आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्यंतरी अध्यात्म, ध्यान हे सर्व टीकेचे धनी झाले होते. प.पू. रागमदेवजी महाराज. प.पू. श्री श्री गुरुजी यांच्यामुळे आज चांगले दिवस आले आहेत.>>रामदेव म्हणायचे आहे का तुम्हाला? कुठले मध्यंतर?

...अन्‌ रिकामटेकड्या वादप्रिय ( हेहे, मिळालेला चान्स घालवू नये Wink ) नास्तिक लोकांकडून अध्यात्म, ध्यानावर टीका नेहमीच होत आली आहे, त्यामुळे त्याचे महत्व कमी झाल्याचे काही स्मरत नाही बुवा!

भाकडकथा म्हटल्याने दु:ख झालेच आहे. नियम क्र. २ पहा.

भावनेपेक्षा या वृत्तीला उत्तर देणे गरजेचे असल्याने लिंक देतेय. वाचा आणि विचार करा.

http://nonstopindian.blogspot.in/2012/07/aeroplane-in-india-was-first-in...

http://www.panditastro.com/2009/12/blog-post_28.html

http://jhindu.blogspot.in/2012/01/blog-post_24.html
( सुंदर विमान कसं बनवायचं याचं डिझाईन या लिंकवर आहे ). या लिंकवर पुण्याचे एक पंडीत पूज्य श्री शिवकर बापूसाहेब तळपदे यांच्या मरुत्सखा या संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमानाच्या उड्डाणाचे १८८५ मधे मुंबईत केलेले प्रयोग दिलेले आहेत. त्या वेळी बडोद्याचे महाराज उपस्थित होते असं लिहीलं आहे. (गायकवाड आडनाव आहे)

http://marutsakha.blogspot.in/
या लिंकवर गेल्यास तुम्हाला उत्तर देण्याची गरज राहणार नाही. व्हिडीओ पहा. अनेक ग्रंथांमधून विमानविद्येबद्दलचे असलेले तपशील त्यात आहेत. अभ्यासू लोकांनी हे ग्रंथ मिळवून अभ्यास केल्यास त्यांना ते समजून येईल.

सरतेशेवटी, माझ्या काही मर्यादा असल्याने विषयाला न्याय देता आला नसेल तर क्षमस्व !
http://www.sanatan.org/mr/a/902.html
या लिंकवर गेल्यास आपल्याला विषय नीट समजेल.

पूज्य तळपदे यांनी विमानविद्येचे शिक्षण सुब्बराव शास्त्री यांच्याकडे घेतले होते. शास्त्रींनी खालील ग्रंथ लिहीला आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Vaim%C4%81nika_Sh%C4%81stra

en.wikipedia.org/wiki/Vaimānika_Shāstra

ही विद्या प्राचीन आहे.

वीणा, आपण लिहित आहात त्या गोष्टी पटत आहेत. पण कायेनाकी अनेकांचा "पुराव्यानी शाबित करा" असा हेकाच असतो. स्वतःच्याच चांगल्या अभिमानास्पद गोष्टींवर श्रद्धा ठेवणे जमतच नाही. त्यात त्यांची चूक नाही, बाह्य संस्कृतींच्या आक्रमणाने मानसिकता एवढी बदलून टाकलेली आहे की आता तर मला वाटते तुम्ही काय किंवा कोणीही काय कितीही सांगितलेत तरी फरक पडणार नाही. Sad
पालथाघोरसला महत्व देतील पण हेच जर म्हणले की त्रिकोणमिती ही देखील भारतात फार पुर्वीच शोधली गेलेली आहे, तर मानणार नाहीत. Sad
हे असले विषय तुम्हाला नवीन असतील माबोवर, पण अनेकांनी अनेक वेळा चर्चाचर्वण करून झालेले आहेत. Happy

वीणा सुरू हे असले धागे सुरू नका करू ! Happy

"बाह्य संस्कृतींच्या आक्रमणाने मानसिकता एवढी बदलून टाकलेली आहे की आता तर मला वाटते तुम्ही काय किंवा कोणीही काय कितीही सांगितलेत तरी फरक पडणार नाही".

हेच मला नेमकं सांगता आलेलं नव्हतं. तुम्ही योग्य शब्दात सांगितलंत. आभार महेशसर आपले.

प.पू. रागमदेवजी महाराज. प.पू. श्री श्री गुरुजी महाराज चांगले बिजनेस मैन आहेत असे ऐकुन आहे ते बरोबर आहे का? यांची फी जबरदस्त असते म्ह्णे.

सुरेख
तुम्हालाहवे असलेले पुरावे आणि इतर सर्व दिल्यानंतर तुम्ही या पातळीवर उतराल असे वाटले नव्हते. तुम्ही दुखावताय इतरांना.

तुम्हालाहवे असलेले पुरावे आणि इतर सर्व दिल्यानंतर तुम्ही या पातळीवर उतराल असे वाटले नव्हते. >>>> फार मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्या!

एक साधा प्रश्नतर विचारला आहे याच्याशी रिलेड कुठला पुरावा आहे का? नेट थोडा स्लो आहे .प्रश्न विचारने म्हणजे
दुखावने का?

तुम्ही आधी प्रश्न विचारला. त्याची उत्तरे दिली. ती मान्य आहेत का हे न सांगता दुसरा असंबद्ध प्रश्न विचारत आहात.जर तुम्हाला काहीच म्हनायचं नव्हतं तर पहिल्यांदा प्रश्न का विचारलात ? तुमचं असच चालनार असेल तर निरुत्तर झालात की पळ काढणा-यांना का महत्त्व द्यायच्चे ?

प्रश्न विचारताहात तर जबाबदारीचं भान असू द्यावे. (आत्ताच्या प्रश्नाचा काय संबंध आहे, तो का विचारला, आधीचा का विचारला होता आणि आता उत्तर दिल्यानंतर त्यावर म्हणने काय आहे हे सांगणार आहात का ?).

हा कॉम्प्युटर आणि हे इंटरनेट वै. पण शोधल्याचे काही पुरावे आहेत का? आणि तुम्ही संत रामदास यांना ओळखता का? त्यांनी मुर्खांची लक्षणे या नावाने बरीच लक्षणे लिहून ठेवली आहेत. त्यात सांगे वडिलांची कीर्ती तो एक मुर्ख असे ही एक लक्षण सांगून ठेवले आहे.
भारताला बराच प्राचीन इतिहास आहे ज्यात काही अभिमान वाटावा अशा गोष्टी आहेत आणि काही अत्यंत लज्जास्पद गोष्टीही आहेत. पण उगीच काहीतरी उकरून आमच्या पूर्वजांना क्लोनिंगपासून विमान बनवण्यापर्यंत सग्गळंसग्गळं येत होतं ह्याला काहीही अर्थ नाही! तुमच्या म्हणण्याप्रमाणे अलम दुनियेतले सगळे शोध जरी माझ्याच (पक्षी: भारतीयांच्या) पूर्वजांनी लावले असले तरी आज त्यातल्या एकाही शोधाचा उपयोग या महान देशाला झालेला नाही हे सत्य आहे. त्यामुळे आता ते शोध पुन्हा उकरून काढण्यात काय हशील आहे?
शिवाय आज आपल्यासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. अपारंपारिक उर्जा स्त्रोत, पाणी हवा यांचे प्रदूषण, एड्स, इबोला, कर्करोग यासारखे सारखे गंभीर आजार. Why don't you invest your efforts in finding worthwhile solutions to problems that exist in today's world? May be future generations will remember you better?

हा माझा प्रश्न ,प.पू. रागमदेवजी महाराज. प.पू. श्री श्री गुरुजी महाराज चांगले बिजनेस मैन आहेत असे ऐकुन आहे ते बरोबर आहे का? यांची फी जबरदस्त असते म्ह्णे.

हे तुमचे उत्तर,तुम्हालाहवे असलेले पुरावे आणि इतर सर्व दिल्यानंतर तुम्ही या पातळीवर उतराल असे वाटले नव्हते. तुम्ही दुखावताय इतरांना.

आता यात माझ्या प्रश्नाचे उत्तर कुठे आहे? माझ्या प्रश्नाचे पुरावे कुठल्या लिंक मधे आहेत .क्रुपया सांगाल का?

निरुत्तर होउन पळ काढणा-यांतली मी नाही.
वाचकांनी प्रश्नाचे उत्तर दिले तरी चालेल.

जिज्ञासा
मूर्खांची लक्षणे म्हणून तुम्ही जे काही सांगितले आहे ते असे आहे.

जन्मला जयांचे उदरीं| तयासि जो विरोध करी |
सखी मनिली अंतुरी| तो येक मूर्ख ||८||

पहा बरं , पटतंय का ?

आणखीही बरीच लक्षणे आहेत.

नायेके त्यांसी सिकवी| वडिलांसी जाणीव दावी |
जो आरजास गोवी| तो येक मूर्ख ||२०||

नायेके त्यांसी सिकवी| वडिलांसी जाणीव दावी |
जो आरजास गोवी| तो येक मूर्ख ||२०||

देवद्रोही गुरुद्रोही| मातृद्रोही पितृद्रोही |
ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही| तो येक मूर्ख ||४४||

आदरेंविण बोलणें| न पुसतां साअक्ष देणें |
निंद्य वस्तु आंगिकारणें| तो येक मूर्ख ||४६||

दोघे बोलत असती जेथें| तिसरा जाऊन बैसे तेथें |
डोई खाजवी दोहीं हातें| तो येक मूर्ख ||६३||

अशी बरीच लक्षणे आहेत ती सोडून संदर्भ सोडून काहिच्या काही कोट करण्यासाठी सुद्धा समर्थांनी म्हनून ठेवले आहे.

अक्षरें गाळून वाची| कां तें घाली पदरिचीं |
नीघा न करी पुस्तकाची| तो येक मूर्ख ||७०||

तुम्ही दिलेल्या अर्धवट श्लोकाचा मूळ अर्थ असा आहे. श्लोक शोधून घ्यावा.

आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या माणसासमोर जो मोठया अहंकाराने वागतो, तो व आपण बरोबरीचे आहोत असें मनांत समजतो,तसा अधिकार नसतांना जो दुसर्र्यावर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो,जो आपण स्वतःच आपली तारीफ करतो, एकीकडे घरी दुर्दशा भोगीत असतो तर दुसरीकडे " आमचे पूर्वज व वाडवडील असे होते तसे होते," वगैरे बढाई मारतो,

इबोला, कर्करोग यासारखे सारखे गंभीर आजार.
----- इबोला, एडस वर जालिम औषधी प्राचिन काळात कण्व ऋषीन्ना माहित होते... असे वाचायला केव्हा मिळणार ? Happy

ओह! तुम्ही संपूर्ण श्लोक देत आहात हे बरंच आहे. मी तो दिला नाही करण मला पाठ नाही शिवाय माझ्याकडे दासबोध हाताशी नाही आणि ते अवांतर देखिल आहे. तरीही
एकीकडे घरी दुर्दशा भोगीत असतो तर दुसरीकडे " आमचे पूर्वज व वाडवडील असे होते तसे होते," वगैरे बढाई मारतो,>> एवढेच म्हणायचे आहे मला! आणि मुर्ख हा शब्द व्यक्तिशः घेऊ नका. ते तुम्हाला उद्देशून नाही.

आणि जेव्हा इथे प्रयोगशाळेत काम करताना १० प्रयोग फेल जातात तेव्हा १००० प्रयोग फेल जाऊन विजेच्या दिव्याच्या तारेचा शोध लावणारा एडिसन काय चीज असेल हे कळते. मी तुम्ही दिलेल्या लिंक्स पाहिल्या नाही आणि पाहणार ही नाहीये. आधुनिक विज्ञानाचा भरपूर फायदा घेत त्या सर्व शास्त्रज्ञांचे श्रेय अव्हेरण्याचा प्रयत्न करून उगीच न देखल्या देवा दंडवत घालायला लावू नका लोकांना.

पेप्रातल्या बातमीचे कात्रण म्हणज विश्वासार्ह पुरावा ठरतो. हे समजुन हिन्दु मन धन्य झाले.

असे असेल तर कोर्टाची गरज काय आहे ? पेप्रात अमुक तमुक याने बलात्कार केला असे छपलेल्र असते. ते वाचुन शिक्षा द्यायची.

दक्षिणा, मी नेमके/ नक्की काय चोरले?:अओ::फिदी:

आधुवादी ( आधूनीक+ परम्परावादी) हा शब्द तुझ्या मनात होता का?:फिदी:

डीविनिता
तुम्ही नेमक्या कोणत्या बाजूने आहात ? हा प्रश्न अनेकांना लागू आहे.>>> मुळात तुमच्या धाग्याला बाजूच नाही, त्यामुळे आम्ही सर्व प्रतिसादक समोरील बाजूस आहोत, धागा आपला गोलगोल फिरतोय .......:दिवा:

"बाह्य संस्कृतींच्या आक्रमणाने मानसिकता एवढी बदलून टाकलेली आहे की आता तर मला वाटते तुम्ही काय किंवा कोणीही काय कितीही सांगितलेत तरी फरक पडणार नाही".>>>

महेश +१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

जिज्ञासा

तुम्ही कुणाला मूर्ख म्हणालात म्हणून कुणी मूर्ख होत नाही. मग ते कुणालाही उद्देशुन असो.

समर्थांना ओळखता का या प्रश्नाला तुम्ही उल्लेख करू पाहत असलेला (तुम्हाला नीटसा माहीत नसलेला) श्लोक लागू पडतो एव्हढंच सांगायचं होतं. शिवाय तुमच्या प्रश्नांसाठी मूर्खपणाची इतर लक्षणे दासबोधात दिली आहेत ती वाचलीत तर तुमची जिज्ञासा पूर्ण होऊ शकेल.

तुमच्या समाधानासाठीच श्लोक दिले आहेत. बाकी, दासबोध न वाचताही तुम्ही त्यातल्या श्लोकांची उदाहरणे देउ शकताच की.. असो.

सुरेख
तुमचा प्र्~ओब्लेम काय आहे ?

तुमचा प्रश्न पाच उदाहरणे देण्याचा होता. त्याला उत्तर दिले त्यावर तुमचं एक नाही नि दोन नाही. नंतर तुम्ही कि तुमचे साथीदार भाकडकथा म्हणत पुरावे मागू लागले. त्याला उत्तर दिले की तुम्ही मौनव्रत धारण केले.

तुम्ही काय प्रेतात बसलेले वेताळ आहात का प्रश्न विचारायला ? मागचं काय झालं ?

आणि आताच्या प्रश्नाचा, फीज जास्त असण्याचा इथे काहीही संबंध नाही. त्यांनी किती फीज घ्यावी यावर तुमचा आक्षेप असण्याचं कारण काय ?

संस्क्रुत अनिवार्य झाल्याने आता प्राचीन ज्ञान सर्वांना मोफत मिळू हे पहा की. तिकडे तुमच्यासारख्या विचाराच्या लोकांनी या चांगल्या कृतीवरही तोंडसुख घेतल आहे उगीचच.

तुम्ही मुद्दाम भरकटवत आहात हे कळत नाही का ?

Pages