शाकाहार आणि अध्यात्म

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 30 January, 2015 - 08:19

हिंदू धर्मानुसार मनुष्य जन्म हा दैवदुर्लभ असतो . कित्येक योनी फिरल्या नंतर मनुष्य जन्म लाभतो . मनुष्य जन्माचे सार्थक किंवा Aim हाच असतो कि आपण देवत्व प्राप्त करून घेण्याकडे वाटचाल करावी .
जन्म हा आपापल्या पाप पुण्यानुसार मिळतो . जो विचार आपण धारण करतो त्यानुसार आपण वागतो . देवत्व प्राप्त करणे हे नवविधा भक्तीने शक्य असते . नऊ पैकी कोणताही मार्ग अनुसरणे याचे स्वातंत्र्य हिंदू धर्मात दिलेले आहे . पण त्याच बरोबर आपले विहित कर्म करता करता कुठल्याही प्रकारची भक्ती करावी असेच सुचवले गेले आहे.

देवाकडे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नामस्मरण करणे . यासाठी जीभ हे इंद्रिय आपल्या ताब्यात येणे आवश्यक असते . कारण त्यातून प्रकट होणारी वाणी ही जात उलट मार्गाने अभ्यासता आली तर आई सरस्वती आपल्याला ईश्वरानाजीक घेवून जाते .

आपण ज्या वाणीने एकमेकांशी बोलतो त्याला वैखरी असे म्हणतात . हे वाणीचे प्रकट रूप आहे .
वैखरी वाणी तून बोलण्याआधी जीभे ची जी हालचाल होवून शब्द प्रकट होऊ लागतो त्याला मध्यमा वाणी असे म्हणतात .

मनातून एखादी गोष्ट जेव्हा सुचते आणी बोलण्यासाठी जिभेला आज्ञा देते ते वाणीचे स्वरूप म्हणजे पश्यंती वाणी होय .

ही वाणीची तीन रूपे पार करण्यासाठी नाम स्मरण प्रत्येक वाणीत विशिष्ट संख्ये पर्यंत जपावे लागते . ती संख्या आणी त्या त्याव्यक्तीसाठी योग्य ते नाम सद्गुरु देतात कारण ते "शाब्दे परे च निष्णात असतात" . यानंतर आपल्याला बुद्धीची एक विशिष्ट पातळी प्राप्त होते ज्याला ऋतंभरा प्रज्ञा असे म्हणतात .
म्हणजेच एखादा साधक मोठ्याने [ वैखरी ] नाम विशिष्ट संख्ये पर्यंत घेइल.
त्यानंतर जिभेला वळण लागले की तेच नाम तोंडातल्या तोंडात पुटपुटेल [ मध्यमा ] पण इथे वेग वाढलेला असतो .
फक्त मनात जप करणे म्हणजे [ पश्यंती ] वाणी मध्ये जप करणे .
यानंतर परा वाणी म्हणजे आपल्याला जे मनात सुचते त्याचे मूळ रूप . मनातले देवत्वाचे दार उघडायला या वाणीत म्हणजे मनातल्या मनात नाम घ्यावे लागत नाही तर आपले अंतरमन सतत नामच घेते . जसे झोपेतून उठणे, झोप लागणे , भूक लागणे इत्यादी कामे अंतर्मन सहज करत असते त्याप्रमाणे ते सहज आणि सतत नाम घेवू लागते . त्यानंतर देवत्व प्राप्त होते.

आता जर याहून जास्त प्रगती करावयाची असेल तर काय करणार ? भगवंताने त्याहीसाठी short cut दिलेले आहेत . त्यांना मंत्र म्हणतात . मंत्र हे भौतिक तसेच मानसिक लाभासाठी असतात . पण ते सिद्ध व्हायला विशिष्ट दिनचर्या पाळावी लागते जी साधकांना आवश्यक असते .

आपण वर पाहिले त्याप्रमाणे एका वाणीतून दुसर्या वाणीत प्रवेश करताना जे सामिष खाणारे असतात त्यांना खूप वेळ लागतो . त्यामुळे सर्व वारकरी माळकरी लोक सामिष [ nonveg ] खात नाहीत . कारण त्यामुळे आध्यात्मिक प्रगती उशिरा होते. तीच बाब मंत्रांची असते . योग्य उच्चार व्हायला आणि तोही पश्यंती आणी परा वाणीत - सामिष आहार अडथळे आणतो. याचे effects पिढ्यानुपिढ्या होतात . अध्यात्मिक साधकाने मंत्र, वेदोच्चारण करणे आवश्यक असते म्हणून सामिष (मांसाहारी पदार्थ )खायचे नसते .

सामिष खाणाऱ्यांचे गायत्री मन्त्राचेहि उच्चार चुकतात -द्वापार युगात तसेच कली युगात ब्राह्मणांच्या जिव्हेच्या शक्तीला मर्यादा आहेत . त्यामुळे ब्राह्मण या युगात मांसाशन करू शकत नाहीत असे सर्व ऋषींनी सांगितलेले आहे . [ संदर्भ : भागवत ]
-----------------------
शाकाहार करणार्याने रोज पंचामृत प्यावे म्हणजे B १२ ची कमतरता कधीही भासत नाही . तसेच वाटीभर मुग किंवा तूर ही अंड्या पेक्षा जास्त आणि सुपाच्य प्रथिने देते . त्यामुळे अंडी खाल्लीच पाहिजेत वगैरे प्रचार फारसा खरा नाही . [ डॉ बालाजी तांबे यांच्या मार्गदर्शनातून ]

आपला सगळ्या सर्वसामान्यपणे शाकाहारी आणि मांसाहारी यात चांगलाच गोंधळ उडालेला दिसतो. कृपया मी जे खाली लिहीत आहे ते ते लक्षात ठेवावे व त्याचा प्रसार करावा, ही विनंती .

[१] रस [ Glandular Secretions etc , ]
[2] रक्त [ Blood ]
[3] मेद [ Animal Fat ]
[4] मांस [ Muscles ]
[5] अस्थी [ Bones ]
[6] मज्जा [ Nerves, Bone Marrow ]
[7] शुक्र [ Reproductive and power Mgmt ]

हे ७ पैकी रस सोडून इतर एक जरी धातू जागृत किंवा सुप्त अवस्थेत असतात त्या सर्व वस्तू मांसाहारी .

वस्तू मध्ये फक्त रस असणे हे शाकाहारी.

साखर जर बोनअ‍ॅश वापरून तयार केली जात असेल तर ते योग्य नाही. भारतामध्ये अश्या प्रकारे साखर तयार करण्यावर बंदी आहे.

दुध पूर्णत: शाकाहारी आहे. हे वरील गोष्टीवरून लक्षात येईल.

संदर्भ- आचार्य मंदारशास्त्री संत ,पुणे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आध्यात्म वगैरे उच्च प्रतीची बौद्धिक चर्चा किंवा विचार करण्याची आपल्या मेंदूची क्षमता आपल्या पूर्व़जांनी भरपूर व वैविध्यपूर्ण मांसाहार केल्यानेच तयार झाली आहे, एवढे लक्षात असूद्यात!

नाही मनुष्याची उन्नती होत गेली. त्यानी शोध लावले. पुर्वी माहिती नव्हते म्हणून त्याने मासाहार केला. नंतर शेतीचा शोध लागला. प्राण्यांना न मारता काय खाता येईल असा त्यानी बहुदा विचार केला असेल म्हणून कदाचित शाकाहाराची निर्मिती झाली असेल. पुर्वी माणूस कपडे घालायला नाही .. आज ही पद्धत आहे का ? नाही ना? !

बी, मी लिहिले आहे ते काही माझे वैयक्तिक मत नव्हे, इट्स ए सायंटीफिक फॅक्ट.
शोध लावणे, माहिती होणे, अमुक-तमुक विचार करणे, निर्मितीकरणे, नैतिक-अनैतिक भंकस करणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूला आज शक्य आहेत त्या आपल्या पूर्व़जांच्या मांसाहारजन्य हाय प्रोटीन डाएट्मुळेच.

देव अन अध्यात्म कळायच्या फार फार आधीपासून माणूस हा "प्राणी" मांसाहारी होता .>>>
असेल . कारण शेती करण , भाज्या पिकवण हे त्याला माहित नसेल . रानटी प्राण्यांना शिकार करून खाताना बघून असंच खायचं असतं असं त्याला वाटलं असेल . ह्यात त्याची चूक नसल्यामुळे त्याला पाप पुण्याचे हिशोब पण लागू होत नसतील. आता वाघ मांस खातो म्हणून काय तो पापी होतो का ? माणूस हा शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही आहे . शाकाहार मिळाला नाही तर त्याचं अडायला नको म्हणून मांसाहार पण पचवण्याची ताकद त्याला दिली आहे पण ह्याचा अर्थ त्याने मुद्दाम मांसाहार करावा असं होत नाही .
पण खाणार्याला जे खायच असेल ते खाऊ द्या ना >>
ठीक आहे . शेवटी ज्याचं त्यालाच भोगायचं अहे. जीवाला पकडणारा , त्याला मारणारा आणि खाणारा अश्या तिघांवरही कर्मभोग लागू होतो .

नैतिक-अनैतिक भंकस करणे >>
नैतिक-अनैतिकतेचं सोडा . एखाद्या जीवाला मारताना वेदना होतात , तो तडफडून प्राण सोडतो हे तर समजतंय ना . नरमांस खाण्याच्या सुधा पद्धती जगात आहेत . म्हणून शाकाहाराची टिंगल करणार्यांना मारून खाल्लं तर चालेल का ?

>>>> इट्स ए सायंटीफिक फॅक्ट. <<<< ह्यासही मी "अंधश्रद्धा" म्हणले तर काय हरकत आहे?

>>>> शोध लावणे, माहिती होणे, अमुक-तमुक विचार करणे, निर्मितीकरणे, नैतिक-अनैतिक भंकस करणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूला आज शक्य आहेत त्या आपल्या पूर्व़जांच्या मांसाहारजन्य हाय प्रोटीन डाएट्मुळेच. <<<<<
आयला असे आहे तर मग गेली काही हजारो वर्षे वाघसिंहमगरी इत्यादिक प्राणी केवळ अन केवळ मांसाहारच करीत आले आहेत, तर त्यांचे मेन्दू माणसाहून श्रेष्ठ बनलेले दिसायला हवे होते, तसे का नाहीये झालेले?

मला आगाऊने नमुद केलेले फॅक्ट पटले नाही. आय मीन हे फॅक्ट मी कधी वाचलेले नाही. आगाउ लिंक मिळेल ह्या बद्दल माहिती मिळेल अशी? धन्यवाद.

पण पुन्हा तोच तोच मुद्दा येतो आहे शाकाहारी की मासाहारी? पाप पुण्य? इत्यादी इत्यादी. मागे की ह्यावर भरपुर चर्चा केली होती आणि मग तो बीबी तिथे थांबला Happy

उतारा वाचून बुद्धी जागृत झाली आहे, ती काय ती ऋतंभरा प्रज्ञा सुद्धा भेटली आहे, त्यामुळे आज रात्री प्रज्ञा बरोबर सामिष जेवणाचा बेत आखावा म्हणतो.

ठीक आहे . शेवटी ज्याचं त्यालाच भोगायचं अहे. जीवाला पकडणारा , त्याला मारणारा आणि खाणारा अश्या तिघांवरही कर्मभोग लागू होतो .>>.. सारीका, तुम्ही थोडक्यात पण छान लिहीता, आवडले.:स्मित:

नरमांस खाण्याच्या सुधा पद्धती जगात आहेत . म्हणून शाकाहाराची टिंगल करणार्यांना मारून खाल्लं तर चालेल का ?
<<

अगदी अगदी. नक्कीच चालेल. शाकाहारी आम्हाला खाऊन मांसाहार्‍यांत येणार असतील तर आम्ही आमचे सर्व धातूयुक्त मांस एण्यास तात्काळ तयार आहोत. (इब्लिसाचे मांस नरमांस होईल की नाही या चर्चा फाट्यास कृपया वेगळा धागा काढावा Wink )

एक कळत नाही, कुणी थोडं थोडक्यात छान समजवून सांगितलं तर बरं होईल.

त्या बकर्‍याच्या जन्मास आलेल्या कुणा प्राण्याला त्या बोकडयोनीच्या फेर्‍यातून कुणा मुलाण्याच्या हस्ते लवकर बाहेर काढण्याची योजना त्या जगन्नियंत्यानेच केली असेल, तर तमाम शाकाहार्‍यांना काय अडचण आहे बरे?
शिवाय मुलाणी-खाटकाला अल्लाने कर्मविपाक लागू केल्याचा जी.आर. काही पाहण्यात आलेला नाही Wink त्याची प्रत पहावयास मिळेल का?

Lol

>>>Milton said that her theories do not reflect on today's vegetarian diets, which can be completely adequate, given modern knowledge of nutrition.

"We know a lot about nutrition now and can design a very satisfactory vegetarian diet," said Milton, a professor in the Department of Environmental Science, Policy & Management. <<<

अजब चर्चा

आगावा, नको रे अशा धर्मबुडव्या गोष्टी लिहूस.. काळजाला घरे पडली>> वरदातै, भरपूर मांसाहाराने पुष्ट व वर्धिष्णू झालेला माझा धर्म असा तसाच कसा बुडेल? Proud

ह्या! ओ काउ मी आजकाल शिकरणात दूध अज्याबात घालत नाय. फकस्त केळे आन साखर, वरुन तुपाची धार. लय मज्जा येती खायाला. नुसता फोटु कशाला चिपकावला?ऑ!

>>We know a lot about nutrition now and can design a very satisfactory vegetarian diet," said Milton, a professor in the Department of Environmental Science, Policy & Management. <<<

यातील Department of Environmental Science, Policy & Management हे कळीचे शब्द! त्यामुळे हे विधान करताना अँगल वेज की नॉनवेज हा नाही आहे तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि मांसाहारासाठीचे मीट प्रॉडक्शन यासाठी थेट स्वरुपात आणि फीड तयार करण्यासाठीची गवत/धान्य लागवड स्वरुपात जमिन, पाणी वगैरेचा जो वापर होतो त्याचा पर्यावरणावर होणारा घातक परीणाम याबाबत आहे.

आध्यात्म वगैरे उच्च प्रतीची बौद्धिक चर्चा किंवा विचार करण्याची आपल्या मेंदूची क्षमता आपल्या पूर्व़जांनी भरपूर व वैविध्यपूर्ण मांसाहार केल्यानेच तयार झाली आहे, एवढे लक्षात असूद्यात!>>>>> बरोबर आहे पण आपल्या वाढलेल्या मेंदुच्या क्षमतेमुळे आपण सहज पणे मांसाव्यतिरिक्त इतर अन्न पदार्थ पिकवू शकतो/तयार करु शकतो. थोडक्यात आपल्या गरजा भागवायला मांसाहार हाच एक ऑप्शन नाहीये (जो पुर्वी होता, आपली बौद्धिक क्षमता कमी असल्याने).
ह्याउपर आता जर आपण पृथ्वी वरचे सगळ्यात जास्त बौद्धिक क्षमता असलेले प्राणी झालो आहोत तर आपल्यावर नैतिक जबाबदारी येऊन पडते इतर प्राणीमात्रांना नीट जगण्यास मदत करण्याची. Happy
हे मी एक फक्त विचार म्हणून सांगतोय. मांसाहार करणे हा कल्चर, आवड ह्याच्याशी संबंधित मुद्दा आहे. तो एक चॉईस आहे गरज नाही. मी स्वतः ४ वर्षांपुर्वी पर्यंत मांसाहार करत होतो त्यामुळे मांसाहार करणार्‍या लोकांवर ताशेरे वगैरे ओढायचा आजिबात हेतू नाहीये. Happy

म्हणून शाकाहाराची टिंगल करणार्यांना मारून खाल्लं तर चालेल का ?
>> काही लोक शाकाहाराची टिंगल करत असतीलही . मी तरी नाही .माझा शाकाहारी लोकांबद्दल प्रचंड आदर आहे . माझे ऑफिसमधील दोन सहकारी पक्के व्हेज असल्याने मी कधीही ऑफिसम्धे त्यांच्यासमोर नॉन व्हेज खात नाही .

पण त्याहीपेक्षा जास्त शाकाहारी लोक मांसाहारी लोकाना नाव ठेवतात . त्यातील काही तर मांसाहारी म्हणजे माणूस नाहीतच अशा आविर्भावात असतात . Sad
होलिअर दॅन दाऊ चा राग येतो तो अशा लोकांमुळे.
रोज दिवस रात्र मांस खाऊन परोपकार करणारा माणूस रोज उपवास करून लोकाना लुबाडणार्या माणसापेक्षा देवाला अधिक प्रिय नसेल अस मानणार्यांच कठीण आहे .

ज्याला जे खायचे ते खाऊ द्या . काय कर्म भोग वगैरे भोगेल तो Happy

>>>मांसाहार करणे हा कल्चर, आवड ह्याच्याशी संबंधित मुद्दा आहे. तो एक चॉईस आहे गरज नाही.<<<

अनुमोदन!

केदार,

आहारशैलीमुळे आदर वाटणे हाही एक गोंधळ वाटत आहे मला तरी.

वनस्पतींच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत. वनस्पतींमध्ये जीव असतो असे मान्य केले तर जवळपास सर्वच सजीव दुसर्‍या जिवाला मारून खातात असे म्हणावे लागेल. (दगड खाणारा कोणी सामुद्री प्राणी / मासा असतो असे ऐकून आहे, असे काही सजीव सोडले तर).

त्यामुळे वैद्यबुवा म्हणतात त्याप्रमाणे तो संस्कृती, आवड ह्यापुरताच मुद्दा गणला जावा. इव्हॉल्व्ह होण्यासाठी / होताना / होण्यापुरता मांसाहार 'मस्ट' होता असा निष्कर्ष निघणे ह्याचा अर्थ मांसाहार हा सार्वकालीन शाकाहारापेक्षा श्रेष्ठ ठरतो असा होत नाही. मेंदू विकसित झाल्यानंतर शाकाहारासाठीची तंत्रे विकसित झाली. धावत सुटणारा प्राणी पकडत बसण्यापेक्षा एकाजागी असलेले झाड कापणे सोपे!

मूळ लेखाशी असहमत आहे.

केदार,

आहारशैलीमुळे आदर वाटणे हाही एक गोंधळ वाटत आहे मला तरी.

>> लहानपणापासून आजी / आजोबा किंवा माळकरी लोक शाकाहारी जास्त पाहिल्यामुळे असेल कदाचित Happy

अर्र! बी आणी काउ, आय्येम रीअली सॉरी. केळ्यामुळे मला ते आधी शिकरण वाटले. पण खरे तर शाका-मान्साहार सोडा बाजूला. पण काहीही खाल्ले तरी तुमची सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवा म्हणजे झाले.

बी वाद नाही पण एक उदाहरण देते ( काय विचीत्र सवय लागलीय मला माहीत नाही). माझ्या नातेवाईकान्मध्ये सासरी बहुतेक लोक मान्साहारी आहेत. ( मी आणी सासु, माझे आई वडिल सोडुन ) तरीही मोठ्या विषयी आदर-प्रेम आणी इतरान्विषयीचा माणुसकी धर्म कुणाचाही कमी झालेला नाहीये.

शेवटी आपण कसे वागतो ते मुख्य. एखादा पूर्ण शाकाहारी असलेला सावकार, शेतकर्‍याची जमीन लुबाडु शकतो, तर दुसरा मान्साहारी व्यक्ती दुसर्‍याला घासातला घास काढुन देतो अशीही उदाहरणे आहेत जगात. वैयक्तीकरित्या मला शाकाहार आवडतो, पण मी दुसर्‍याला कधीच तसा/तशी हो म्हणून सक्ती करत नाही, आणी करणार पण नाही.

>>अध्यात्मामधे प्रगती करणेसाठी शाकाहारी असलेच पाहिजे असे नाही
>>उदा. रामकृष्ण, विवेकानंद आणि बंगालमधले अनेक संतपुरूष

हे लोक मांसाहारी होते तरी त्यांच्याबद्दल भारतालाच नाही तर जगाला आदर आहे. Happy
डू यू नो अनादर केस ? Wink

डू यू नो अनादर केस ? >>>>. आणी क्रुरकर्मा हिटलर शाकाहारी होता.:अरेरे: ( असे वाचलय, खखोदेजा)

Pages