शाकाहार आणि अध्यात्म

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 30 January, 2015 - 08:19

हिंदू धर्मानुसार मनुष्य जन्म हा दैवदुर्लभ असतो . कित्येक योनी फिरल्या नंतर मनुष्य जन्म लाभतो . मनुष्य जन्माचे सार्थक किंवा Aim हाच असतो कि आपण देवत्व प्राप्त करून घेण्याकडे वाटचाल करावी .
जन्म हा आपापल्या पाप पुण्यानुसार मिळतो . जो विचार आपण धारण करतो त्यानुसार आपण वागतो . देवत्व प्राप्त करणे हे नवविधा भक्तीने शक्य असते . नऊ पैकी कोणताही मार्ग अनुसरणे याचे स्वातंत्र्य हिंदू धर्मात दिलेले आहे . पण त्याच बरोबर आपले विहित कर्म करता करता कुठल्याही प्रकारची भक्ती करावी असेच सुचवले गेले आहे.

देवाकडे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नामस्मरण करणे . यासाठी जीभ हे इंद्रिय आपल्या ताब्यात येणे आवश्यक असते . कारण त्यातून प्रकट होणारी वाणी ही जात उलट मार्गाने अभ्यासता आली तर आई सरस्वती आपल्याला ईश्वरानाजीक घेवून जाते .

आपण ज्या वाणीने एकमेकांशी बोलतो त्याला वैखरी असे म्हणतात . हे वाणीचे प्रकट रूप आहे .
वैखरी वाणी तून बोलण्याआधी जीभे ची जी हालचाल होवून शब्द प्रकट होऊ लागतो त्याला मध्यमा वाणी असे म्हणतात .

मनातून एखादी गोष्ट जेव्हा सुचते आणी बोलण्यासाठी जिभेला आज्ञा देते ते वाणीचे स्वरूप म्हणजे पश्यंती वाणी होय .

ही वाणीची तीन रूपे पार करण्यासाठी नाम स्मरण प्रत्येक वाणीत विशिष्ट संख्ये पर्यंत जपावे लागते . ती संख्या आणी त्या त्याव्यक्तीसाठी योग्य ते नाम सद्गुरु देतात कारण ते "शाब्दे परे च निष्णात असतात" . यानंतर आपल्याला बुद्धीची एक विशिष्ट पातळी प्राप्त होते ज्याला ऋतंभरा प्रज्ञा असे म्हणतात .
म्हणजेच एखादा साधक मोठ्याने [ वैखरी ] नाम विशिष्ट संख्ये पर्यंत घेइल.
त्यानंतर जिभेला वळण लागले की तेच नाम तोंडातल्या तोंडात पुटपुटेल [ मध्यमा ] पण इथे वेग वाढलेला असतो .
फक्त मनात जप करणे म्हणजे [ पश्यंती ] वाणी मध्ये जप करणे .
यानंतर परा वाणी म्हणजे आपल्याला जे मनात सुचते त्याचे मूळ रूप . मनातले देवत्वाचे दार उघडायला या वाणीत म्हणजे मनातल्या मनात नाम घ्यावे लागत नाही तर आपले अंतरमन सतत नामच घेते . जसे झोपेतून उठणे, झोप लागणे , भूक लागणे इत्यादी कामे अंतर्मन सहज करत असते त्याप्रमाणे ते सहज आणि सतत नाम घेवू लागते . त्यानंतर देवत्व प्राप्त होते.

आता जर याहून जास्त प्रगती करावयाची असेल तर काय करणार ? भगवंताने त्याहीसाठी short cut दिलेले आहेत . त्यांना मंत्र म्हणतात . मंत्र हे भौतिक तसेच मानसिक लाभासाठी असतात . पण ते सिद्ध व्हायला विशिष्ट दिनचर्या पाळावी लागते जी साधकांना आवश्यक असते .

आपण वर पाहिले त्याप्रमाणे एका वाणीतून दुसर्या वाणीत प्रवेश करताना जे सामिष खाणारे असतात त्यांना खूप वेळ लागतो . त्यामुळे सर्व वारकरी माळकरी लोक सामिष [ nonveg ] खात नाहीत . कारण त्यामुळे आध्यात्मिक प्रगती उशिरा होते. तीच बाब मंत्रांची असते . योग्य उच्चार व्हायला आणि तोही पश्यंती आणी परा वाणीत - सामिष आहार अडथळे आणतो. याचे effects पिढ्यानुपिढ्या होतात . अध्यात्मिक साधकाने मंत्र, वेदोच्चारण करणे आवश्यक असते म्हणून सामिष (मांसाहारी पदार्थ )खायचे नसते .

सामिष खाणाऱ्यांचे गायत्री मन्त्राचेहि उच्चार चुकतात -द्वापार युगात तसेच कली युगात ब्राह्मणांच्या जिव्हेच्या शक्तीला मर्यादा आहेत . त्यामुळे ब्राह्मण या युगात मांसाशन करू शकत नाहीत असे सर्व ऋषींनी सांगितलेले आहे . [ संदर्भ : भागवत ]
-----------------------
शाकाहार करणार्याने रोज पंचामृत प्यावे म्हणजे B १२ ची कमतरता कधीही भासत नाही . तसेच वाटीभर मुग किंवा तूर ही अंड्या पेक्षा जास्त आणि सुपाच्य प्रथिने देते . त्यामुळे अंडी खाल्लीच पाहिजेत वगैरे प्रचार फारसा खरा नाही . [ डॉ बालाजी तांबे यांच्या मार्गदर्शनातून ]

आपला सगळ्या सर्वसामान्यपणे शाकाहारी आणि मांसाहारी यात चांगलाच गोंधळ उडालेला दिसतो. कृपया मी जे खाली लिहीत आहे ते ते लक्षात ठेवावे व त्याचा प्रसार करावा, ही विनंती .

[१] रस [ Glandular Secretions etc , ]
[2] रक्त [ Blood ]
[3] मेद [ Animal Fat ]
[4] मांस [ Muscles ]
[5] अस्थी [ Bones ]
[6] मज्जा [ Nerves, Bone Marrow ]
[7] शुक्र [ Reproductive and power Mgmt ]

हे ७ पैकी रस सोडून इतर एक जरी धातू जागृत किंवा सुप्त अवस्थेत असतात त्या सर्व वस्तू मांसाहारी .

वस्तू मध्ये फक्त रस असणे हे शाकाहारी.

साखर जर बोनअ‍ॅश वापरून तयार केली जात असेल तर ते योग्य नाही. भारतामध्ये अश्या प्रकारे साखर तयार करण्यावर बंदी आहे.

दुध पूर्णत: शाकाहारी आहे. हे वरील गोष्टीवरून लक्षात येईल.

संदर्भ- आचार्य मंदारशास्त्री संत ,पुणे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या शतकात अगदी कालपरवापर्यंत छापिल ते ते सत्य असे मानायची पद्धत होती. मग ते पुस्तकात छापून येऊदे, ग्रंथात येऊदे, वर्तमानपत्रात येऊदे, वा हॅन्डबील/पोस्टर्स वर छापलेले असुदे, ते ते सत्य मानायची प्रथा होती. हल्ली हल्ली लोक थोडे शहाणे होऊ लागलेत, सगळेच छापिल ते ते सत्य नसते असे त्यांना समजू लागले असावे असे वाटते.
पण हाय रे दैवा... छापिल ते ते सत्य या पेक्षाही भयंकर रोग निर्माण झालाय, तो म्हणजे जे जे इंटरनेटवर प्रसिद्ध झाले असेल/गुगल केल्यावर जे जे इंटरनेटवर सापडेल ते ते सत्य मानायचा रोग. !
मग अशाने काय होत? की माणूस स्वतः विचार न करता, अशा लिन्कावरिल मजकुरच सत्य मानुन चालतो व स्वतःची विचार करण्याची क्षमताच गमावुन बसतो अन जिथे तिथे "लिन्का" देत सुटतो. (बरेचदा सोईस्कर मजकुराच्याच लिन्का देण्याइतपत बुद्धि शाबुत असते म्हणा... पण ते तितकेच)
असो.

अश्विनी धन्यवाद.:स्मित: शक्यता आहे.

हापुस वर्णोत्पन्न>>>>आमच्या लहानपणी हापूस नव्हता मी चाखला. बाकी पायरी, गावठी वगैरे वगैरे होते.

काउ तुम्ही अजूनही गेल्या दिवसात/ आठवणीत का रमताय?

म्हणूनच मी सहसा गुगल.. विकि ह्यावर सर्च करुनही ही ही इथे विचारतो तर परत मला लोक म्हणतात गुगल करा. आपला उद्देश काय असतो आणि लोकांचा काहीतरी वेगळा. पडताळून पाहणे कशाला म्हणतात हे इथे नाहीच.

त्या बकर्‍याच्या जन्मास आलेल्या कुणा प्राण्याला त्या बोकडयोनीच्या फेर्‍यातून कुणा मुलाण्याच्या हस्ते लवकर बाहेर काढण्याची योजना त्या जगन्नियंत्यानेच केली असेल, तर तमाम शाकाहार्‍यांना काय अडचण आहे बरे?
शिवाय मुलाणी-खाटकाला अल्लाने कर्मविपाक लागू केल्याचा जी.आर. काही पाहण्यात आलेला नाही डोळा मारा त्याची प्रत पहावयास मिळेल का?>>
इब्लिस राव आपलं अध्यात्मातलं knowledge किती हे सांगितलं जर जरा बरं होईल . इस्लाम हा एकमेव धर्म कर्मविपाक , पुनर्जन्म वगेरे मनात नाही हे तुम्हाला माहित आहे का ? त्यांच्या न मानण्याने त्यांना भोग थोडेच चुकतात . बोकडाच्या मरणावर असलं फुटकळ लॉजिक सांगताना उगीच जगन्नियंत्याला कशाला मध्ये आणताय ?

अध्यात्मामधे प्रगती करणेसाठी शाकाहारी असलेच पाहिजे असे नाही
उदा. रामकृष्ण, विवेकानंद आणि बंगालमधले अनेक संतपुरूष >>>
पुरावा ??? कुठे वाचलंत ? कुणी सांगितलं ? उगीच स्वताच्या मानाने काहीही टिंग्या सोडायच्या का ?

वनस्पतींच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत. वनस्पतींमध्ये जीव असतो असे मान्य केले तर जवळपास सर्वच सजीव दुसर्‍या जिवाला मारून खातात असे म्हणावे लागेल. >>>
वनस्पतींचे जे भाग खाण्यालायक आहेत पानं , फुलं , फळ इत्यादी अश्या ठिकाणी वेदना अतिशय कमी वेदना होतात किवा होत नाही . केस कापताना , नखं कापताना आपल्याला जश्या होत नाहीत तश्या . दुसरी गोष्ट म्हणजे वनस्पतींमध्ये समूह आत्मा असतो . जावूदे . अध्यात्मात जास्त शिरायचं म्हणलं तर ते बरंच लांबलचक होईल . मी आता माझे इथले प्रतिसाद थांबवत आहे

डोम्बल्याचे पडताळुन पहाणे. अरे बी, तिथे गुगलुवर माहिती कोण भरणार आपल्या सारखी माणसेच ना? मग प्रत्येक माणसाचे मत हे वेगळे असणारच की. आता गम्मत पहा. सो कॉल्ड आधुवादी ( माझे पेटन्ट आहे या शब्दावर) लोक्स म्हणणार अगा रामायण महाभारत घडलेच नाही, पुरावा काय? पण हेच लोक म्हणणार अमेरीकेत १० हजार वर्षापूर्वीची सन्स्कृती सापडली.
समुद्रात बुडालेली द्वारका, परदेशी लोक येऊन शोधणार, ती एन जी सी/ डिस्कव्हरीवर दाखवणार. मग आपले बाया बाप्ये माना डोलवणार हो क्की रे होती की द्वारका तिथ.

सगळीकडे नुस्ता सावळो गोन्धळ हाय्ये. जाती म्या माज्या कामाला, मोप काम हायती. निस्ता टाईमपास झाला हिथ.:राग::फिदी:

इस्लाम हा एकमेव धर्म कर्मविपाक , पुनर्जन्म वगेरे मनात नाही हे तुम्हाला माहित आहे का ?

...

ते त्याना माहीत आहे . म्हणुनच त्यानी तो परिच्छेद उपहासपूर्वक लिहिला आहे.

आणि कर्मविपाक जर असेल तर तोबोकडाच्या मरणालाही लागू होइल ना ? की कर्मविपाक फक्त राम कृष्ण भीष्म अशा महान लोकानाच लागु होतो ?

समूह आत्मा म्हणजे जिथे अनेक आत्मा वस्तीला असतात. हे मी फक्त वडाच्या झाडाच्या बाबतीत ऐकले आहे. दिवसा मुल दंगा करतात आणि रात्री भुत!

नख कापणे आणि केस कापणे हे उदाहरण खूप छान दिले आहे. धन्यवाद. मुळात झाडांमधे चेतना नसतात. जसे आपल्यला कुणी चिमुकडा घेतला तर जाणवते तसे झाडाचा कुणी ओरबाडलं, फांदी कापली तर ते त्यांना जाणवत नाही. उलट झाडाची कटाई केली की ती जोमानी वाढतात. जसे आपले केस कापले की वाढ सुधारते तसेच झाडांचेही आहे. झाडाची फांदी कलम करुन नवीन झाड निर्माण होते.

काउ | 4 February, 2015 - 11:49 नवीन

समूह आत्मा !

हे काय असते ?
<<<

अनेक शरीरांनी एका ठिकाणी वावरणे पण सर्वांचा आत्मा / मूळ विचार एकच असणे! काही नैसर्गीक प्रलयांनंतर त्या ठिकाणाची साफसफाई करावी लागते एखाद्या आत्म्याला! काही वेळा ते स्थलांतरही करण्याचा विचार करतात.

वडाच्या झाडावर अनेक जीव असले तरी झाडाचा स्वतःचा आत्मा एकच असेल ना ?

माणसाच्या शरीरावर चार ढेकुण व दोन उवा असल्या तर तो समूह आत्मा होतो का ?

समूह आत्मा !

हे काय असते ?>>>
हे काउंने विचारावे हे अंमळ आश्चर्यच आहे,
समुह आत्मा म्ह्णजे एकाच व्यक्तिने बर्‍याच ड्युआयड्या घेउन माबो वर वावरणे.. Wink Light 1
आत्मा एकच परंतु कित्येक अवतार..

बेफिकिरभौ .

तुमच्या टोळीतील दोन आत्मे कोकभौ व कागाळेदादा कालपरवा मोक्षाला गेले... तुमच्या दु:खात सहभागी आहे.

मुळात झाडांमधे चेतना नसतात.

...

आँ ! मग ते डॉ. जगदेशचंद्र बोस होते त्यानी काय लिहिले होते ?

चला सर्वांनी भेदभाव विसरून समुहगान म्हणा २ मिनिटे !>>>>> हम लाए है तुफान से कश्ती निकालके
इस देशको रखना मेरे बच्चो सम्भालके!

वनस्पती मध्ये पण जीव असतो तर मग त्या खाल्य्या कि ती पण एक प्रकारची हत्याच होते ना ... बंगाल मध्ये अनेक विभूती आहेत जे मास भक्षण करायचे मग याला काय म्हणायचे

मनुष्य जन्माचे सार्थक किंवा Aim हाच असतो कि आपण देवत्व प्राप्त करून घेण्याकडे वाटचाल करावी .>>>> देवत्व नाही दासत्व......... जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास.

वनस्पती मध्ये पण जीव असतो तर मग त्या खाल्य्या कि ती पण एक प्रकारची हत्याच होते ना>>>>> हो! पण प्रत्येक जीवाला अन्नासाठी दुसऱ्या जीवांवर अवलंबून रहावे लागते. आणि शास्त्रांनुसार, मनुष्याला फक्त वनस्पतींवरच अवलंबून राहण्याचा सल्ला आहे....

बंगाल मध्ये अनेक विभूती आहेत जे मास भक्षण करायचे मग याला काय म्हणायचे>>>>>> लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण

Pages