one meal a day

Submitted by काउ on 17 February, 2015 - 09:01

दिवसातून फक्त एकदाच जेवण घेऊन रहाणे , हा प्रयोग कुणी केला आहे का ?

एकच वेळ जेवायचे असल्यास शाकाहारी पदार्थ वापरुन कोणत्या पद्धतीने जेवण करावे लागेल ?

http://www.finalcall.com/artman/publish/Health_amp_Fitness_11/article_89...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला इथे गोगा प्रयोग शाळेतले गिनीपिग आहेत असं चित्र दिसलं Proud

पिंजर्‍याच्या आड कोबी खाताना गिनीपिग....

गोगा,
(ह. घ्या.)

गोगा, फळांच्या रसातून किती ती साखर जाते? <<< जेवढी असते तेवढी (म्हणजे मी अजून साखर घालत नाही)..

केळे, अननस, Melon , Persimmon , सफरचंद, नाशपती, Strawberry, Raspberry, Blueberry इत्यादी फळे असतात. काही आंबट काही गोड.. फक्त पेरूच्या फोडी वेगळ्या खातो... :

गोगा, पुन्हा फुकटचा सल्ला(तुम्हीच आ बैल मुझे मार केलय तर..)

केळ - वजन कमी करताना सुरुवातील कमीच खा.
मला अर्धच पण कमी पिकलेलं केळ खायला सांगितलं. सुरुवातील मी एक मोठं केळ खायची व वजन कमी होत नाही म्हणायची. मग अर्धच सकाळीच खायचे.
अननस - पुन्हा साखर
सफरचंद - साखर
रस पेक्षा अक्खी फळं का नाही खात दिवसभरात?
बाकी फळं चांगली आहेत. जमलं तर कमी करा वरची फळांचा रस.

धन्यवाद सगळ्यांना..

रात्रीच्या जेवणासाठी फळे खातो.. ती दिवसभर खाल्ली तर रात्री काय खाऊ?
यातली सगळी फळे रोज नसतात.. मी दिसतील ती फळे आणतो व मिक्सर मधे टाकतो.

आपण काऊ यांचा मूळ विषय भलतीकडे नेतोय.. तेव्हा इथे थांबूया..

आपण काऊ यांचा मूळ विषय भलतीकडे नेतोय.

.............

नाही . असे काही बंधन नाही लिहिण्यावर. बिनधास्त चर्चा करा.

एक डॉक्टर या नात्याने मला असे वाटते की फक्त रात्री व पहाटेच दोनदा जेवले तर चालु शकेल. एकभुक्त हे शाकाहारी माणसाला अवघड आहे.

आपण चार पाच वेळा खातो. पण त्यात प्रत्येक वेळी स्टार्च शुगरचाच भरणा असतो. शरीराला तेच आयते वापरायची सवय लागते.

आपले शरीर फ्याट , प्रथिने अशा इतर गोष्टी वापरुनही उएजानिर्मिती करु शकते. पण शरीराला तशी आपण संधी देतच नाही.

त्यासाठी आठवड्यातुन कधीतरी कडकडीत उपास केला तर तो फायद्याचा ठरु शकेल.

अर्थात हा माझा अंदाज / तर्क आहे. डॉक्टर असलो तरी हे मत आहारतज्ञाचे मत म्हणुन कुणी गृहीत धरु नये.

जूनला रोजे सुरु होतील त्याच्याआधी एखादी ट्रायल घ्यावी लागेल. Happy

<<<यातले फळांचे रस (ताज्या फळांचे असल्याने) फायबर आणतात>>

जिथे जिथे मी फळांचे रस व ताजी फळे यांची तुलना वाचली आहे तिथे रस घेतल्याने आपण फायबर घेत नाही असे वाचलेले आहे.

http://www.whfoods.com/genpage.php?tname=george&dbid=24
http://www.livestrong.com/article/435966-juice-extraction-vs-eating-whol...

Despite the plentiful nutrients available in juice, you won't be getting the fiber contained in whole fruit. Juicing appliances extract the juice and leave behind the pulp and skin, which is where most of the fiber content is located. Fiber's health benefits include supporting digestion, controlling blood sugar and lowering cholesterol, according to the American Dietetic Association. Fiber also helps you feel full longer, an important advantage of whole fruits, particularly if you're watching your weight.

तिथे सगळंच लिहिलं आहे. पण जे लिंक उघडून वाचू शकणार, पाहणार नाहीत त्यांच्यासाठी : नुसतं फळ खाल्ल्याने जितकी % साखर पोटात जाते ते % रसात अधिक असतं. तुम्ही एक अख्खे फळ खात असाल तर तीन फळांचा रस घ्याल. म्हणजे साखरेचं काय झालं बघा. रसाचा ग्लायसेमिक इन्डेक्स फळापेक्षा जास्त असतो.

जेवणात आमसुल/लिंबू/चिंच ह्याचा उपयोग केला की जेवण पचायला खूप सोपे जाते. चांगले दर्जेदार मधे अनाशापोटी खायचे पहाटे पहाटे. अधुनमधुन आवळा खायचा. वरणात आमसुल रोज घालायचे.

आधी हे बघा की तुम्हाला जे खाता ते अन्न पुर्णपणे पचते का? म्हणजे दुसरे जेवण करण्याअधी सकाळी वा रात्री जे काही खाल्ले ते पचून विष्ठा बाहेर पडायला हवी. ही प्रक्रिया जर होत नसेल तर प्रश्न आहारामधे नसून पचनसंस्थेमधे आहे. रोज पपई खाल्ल्याने अन्न लवकर पचते. ज्येष्ठमध रोज चावले की अन्न लवकर इन्टेस्टाईअमधे पोचते. वज्रासन केले की अन्न लवकर खाली उतरते.

रात्री दुध बिग नो. रात्री कुठलेच पांढरे पदार्थ खाऊ नये. कारण त्यात प्रोटीन्स असतात आणि ते लवकर डायजेस्त होत नहीत. म्हणून सकाळीच खवे.

ज्यांचे पोट मोठे आहे म्हणजे त्यांना काही ना काही पचन शक्तीचा त्रास आहे(मोठे पोट नसणार्‍यांना नसतो असे नाही पन ज्यास्त करून गॅसेस मुळे पोट मोठे असते व अपचनाने.).

त्यांनी पोट साफ कसे राहिल हे बघावे. पुर्वी सारखे दूध वगैरे पदार्थ आता नसतात.(भरपूर हार्मोन वगैरे देवून दूध मिळवतात) ते दूध कधीच न पचता पोटात रहाते.

मी आल्याचा व लिंबाचा रस घेते जेवणाआधी रोज. माझे पोट खूपच कमी झाले. अगदी सपाट झाले. मैदा पुर्ण बंद. पांढरी साखर बंद. साखरेची फळं(केळी, अननस, अ‍ॅपल, द्राक्षं) बंद. बाहेरचे जेवण बंद केले. भरपूर उकड्या भाज्या ,मासे खाल्ले. आणि पोट दोन तीन आठवड्यात आत असा स्वानुभव आहे. अजून हि ठिक आहे. मला वाटतं मैद्याचे पदार्थ मला पचत नसत. मटण आणि चिकन बंद.
मग जरा स्थिरास्थावर झाले तसे चहा घ्यायला लागले दूध टाकून.

तिशी उलटली की पोटामधे विसरल फॅट्स गोळा होतात. पोट जरी दिसत नसले तरी त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. कारण फॅट्स ही जागा अडवून बसतात. त्यामुळे तो भाग सुस्त होत, रक्ताभिसरण, प्राणवायु पोहच्त नाही. पुरेशा हालचाली तिथे होत नाहीत. म्हणून पोट स्वच्छ ठेवावे.

मी आठवड्यातून एक वा दोन दिवस उपवास करतो मला त्याचा खूप फायद झाला आहे.

काउ,

आल्याचा रस उष्ण असतो. तेव्हा तुमच्या तब्येतीला झेपेल इतका घ्या सुरुवातील.
पाव चमचा आल्याचा रस + पाव चमचा लिंबू रस.
काहीच त्रास नाही झाला तर वाढवा. जेवणाआधी एक तास. ते सुद्धा पोट रिकामे असताना.
म्हणजे उदाहरण, ९:३० नाश्ता असेल तर ११:४५ रस आणि त्यावर एक ग्लास कोमट पाणी.

१२:४५ दुपारचे जेवण. मग पुन्हा ३:४५ रस आणि दुपारचा नाश्ता.
रस घ्यायच्या एक तास आधी व नंतर चहा , कॉफी बंद.

माझ्या मैत्रीणीचे पोट सुद्धा कमी झालेय. नुसता रस घेवून नाही, तर सुरुवातीला दोन- तीन महिने साखर बंद, तीन वेळा चालणं(फक्त २० मिनिटं), घरीच सकाळी व संध्याकाळी स्ट्रेचेस. मला जिम मध्ये उगाच मजूरी करायला झेपत नाही( एका वयात करायचे. आता झेपत नाही पळणे वगैरे) Proud

बाकी, मी रोजचेच खाते. खूप त्रास नाही करत. जे खातो त्यात खुष राहिले की वजन कमी होते. Happy

पोट कमी झाल्यावर व पचन सुधारल्यावर , मी आता अधी मधी समोसा, जिलेबी,खिरी आणि शिरासुद्धा बनवून खाते. पण क्वचितच पण खाल्ल्यावर दु:खी होत नाही. अजून वजन तेच आहे.

ईंटरेस्टीग,
धागा माहिती प्रतिसाद
अन्यथा,
मी आजवर असेच समजायचो की एकाच वेळी भरमसाठ खाण्याऐवजी दिवसातून तीन वेळा थोडे थोडे खा, किंवा उतरत्या क्रमाने खा, तसेच दर दोन-तीन तासांनी काहीतरी तोंडात टाकत राहा वगैरे वगैरे.
अर्थात,
हे दोन्ही प्रकार आपापल्या जागी बरोबर असतील तर खाऊन पिऊन सुखी राहिलेले केव्हाही उत्तम Happy

फळांचे रस हे घरी फळे आणून मिक्सर मधे घालून करूनच पितो..>>> गोगा, तो रस गाळून घेता का?

उत्तर 'हो' असेल तर फायबर गाळात जातंय, पोटात नाही.

बाकी, 'दिवसातून एकदा जेवणे' यात नेमका कसा आहार अभिप्रेत आहे? आहारक्रम आणि वेळा लिहू शकाल का काऊ?

फळांचा रस जरी पोटात गेला तरी त्यासोबत लाळ जात नाही. म्हणजे फळ खाताना चयापचनाला आवश्यक असलेली लाळ फळासोबत आपोआप मिसळते. आपण रस पिताना तो खात नाही तर तो पितो त्यामुळे फळांचा रस पचायला जास्त वेळ लागतो. म्हणून फळ हे अख्ख खाल्ल पाहिले.

खूप साध जीवशास्त्र आपल्याला माहिती नसत Happy

काउ बाकी ठिकाणी आपली खडाजन्गी होते, होऊ द्या. पण इथे अजून एक बदल सान्गावासा वाटतोय. आले+लिम्बाचा रस याचे जे पाचक केले जाते त्यात आले, साखरेबरोबर मिळाल्यास आवळे पण किसुन टाका. आवळे अजून आहेत बाजारात. पुण्यात तरी मिळतात. मात्र हे फ्रिझबाहेर टिकत नाही ( आवळा असलेले ) कारण कच्चे असते. आले+लिम्बाचे साखर घालुन शिजवले तरी चालते. साखर नाही घातली तरी चालते, पण हो आले उष्ण आहे.

एकाच वेळी जेवायचे असे करु नका, त्या ऐवजी निदान ( सन्ध्याकाळी) दलिया ( उपमा व खिचडी ). ज्वारी वा तान्दळाची उकड, भाजणी वा कणकेची उकडपेन्डी असा हलका आहाराने सुरुवात करा. म्हणजे पचनावर एकदम ताण येणार नाही. रव्याची खीर, ओट्स सुद्धा चालतील.

मुस्लिम लोकान्चा उपास सोडतानाचा हलिम हा दणकट पोटभरु पदार्थ आहे. त्याने पोटावर ताण येत नाही. मग रोजे करायचेच असतील तर तसे करुन बघा. हळु हळु सुरुवात केली तर कदाचीत जमेल. तरीही एकभुक्त राहु नका. सोपे आणी चान्गले पण नाही ते कुठल्याच दृष्टीने.

नवर्‍याचा मित्र जेव्हा रोजे करतो तेव्हा त्याच्या घरी हे बनतेच ( सर्वच मुस्लिम लोकान्च्या घरात बनते). नन्दिनीला कदाचीत माहीत असेल. मी नॉनव्हेज खात नसल्याने याची कल्पना नाही.:स्मित:

कोकणी मुस्लिमांकडे फारसे बनत नाही. मला तरीहे हलीम प्रकरण कधीच आवडलेलं नाही.

काऊ तुम्हाला एक भुक्त रहायचंय की रोझे ठेवायचेत? दोघांची आहारगरज वेगवेगळी असणारकी.

हो ना. काउ रोज्यान्साठी विचार करा. फार कठिण आहेत ते. एकभुक्त रहाल तर फेरविचार करु शकता.

माझ्या पणजी बाई आयुष्याची शेवटची चाळीस व एकभुक्त होत्या. ९९वर्षे जगल्या. शेवट पर्यन्त तब्येत ठणठणीत होती. स्मरणशक्तीही शाबूत होती. शेवटचे २-३महिने सोडले तर स्वतःची कामे स्वतः करायच्या म्हणजे आन्घोळ,
जेवणखाण इ. त्या .ना एकही दिवस आजारपण नव्हते.शेवटी थकल्यामुळे गेल्या. आणी घरातली सगळी कामे करत होत्या. तेव्हा जेवण मात्र नेहेमीच सत्वयुक्त असायच कारण बरच धान्य भाजी दूध आणी फळ घरचच असायच

गोगा...सगळ्यानी दिलाच आहे मग आत मी ही सल्ला देते...
सर्वात प्रथम होकारार्थी विचार ठेवा. शक्यतो घरी बनवीलेला आहार घ्या. भुक लागेल तेंव्हा पोउष्टिक असे नक्की खा. एक एक घास मोजुन म्हणजे अगदी मोजुन ३२ वेळा चावुन खा. अवघड आहे पण करुन तरी बघा. भूक अजीबात मारु नका. व्यायाम शरीर आणि मन दोन्ही साठी करा. आपले वजन वाढते आहे हे विसरुन जा. पण खाण्या पीण्या वर बरिक नजर आणि कन्ट्रोल ठेवा. शारीरिक आणि मानसिक गरज भागविणारा व्यायाम करा जसे की खेळ.

Pages