निसर्गाच्या गप्पा (भाग -२४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 December, 2014 - 06:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!

मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!

कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्‍या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!

धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:

ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्‍या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.

परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्‍याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!

गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्‍याखुर्‍या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्‍या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!

..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!

(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खोटा वा दि.?::दिवा:
जिप्सी Angry
दिनेश दा... काय पण लोक पार्ट्या उकळण्या साठी तुम्हाला दोन दोन वेळा शुभेच्छा देतात...:G Biggrin Biggrin
आणि ते सगळे पक्वान्न गुर्जीन्च्या आवडीचे आहेत का? Happy की पार्टी मधे हवे आहेत...G Biggrin :

जिप्स्याने दिली कि मला पार्टी ! बाकिच्यांना नाही दिली अजून ??>>>??????????????????????????????
हे काय ऐकतोय काय आम्ही जिप्स्या??????? शो ना हो हे तु!!!!! (हे म्हंजे पुणेकरांच्या वर्ताण झालं की!!!) {कृपया हे हलकेच घेणे - म्हंजे पुणेकरांनी बर्का!! जिप्स्याने नाही!!}
जिप्स्या.... लेकीचं नाव ठेवलंस, दिनेशदांना एकट्यांना पार्टी दिली (आता ह्यात बाकीचे मुंबैकर पण आहेत की क्काय????) आम्हाला नै बोलवलंस! काय हे? ऑ? समस्त आत्या आणि मामा आणि काका नाराज बर्का!

दिनेशदा Happy

शांकली, नाही अजुन लेकीचं बारसं नाही केलंय Happy

दिनेशदा, सॅण्डविच आणि कॉफीला पार्टी म्हणतायत. Happy इतक्या स्वस्तातली पार्टी पाहिजे तर मी तय्यार आहे. Wink Proud

कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू,>>>>मि.बी खुपच सुन्दर ऑळ आहे .या ॠतुतल्या
फळाफुलान्च ट्वटवीत सतेज रुपड अगदी योग्य शब्दात रेखाटले आहे.प्रतिसादास उशीर कारण गद्य वाचण्ञाचा
आळस आणी अजुन नीट टाईप करता येत नाही.मात्र तुम्हा सर्वान्च्या नुसत्या गप्पा वाचल्या तरी मनाची मरगळ दुर होते .सर्वाचेच आभार....

आपण निसर्गाचा लहरीपणा हा शब्द भारतात खुप वेळा वापरतो.. पण तरी मी म्हणेन त्यातही एक नियमितपणा आहेच.
इथे अंगोलात रोज निसर्गाचे नवीन रुप दिसते. इथल्या हवामानात समुद्रातील प्रवाह देखील महत्वाची भुमिका बजावतो. कधी कधी अचानक तपमान खुप वाढते. पावसाचे काही सांगता येत नाही, कधीही पडतो.

खुप दिवसांनी माबोवर येणे झाले.
शशांकदा प्रचंड उशिराने वा.दि.च्या शुभेच्छ्या.
रिया तु सांगितलेली माहिती माझ्याही एकण्यात आहे. ती मुलगी कोमात गेली होती नंतर तिचे काय झाले कळले नाही.
माझ्या नवर्यांला कच्च्या भाज्या खायची सवय आहे. पण बरेचदा मला भीती वाटते. अगदी हेच उदाहरण मी त्याला गेल्या रविवारी दिले तर त्याने साफ दुर्लक्ष केले. आता आज ही पोस्ट दाखवते.

सायली, रांगोळी मस्त.

सश्या, तण उपटायचे, त्याच्यावरची माती झटकुन घ्याय्ची आणि तण फेकुन माती वापरायची. तण म्हणुन वाढणारे गवत जे असते ते जमिनीला समांतर धावते आणि जरा दुर्लक्ष झाले की कुंडी भरुन जाते. अतिशय बेक्कार असते ते गवत. आमच्याकडे त्याला हरयाळी म्हणतात. माझ्या कुंड्यांमध्ये मी त्याला वाढाउयला देतच नाही. त्याला जरा जरी चान्स मिळाला की मुळ रोपटे गेलेच कामातुन म्हणुन समजा.

मी बर्याच दिवसांनी आले.
दिनेशदा, वाढदिवसाच्या खूप उशिराने शुभेच्छा !
मस्त माहिती मिळतेय. जागू डॅनीशेठ मस्तच आहेत

संक्रांती दरम्यान तामिळ लोकांना पुजेसाठी हळदीची रोपे लागतात. चेंबूरमधे खुप बघितली.. !
मला बालीला पांढरी हळद बघायला मिळाली होती. चव तशीच, वास तसाच फक्त रंगाने फिक्कट. तिचा चहा ( ? ) आणलाय. पिऊन गोरा होईन म्हणतोय Happy

दिनेश, प्रज्ञा.. Rofl

इंडोनेशियन स्वैपाकात नेहमी ओली हळद वापरली जाते , ओल्या नारळाबरोबर छान पैकी बारीक वाटून..

सायली लोणचं संपलं कि काय एव्हढ्यात???

अrevwa अन्जु ताई..

प्रध्न्या.....
वर्शु दी आhw लोणच... फोटो टाकते मग...ओlली ह. ना र ळा चे कोम्बी छान च लागत अ से ल नाही...

हो सायली पण आता कोणाला होत नाही हळद करणं. एक unmarried आत्या राहते गावाला तीपण वयस्क आहे आता आणि माझ्या आईबाबांचे पण वय झालं. भाऊ, चुलतभाऊ यानाही जमत नाही गावाला जाऊन करायला त्यामुळे सध्या दोन तीन वर्षे हळद विकत घेतो आम्ही. नाहीतर कायम माहेरची हळद यायची सर्वांनाच Happy

प्रज्ञा .. नक्कीच !

हळदीवर प्रोसेस करून जी हळकुंडे करतात ती चव आणि ओली हळद वापरली तर येणारी चव थोडी वेगळी असते ना वर्षू ?
ओली हळद कशी टिकवायची ? ( लोणचे न करता ! )

हो दिनेश, ओल्या हळदी ची चव फारच सुगंधित असते Happy
ती बहुतेक टिकवता येत नाही .. मेड्स पैकी एकीचं रोज वेट मार्केट मधे जाऊन फ्रेश भाज्या आणण्याचं काम होतं.. बारा महिने फ्रेश मिळत असल्याने ती टिकवावी असं काही मनात आलं नाही

इव्हन, हळद पावडर वापरण्यापेक्षा आयत्यावेळी हळकुंडे तळून घेतली तर जात चवदार लागतात. मालवणला आमच्या घरी तसे करत.

इंडोनेशिया सारख्या देशात.. कायम दमट हवामान असते ना. वर्षभर ताजी हळद मिळणे कठीण नाही.

सायली, हळदीचे लोणचं (फोटो) मस्तच Happy
थोडं मुंबईला पाठवून द्या Happy (रच्याकने, मुंबईत मिळेल का ह.लो.? मी अजुन याची चव घेतली नाही Sad )

Pages