लसुणाची झट प ट चटनी

Submitted by SUMITRA JADHAV on 22 January, 2015 - 09:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लसुण कान्ड्या दोन, लाल मिरची पावडर, मीठ चविपुरते.
प्रथम लसुण सोलुन घ्या प्रत्येक पाकळीचे दोन काप करा. आता छोट्या कढई मध्ये तेल टाकुन तापू द्या. थोडिशी मोहरी फोड्णी घाला, तेल चान्गले तापल्यावर कापलेला लसूण टाका, चान्गले बदामी होईपर्यत
कमी गॅसवर होउद्या. नंतर मिरची पावडर व मीठ घाला. गॅस बंद करा. कुरकुरीत खमंग चटणी तयार. संध्याकाळी खिचडी सोबत छान लागते.

क्रमवार पाककृती: 

प्रथम लसुण सोलुन घ्या प्रत्येक पाकळीचे दोन काप करा.
आता छोट्या कढई मध्ये तेल टाकुन तापू द्या.
थोडिशी मोहरी फोड्णी घाला,
तेल चान्गले तापल्यावर कापलेला लसूण टाका, चान्गले बदामी होईपर्यत
कमी गॅसवर होउद्या. नंतर मिरची पावडर व मीठ घाला. गॅस बंद करा. कुरकुरीत खमंग चटणी तयार. संध्याकाळी खिचडी सोबत छान लागते.

अधिक टिपा: 

लसुण जळु देउ नये.

माहितीचा स्रोत: 
माझी आजी बनवायची
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या कडे पण असा कुरकुरीत लसूण करतात. वाटीभर लसणीचे तुकडे घ्यावे. ते बुडतील इतक्या तेलावर फोडणी टाकून त्यावर लसूण टाकावा व ताम्बूस करून घ्यावा. होत आल्यावर त्यात खोबर्याचा कीस टाकावा. व अजून थोडा परतू द्यावा. वरून चवीप्रमाणे मीठ व आवडीप्रमाणे तिखट घालावे. थंड झाल्यावर कुडकुडीत तोंडीलावणे छान लागते.

मला खुप आवडते लसणाची चटणी, नेहमी घरी असते. पण कधी केली नाही बाजारातुन विकत आणली आहे. आता करण्यात येईल.