ही फळभाजी कुठली ?

Submitted by काउ on 24 December, 2014 - 09:24

हे काय आहे ?

पाच रु ला एक मिळाले.

भाजीवाला बोलला .. त्याचे साल काढुन तुकडे करुन भाजी करा.

या भाजीचे नाव काय ?

fruit.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे वांगं आहे का एक प्रकारचं? एकदा अश्याप्रकारची वांगी बाजारात पाहिली होती. हे काय आहे असं विचारल्यावर भाजीवालीने वांगी सांगितलं.

मलाही तो बैंगन म्हणाला.

वरचे हिरवे साल अगदी पेरुसारखे दिसते.

तो बोल्ला आत बिया नसतात. गर वांग्यासारखाच असतो

याला कन्नड मध्ये सीमेबन्देकाय म्हणतात. सीमेबन्देकाय म्हणजे सीमेच्या पलिकडुन आलेली भाजी.
अमेरिकेत याला chayote म्हणतात. http://en.wikipedia.org/wiki/Chayote

वरचे हिरवे साल अगदी पेरुसारखे दिसते.>>> हो साल आणि आकार लांबोळक्या पेरु सारखाच. फक्त अ‍ॅब्नॉर्मल पेरु वाटतो तो. केली का भाजी? नेहमीच्या वांग्यासारखीच लागते का?

नेहमीच्या वांग्याची करता तशीच करुन बघा की. कुठल्याही भाजीची बेसिक रेसिपी सेमच असते. फोडणीला फोडी टाकणे किंवा फोडींच्या आधी कांदा आलं लसूण फोडणीत घालणे. थोडं फोडींच्या अंगासरसं पाणी घालून झाकण घालून शिजवणे. कांदा लसणीची भाजी नसेल तर चिंच गूळ गोडा मसाला. वरुन मीठ, तिखट आणि कोथिंबीर घालून ढवळणे. तब्बेतीला चालत असल्यास खोबरं घालणे. फिनिश.

एकच आणलंय ना वांगं? करा बिनधास्त प्रयोग आणि तुमच्या वांगी फॅन क्लबात टाका Happy

मी वांगी फॅन नाही म्हणून त्या क्लबात नाव नोंदवलं नाही.

काउ,

आतून लिबलिबीत आहे की कडक? वास कसा आहे?

यूझ्वली अश्या फळभाजीतून ए आणि के व्हिटॅमिन मिळत असावे असे वाटते. अर्थात त्या विषयावर तुमच्यापुढे आम्ही काय बोलणार! पण कच्चे टोमॅटो किंवा ढेमसे ह्यांची करतात तशी भाजी करून बघा बरे कशी लागते! खाल्ल्यावर चवही सांगा!

माझा असा अंदाज आहे की दाणे, डाळ वगैरे घालून थोडा रस असलेली भाजी केली तर योग्य व्हावे. पण केल्यावर अवश्य सांगावेत.

एक कल्पना सुचली. गाजर, कांदा, बटाटा, मटार आणि ही भाजी घालून भात बनवायचा.

मलाही खेडेगावात गेले की अश्या चित्रविचित्र भाज्या शोधायला फार आवडते.

>>> dhanashri | 24 December, 2014 - 20:46 नवीन

आम्ही याला चीवचीव असे म्हणतो.
<<<

त्या भाजीला की वरील प्रतिसादांना?

माझ्या डोक्यात दोन योजना आहेत.

१. किसुन बेसन पीठ लावणे.

२. वांग्याचे काप करतो तसे शॅलो फ्राय काप करणे

वेलवांगे .. छान नाव आहे.

एक थोडासा विषयाला अनुसरूनच पण सिलॅबसच्या बाहेरचा प्रश्न.

फळभाज्या म्हणजे काय आणि कुठच्या भाज्या त्यात मोडतात?

चारेक दिवसांपूर्वीच माझ्या मित्राने डाएटींग संदर्भात मला फळभाज्या म्हणजे काय आणि कोणत्या असे विचारले असता मी उत्तरादाखल अरे फळभाज्या म्हणजे म्हणजे म्हणजे, म्हणत हातवारे करत राहिलो ..

वनस्पतीचे वेगवेगळे भाग आपण अन्न म्हणून वापरतो. एखाद्या वनस्पतीचे फळ आपण भाजी करायला वापरत असू तर ती फळभाजी. ह्यात इतके अवघड काय आहे? वांगे, टोमॅटो, भोपळे, भेंडी, मिरच्या वगैरे फळभाज्या आहेत.

भाज्यांचे दोन प्रकार असतात फळभाज्या ,पालेभाज्या.
(फळ्भाज्या) कुठच्या भाज्या त्यात मोडतात?>>भेंडी, वांगी, टमाटे, गवार, काकडी, सुरण, पडवळ, घोसाळे, भोपळा, इ
अधिक माहिती साठी http://mr.vikaspedia.in/health/92a94b93793e93993e930/92893f93094b917940-... या लिंक वर पाहु शकता .

ओहके, सोपेय हे बरेच. मला माहीत नसल्याने मी वेगळ्याच अ‍ॅंगलने विचार करत होतो, जसे कोणत्या फळांच्या भाज्या करता येतात. उदाहरणार्थ कच्ची केळी किंवा फणस वगैरे. असो, माहितीबद्दल धन्यवाद आणि अवांतराबद्दल क्षमस्व! Happy

आज त्याची भाजी केली.

किसुन परतले व त्यात बेसन पीठ घातले.

जरा उग्र वास येतो. घट्ट पिठल्यासारखे झाले.

दुसरे आहे ते नुसतेच कापुन खाणार आहे.. फोडी करुन काकडीसारखे खाणे. किंचित गोडसर चव असते.

त्याचा मोठा भाग आहे त्यात कोय निघाली

काउ | 25 December, 2014 - 20:13 नवीन

पाच रुला एक होते. पण त्याने पाचला दोन दिलेत
<<<

तुम्हाला भाजीवालेपण घाबरतात हे पाहून आदर दुणावला.

याला 'चावचाव' (चहातला 'च') म्हणतो आम्ही.

पा.कृ.-

१. २ चमचे ह.डाळ भीजत ठेवणे - ३० मि.
२.चावचाव चे साल आणि आतली कोय काढून बारीक ( अर्धा इंच * अर्धा इंच ) तुकडे करायचे
३. पातेल्यात पाणी घेउन ( चाव चाव चे तुकडे बुडतील इतकं ) चावचाव शिजवणे ( चावचाव मधेही बरच पाणी असतं, ही भाजी लगेच शिजते. शिजून झाल्यावर उरलेलं पाणी टाकू नये, ते हवं आहे. ते तसच असूद्या पातेल्यात )
४. भीजलेली ह.डाळ + हिरव्या मिरच्या (३ ) + आलं + मीठं मिक्सरमधे वाटून घ्या
५. नं. ४ मधलं वाटण त्या शिजलेल्या चावचाव च्या पातेल्यात टाकणे आणि परत एक उकळी आण
६. गॅस बंद करून वरून १ वाटी आंबट ताक टाका
७. तूप्,जिरे,हिंग आणि १ लाल (सुकी) मिरचीची फोडणी वरून घाला

हीच रेसिपी वापरून कोणतीही पाणीदार भाजी ( दुधी, काकडी, पडवळ इ.) करता येते

Pages