आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>थट्टा करता का हो एका गरीब बिचा-या परदेशस्थ महीलेची ? कुफेहेपा<<<

ह्या प्रश्नात 'हयात' हा शब्द राहिला.

नालंदा विद्यापीठ जळाले हे कदचीत खरे असेलही. पण केवळ त्या विद्यापीठातच फक्त विमानाविषयी पुस्तके होती बाकी कुठे नाही हे पटत नाही. दुसरा मुद्दा एखादी संस्कृती केवळ विमानासारख्या एखाद्या प्रचंड गुंतागुंतीच्या शास्त्रात प्रगती करू शकते पण इतर मुलभूत बाबींत नाही हे पटत नाही. विमाने होती तर जमिनीवर धावणाऱ्या गाड्या का नव्हत्या? रेदिओ टीवी का नव्हते?? सर्वात महत्वाचे, जी संस्कृती विमाने निर्माण करू शकत होती ती संस्कृती शस्त्रे निर्माण करून स्वतःचे संरक्षण का करू शकली नाही???

स्वतःचे संरक्षण का करू शकली नाही???
<<

श्शऽ..
असले प्रश्न विचारायचे नाहीत.

ते विद्यापीठं जाळून त्यातलं ज्ञान यवन अन म्लेंछांनी नष्ट केलं की नै? म्हणून झालं सगळं हे असं. अन त्यामुळेच आता आम्हालाही हे असलं भारी भारी सगळं सोडून इकडे म्लेंछांच्या देशात रहावं लागतं, असं ते तंबोराभाऊ म्हणतील आता.

अन ते निष्पक्ष भ्रम्मराक्षसही येतील लवकरच मदतीला.

गुड मॉर्निंग!

naalMdà जळली तर पुस्तकेही जळालीच.

पण भारतातले एअर्पोर्ट , विमाने , पायलट , इंधनाच्या विहिरी ... हेही सगळे जळुन गेले.

Proud

मुसलमानानी पुस्तके जाळली हे पटत नाही. आता युद्ध होताणाअ आग लागली असेल तर ते स्वाभाविक आहे... हैद्राबादच्या निजामाने इंग्रजांची इंजिनियरिंग पुस्तके उर्दुत भाषंतरेत केले होती. मोघलानी कित्येक हिंदु ग्रंथ फारशीत भाषंतरीत केले होते.. एकाहे हिंदु संस्थानिकाने असे केल्याचे ऐकिवात नाही.

मोघलानी कित्येक हिंदु ग्रंथ फारशीत भाषंतरीत केले होते.. एकाहे हिंदु संस्थानिकाने असे केल्याचे ऐकिवात नाही. >> हिंदु संस्थानिक कशाला फारशीत भाषंतर करतील ? Lol

पृथ्वी गोल आहे हे पूर्वी माहीत असणार शिवाय ती सूर्या भोवती फिरते हे ही माहित असणार … म्हणून त्यांनी १२ महिने चैत्र, वैशाख …इ बनविले व प्रत्येक महिन्यात ३० दिवस ठरवले ……… ३६०/१२ = ३०…… कारण १२ महिने आणि ३० दिवस हा योगायोग वाटत नाही ………।

हिंदु संस्थानिक इंग्रजी / इतर पुस्तकांची मराठी / हिंदीत भाषांतरे करु शकत होते ना ? पण हिंदु संस्थानिकानी कोणतेही ज्ञान आपल्या भाशेत आणले नाही.

जगातल्या सगळ्या शाखांचं ज्ञान ठेवण्यापेक्षा दोन पेशंट कसे येतील हे पहावं. हवं तर एखाद्या रिक्षेवाल्याला हाताशी धरावं. निवडणुकीत भोंगा लावून प्रचार करतात तसं एखादी सीडी बनवून त्याच्याकडे द्यावॉ. त्या सीडीमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या रोगांवर उपचार करता येतात याची माहीती असावी. काही गाणी पण टाकता येतील.

नाहीच जमलं तर मग खानदानी दवाखानाच्या धर्तीवर रस्त्याच्या कडेला छत्री टाकून मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डर लावावा. दोन पहिलवानांचे फोटो लावावेत म्हणजे पेशंटला वाटेल की इथे आपली तब्येत सुधारेल.

महत्वाचं म्हणजे सदा न कदा वस्सकन अंगावर धावून जाण्याची सवय सोडावी आणि पेशंट आले (चुकून माकून) तर जरा मायबोलीला सुटी द्यावी (म्हणजे इतरांनाही हुश्श वाटेल). शिवाय अधून मधून आपल्या शाखेचा अभ्यास करायला कुणाची बंदी सुद्धा नाही.

LOL

ते एच आय व्ही एडसचे डॉक्टर आहेत.
तुम्ही जाणार का त्यांच्याकडे?
रिक्षा , भोंगा , पँप्लेट्स सगळं काही सरकार करतं त्यांच्यासाठी .
भरभरून सरकारी ओपिडी असते आणि नाही आले पेशंट तर सरकार काही पगार कापणार नाही त्यांचा..
ऑफिसमधलं नेट फुक्कट वपरणार्यांइतकं काऊचं आयुष्य खडतर नाही हो.

मोघल व इंग्रजांपेक्षा हिंदु संस्थानिकच जास्त लबाड होते. हे मा वै म आहे.

मी इंटरनेट मोबैलवर माझ्या पैशाने वापरतो

वीणा, वाक्यावाक्याला जबराट हसलो....

जगातल्या सगळ्या शाखांचं ज्ञान ठेवण्यापेक्षा दोन पेशंट कसे येतील हे पहावं. हवं तर एखाद्या रिक्षेवाल्याला हाताशी धरावं. निवडणुकीत भोंगा लावून प्रचार करतात तसं एखादी सीडी बनवून त्याच्याकडे द्यावॉ. त्या सीडीमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या रोगांवर उपचार करता येतात याची माहीती असावी. काही गाणी पण टाकता येतील. >> Smiley

नाहीच जमलं तर मग खानदानी दवाखानाच्या धर्तीवर रस्त्याच्या कडेला छत्री टाकून मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डर लावावा. दोन पहिलवानांचे फोटो लावावेत म्हणजे पेशंटला वाटेल की इथे आपली तब्येत सुधारेल.
>> Smiley Smiley

Smiley महत्वाचं म्हणजे सदा न कदा वस्सकन अंगावर धावून जाण्याची सवय सोडावी आणि पेशंट आले (चुकून माकून) तर जरा मायबोलीला सुटी द्यावी (म्हणजे इतरांनाही हुश्श वाटेल). शिवाय अधून मधून आपल्या शाखेचा अभ्यास करायला कुणाची बंदी सुद्धा नाही. >> Smiley

हे माझ्या पैशाने माझ्य पैशाने काय असते बुवा?

मी २००७ मध्ये आंतरजालावर आलो आणि तेव्हापासून प्रत्येक सेकंदाचे पैसे मीच भरलेले आहेत. जेव्हा कमवत होतो तेव्हाही आणि आताही! कंपनीचा पीसी कंपनीच्या कामासाठी आणि माझा लॅपटॉप आणि माझे डेटा कार्ड माझ्या पर्सनल कामासाठी! कित्येकदा तर माझ्याच खर्चाने कंपनीची आंतरजालाची बिले भरत असे मी!

मायबोली जोवर पैसे मागत नाही आणि कंपनीच्या पैशाने आंतरजाल वापरायला जोवर एखाद्याची कंपनी परवानगी नाकारत नाही तोवर उगाच वायफळ कमेंटी का केल्या जात आहेत?

मायबोली जोवर पैसे मागत नाही आणि कंपनीच्या पैशाने आंतरजाल वापरायला जोवर एखाद्याची कंपनी परवानगी नाकारत नाही तोवर उगाच वायफळ कमेंटी का केल्या जात आहेत?>>

मुद्दे नसले की असंस्कृत वैय्यक्तिक टिप्पण्या करताना वापरायचे एक हत्यार म्हणून. Happy

कंपुच्या लोकांनी वापरले की मुद्दे समजुन स्मायली टाकायची
आणि दुसर्यांनी वापरले की असंस्कृत टिप्पण्या समजायचे Rofl
किती कोलांट्याउड्या Wink

तीन वैद्य आणि दोन रुग्ण - काय श्रीमंत व भरभराट झालेल्या संस्कृती नांदतात नाही काही पानांवर!

तमाम देशात हे प्रमाण दहा हजार रुग्णांमागे एक वैद्य असे आहे.

महिलांविषयीच्या टिप्ण्या करणारे सभ्य आहेत की असभ्य ? असले हलकट विचार असणार्‍याची संस्कृती नष्टच झाली पाहिजे

वीणा सुरु,

<<<जगातल्या सगळ्या शाखांचं ज्ञान ठेवण्यापेक्षा दोन पेशंट कसे येतील हे पहावं. ...................शिवाय अधून मधून आपल्या शाखेचा अभ्यास करायला कुणाची बंदी सुद्धा नाही.>>>> कश्याला कुणाच्या प्रोफेशनवर टिका करायची? कुणीही त्यांचं काम नीट करुन माबोवर पडिक राहिले तरी कुणाचं काय जातंय? समजा समोरच्याने वाट्टेल तश्या टिपण्ण्या केल्या तरी आपणही तसंच केलं पाहिजे असं नाही ना? सोडून द्यायचं. डॉक्टर व्यक्तीने वैयक्तिकरित्या कसं वागावं हे त्याच्यावरच सोडावं पण शिक्षक/संरक्षण दल ह्यासारखंच डॉक्टरकी हे नोबल प्रोफेशन आहे. त्या प्रोफेशनचा मान राखायला हवा. पटलं तर बघा, नाहीतर सोडून द्या.

>>>डॉक्टर व्यक्तीने वैयक्तिकरित्या कसं वागावं हे त्याच्यावरच सोडावं पण शिक्षक/संरक्षण दल ह्यासारखंच डॉक्टरकी हे नोबल प्रोफेशन आहे.<<<

नक्कीच! फक्त हे खुद्द त्या डॉक्टरांना मान्य असायला हवे ना? दुसर्‍याला उद्देशून वाट्टेल ते जाहीररीत्या लिहिल्यावरही त्यांच्या डॉक्टरकीचा सन्मान करत आरत्या करत राहायच्या की काय?

ते डॉक्टर आहेत हे फक्त त्यांनी समाजावर केलेले उपकार नाही आहेत, समाजानेही त्यांना त्याचा योग्य तो मोबदला देऊ केलेला आहे. त्यानंतर एकमेकांचा किमान आदर ठेवण्याची, तोही जाहीर स्थळावर सर्वांदेखत, काहीच जबाबदारी त्यांची नाही का?

(येथे मला एकटे 'काउ' अभिप्रेत नाहीत)

ज्यांना स्वतःचे प्रोफेशन सांगायची लाज वाटते त्यांना काय दुसर्‍यांचे प्रोफेशन बद्दल काही वाटेल Happy
काहींची असते वृत्ती Happy

नक्कीच! फक्त हे खुद्द त्या डॉक्टरांना मान्य असायला हवे ना? दुसर्‍याला उद्देशून वाट्टेल ते जाहीररीत्या लिहिल्यावरही त्यांच्या डॉक्टरकीचा सन्मान करत आरत्या करत राहायच्या की काय? >>>> जेवढ्यास तेवढं उत्तर द्यावं. भलती अहिंसा मलाही मान्य नाही. मग ती मानसिक असो वा शारिरिक. पण कुठलंच प्रोफेशन काढू नये असं मला वाटतं. प्रत्येकजण आपली रोजीरोटी कष्ट करुन ज्या प्रोफेशनने कमावतो ते कुठलंच प्रोफेशन खालच्या दर्जाचं नाही. पण त्यातही वरची तीन प्रोफेशन्स तर खूप महत्वाची आहेत.

दुसर्‍याला उद्देशून वाट्टेल ते जाहीररीत्या लिहिल्यावरही त्यांच्या डॉक्टरकीचा सन्मान करत आरत्या करत राहायच्या की काय? >>>> जनरलीच, जो जाहिररित्या दुसर्‍याचा सतत पाणउतारा करत राहतो तो स्वतःच स्वतःची सन्मानेबिलिटी (:अओ:) जगासमोर उघडी करत असतो. नॉट टू वरी.

जनरलीच, जो जाहिररित्या दुसर्‍याचा सतत पाणउतारा करत राहतो तो स्वतःच स्वतःची सन्मानेबिलिटी ( Uhoh ) जगासमोर उघडी करत असतो. नॉट टू वरी.>> +१०००००००००००००

Pages