भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
कपाळजिहाद आहे हा. Wink
लोक असे फॉरवर्ड्स वाचतील आणि कपाळ बडवुन घेत रहातील असा डाव आहे त्यामागे.

अचाट मेसेज आहे खरा.

… स्त्रियांमध्ये बीज वाढू नये; शोणित वाढावे. गायत्रीजप केला तर, शोणित जळून जाईल.

शोणित = स्त्रियांना पाळीत येणारे रक्त.
ते जळून जाईल ❓ कसे ❓ते कोणत्या मंत्राने वाढवावे म्हणे ❓ 😁

….कपाळजिहाद… शब्द आवडलाय.

😁

फक्त पहिले बावीस अक्षरच म्हणायची मग. >> Lol अगदी हेच म्हणणार होतो.
बाकी शोणिताचं आयुष्यातील काम झाल्यावर ते असं मत्रबिंत्र म्हणून एकदाचं जळून जाणार असेल तर स्त्रीया दुवाच देतील. Lol Wink

इतक्या नाड्यांबद्दल वाचून -
जानती हो इतना तो, बदन में लाखो नाडी
बोलदो मेरी खातिर, कहाँ है प्यार की नाडी

हे आठवलेलं आहे Proud

यांच्या मते लाखो नाड्या असतानाही आपण बावीस की चोवीस असा वाद घालत आहोत. धिक्कार असो! Proud

बदन में लाखो नाड्या …

आणखी एका अचाट फॉरवर्डचे पोट्यांशियल दडलेले आहे इथे. Lol

नवर्याच्या सर्व नाड्या बायकोच्याच हातात असल्यामुळे बायको नी गायत्री मंत्र नाही म्हटला तरी चालेल. फक्त नवर्याच्या सर्व नाड्या पकडून ठेवायच्या.

हम छोडेगा नही जी...ये पकड के रखना जी.

बोलदो मेरी खातिर, कहाँ है प्यार की नाडी>>>> रमड चं काय वेगळंच गणित Lol
स्त्रिया & गायत्री मंत्र डिसगस्टींग फॉ आहे हा.. कपाळजिहाद लॉल..

पुरुषांना शेवटच्या दोन नाड्या ज्याप्रमाणे दाढी मिश्या आणि प्रोस्टेट ग्रंथी साठी वापरता येतात / दिल्या आहेत तसे स्त्रियांना उरलेल्या दोन नाड्या गर्भधारणा आणि सौंदर्यासाठी / भावनाप्रधानतेसाठी (येथे वाचकांनी स्त्री स्पेसिफिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्याही गोष्टी वाचाव्यात) दिलेल्या असू शकतात ना?

एवढ्यासाठीच हल्ली ट्रॅक पँट घेताना मी इलास्टिक असले तरी नाडी सुद्धा आहेना हे कन्फर्म करूनच घेते. आधीच दोन नाड्या कमी आहेत.. ती कमतरता खूप आहे. ट्रॅक पँटला नाडी ही हवीच !!

आधीच दोन नाड्या कमी आहेत.. ती कमतरता खूप आहे. ट्रॅक पँटला नाडी ही हवीच !! Rofl

वरच्या काकाफॉचे पोस्ट स्क्रिप्ट असंही लिहीता येईल.

कधीतरी बायकांत या नाड्यांच्या कमतरतेमुळे विविध आरोग्याचे व सामाजिक प्रश्न निर्माण होऊ लागले हे आपल्या पूर्वजांच्या लक्षात आले असावे. त्यामुळे बाह्य नाडीचा वापर करून त्यावर उपाय केले गेले असावे. महाराष्ट्रात परकर पोलकं, पंजाबात सलवार, गुजरातेत घागरा, दक्षिणेत पावडाई, उत्तरेत लेहंगा हे सर्व वापरात आले ते उगाच का? अर्थात या सर्व नाड्या गरजेनुसार सैल घट्ट करता येत. त्यामुळे शोणिताचा नाश होत नसे. आपली संस्कृती ही विज्ञानपुरक व ईव्हॉल्विंग आहे. पण पाश्चात्यांच्या नादी लागून आपण तिकडे दूर्लक्ष करतो व नवनवीन प्रश्नांना सामोरे जात राहतो.

माझेमन Lol Lol

"पण पाश्चात्यांच्या नादी नाडी लागून " वाचलं

माझेमन Lol

झाले असे की हे पाहुन व ज्यांना नाड्यांचे काडीचे ही ज्ञान नाही त्यांनी पुरुषांचे पायजमे, चड्ड्या यानांही नाड्या लावल्या.
त्यामुळे अशा पुरुषांनी गायत्री मंत्र म्हटल्याने आधी स्त्रियांना जो त्रास होत असे तो त्यांना सुरू झाला. दाढी मिशी न ठेवणे, केस वाढवणे, नटणे थटणे अशा भावना त्यांच्यात उत्पन्न होण्याचे हेच कारण आहे. धोतर घालणारा आणि असा वागणारा पुरुष विरळाच. तेव्हा पुरुषांनी अजिबात बाह्य नाड्यांचा करू नये.

हर्पा, मानव >>> Lol Lol
धोतर घालणारा आणि असा वागणारा पुरुष विरळाच.
>>>
लग्नासाठी नाडी जुळवायचे हेच कारण असावे की बाह्य नाड्या जुळल्या नाहीत तर उत्तम संतती निर्माण होते जे वैवाहिक जीवनाचे एक प्रमुख कर्तव्य आहे.

बायका ह्याच सगळ्या संस्कृतीचा आधार आहेत, त्यांच्या भक्कम डोक्यावर पाय ठेऊन संस्कृती उभी आहे.

पुरुषांकडे जितके जास्त लक्ष तितका संस्कृतीचा र्‍हास. त्यामुळे सगळे फॉर्वर्ड स्त्रियांसाठी लिहिलेत. पुरुषांवर वेळ घालवुन फायदा नाही.

जरी वेष असे बावळा
तरी त्या नाड्या आवळा
इलास्टिक नका हो ताणू
संस्कृती ही अंगी बाणवू

मी काय म्हणतो?
आजकाल नाडीऐवजी इलॅस्टीक अस्तं ना चड्ड्यांना?

आजकाल नाडीऐवजी इलॅस्टीक अस्तं ना चड्ड्यांना.>>>>>

म्हणुनच … म्हणुनच र्‍हास होतोय झ्संस्कृतीचा.. नाडी हातात राहायला नाडीच नाही.

स्त्रियांनी नेहमी पुरुषांचे पाय का दाबायला हवेत यावरचे सुंदर विवेचन:

पुरुषांचा गुडघ्यापासून पायाच्या टाचेपर्यंतचा भाग शनीने प्रभावित असतो. तर स्त्रियांचे मनगट ते बोटे ही शुक्राच्या प्रभावाखाली असतात.
जेव्हा शुक्र शनीच्या अंमलाखाली येतो तेव्हा धनप्राप्ती नक्की होते. समृद्धी, बरकत येते.
म्हणून स्त्रियांनी सदैव आपल्या पतीची चरणसेवा करावी. हे शास्त्रोक्त आहे.

Angry ( ही रागाची स्माईली माझी भर आहे!!)

Pages