क्रॅनबेरी कांदा लोणचे

Submitted by Adm on 6 January, 2015 - 21:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ पाकीट ताज्या क्रॅनबेरीज
२ मध्यम कांदे (किसून)
१ चमचा तिखट
१ वाटी गुळ
चवीप्रमाणे मिठ
फोडणीसाठी मेथ्यांचे दाणे, हिंग आणि तेल (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

१. क्रॅनबेर्‍या धुवून, निथळवून घ्याव्या.
२. एका खोलगट भांड्यात क्रॅनबेर्‍या घालून मध्यम आचेवर ठेऊन द्याव्या.
३. थोड्यावेळाने त्या मऊ होऊन फुटायला लागल्या की डावाने किंवा मॅशरने घोटत रहावं.
४. त्याच्या लगदा तयार झाला की गॅस बंद करून त्यात किसलेला कांदा, गुळ, तिखट आणि मिठ घालून चांगल ढवळावं. कांदा शिजवायचा नाहीये. त्यामुळे गॅसवरून उतरवून मगच कांदा घालावा.
५. गुळ विरघळला की लगेच खाता येतं. पण मुरल्यावर दुसर्‍यादिवशी जास्त चांगलं लागतं.
६. पाहिजे असेल तर गार झाल्यावर वरून तेल, हिंग आणि मेथ्यांची फोडणी द्यावी.

पोळी, ब्रेड, भात कशाबरोबरही छान लागतं.

वाढणी/प्रमाण: 
एक वाडगा भरून होतं
अधिक टिपा: 

स्वातीच्या रेसिपीने क्रॅनबेरी सॉस करून पाहिला. तो अगदी मेथांब्यासारखा लागला. त्यामुळे कैरी कांदा लोणच्यात कैरीच्या जागी क्रॅनबेरी घालून प्रयोग करून बघायचं ठरवलं. त्यात कैरी कच्ची घालतात. पण क्रॅनबेर्‍या कच्च्या खाणं शक्य नसल्याने त्या शिजवून लगदा करून मग त्यात बाकीचे पदार्थ घातले. (कोणी कच्चा क्रॅनबेरीचा करून पाहिलं तर खाता आलं का ते सांगा). मेथ्यांची फोडणी दिली नाही तरी चालेल. फ्रिजमध्ये आठवडाभर टिकू शकेल पण आमचं दोन दिवसातच संपलं.

माहितीचा स्रोत: 
'क्रॅनबेरी सॉस' आणि 'कैरी कांदा लोणचं' ह्या रेसिप्यांचं फ्युजन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदा कैरी खूप आवडते त्यामुळे करुन बघेन! कांदा न शिजवता आठवडाभर टिकेल का?
भा. प्र. : क्रॅनबेरीमधे बिया नसतात का?

kachya cranberry khayala avadataat. tyachya barik fodi kelyaki murun chan lagel i guess. crunchy pan rahil kadachit.

लागतात का चांगल्या ? मी खाल्ल्या त्या फारच जास्त आंबट, तुरट होत्या.. ! त्यामुळे त्या शिजवून घेतल्या..

जिज्ञासा.. नसतात बिया.. म्हणजे निदान लागत तरी नाहीत..

मी कधी खाल्ल नाहीये कैरी-कांदा लोणचं. त्यामुळे क्रॅनबेरीज घालून कसं लागेल अंदाज येत नाहीये. फोटो टाक की.

सिंडी, क्रॅनबेरी सॉससारखच दिसतं.. फार काही वेगळं नाही.. तिथले फोटो बघून घे ह्याचे समजून.. Happy

ड्राय क्रॅनबेरीचा चांगला होईल असे वाटतेय >>> म्हणजे ? फ्रोजन का? की ड्राय वेगळ्या? इथे कधी पाहिल्या नाहीत.. आता शोधेन..

बर्बर.

ड्राइड क्रॅनबेरीज (क्रेझिन्स) मिळतात इथे ग्रॉसरी स्टोअरमध्ये. ट्रेलमिक्समध्ये आणि सॅलडबारवर हमखास असतात.

ताज्या मिळेनाशा झाल्यात का मृण? आमच्याकडे अजून मिळत आहेत. मी थोडा आणखी सॉस करण्यासाठी कालच आणल्या Happy

प्रोड्यूस सेक्शनमध्ये नाही दिसल्या. तिथे काम करणार्‍यांना विचारायला थांबले नाही. फार्मर्स मार्केटात फ्रेश नक्की मिळतील.

केलं आणि खाल्लं. चवीला आवडलं.

लोणच्यापेक्षा चटणी म्हणून खपेल. Happy

मध्यंतरी हॅलापिन्यो, क्रॅनबेरी-कांदा डिप प्रकार खाल्ला होता. साधारण तसं लागतंय. कांदा पांढरा राहिला नाही. त्यालाही मजेंटा रंग आला. जरा पाणी सुटलंय. तेव्हा लवकर संपवावं लागेल.

cranberry-kanda-chaTaNee-maayboli.jpg

अरे वा केलस पण का मृ ? सहीये..
बायदवे, त्या लोणचं/चटणीला पुष्प का अर्पण केलं आहेस ? Happy

व्हेरिएशन इन्टेरेस्टींग आहे ..

मृ, पुष्प वगैरे अर्पण केलंस पण लोणच्याचं स्टॅटस एकदम "डिस्पोजेबल" दिसत आहे तुझ्या ठायी .. Wink