आवळा त/टक्कू

Submitted by मंजूताई on 16 January, 2015 - 04:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवळे ६ मोठे, किसलेलं आलं २ चमचे, लिंबू १ चवीनुसार मीठ, तिखट, गूळ, फोडणीचं साहित्य - तेल, मोहरी हिंग, हळद, मेथ्या

क्रमवार पाककृती: 

आवळे धुवून कोरडे करुन किसून घ्या, इतर साहित्य व लिंबाचा रस घाला. फोडणी थंड करून घाला व हलवून एकत्र करा. चविष्ट त/टक्कू तयार.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

मीठ व्यवस्थित घातले तर बरेच दिवस टिकतो. आल्याचा स्वाद छान लागतो. कच्चा आवळा जास्त खाल्ल्या जात नाही व कोण्त्याही स्वरुपात आवळा खाल्लातरी त्याचे पौष्टीक गुणधर्म कायम राहतात.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोपी रेसिपी आहे.
मी आवळ्याचं कधी काही केलं नाही.. हे करून पाहते या वीकेंडला.

तुरटरस आपल्या जेवणात कमी असतो व आवळा बहुगुणी आहे सर्वश्रुतच आहे म्हणून ताजे आवळे मिळताहेत तोपर्यंत रोज एकतरी आवळा पोटात गेला पाहिजे....

Pages