शाकाहार आणि अध्यात्म

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 30 January, 2015 - 08:19

हिंदू धर्मानुसार मनुष्य जन्म हा दैवदुर्लभ असतो . कित्येक योनी फिरल्या नंतर मनुष्य जन्म लाभतो . मनुष्य जन्माचे सार्थक किंवा Aim हाच असतो कि आपण देवत्व प्राप्त करून घेण्याकडे वाटचाल करावी .
जन्म हा आपापल्या पाप पुण्यानुसार मिळतो . जो विचार आपण धारण करतो त्यानुसार आपण वागतो . देवत्व प्राप्त करणे हे नवविधा भक्तीने शक्य असते . नऊ पैकी कोणताही मार्ग अनुसरणे याचे स्वातंत्र्य हिंदू धर्मात दिलेले आहे . पण त्याच बरोबर आपले विहित कर्म करता करता कुठल्याही प्रकारची भक्ती करावी असेच सुचवले गेले आहे.

देवाकडे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नामस्मरण करणे . यासाठी जीभ हे इंद्रिय आपल्या ताब्यात येणे आवश्यक असते . कारण त्यातून प्रकट होणारी वाणी ही जात उलट मार्गाने अभ्यासता आली तर आई सरस्वती आपल्याला ईश्वरानाजीक घेवून जाते .

आपण ज्या वाणीने एकमेकांशी बोलतो त्याला वैखरी असे म्हणतात . हे वाणीचे प्रकट रूप आहे .
वैखरी वाणी तून बोलण्याआधी जीभे ची जी हालचाल होवून शब्द प्रकट होऊ लागतो त्याला मध्यमा वाणी असे म्हणतात .

मनातून एखादी गोष्ट जेव्हा सुचते आणी बोलण्यासाठी जिभेला आज्ञा देते ते वाणीचे स्वरूप म्हणजे पश्यंती वाणी होय .

ही वाणीची तीन रूपे पार करण्यासाठी नाम स्मरण प्रत्येक वाणीत विशिष्ट संख्ये पर्यंत जपावे लागते . ती संख्या आणी त्या त्याव्यक्तीसाठी योग्य ते नाम सद्गुरु देतात कारण ते "शाब्दे परे च निष्णात असतात" . यानंतर आपल्याला बुद्धीची एक विशिष्ट पातळी प्राप्त होते ज्याला ऋतंभरा प्रज्ञा असे म्हणतात .
म्हणजेच एखादा साधक मोठ्याने [ वैखरी ] नाम विशिष्ट संख्ये पर्यंत घेइल.
त्यानंतर जिभेला वळण लागले की तेच नाम तोंडातल्या तोंडात पुटपुटेल [ मध्यमा ] पण इथे वेग वाढलेला असतो .
फक्त मनात जप करणे म्हणजे [ पश्यंती ] वाणी मध्ये जप करणे .
यानंतर परा वाणी म्हणजे आपल्याला जे मनात सुचते त्याचे मूळ रूप . मनातले देवत्वाचे दार उघडायला या वाणीत म्हणजे मनातल्या मनात नाम घ्यावे लागत नाही तर आपले अंतरमन सतत नामच घेते . जसे झोपेतून उठणे, झोप लागणे , भूक लागणे इत्यादी कामे अंतर्मन सहज करत असते त्याप्रमाणे ते सहज आणि सतत नाम घेवू लागते . त्यानंतर देवत्व प्राप्त होते.

आता जर याहून जास्त प्रगती करावयाची असेल तर काय करणार ? भगवंताने त्याहीसाठी short cut दिलेले आहेत . त्यांना मंत्र म्हणतात . मंत्र हे भौतिक तसेच मानसिक लाभासाठी असतात . पण ते सिद्ध व्हायला विशिष्ट दिनचर्या पाळावी लागते जी साधकांना आवश्यक असते .

आपण वर पाहिले त्याप्रमाणे एका वाणीतून दुसर्या वाणीत प्रवेश करताना जे सामिष खाणारे असतात त्यांना खूप वेळ लागतो . त्यामुळे सर्व वारकरी माळकरी लोक सामिष [ nonveg ] खात नाहीत . कारण त्यामुळे आध्यात्मिक प्रगती उशिरा होते. तीच बाब मंत्रांची असते . योग्य उच्चार व्हायला आणि तोही पश्यंती आणी परा वाणीत - सामिष आहार अडथळे आणतो. याचे effects पिढ्यानुपिढ्या होतात . अध्यात्मिक साधकाने मंत्र, वेदोच्चारण करणे आवश्यक असते म्हणून सामिष (मांसाहारी पदार्थ )खायचे नसते .

सामिष खाणाऱ्यांचे गायत्री मन्त्राचेहि उच्चार चुकतात -द्वापार युगात तसेच कली युगात ब्राह्मणांच्या जिव्हेच्या शक्तीला मर्यादा आहेत . त्यामुळे ब्राह्मण या युगात मांसाशन करू शकत नाहीत असे सर्व ऋषींनी सांगितलेले आहे . [ संदर्भ : भागवत ]
-----------------------
शाकाहार करणार्याने रोज पंचामृत प्यावे म्हणजे B १२ ची कमतरता कधीही भासत नाही . तसेच वाटीभर मुग किंवा तूर ही अंड्या पेक्षा जास्त आणि सुपाच्य प्रथिने देते . त्यामुळे अंडी खाल्लीच पाहिजेत वगैरे प्रचार फारसा खरा नाही . [ डॉ बालाजी तांबे यांच्या मार्गदर्शनातून ]

आपला सगळ्या सर्वसामान्यपणे शाकाहारी आणि मांसाहारी यात चांगलाच गोंधळ उडालेला दिसतो. कृपया मी जे खाली लिहीत आहे ते ते लक्षात ठेवावे व त्याचा प्रसार करावा, ही विनंती .

[१] रस [ Glandular Secretions etc , ]
[2] रक्त [ Blood ]
[3] मेद [ Animal Fat ]
[4] मांस [ Muscles ]
[5] अस्थी [ Bones ]
[6] मज्जा [ Nerves, Bone Marrow ]
[7] शुक्र [ Reproductive and power Mgmt ]

हे ७ पैकी रस सोडून इतर एक जरी धातू जागृत किंवा सुप्त अवस्थेत असतात त्या सर्व वस्तू मांसाहारी .

वस्तू मध्ये फक्त रस असणे हे शाकाहारी.

साखर जर बोनअ‍ॅश वापरून तयार केली जात असेल तर ते योग्य नाही. भारतामध्ये अश्या प्रकारे साखर तयार करण्यावर बंदी आहे.

दुध पूर्णत: शाकाहारी आहे. हे वरील गोष्टीवरून लक्षात येईल.

संदर्भ- आचार्य मंदारशास्त्री संत ,पुणे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कितीदा परत परत त्याच झाडावर ... Wink
ज्याला जे खायचे ते खा .
माणसाचे आचार अन त्याचा आहार यात काहीही संबंध नसतो हे कळण्याएवढा परमेश्वर तरी शहाणा आहे अस मला वाटत Happy

बोकडाला , कोंबडीला माणसापेक्षा कमी वेदना होतात का कापताना ?>>

सारीके, हा वाद इथे झालेला आहे. मायबोलिकरांचे अगदी ठाम मत आहे की 'जीवो जीवस्य जीवनम'. आणि ह्या वादाला पुष्टी देण्यासाठी त्यांचे असेही मत आहे की जर सर्वच शाकाहारी झाले तर सर्वांना अन्न कमी पडेल.

वैदिकांचे पशुपालन आणि यज्ञ या दोन्ही गोष्टी परस्पर पुरक होत्या. यज्ञात पशुचा बळी दिला जाई. मारलेल्या पशुची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून टाकली जाई. यज्ञात मारलेल्या पशुचे मांस खाण्यासाठी तर चरबी अग्नी भडकाविण्यासाठी वापरली जाई. अग्नी भडकावण्यासाठी इतर कोणत्याही ज्वलनशील पदार्थाची माहिती वैदिकांना नव्हती, हे सिद्ध करण्यासाठी वपेच्या वापराचे उदाहरण पुरेसे ठरावे. प्रारंभकाळी यज्ञाचा एकच प्रकार होता. कालांतराने त्याचे दोन प्रकार झाले.
१ श्रौत यज्ञ
२. स्मार्त यज्ञ
स्मार्त यज्ञात पशुच्या जागी प्रतिकात्मक कणकेचे पशु आले. व वपा म्हणजेच चरबीच्या जागी तुप आले. तथापि, श्रौत यज्ञ हेच यज्ञाचे मूळ रूप असून त्यात पशुबळी अनिवार्य आहे. मनुष्याचा बळी देऊन यज्ञ करण्याची परंपराही वैदिकांत होती. अशा यज्ञास नरमेध म्हणत. (नरमेधाचा उल्लेख खुद्द ऋगवेदातच असून, या विषयी आपण या लेखमालेत पुढे पाहणार आहोत.) प्रारंभी यज्ञ हा दैनंदिन जगण्याचा भाग होता. नंतर त्यात कर्मकांड शिरले. यज्ञाला उत्सवाचे स्वरूप आले. यज्ञ हा श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा एक भाग ठरला. राजसत्तेची महत्ता ठरविण्यासाठीही यज्ञाचाच वापर होऊ लागला. पण हा काळ फार नंतरचा. या विषयावर श्रीकृष्णविषयक प्रकरणात मी सविस्तर लिहिणार आहे. तूर्त आपण वेदांतील यज्ञाबाबतच बोलू या. ऋगवेद काळात अग्निहोत्र अर्थात यज्ञ करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य होते, असे दिसून येते. सार्वजनिक स्वरूपात होणारया यज्ञाचे विधि ब्राह्मणांच्या हातूनच पार पाडले जात.
यज्ञात बळी दिले जाणारे पशु
यज्ञात बळी दिल्या जाणारया पशुंत गाय हा प्रमुख पशु होता. त्याचे कारण गायींची उपलब्धता हेच होते. या शिवाय बैल, घोडे, बकरया व विविध प्रकारचे पक्षीही यज्ञात मारले जात१. बैल मारून करण्यात येणारया यज्ञास शूलगव असे म्हटले जाई. हा यज्ञ रुद्राला प्रसन्न करण्यासाठी करावा, अशी वेदाज्ञा आहे. शूलगवासाठी वापरण्यात येणारा बैल घरच्या गायीचा गोरहा असावा. तसेच हा यज्ञ आर्द्रा नक्षत्रावर करावा, अशी शास्त्राज्ञा आहे२. ही कर्मे गृहस्थ्याने म्हणजेच सांसारिक पुरुषाने करावयाची आहेत. राजसूय यज्ञ चक्रवर्ती सम्राट राजाने करावयाचा आहे. या यज्ञात काळे कान असलेल्या म्हणजेच श्यामकर्ण घोड्याचा बळी दिला जाई. पांडवांनी राजसूय यज्ञ केल्याची कथा महाभारतात येते. या सर्व प्राण्यांची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून वापरली जाई. यज्ञपशु ज्या खांबाला बांधला जाई त्याला यूप असे म्हणत व जेथे पशू कापला जाई त्या जागेला सुना असे म्हणत.
ब्राह्मणांच्या गोमांसभक्षणाचे पुरावे
वेद वाङ्मयात गायीच्या हत्येची परवानगी होती. गायीच्या मांसास वेदांत गव्य असे म्हटले जाते. परंतु त्या काळी ब्राह्मण मांसभक्षण करीत होते का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. क्षत्रियांना आजही मांसभक्षणाची शास्त्रोक्त परवानगी आहे; परंतु ब्राह्मणांना नाही. सांप्रतकाळातील महाराष्ट्रातील एक गणमान्य पत्रकार कुमार केतकर यांनी काही वर्षांपूर्वी सकल ब्राह्मण अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना +ब्राह्मण पूर्वी मांसभक्षण करीत होते+ असे विधान केले होते. तेव्हा अधिवेशनातील ब्राह्मणांनी केतकरांना सभास्थानावरून हाकलून लावले होते. त्यानंतर केतकरांनी हा विषय ताणला नाही. ब्राह्मण खरेच मांसभक्षण करीत होते का, याचा कोणताही पुरावा तेव्हा केतकरांनी दिला नव्हता. या सर्व पाश्र्वभूमीवर हा मुद्दा खरया अर्थाने महत्त्वाचा ठरतो. केतकरांसारख्या विद्वान ब्राह्मणांस प्राचीन काळच्या ब्राह्मणांच्या मांसभक्षणाचे पुरावे माहीत नसतील, असे म्हणवत नाही. तथापि, केतकरांनी ते देण्याचे टाळले असे दिसते. केतकरांनी पुरावे दिले नसले, तरी मी ते आता देणार आहे. होय, यज्ञात मारलेल्या पशुचा खूर, हाडे आदी अखाद्य भाग वगळून उरलेला सर्व भाग खाण्यासाठीच वापरला जात असे. क्षत्रिय-वैश्य-शुद्रादि त्रैवर्णिकांसह ब्राह्मणही मांसभक्षण करीत असत. ऋगवेदाचा भाग असलेल्या आश्वलायन सूत्रात३ ब्राह्मणांच्या मांस भक्षणाचे पुरावे जागोजागी आढळतात. आश्वलायन सूत्राचे श्रौत आणि गृह्य असे दोन भाग आहेत. गृह्य म्हणजे घरगुती, पारिवारिक. आश्वलायन गृह्य सूत्रातून ऋग्वेदी ब्राह्मणांनी करावयाची दैनंदिन व नैमित्तिक कर्मे सांगितली आहेत. यातील सर्व नियम हे ऋग्वेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. त्यामुळे हे गृह्य सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याकाळी ऋग्वेदी ब्राह्मणांची सर्व कर्तव्य कर्मे आश्वलायन गृह्य सूत्रांनी बांधलेली होती, त्यामुळे ऋगवेदी ब्राह्मणांना अश्वलायन ब्राह्मण असेही म्हटले जाते.
आश्वलायन गृह्य सूत्राच्या २३ व्या खंडात ब्राह्मणांनी यज्ञाचे पौरोहित्य करताना पाळावयाच्या नियमांचा उल्लेख येतो. त्यातील एक सूत्र असे :
न मांसश्नीयुर्न स्त्रियमुपेयुरा क्रतोरपवर्गात ।।सूत्र : २१।।
अर्थ : यज्ञाचे पौरोहित्य करणारया ब्राह्मणाने यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्त होईपर्यंत मांस भक्षण करू नये. तसेच स्त्रीसोबत संभोग करू नये.यज्ञ समाप्तीपर्यंत मांसभक्षण करू नये, असा आदेश या सूत्रात देण्यात आला आहे, याचाच अर्थ त्याकाळात ब्राह्मण मांसभक्षण करीत होते. ब्राह्मण मांस खात नसते तर, अश्वलायनाने असा आदेश दिलाच नसता. यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्तीपर्यंत मांस भक्षण करू नये, हा नियम फक्त पौरोहित्य करणारया ब्राह्मणांसाठी आहे. इतर ब्राह्मणांसाठी नाही. पौरोहित्य न करणारे ब्राह्मण यज्ञकाळातही मांस खाण्यास मोकळे आहेत, असा त्याचा दुसरा अर्थ होतो.
आपस्तंभ सूत्र काय म्हणते?
आश्वलायन सूत्रातीला मांसभक्षणाचा हा उल्लेख असला तरी गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख नाही. हे मांस गायीचेच असेल, असे ठामपणे म्हणता येत नाही. ते कोणत्याही प्राण्याचे असू शकते. यातून ब्राह्मण मांस खात होते, हे सिद्ध होत असले तरी ते गायीचे मांस खात होते, हे काही सिद्ध होत नाही. त्यासाठी वेदवाङ्मयाचाच भाग असलेल्या आपस्तंभ सूत्राकडे आपण वळू या. आपस्तंभ सूत्रात गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख येतो. हे सूत्र असे :
धेनवनडुहोर्भक्ष्यम (प्रश्न १, पटल ५ सूत्र ३०)
अर्थ : गोमांस भक्ष्य आहे. (सोप्या मराठीत अर्थ : गायीचे मांस खाण्यासाठी योग्य समजावे.)
मनुस्मृतीतील पुरावे
ब्राह्मण हे गायीचे मांस खात होते, याचे इतके पुरावे वेदवाङ्मयात आहेत की, त्यांचे संकलन केल्यास अनेक खंड होतील. या सर्व पुराव्यांत न पडता ब्राह्मणांना परमवंद्य असलेल्या मनुस्मृतीतले उल्लेख पाहून हा विषय संपवू या. ब्राह्मण ज्याचा महर्षि असा उल्लेख करतात, त्या मनुने + सर्व प्राणी हे खाण्यासाठीच असतात. देवाने प्राणी हे भोजन प्रित्यर्थेच तयार केले आहेत+ असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. मनु म्हणतो :
प्राणस्यान्नमिदं सर्वं प्रजापतिरकल्पयत ।
स्थावरं जंगमं चैव सर्वं प्राणस्य भोजनम् ।।
(मनुस्मृती अध्याय : ५ श्लोक २८)
याही पुढे जाऊन मनू म्हणतो की, मांस खाल्याने, मद्य प्राशनाने तसेच मैथुन केल्याने दोष लागत नाही. मनूचा हा श्लोकार्ध असा :
न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने ।
(मनुस्मृती : अध्याय ५. श्लोक ५६.)
असाच निर्वाळा याज्ञवल्क्यही५ देतो. याज्ञवल्क्याच्या व्यवहाराध्यात म्हटले पुढील श्लोक आढळतो :
प्राणात्यये तथा श्राद्धे प्रोक्षितं द्विजकाम्यया ।।
देवान् पितृन् समभ्यच्र्य खादन्मांसं न दोषभाक् ।।
अर्थ : श्राद्धात, यज्ञात आणि खाण्यासाठी पशु मारावेत. त्याने पाप लागत नाही.
प्राणिहत्येला वैध ठरविण्यासाठी वैदिक शास्त्राने अनके श्लोकांची रचना केली आहे. त्यापैकी एका श्लोकात तर असे म्हटले आहे की, वेदांच्या आज्ञेनुसार प्राणी मारण्यात आले तर या कृत्यास हत्या समजली जाऊ नये. हा श्लोक असा :
या वेदविहिता
हिंसा न सा हिंसा प्रकीत्र्तिता ।।
अर्थ : वेदांच्या आज्ञेनुसार करण्यात आलेल्या पशु हत्येला qहसा समजण्यात येऊ नये४.
लोकहितवादी दाखविली सत्य सांगण्याची हिम्मत
बौद्ध धर्माच्या रेट्यामुळे ब्राह्मणांनी स्वत:च्या वाङ्मयात गुपचूप बदल करून. जुने ग्रंथांतील उल्लेख दडवून ठेवले. जुने ग्रंथ बाहेर काढून त्यांचा खरा अर्थ जगासमोर आणण्याची हिम्मत ब्राह्मणांनी दाखविली नाही. दयानंद सरस्वतीसारख्या दुराभिमान्यांनी तर्कवितर्क करून नवीनच अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. वेदांत हिंसा लिहिलीच नाही, असा दावा करताना दयानंदानी वेदांचे काव्यात्म आणि सांकेतिक अर्थ लावले. त्यांचा हा उपदव्याप निंद्य आणि बहुजनांची दिशाभूल करणारा आहे. या उलट लोकहितवादी यांनी +वेदकाळी ब्राह्मण गायींसह इतर सर्व प्राण्यांचे मांस खात असत+ हे सांगण्याचे धाडस दाखविले आहे. लोकहितवादी म्हणतात : +श्रौत यागात (याग म्हणजे यज्ञ) हिंसेवाचून बोलणेच नाही. गृह्यकर्मात (गृह्यकर्म म्हणजे नवरा बायकोने मिळून करावयाचे कर्म) अश्वलायनांनी हिंसा लिहिली आहे. यावरून गाय, बैल, बकरी, पक्षी इ. प्राणी यज्ञशेषद्वाराने (यज्ञशेष म्हणजे यज्ञ केल्यानंतर उरलेले) भक्षणार्ह झाली होती व त्याविषयीचा कोणत्याही प्रकारचा निषेध किंवा शंका सूत्रकत्र्याच्या मनात आली असेल, असे म्हणवत नाही. ... आता हे सूत्र वेदास अगदी सन्निध आहे इतकेच नव्हे, तर वेदतुल्य आहे असे सर्व ब्राह्मण समजतात४.+ इतरही अनेक विद्वानांनी ब्राह्मणांच्या गोमांस भक्षणाविषयी लिहिले आहे. तथापि, मी येथे लोकहितवादी यांच्या लेखनातील पुरावा दिला आहे. कारण लोकहितवादी स्वत: ब्राह्मण होते. तसेच एक मोठे समाजसुधारक या नात्याने त्यांनी रोखठोक लिखाण केलेले आहे. या पाश्र्वभूमीवर विधानाला आपसुकच विशेष महत्त्व प्राप्त होते.

शाकाहारी व मांसाहारी यामध्ये शारीरिक आणि बौद्धिक सामर्थ्याच्या दॄष्टीने तुलना करता कोण अधिक बलवान ठरू शकेल ? यावर मार्गदर्शन करावे. मागे भारतीय मुष्टियोद्धे जे ऑलिंपिक मध्ये मेडल प्राप्त करते झाले, ते देखील पूर्ण शाकाहारी असल्याचे ऐकले होते . तसेच नुकत्याच सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया दौर्यात काही क्रिकेटपटूना शाकाहारी जेवण न मिळाल्याने त्यानी निषेध नोंदवल्याचे देखील वॄत्त आले होते . यावरून शाकाहारी मंडळी देखील सामर्थ्यवान असतात , असा निष्कर्ष निघू शकेल का? किंबहूना परिपूर्ण आहार कोणता ? यावर चर्चा करावी !>> मला वाटते पुराणातल्या चर्चापेक्षा यावर चर्चा करता येइल का?

बलवान असणे हे आपण शाकाहारी आहोत की मासाहारी आहोत ह्यावर माझ्यामते मुळीच अवलंबून नाही. आपल्या शरिराचा तोल आपल्याला सांभाळता आला पाहिजे. वाघ १०० टक्के मासाहारी आहे आणि तो बलवान आहे. घोडा, हत्ती, उंट हे शाकाहारी आहे पण त्यांची क्षमता वेगवेगळी आहे. आपल्या शरीरातील चरबी एकदा वाढली की शरिराला मर्यादा येतात. मग उठणे बसणे ह्या साध्या क्रिया देखील जड होतात. म्हणून काहीही खा फक्त चरबी वाढू देऊ नका.

ठीके बी आता पुढचा प्रश्न..
पुराणातली वांगी काय दराने मिळतात?
त्याचं भरित करता येतं का? आणि त्याची चव कशी असते Proud

Happy Happy

आग कशी लागली? कुठले तेल वापरले? मग पक्षी उडतो कसा? त्याला चटका लागत नसेल का? पंख जळत का नाही? Happy

आग कशी लागली? >>>>
यज्ञात पशुचा बळी दिला. मारलेल्या पशुची वपा म्हणजेच चरबी काढून त्याने आग लावली. (अग्नी भडकावण्यासाठी इतर कोणत्याही ज्वलनशील पदार्थाची माहिती वैदिकांना नव्हती)
कुठले तेल वापरले? >>>>
तेल नाय वो, चरबी वापरली, तेल असतं तर आज अरब लोकां एवजी इथले लोक्स सोन्याच्या कमोडवर बसले असते. Wink
मग पक्षी उडतो कसा? >>
आम्हाला विमान विद्या प्राप्त होती, जळले मले ते राइट ब्रदर्स..आमची इद्याच चोरुन नेली
त्याला चटका लागत नसेल का?>>> पंख जळत का नाही?>>
अखिल ब्रम्हांडात भ्रमण करण्यासाठी आमच्याकडे जी अवकाशयानं, होती ना त्यांच्यात आम्हीच तयार केलेलं insulation होतं... तेच पंखावर 'बी' वापरलं..

Light 1

बलवान असणे हे आपण शाकाहारी आहोत की मासाहारी आहोत ह्यावर माझ्यामते मुळीच अवलंबून नाही. आपल्या शरिराचा तोल आपल्याला सांभाळता आला पाहिजे. वाघ १०० टक्के मासाहारी आहे आणि तो बलवान आहे. घोडा, हत्ती, उंट हे शाकाहारी आहे पण त्यांची क्षमता वेगवेगळी आहे. आपल्या शरीरातील चरबी एकदा वाढली की शरिराला मर्यादा येतात. मग उठणे बसणे ह्या साध्या क्रिया देखील जड होतात. म्हणून काहीही खा फक्त चरबी वाढू देऊ नका.>>
असं कसं काहीही खा???? भांग, चरस, गांजा, दारु हे खाउन/पिउन थोडीच तोल सांभाळता येणारे..(चरबी नाय वाढत त्याने तरीबी

Light 1

आपल्या शरीरातील चरबी एकदा वाढली की शरिराला मर्यादा येतात. मग उठणे बसणे ह्या साध्या क्रिया देखील जड होतात. म्हणून काहीही खा फक्त चरबी वाढू देऊ नका.>>> पर्फेक्ट वाक्य. पोटावर चरबी वाढली की पाठदुखी होते आणी कमरेवर वाढली की डायबेटीसचा सम्भाव्य धोका. हे माझे नाही तर जागतीक आरोग्य परिषदेचे मत आहे. मध्यन्तरीच टाईम्स मध्ये वाचले, तर पाठदुखीबाबत सह्याद्री वाहिनीवर कार्यक्रम होता, त्यात बोलावलेल्या डॉ. नी सान्गीतले होते.

अवान्तरः एखादा जास्त शाणपट्टी (फिल्मी भाषेत) करत असेल, तर तुला जास्त चरबी चढलीय का रे असे म्हणतात.:फिदी:

सगळ्या कोंबड्या, बकऱ्या यांच्याकडे नेऊन सोडल्या पाहिजेत. बघुतरी किती दिवस पाळतात ते.

का? कुत्रे मांजरे उनाड फिरतातच की? तशा कोंबड्या बकर्‍या फिरतील. त्यांना कापून खाल्ले म्हणजे त्यांचा उपद्रव होणार नाही ही भावना फारच अमानुष आहे.

मी तर असे ऐकले आहे की फिलीपाईन्समध्ये भटकी कुत्री दिसतच नाहीत. दिसली की त्यांना पकडून कापून खाऊन टाकतात म्हणे.
तसेच, मुंबईत राहणाऱ्या काही नाजयेरीयन विद्यार्थ्यांनी कुठूनतरी एक माकड खरेदी करून आणले व मारून खाण्याच्या प्रयत्नात होते. पण त्याचा वास प्रचंड सुटल्याने रहीवाश्यांनी तक्रार केली आणि पोलिस येऊन त्यांना पकडून घेऊन गेले.
हा आमचा धार्मिक विधी असल्याचा दावा त्या विद्यार्थांनी केला म्हणे...

ब्राम्हण....

limbutimbu,

१.
>> पहिल्या संदर्भातील "द्विज" व "ब्राह्मण" हे दोनही शब्द मला गोंधळात टाकत आहेत.

द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्मणारा. मुंजीनंतर हा दुसरा जन्म होतो. माझ्या माहितीप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना मुंजीचा अधिकार आहे.

२.
>> दुसर्‍या संदर्भातील कुंतीपुत्र वा पांडव हे "ब्राह्मण" नसून "क्षत्रीय" होते असे आठवत असल्याने ते देखिल गोंधळात
>> पाडते आहे.

कुंतीपुत्र क्षत्रिय असल्याने त्यांची मुंज झाली होती. म्हणून ते द्विज आहेत.

आ.न.,
-गा.पै.

ब्राह्मण आणि तपी हे वेगवेगळे गणले जात.
बरोबर वाटते.
तपी लोकांना उच्चार शुद्ध ठेवणे भागच होते, कारण जे काय शास्त्र समजले जात होते ते जिवंत ठेवायचे तर पाठांतर हा एकच उपाय होता. मग या लोकांनी उच्चार शुद्ध ठेवायला जास्तीत जास्त प्रयत्न करणे साहाजिक आहे. तेंव्हा त्यांनी काय खावे व इतरांना काय चालेल हे वेगळे असणारच.

आजहि निरनिराळे विकार (रक्तदाब, मधुमेह) असणार्‍यांसाठी वेगळे आहार सांगतात.
निरनिराळ्या व्यवसायातील लोकांसाठी वेगळे वेगळे आहार सांगितले आहेत. गर्भारशी स्त्रिया बाळंत होईस्तवर त्यांचा आहार काय असावा, नंतर काय असावा यातले फरक आपण समजतो.
तीं पुस्तके वाचून लगेच हे चूक आहे कारण ज्यांना हे विकार नसतील, ज्यांची अवस्था तशी नसेल त्यांनी खुशाल खावे असेहि लिहीले असते. हे आपल्याला कळते.

फक्त आपल्या हजारो वर्षांपूर्वी लिहीलेल्या लिखाणाचे संदर्भ, त्याविषयी काही माहिती नसताना लगेच पुराणातील वांगी म्हणून त्याची हेटाळणी होते. सर्वच लिखाण संस्कृतमधे होते म्हणजे ते सगळे धर्मानुसार आचरण कसे करावे हे सांगणारे होते असे नव्हे. इतर विषयांबद्दलहि होते. आरोग्य, राजनीति, शृंगार सर्वांबद्दल लिहीले होते.
पण आपली अक्कल ब्राह्मण नि म्हैस एकाच पद्धतीने लिहावे असे समजणारी. फक्त दुसर्‍याची टिंगल केली की आपण शहाणे असे समजणारे लोक. क्काय फुक्कट पुराणांच्या गोष्टी करता? खरे तर कुठल्याच गोष्टीबद्दल मायबोलीवर चर्चा म्हणजे प्रचंड विनोद. चर्चा कसली, टिंगल टवाळी करणे हाच एक उद्देश.
ईहि हे लिहितो कारण मी मायबोलीवरच लिहीतो आहे! When in Rome,...............

>>पण आपली अक्कल ब्राह्मण नि म्हैस एकाच पद्धतीने लिहावे असे समजणारी. फक्त दुसर्‍याची टिंगल केली की >>आपण शहाणे असे समजणारे लोक. क्काय फुक्कट पुराणांच्या गोष्टी करता? खरे तर कुठल्याच गोष्टीबद्दल >>मायबोलीवर चर्चा म्हणजे प्रचंड विनोद. चर्चा कसली, टिंगल टवाळी करणे हाच एक उद्देश.

नका हो एवढे लखलखीत सत्य लिहू, मग अनेकांना हिंदू धर्म, संस्कृत आणि संस्कृतीला विरोध
करून आम्हीच काय ते समाज सुधारक यात मिळणारी मज्जा, होणारा टैमपास, इ. बंद पडेल ना. Wink

असो विषय होता शाकाहार आणि अध्यात्माचा. तर अध्यात्मामधे प्रगती करणेसाठी शाकाहारी असलेच पाहिजे असे नाही उदा. रामकृष्ण, विवेकानंद आणि बंगालमधले अनेक संतपुरूष
पण असले तर चांगलेच आहे.

झक्की, अचूक मर्मभेद....
महेश, तुमचेही बरोबर... त्याशिवाय मज्जा टैमपास बंद पडेल...
गामा, ओक्के, कळले आता, धन्यवाद.

बी ,
मी मा. बो वर नवीन असल्यामुळे आधी काय झालेत मला माहित नाहीये .
'जीवो जीवस्य जीवनम'. >>>
माझं हि हेच मत आहे . जगण्यासाठी दुसर्याला मारून खाण आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाण ह्यात फरक आहे कि नाही ? शाकाहारी प्राण्यांना मारून खाण्यासाठी देवाने मांसाहारी प्राणी निर्माण केले आहेत . त्याचा ठेका मनुष्याला दिलेला नाहीय्ये. पण माणसांनी मांसाहारी प्राणी तरी कुठे जिवंत ठेवलेत ?

बलवान असणे हे आपण शाकाहारी आहोत की मासाहारी आहोत ह्यावर माझ्यामते मुळीच अवलंबून नाही. आपल्या शरिराचा तोल आपल्याला सांभाळता आला पाहिजे. वाघ १०० टक्के मासाहारी आहे आणि तो बलवान आहे. घोडा, हत्ती, उंट हे शाकाहारी आहे पण त्यांची क्षमता वेगवेगळी आहे. आपल्या शरीरातील चरबी एकदा वाढली की शरिराला मर्यादा येतात. मग उठणे बसणे ह्या साध्या क्रिया देखील जड होतात. म्हणून काहीही खा फक्त चरबी वाढू देऊ नका. >>>

शरीराला बलवान करण अध्यात्माचा उद्देशच नाहीये . अध्यात्मात शरीराला दुय्यम स्थान असतं. मांसाहाराने शरीर बलवान होत असेल पण आत्मा दुबळा होतो त्याचं काय ? धाग्याच शीर्षक शाकाहार आणि अध्यात्म असं आहे .

शाकाहारी प्राण्यांना मारून खाण्यासाठी देवाने मांसाहारी प्राणी निर्माण केले आहेत >>
अगदी बरोबर . त्यातलाच एक प्राणी माणूस आहे इतकच .
देव अन अध्यात्म कळायच्या फार फार आधीपासून माणूस हा "प्राणी" मांसाहारी होता .

शाकाहार गुड फॉर हेल्थ , पार्शली अ‍ॅग्री . अर्थात पनीर टीक्का मसाला अन चिकन टीक्का मसाला खाण यात काही फरक नाही .

अध्यात्मासाठीही मेबी चांगला असेल .

पण खाणार्याला जे खायच असेल ते खाऊ द्या ना Happy

Pages