१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
गामा, हडप्पा संस्कृतीतला हा
गामा,
हडप्पा संस्कृतीतला हा कुणी विकास पुरूष असावा. त्या काळी त्याने हडप्पा संस्कृतीचा विकास केला असावा. काय हे! या आणि इतर अनेक गोष्टी असंबद्ध, कंटाळवाण्या आहेत. गुड नाईट.
शब्बा खेर...
शब्बा खेर...
काल काही बातम्यांत काही
काल काही बातम्यांत काही गोष्टी दाखवल्या गेल्या कि प्राचीन भारतात विमानोद्दान माहित होते. प्रतिसादात दिलेल्या लिंक वर सुद्धा मंगळावर हेल्मेट वगैरे गोष्टी दिल्या आहेत. यावर माबोकरांची मते वाचायला आवडतील.
आज मैदानात पाय घसरुन पड्लो
आज मैदानात पाय घसरुन पड्लो ...
प्राचिन खोलगटपणा.
प्राचिन खोलगटपणा.
बेफिकीर, >> जसे, काँग्रेस
बेफिकीर,
>> जसे, काँग्रेस नेस्तनाबूत होणे हे आपल्या देशाच्या राजकीय भवितव्यासाठी चांगले नाही आहे.
या विधानाशी असहमत. तुम्ही ज्याला काँग्रेस म्हणता तो पक्ष १९७० साली फुटला. आताचा काँग्रेस पक्ष स्वत:च्या गैरकृत्यांनी स्वत:चेच मरण ओढवून घेत आहे. नरसिंहरावांच्या पश्चात काँग्रेसच्या मतांची अखिल भारतीय टक्केवारी सतत घसरत आहे. सतत अठरावीस वर्षे जनतेचा इशारा न ओळखता तीस पाण्यात पाहणे चुकीचे आहे.
बहुतेक तुम्हाला 'काँग्रेस नेस्तनाबूत होणे' याच्याऐवजी 'मोदींना पर्याय नसणे' असं म्हणायचं असावं. ते बरोबर असल्यास मलाही मान्य आहे. मोदींना पर्याय मिळाला पाहिजे. मात्र असा पर्याय काँग्रेसछाप सेक्युलर राजकारणी व्यक्ती असूच शकत नाही. जो काही पर्याय आहे तो या घडीपासून हिंदुत्वाच्या परीघातच असणार आहे. मोदींनी दिल्लीचं वातावरण काय मर्यादेपर्यंत ढवळून काढलंय याची लोकांना आजून नीटशी कल्पना आलेली नाहीये. सेक्युलर कंपू या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून फक्त मोदींची टिंगलटवाळी करण्यात गर्क आहे. यावर काय बोलणार!
आ.न.,
-गा.पै.
>>>बहुतेक तुम्हाला 'काँग्रेस
>>>बहुतेक तुम्हाला 'काँग्रेस नेस्तनाबूत होणे' याच्याऐवजी 'मोदींना पर्याय नसणे' असं म्हणायचं असावं. ते बरोबर असल्यास मलाही मान्य आहे<<<
होय! बेसिकली मला मोदींना (किंवा प्रत्येकच नेत्याला) एक पर्याय असावा ह्याच अर्थाने म्हणायचे होते.
पण त्याचबरोबर असेही म्हणायचे होते की काँग्रेससारखा एक तळागाळापर्यंत रुजलेला पक्ष नेस्तनाबूत होणे हेही घातक आहे. मग तळागाळापर्यंत रुजलेला कोणताही पक्ष असो, काँग्रेस तसा होता / आहे, म्हणून कॉंग्रेस म्हणालो इतकेच.
<< होय! बेसिकली मला मोदींना
<< होय! बेसिकली मला मोदींना (किंवा प्रत्येकच नेत्याला) एक पर्याय असावा ह्याच अर्थाने म्हणायचे होते.
पण त्याचबरोबर असेही म्हणायचे होते की काँग्रेससारखा एक तळागाळापर्यंत रुजलेला पक्ष नेस्तनाबूत होणे हेही घातक आहे. मग तळागाळापर्यंत रुजलेला कोणताही पक्ष असो, काँग्रेस तसा होता / आहे, म्हणून कॉंग्रेस म्हणालो इतकेच. >>
मला वाटते अजुनही साधनशुचिता, प्रामाणिकपणा ही वैशिष्ट्ये पाहता कम्युनिस्ट पक्ष हे चांगला पर्याय होऊ शकतात.
पण त्यांची पहुंच तेवढी नाही
पण त्यांची पहुंच तेवढी नाही आहे ना?
बाकी हे सगळं इथे का चाललंय
बाकी हे सगळं इथे का चाललंय कोण जाणे!
गामा पैलवान खूप सुंदर
गामा पैलवान
खूप सुंदर प्रतिसाद.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/52145?page=1#comment-3404484
बेफिकीर लिंक वर क्लिक केलं की
बेफिकीर
लिंक वर क्लिक केलं की हा संदेश येतो
हे पान पहायची परवानगी नाही.
वीणा सुरू | 6 January, 2015 -
वीणा सुरू | 6 January, 2015 - 19:56 नवीन
बेफिकीर
लिंक वर क्लिक केलं की हा संदेश येतो
हे पान पहायची परवानगी नाही.
<<<
अभिनंदन वीणा सुरू!
(No subject)
खोलगटविमानचर्चा
खोलगटविमानचर्चा
@ इब्लिस, तुमची इन्दिअन
@ इब्लिस, तुमची इन्दिअन एक्स्प्रेस ची लिंक वाचली. छान आहे व सहमत आहे. माझे असे मत आहे कि कोणतेहि शास्त्र एकांगी कसे काय डेवलप होवू शकेल. प्राचीन भारतात विमानोद्दनाची कला (किंवा शास्त्र) अवगत असेल तर त्याला पूरक असे पुरावे सापडावयास हवेत. जसे कि तो विषय अभ्यासक्रमात असणे, विमानाच्या कारखान्यांचे (थोडे तरी) अवशेष, विमानांचे सांगाडे, आकृत्या, ई. अनेक परकीय लोकांनी आपल्या देशाला भेट दिली व त्यावर पुस्तके लिहिली पण कोणत्याही पुस्तकात भारतात विमाने उडत असल्याचे लिहिल्याचे वाचनात नाही.
सर्वात महत्वाचे, विमानासारख्या शास्त्राला अनेक पूरक मुलभूत शास्त्रांची व त्यातल्या असंख्य शोधांची गरज असते. ते सर्व प्राचीन भारतात असल्याचा कोणताच पुरावा सापडत नाही.
दोन. एके ठिकाणी वाचनात (कि ऐकण्यात आठवत नाही) आले कि प्राचीन भारतीयांना पृथ्वी गोल होती हे माहित होते.; पुरावा?? जिओग्रफि साठी संस्कृत शब्द - भूगोल. पण त्याच्या अनुषंगाने इतर काहीच शोध सापडत नाहीत. ते का??
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Bh%C4%81skara_II
नालंदा विद्यापीठाला लावलेल्या
नालंदा विद्यापीठाला लावलेल्या आगीत अनेक ग्रंथ जळून खाक झाले.
नालंदा विद्यापीठाला लावलेल्या
नालंदा विद्यापीठाला लावलेल्या आगीत अनेक ग्रंथ जळून खाक झाले.>>याला पण पुरावा द्या सुरू मॅडम
आता याला कुठे पुरावा ?
आता याला कुठे पुरावा ?

तक्षशिला, नालंदा ही विद्यापिठे आणि त्यांची ग्रंथालये जगप्रसिद्ध होती त्या काळी.
पण अनेक बाह्य आक्रमणांमधे त्याची नासधूस, जाळपोळ करण्यात आली.
कारण मी सांगणार नाही. अंतर्ज्ञानाने जाणून घ्यावे.
विमाने तयार करणार्या देशाला
विमाने तयार करणार्या देशाला पुस्तकांच्या अनेक कॉप्या कराव्यात ही अक्कल नव्हती का ? नालंदा जळाले तरी बाकी देशभर त्याच्या कॉप्या नव्हत्या का ?
नालंदा जाळपोळीचे उदाहरण ऐकले की मला तो विनोद आठवतो.. गवत खाणार्या गायीचे चित्र काढा म्हटल्यावर एक मुलगा कोरा कागदच ठेवतो. चारा कुठे आहे ? गायीने खाल्ला .. गाय कुठे आहे ? पळुन गेली.
यांचे नालंदा पुराण तसेच असते.
पुरावे कुठे आहेत ? नालंदेत आहेत.
नालंदा कुठे आहे ? जळुन गेली.
भात कुठे आहे ? काउने
भात कुठे आहे ? काउने खाल्ला.

काउ कुठे आहे ? भात खाल्ल्यावर कशाला थांबेल ? भुर्र्र्र्र्र्र्र्र्र उडून गेला.
काबॉ, गमतीचा भाग जाऊ द्या, पण तुमचा काय अंदाज आहे ? काय झाले असेल त्या विद्यापिठांचे ? त्यातील ग्रंथांचे ?
सुरूबाई, नाव बदला, तुमचे माहिती नाही, निदान धाग्याचे नाव बदला. एक पर्याय

महा आखाडा
महेश.
महेश.:हहगलो:
(No subject)
एकवेळ मान्य करा की आपल्या
एकवेळ मान्य करा की आपल्या पुरातन काळात विमाने होती.
मग एक प्रश्न उठतो
त्यात इंधन कोणते वापरत होते?
याचा अर्थ भारतात विपुल प्रमाणात तेलसाठे होते आणि ते इंधन म्हणुन वापरले. इतके की शेवटी तेलसाठे संपले आणि आपले पुरान विमाने भंगारात गेली. आणि विद्या लोप पावली.
लहानपणचा खेळ आठवला. काऊ उडाला
लहानपणचा खेळ आठवला.:फिदी: काऊ उडाला भूर्र, चिऊ उडाली भूर्र, बेडुक उडाला...?
महा आखाडा नाव छानेय. देशोदेशीचे लिखाणबहाद्दर मल्ल यात येतात. कधी सकाळी, दुपारी, सन्ध्याकाळी, रात्री, पहाटे वगैरे वगैरे....स्त्री पुरुष हा भेद यात नाही हे बघुन सन्तोष जाहला.
विद्वानांनी उत्तर द्यावे
विद्वानांनी उत्तर द्यावे
नालंदेत विमानाचे पुस्तक होते
नालंदेत विमानाचे पुस्तक होते , हे मान्य केले तरी एअरपोर्ट तरी भारतभर असायला हवीत ना ? एअरपोर्ट कुठे गेले ?
http://aajtak.intoday.in/stor
http://aajtak.intoday.in/story/every-hindu-woman-must-produce-at-least-4...
जय कृष्ण गोविंद हरी मुरारी
हे नाथ नारायण वासुदेवा
Pages