१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
त्या केसांचा लिलाव होतो
त्या केसांचा लिलाव होतो म्हण्जे त्याचा बाजार मांडला जातो. परंपरेत हे मान्य आहे का? म्हण्जे देवाला वाहीलेल्या / दान केलेल्या वस्तुंचा असा बाजार मांडाणे? हे फक्त तिरुपतीलाच नाहीतर बहुतेक सगळ्याच फेमस मंदीरात होत.
आता माझा प्रश्न कळाला का?
चेतन, श्यामला माजगांवकर ( मग
चेतन,
श्यामला माजगांवकर ( मग जव्हेरी ) आणि त्यांच्या कन्या मधुबाला चावला...
दोघी गायिका !
दिनेश. धन्यवाद. नवीन माहिती
दिनेश.
धन्यवाद. नवीन माहिती दिलीत.
(No subject)
जवळच्या व्यक्तिच्या
जवळच्या व्यक्तिच्या म्रुत्युनंतर मुंडन का करतात?
मला सगळ्यात लॉजिकल वाटलेले उत्तर : मृत व्यक्तिच्या जवळचे लोक ओळखु यावेत म्हनुन. हे लोक १०-१२ व्या नंतर परत समाजात मिसळतात तेंव्हा इतरांना भान रहावे वागताना बोलताना की यांना नुकताच जवळच्या कोणाचातरी निधनाचे दु:ख झालाय म्हनुन.
शिवाय ते परत येतात>>> बेफी
शिवाय ते परत येतात>>> बेफी काहुन हसताहेते एवढे?? हा कोणता विनोद?? मी मिसला.
अय्या सुशान्त तुम्हाला गुगल
अय्या सुशान्त तुम्हाला गुगल माहीत नाही? चक्क्?:फिदी::दिवा:
सुशांत, साधा विचार आहे. आपण
सुशांत, साधा विचार आहे. आपण देवाला केस देतोय म्हणजे नक्की कुणाला ? एवढा विचार प्रत्येक भक्ताने केला तरी खुप. आणि तसेही त्या केसांचा तिथे कचरा होण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग होतो तरी आहे. ( इथे आफ्रिकेत केसांना प्रचंड मागणी असते. ) तो ट्र्स्ट असल्याने त्या पैश्याचा योग्य तो उपयोग होत असावा.
चेतन, त्या दोघी माझ्या नातलग आहेत. जुन्या काळातल्या प्रख्यात गायिका होत्या त्या.
< सुशान्त तुम्हाला > हायला इथ
< सुशान्त तुम्हाला >
हायला इथ वॉचमन / हापीस बॉय वगैरे पण आहो जाहो करत नाहीत मला... मन अगदी भरुन आल
बर ते गुगल बद्दल सांगणार होतात काय झाल?
<<आपल्याकडे मुंडन म्हणजे
<<आपल्याकडे मुंडन म्हणजे मृत्यूचे प्रतीक मानत असत. तसे करून मृताशी भावनिक एकात्मता साधली जात असे. पण तिरुपतिला कुमारिका, विवाहितस्त्री, पुरुष लहान मुले सगळ्याचे मुंडन करतात.?लिंबूभाऊ कडुन उत्तर अपेक्षित आहे.
पुर्वी कोल्हापूरात अशी प्रथा
पुर्वी कोल्हापूरात अशी प्रथा होती खरी.. कुणी केसाचा चमनगोटा केलेला दिसला कि आवर्जून घरी सगळे ठिक आहे ना, असे विचारत असत. मिशीबाबतही हे खरे होते. पण भिक्षुकी करणार्यांच्यात ते कॉमन होते.
परत आफ्रिकेचा उल्लेख करतो.. इथे ९९ टक्के लोकांचे मुंडन केलेले असते. त्यांचे केस वाढवले तर ते आवाक्याबाहेर जातात आणि त्यांच्या स्पायरल रचनेमूळे त्यात हीट ट्रॅप होते.
दिनेशदा मग केस द्यायच्या ऐवजी
दिनेशदा मग केस द्यायच्या ऐवजी डायरेक्ट पैसे दिले तर चालतील का? म्हण्जे बघा माझे २ ईंच लांबीचे केस आहेत साधारण सगळेच केस ५० ग्राम तरी नक्कीच भरतील. देवस्थानाने रेट सांगावा प्र्त्येक ग्रॅमला कीती ते. आम्ही वजनाच्या अंदाजाने देऊ पैसे. हा आता देवस्थान आहे तर घासाघीस नाही करणार हा....
दिनेशदा चमन्गोटा फक्त भाऊबंद
दिनेशदा चमन्गोटा फक्त भाऊबंद आणि चमनगोटा + मिशी दाढी साफ सख्खे . त्यात पण अजुनच डीटेलमधे कळाव म्हनुन.
अय्यो बालाजी धागा कशावरुन
अय्यो बालाजी धागा कशावरुन कशावर गेला ?
आता केस सुध्दा आलीत 
मुंडण कोणाला अर्थ कळला तर
मुंडण
कोणाला अर्थ कळला तर मराठीत लिहिण्याचे करावे.
सुशांत, तिरुपतीने कुबेराकडून
सुशांत, तिरुपतीने कुबेराकडून कर्ज घेतले होते ( बहुतेक लग्नासाठी ) ते अजून फिटलेले नाही. त्यासाठी तिथे हुंडी ठेवलेली आहे. त्यामुळे पैश्याचे स्वागतच आहे.
केसे देणे ही उथळता असली तरी आर्थिक नियोजन हा आधुनिकपणा आहे. ( तात्पर्य, चर्चा भरकटलेली नाही. )
पण ते फिटले हे कोण सांगनार
पण ते फिटले हे कोण सांगनार कुबेर साहेब तर येणार नाहीत सांगायला
असे फिटलेबिटले तर सर्वच
असे फिटलेबिटले तर सर्वच दुकाने बंद होतील ना !
दिनेशदा हूंडीत ज्याच्या
दिनेशदा हूंडीत ज्याच्या त्याच्या मनाने पैसे टाकायचे आणि केसांचा दररोज ईंटरनॅशनल मार्केटरेट्प्रमाणे रेट डिस्प्ले करुन पैसे घ्यायचे.
सगळ्यात पहिल्यांदा त्या
सगळ्यात पहिल्यांदा त्या विनीताताईंनी फिदीफिदी हसुन माझा अपमान केला...

नंतर नावाचा तर अगदीच कचरा करुन टाकला
मग त्या रश्मींनी गुगल बद्दल न सांगताच माझ्या तोंडाला पान पुसली
दिनेशदांनी माझा प्रशन्च नीट समजाऊन नाही घेतला....
अत्यंत व्यथित अंतःकरणाने मी २ दिवस माबो सन्यास घेत आहे.
हेमाशेपो
मी खुप गंभिर पणे प्रश्न
मी खुप गंभिर पणे प्रश्न विचारत होते.एक लाइन टायपे पर्यत १० पोष्टी.
सुशांत, पश्चाताप म्हणून सर्व
सुशांत, पश्चाताप म्हणून सर्व माबोकर तुम्हाला आजन्म आदरार्थी बोलावतील (स्वल्पविराम दिला आहे आणि पश्चाताप असे आडनाव अद्याप ऐकिवात नाही )
लावा मराठीची वाट लावा
लावा
मराठीची वाट लावा डीविनीटा
बोलावतील
???
अहो संबोधतील म्हणा
अर्रर खरेच!!
अर्रर खरेच!!
डीविनिटा हे बोर्नविटा सारखे
डीविनिटा हे बोर्नविटा सारखे वाटतेय..
रच्याकने माझे तरी मत आहे सकाळी चहा कॉफी पेक्षा बोर्नविटाच प्यावा. मस्त वाटते. पुन्हा एकदा लहानपण अनुभवल्यासारखे....
बाकी हॉर्लिक्स वगैरे नाही आवडले कधी.
काय योगायोग. मी बोर्नविटाच
काय योगायोग. मी बोर्नविटाच घेतो. मस्त वाटतं. दूध का दूध, चव की चव. झक्कास.
हॉर्लिक्स बद्दल अनुमोदन.
बर ते गुगल बद्दल सांगणार
बर ते गुगल बद्दल सांगणार होतात काय झाल?>>>>>इश्श! आम्ही नाही सान्गत जा.
मोकाटेत जाऊन 'ता' चा 'टा'
मोकाटेत जाऊन 'ता' चा 'टा' केलाय
मला ते "कारटा" या संबोधनापरी जोर्रात लागले
एवढे भिंग घेउन पोस्टी वाचल्या
एवढे भिंग घेउन पोस्टी वाचल्या जातात आमच्या धन्य धन्य झालो.
सुशांत, दोन दिवसांनी काय
सुशांत, दोन दिवसांनी काय होतंय. ? न याल तर मौलिक चर्चेला मुकाल.
मला आता प्रत्येक शब्दात काहीतरी नवीन दिसतय.
डी आधुनिक असेल तर विनीता ??
चँप आधुनिक असेल तर आशु ???
बोर्नव्हिटा आधुनिक तर दूध ???
Pages