आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ह्याना चान्दोबा माहीत नाही? वेताळ माहीत नाही? विक्रम माहीत नाही? मग काय वाचले यानी? ( हे सगळे अरे ये पी एस पी ओ नही जानता च्या चालीवर वाचावे.:खोखो:)
धिक्कार असो.:दिवा:

वाचाल तर वाचाल नाहीतर नुसते हसत बसाल.

हा धागा धार्मिक विभागात असल्यामुळे पुर्वी उघडला नव्हता. ३०० + प्रतिसाद पाहुन आलो ज्ञानात अमुल्य भर पडली Happy Happy Happy

हा धागा धार्मिक विभागात असल्यामुळे पुर्वी उघडला नव्हता.. >> कलियुग आलेय रे देवा कलियुग ...

उपाय म्हणून कली नावाची गफ्रें शोधा असे सांगणार होते पण जाऊदे, लोक म्हणतील तुम्ही स्वत:लाच सूचना करताय... हाहा

अहो मी तिच्याशीच लग्न करायचे ठाम निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आलोय आणि तुम्ही मला नवीन शोधायला काय सांगत आहात... त्यापेक्षा तिचेच नाव लग्नानंतर बदलून कली ठेवतो..
पण माझ्यामते मुलगी लग्नाआधी कली असते, लग्नानंतर तिचे फुल होते, आणि ते जुने होता होता फुलदाणी.. Wink

हे पहा, अवांतर प्रतिसादांमुळे जे मोजके विषयाला धरून असणारे प्रतिसाद आहेत ते वाचकांना सापडणार नाहीत. सर्वांना माझी विनंती आहे की आपापले प्रतिसाद (अवांतर) डिलीट करावेत.

वीणातै .. मी कालपासुन या विषयावर विचार करतोय.....पुरातन काळी जश्या या सर्व जीवनविद्या साधू संतांनी रचल्या अन सांभाळून ठेवल्या तश्या पृथ्वीतलावर त्या काळी अजुनही काही (दुसर्‍या) संस्कॄती असतील ना! त्यांच्या बद्दल काही माहिती पुरवू शकाल का? त्यांचे एक्मेकांमधे "पारंपारीक ज्ञानाची" आदान प्रदान का नाही होऊ शकली?

वीणा सुरु तिरुपती बालाजी ला प्राचिन काळापासुन स्त्रि-पुरुष केश मुंडन करन्याची प्रथा आहे.त्यामागे काय कारन असावे.?

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.>>>>>> सुरेख, लेखातील सर्वात शेवटचं हे वाक्य वाचले नाहीत का? ती प्रथा अजुनही चालुच आहे त्याची चर्चा कशी करणार. Wink

इथे अवांतर चर्चा करणाऱ्यांना पाप लागणार आहे.
तुम्हाला रौरव नरक, कुंभीपाक इ.इ. तरतूद करण्यात आली आहे.
आपली जागा आजच राखून ठेवा..

सौ. यमदरबार
(सौ म्हणजे सौजन्य असे वाचावे, यमाची सौ नव्हे)

दक्षिणा, नवरे कधीही बोडके गुच्छ होत नाहीत.... तसे वाटले तर समजावे ते पाकळ्या कुठेतरी बाहेर उधळत आहेत Wink

Raurava,
the "screaming" Naraka, is where beings run wildly about, looking for refuge from the burning ground. When they find an apparent shelter, they are locked inside it as it blazes around them, while they scream inside. Life in this Naraka is 8.2944×1014 years long.

अधिक माहीतीसाठी
https://shastragyan.wordpress.com/2013/07/25/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD...

आयडी १ - अनुमोदन
आयडी २ - अनुमोदनाला अनुमोदन
आयडी ३ - प्रत्यवाय नसावा
आयडी ४ - प्रत्यवाय नसण्यास प्रत्यवाय नसावा
आयडी ५ - कमिटी नेमावी

सौ. पु.ल. देशपांडे Happy

काउ,

इतर धाग्यांवर आलेली एक्सेस स्ट्रेस सदस्यांना रिलीज करता यावी ह्यासाठी प्रशासनाने ह्या धाग्याला अमरत्व दिल्याचे समजते. दर दिवसाआड एक समरी लिहावी लागेल इथे.

दर्शवतो >> हे घड्याळकाकांसारखं का? म्हणजे दर्शवायचं पण द्यायचा नाही. Wink

Pages