आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा ही आधुवादी नवयुवती असताना ???

मग ते ७६ वय बिय.. अस का बरं ?
नवयुवतीच असेल तर असू द्या. विनोद मलाही आवडतो बरं
पण इथं काय झालय की अवांतर प्रतिसाद खूप झालेत. मग ज्यांना या विषयात रुची आहे त्यांना हे सर्व वाचण्याचा कंटाला येउन त्यांच्याकडून दुर्लक्ष होण्याचा धोका असतो.

मला राहून राहून गंमत वाटतेय.

आधुनिकतेशी ना माझं वैर , ना कुठला पूर्वग्रह. तसा तुमचा आणि काहींचा समज का झाला काही कळेना. माझी राहणी आधुनिकच आहे. तसच जुनं तेच सोनं असही मी म्हणालेले नाही. जे चांगलं आहे ते अंधश्रद्धेपोटी नाकारणे इतका सरळ विषय होता हो. पुन्हा वाचून पहा असंच म्हणेन.

पुन्हा कशाला वाचून पहा? या विषयावर किमान हजार धागे झालेत या साईटीवर. त्यामुळेच लोक अवांतर दंगा करायलेत. तरी तुम्ही लौन धरलंय पुन्हा वाचा म्हणून. Uhoh

पुन्हा वाचून पहा असंच म्हणेन>>एकदाच वाचून हसून हसून माझं पोट दुखायलंय इथे दोन दिवस, परत वाचायचं, होसुमीयाघ रिपिट बघितल्यासारखं होईल.

पुन्हा वाचून पहा असंच म्हणेन.>>>
बापरे आता ऑफिसला दांडी मारावी लागेल परत वाचायचे ठरले तर.. हां , माबोकर खूप खूप प्रेमळ आणि विनोदी आहेत पण परत नाही झेपायचं बॉ!

मला राहून राहून खूप गंमत वाटतेय.
यात हसण्यासारखं काय आहे हे कळालं तर मला सुद्धा हसता येईल ना !

फक्त ते विमानोऊड्डाणाची सत्यकथा भाकडकथा कशी काय आहे हे सांगणार होते त्यांचं काय झालं ते कळू द्या. वर्तमानपत्रात ही घटना प्रत्यक्षात झालेली आहे हे छापून आलेलं असल्याने तो पुरावा सर्वात शेवटी दिला होता. तर फक्त वर्तमानपत्राच्या बातमीवर विश्वास ठेवता का असा प्रश्न विचारला. पण विविध ग्रंथात काय सांगितलंय याबद्दल एक अवाक्षर नाही. पुरावे नाहीत म्हणून भाकडकथा म्हणणारे पुरावे दिले की सयाजी शिंदे की गायकवाड या वादात शिरतात, पण आपल्या प्रश्नाला उत्तर दिले गेले आहे यावर काहीच बोलत नाहीत. हे खटकतं.

नमस्कार वीनाजी - तुमचा लेख वाचला ...
पण तुमचा मुद्दा mostly योग्य आहे ... science कडे आज सगळी उत्तरे नाही आहेत.. .तुम्ही दिलेले विमानाचे उदाहरण देखील बरोबर आहे परंतु ते निट सिद्ध करता येणार नाही... ...

अजूनपण science ला या प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत... काही प्रश्न इथे लिहितो ... जर विषयांतर होत असेल तर कृपा करून हा प्रतिसाद delete करा

१. माणूस स्वप्ने का बघतो... अजून science ला याचे उत्तर मिळालेले नाही .. बोर्न blind लोक सुद्धा स्वप्ने पाहतात ...
२. जीव कोणी निर्माण केले ... Who Created Life on Earth ?

३.मृत्यू नंतर काय आहे ?

Science म्हणतो memories ब्रेन मध्ये save होतात ... मग ज्या पुनर्जन्म च्या कासेस असतात त्यांना जुन्या life च्या memories कशा असतात?

लेखात तुम्ही ज्यांची नावे घेतली आहेत त्यांच्यावर माझा विश्वास नाही... परंतु महाभारत आणि रामायण या काळात आपण बरेच सुधारलेले होतो ...
पुष्पक विमान हे plane नाही तर काय आहे ...
जी अस्त्रे चालवली जायची ते सगळे modified scientific च होते...Sanjaya ने dhritrashtr ला सांगितलेल कुरूक्षेत्र चे वर्णन is nothing but live telecast.
जर रामायण हे महाकाव्य खरे आहे तर भारताचे इतके बरोबर वर्णन आणि खाली लंका - आणि सेतू हे आज देखील दिसते.

तुम्ही लक्ष देओ नका लोकांकडे... पण या बाबा लोकांवर पण आंधळा विश्वास ठेवणे चुकीचे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे...

श्रद्धा | 15 December, 2014 - 10:29
उथळता असा शब्द मराठीत नाही. उथळपणा असा आहे. मराठीच्या परंपरेला गालबोट लावू नका. तसेच, परंपरा शब्दावरून पारंपरिक असा शब्द होईल. पुढेमागे वापरावासा वाटला तर हाताशी असू द्या. माझी ही पोस्ट शीर्षकास धरून आहे. तुम्हांला चालावी. बाकी विषयाला धरून पोस्ट नंतर टाकेन. आताशा टायपिंग होत नाही, शहात्तरी गाठली आता. नात पोस्टे टायपून देते, पण सध्या तिची इंजिनीयरिंगची सेमिस्टर परीक्षा आहे.

नंदिनी | 15 December, 2014 - 10:53
श्रद्धाकाकू, तुम्हाला उथळता हा शब्द माहित नसलेले पाहून सखेद आश्चर्य वाटले. उसळता, कोसळता, सळसळता तसाच उथळता असादेखील शब्द आहे. आमच्यात वापरतात.

नातीला इंजीनीअरिंगच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. अभ्यास वगैरे करते ना? आमच्या लेकाच्या पुढल्या महिन्यांत ज्युनिअर केजीच्या सेमीस्टर परीक्षा आहेत. कार्टी जरासुद्धा अभ्यास करत नाहीत हो. काय सांगावं!

डीविनिता | 17 December, 2014 - 04:45
वीणातै, राग मानू नका, पण धागा भरकटवायला तुम्हीच सुरूवात केलीत, श्रद्धा ही आधुवादी नवयुवती असताना तुम्ही तिला काकू केलेत, मग माबोकर पण भरकटले. आधी माहिती नाही तर थोडा संयम ठेवून बोलायचे ना...

-->

डीविनिता - नंदिनी म्हणजेच वीणातै का ? कारण काकू असे नंदिनी म्हणाल्या होत्या ... विना आणि नंदिनी हे एकाच व्यक्तीचे id आहेत?

पण विविध ग्रंथात काय सांगितलंय याबद्दल एक अवाक्षर नाही.

.....

सुरु बै , त्या ग्रंथात विमानाचे मॉडेल दिलेले आहे तर भाजपा किंवा बजरंग दल त्याप्रमाणे एखादे विमान तयार करुन ते उडवुन का दाखवत नाही ?

मोदी काही हजारो करोड रुपयांची अस्त्रशस्त्रे आयात करणार आहेत.

तुमचे हे ग्रंथ वापएरुन त्याना विमान व ब्रह्मास्य्र तयार करायला सांगा.

लेख खूपच सैरभैर झाला आहे असं प्रामाणिकपणे वाटतं. मनात आलेले विचार एकटाकी लिहून काढले असावेत. नंतर संपादकीय हात फिरला असता तर बरे झाले असते. तुमची कळकळ समजते पण ती अस्थानी आहे असे वाटते. अरण्यरूदन.

बर्‍याच वाक्यांचे संदर्भ समजले नाहीत.
>त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत.
साईबाबांचा संदर्भ आहे का?

>बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं.
माफ करा, केवळ टीव्हीवरून सांगताना ऐकणे हे नोबेल देण्यासाठी पुरेसे असते तर अमेरिकेतील अनेक ख्रिस्चन लोकांना आधीच मिळाले असते. येशूचे नाव घेताच लंगडे चालायला लागले, असे चमत्कार आजही टीव्हीवर दाखवतात.

प्राचीन भारतीयांनी अभिमान वाटावे असे बरेच काम केले आहे त्याचा जरूर अभिमान बाळगूयात. तळपदेंचे विमान कदाचित हँग ग्लायडर सारखे असावे. तेही अभिमानास्पद आहेच. पण त्यांचे डिझाईन चोरून इंग्लंड मार्गे अमेरिकेत गेले हे मान्य करणे अवघड आहे.

बाकी आजकालची तरूण पिढी वयस्कर लोकांचा मान ठेवत नाही ही तक्रार फार जुनी आहे. त्याचे फार टेन्शन घेऊ नये. पाणी पुढेच जाणार.

>>हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

इथे माबोवरही नॅनोटेक, खगोलशास्त्र ई मधले तज्ञ आहेत त्यांची बोबडी वळणार नाही उलट ते 'वीज म्हणजे काय?" हा सचित्र लेख लिहू शकतील.

@लोकहो,

वीणा सुरु नव्या सदस्य आहेत. त्यांचा हा पहिलाच लेख आहे (निदान इथला तरी). त्या लेखातील जे मुद्दे पटले नसतील त्यावर जरूर टीका करुयात पण धागा भरकटवू नका प्लीजच. शिवाय शिंदे /गायकवाड कणाद/कण्व असे स्लिप ऑफ टंग होतातच. त्याबद्दल त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली आहे तेव्हा तो विषय संपला आहे असे मानू.

vijaykulkarni,
तुम्ही किती चांगले अहात. या ब्लऑगवर तुम्हि एकच स्रुदय अहत.
मला काय म्हणाञाच्। ते तुम्हल नीटच कळालय.
धन्यवद.
अज्काल्च्य जगत असे ब्लोगर दुम्रिळ झलेत.

-नवी सुरवत

विकुन्शी कधी नव्हे ते मी सहमत आहे.:स्मित:( कधी नव्हेत याचे कारण म्हणजे विकु कॉन्ग्रेस पुर्स्कर्ते आणी म्या भाजपा पुरस्कर्ती.:फिदी:)

मी तर सिन्सिअरली वीणतैंच्या लेखाचे कौतुक करतेय. थोडे प्रतिसाद असतील मजेचे, पण लोकाना त्याना हिडिसफिडिस करायचे नाहीय.. विषय खूपवेळा चर्चून झालाय बाकी काही नाही..

आणि च्रप्स, तुम्हाला प्रतिसाद वाचून समजत नसतील तर तो माझा दोष नाही..विणातै परत वाचा असे सुचवत आहेतच..

मी काय म्हणते की हा धागा धमाल करायला राहू देत की.
वीणातैंना जी माहीती हवीये ती माहीती आणि चर्चा जरा माबो चालली की मिळेल Wink

कुमार ऋन्मेशचे ज्ञानकण वेचलेत का टोनगा पुरुषांनो?

सर्वाप्रथम च्रप्स आणि विजयकुलकर्णी यांचे मन:पूर्वक आभार. दोघांनीही छान समजून घेतल्याबद्दल आणि इथे लिहीण्याचा आत्मविश्वास वाढवल्याबद्दल. च्रप्स तुमचे निरीक्षण बरोबर आहे. पण दोन व्यक्ती एक हे समजले नाही.

च्रप्स यांच्या पहिल्या पोस्टला संपूर्ण अनुमोदन. बाबा लोकांच्याबाबत श्री. विजय कुलकर्णी आणि तुम्हाला एकच उत्तर देते.

प. पू. रामदेव महाराज यांनी कधीही चमत्काराचे समर्थन केलेले नाही. योग, प्राणायाम हे सायन्स आहे. त्यात काही न्यून असेल तर ते ही अभ्यासाने दूर करता येऊ शकते. जर कुणाला आठवत असेल तर सुरुवातीला संस्कार आणि नंतर आस्था चॅनेलवर महाराज योग, प्राणायाम याबरोबरच औषधी वनस्पतींची माहीती देत असत. आचार्य बाळकृष्णजी स्वतः त्या वनस्पतीचा आढळ, ओळखायची खूण, गुणधर्म व होणारे फायदे तोटे सांगत असत. पतंजली विद्यापीठात त्या त्या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण आणि संशोधन चालतं.

चमत्काराच्या सहाय्याने रुग्ण बरे करणारे ख्रिस्ती आणि रामदेव महाराज यांच्यात आणखी एक फरक असा आहे की महाराज प्रत्येक रुग्णाचं रेकॉर्ड ठेवतात. आयुर्वेदात डाटा न ठेवल्याने त्याच्यावर संशय घेतला जातो असं रामदेव महाराजांनी सांगितलं होतं. बिहार आणि अन्य काही ठिकाणी इंडीयन मेडीकल असोसिएशन ने त्यांचं शिबीर आयोजित केलं होतं. त्यांच्या शिबीराला डॉक्टर्सही हजर राहतात. कॅन्सर बरा होणं हा चमत्कार नसून त्यासाठीची उपचार पद्धती रामदेव महाराजांकडे उपलब्ध असल्याने त्यांना पुरस्कार मिळायला हवा असं वाटलं.

विमानविद्येचं ज्ञान इंग्लंडमार्गे जाणे याबाबत
युरोपात एका ठिकाणी चाललेल्या संशोधनाची माहीती सेमिनार्स व इअतर माध्यमातून सर्व युरोप व अमेरीकेत पोहोचत असे.

अन्य काही प्रतिक्रिया वाचल्या आणि मोठीच गंमत वाटली.

अहो, पारंपारीक ज्ञानाबद्दल आत्मियता व्यक्त केली म्हणजे बजरंग दल आणि अशा संघटनेचं सदस्यत्व घेतलं असा अर्थ होतो का लगेचच ? आणि हे ज्ञान उपलब्ध आहे म्हणून या संघटनांनी विमानं बनवावी यामागचं लॉजिक काही म्हणजे काही समजलं नाही. भारतात उपलब्ध असलेलं ज्ञान वापरून यांनी त्या त्या वस्तू बनवाव्यात असा काही नियम, कायदा झालेला आहे का ?

भारीच बाई प्रतिक्रिया एकेक. मनोरंजन होतंय हे अगदी खरं.

Pages