेल्या अन्नावर गेली पन्नास वर्ष पोसला ... ठणठणीत आहात ... आता कुकरमध्ये शिजवत नाही ... विषयांतर नको
. काऊ असं काही खूळ नाही ना..
त्याच्याकडे बघून विचार येतो
त्याच्याकडे बघून विचार येतो की ह्याच्या आरोग्याच रहस्य काय ... हेही दिवस जातील ... सगळ्यांचं फक्त कौतुक... माणसांना व अन्नाला नांवं ठेवण नाही ... नशिबाला दोष देणं नाही ...>>
जी लोक अनेक वर्ष जगतात त्याला एक कारण असत की ही लोक कष्ट करतात. शरिर झिजवतात. बाहेरचं प्रोसेस झालेलं अन्न खात नाही. अनेक उपवास तापास करतात. फिरतात. सोशल लाईफ जगतात. सकारात्मक दृष्टीकोन ठेवतात. मी आत्तापर्यंत हे काही निरिक्षण केल ते हे होत. बहुतेक वेळी गरीबी वाट्याला आली की हे सगळ आपोआप होतं. चैन निर्माण झाली अंगावर मास चढते पण ते उतरता उतरत नाही.
काऊ, माझा एक सल्ला. तुम्ही घरकाम करा. जसे की फरशी पुसणे, कपडे धुने, झाडलोट करणे, आवराआवव्र करणॅ. ही घरची कामे अंग वाकवतात. पोटाला कमएर्ला हवा तो व्यायाम मिळतो. तसेच चार पाच मजली इमारत खाली उतरायह्ची व परत चडायची. असे एकच वेळा खूप झाले.
आपल्या इथे "एक गोळी/औषध
आपल्या इथे "एक गोळी/औषध म्हणून नाही" ही गोष्ट फार अभिमानानी सांगितली जाते. काही लोकांना जेनेटिक्समुळे म्हणा किंवा त्यांच्या जीवन्शैलीमुळे म्हणा पुष्कळ वया पर्यंत किंवा मरेपर्यंत तसं राहता येतं पण इतर बरीच लोकं ह्याचं अंधानुकरण करत स्वतःचा घात करुन घेतात.
मध्यंतरी माझ्या ओळखीचे एक जण होते, ते मागची जवळ जवळ २५-३० वर्ष दररोज न चुकता ४-५ मैल चालायचे. काही महिन्यांपुर्वी थोडं छातीत दुखायला लागलं म्हणून डॉ कडे जायच्या विचारात असतानाच गेले!
त्यांचंही असच, कधीही कुठली साधी सर्दीची सुद्धा गोळी घेतल्याचे त्यांच्या घरच्यांना आठवत नाही!
आपले जेनेटिक्स चांगले आहेत्/नाहीयेत हे कोणाला माहित असतं? आपला आहार, आपली जीवनशैली आणि ह्या घटकेला आपल्या वयोमानानुसार आपली प्रकृती नेमकी कशी आहे हे मात्र नीट समजून घेऊन त्याबाबतीत काही करता येऊ शकतं आणि ते करायलाच पाहिजे.
>>>जी लोक अनेक वर्ष जगतात
>>>जी लोक अनेक वर्ष जगतात त्याला एक कारण असत की ही लोक कष्ट करतात. शरिर झिजवतात. बाहेरचं प्रोसेस झालेलं अन्न खात नाही. अनेक उपवास तापास करतात. फिरतात. सोशल लाईफ जगतात. सकारात्मक दृष्टीकोन ठेवतात. मी आत्तापर्यंत हे काही निरिक्षण केल ते हे होत. बहुतेक वेळी गरीबी वाट्याला आली की हे सगळ आपोआप होतं. चैन निर्माण झाली अंगावर मास चढते पण ते उतरता उतरत नाही.
काऊ, माझा एक सल्ला. तुम्ही घरकाम करा. जसे की फरशी पुसणे, कपडे धुने, झाडलोट करणे, आवराआवव्र करणॅ. ही घरची कामे अंग वाकवतात. पोटाला कमएर्ला हवा तो व्यायाम मिळतो. तसेच चार पाच मजली इमारत खाली उतरायह्ची व परत चडायची. असे एकच वेळा खूप झाले.<<<
हा सल्ला काउंना का दिला गेला आहे वगैरे मी वाचलेले नाही. मात्र ह्या उतार्यांमधील मूळ मुद्याला माझे पूर्ण अनुमोदन आहे. टू बी स्पेसिफिकः
कष्ट, प्रोसेस झालेलं अन्न न खाणे, घरकाम, इमारत चढणे व उतरणे - हे उपाय अत्तिशय उपयुक्त आहेत शरीरासाठी!
छान
छान
केदार, रानडे असल्याने तसंही
केदार, रानडे असल्याने तसंही अर्धीच टॅबलेट टाकायचे मी एका बाटलीत, त्यामुळे जास्त होतंय हा प्रश्नच नाहीये
गेटोरेड वर्कस बेटर फॉर माय किडणी.
Pages